Category: ठाणे

Thane news

खडकपाडा पोलिसांनी आदिवासी पाड्यावर समजावले शिक्षणाचे महत्त्व

कल्याण : खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील कातकरी पाडा वाडेघर या आदिवासी पाड्यावर खडकपाडा पो स्टे कडून भेट दिली. तेथील…

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने उद्या महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

ठाणे : ठाणे जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत दि.7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील…

चला धाऊया गेट वे ऑफ इंडिया ते डोंबिवली

कल्याण : कल्याण डोंबिवली येथील रनर्स क्लॅन फाऊंडेशनने गेट वे ऑफ इंडिया ते डोंबिवली या अर्बन अल्ट्रा दौडचे सलग चार वर्ष यशस्वी आयोजन करून मोठ्या उत्साहात पाचव्या पर्वाची मोर्चेबांधणी केली…

विज्ञानाची कास धरणे अत्यंत महत्वाचे आणि गरजेचे- रामशेठ ठाकूर

    पनवेल :आधुनिकीकरणाच्या या युगात विज्ञानाची कास धरणे अत्यंत महत्वाचे आणि गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ५२ व्या उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी केले.…

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024ची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

  ठाणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची 11 डिसेंबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या अंतरिम उत्तरसूचीवरील लेखी…

घराघरात सावित्रीमाईंचा फोटो लागलाच पाहिजे – उमेश पाटील

    ठाणे : मुली सर्वाच क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करत असून सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, प्रसंगी दगडगोटे खाऊन मुलींच्या शिक्षणासाठी सातत्याने झटत राहिल्या त्या सावित्रीबाई फुले…

सतीश प्रधान यांची रविवारी शोकसभा

    ठाणे :ठाणे शहराचे शिल्पकार सतीश प्रधान यांचे श्रेय वादातीत आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी, ५ जानेवारी सायंकाळी ४.३० वाजता सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या जनकवी पी. सावळाराम सभागृहात आयोजन…

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे,  दिनेश तायडे, अनघा कदम, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थ‍ित होते.

कल्याण-डोंबिवलीत रात्री झाडांच्या आडोशाने बसणाऱ्या ८१ गांजा व्यसनींवर कारवाई

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरातील गुन्हेगारी मोडून काढण्याचा चंग बांधलेल्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील स्थानिक पोलिसांना रात्रीच्या वेळेत झाडे, झुडपे, खाडी किनारा भागात गांजा, मद्य सेवन,…

लोणावळ्यातील संपर्क बाल ग्राम संस्था, अनाथ मुलांसाठी आशेचा किरण !

अनिल ठाणेकर लोणावळ्यातील संपर्क बाल ग्राम संस्थेला नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी आपल्या पत्नी समवेत नुकतीच  भेट दिली.  त्यांनी या सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे कौतुक करताना सांगितले की,  ही एक उल्लेखनीय संस्था आहे. जी असुरक्षित मुलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी समर्पित आहे. जवळपास तीन दशकांपासून, SAMPARC (सोशल ऍक्शन फॉर मॅनपॉवर क्रिएशन) संपूर्ण भारतातील अनाथ, वंचित, आदिवासी आणि उपेक्षित मुलांसाठी आशेचा किरण आहे, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. आमच्या भेटीदरम्यान, आम्हाला SAMPARC चे संस्थापक आणि संचालक अमितकुमार बॅनर्जी यांच्यासोबत दोन तास घालविण्याचा बहुमान मिळाला. त्याच्या संस्थेचा प्रभाव खोलवर आहे – गेल्या  २९  वर्षांमध्ये, SAMPARC ने ११ हजारहून  अधिक गरजू मुलांचे पालनपोषण आणि समर्थन केले आहे. त्यांच्या सर्वसमावेशक पध्दतीमध्ये केवळ निवाराच नाही तर दर्जेदार शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या संधी यांचा समावेश आहे. प्रत्येक मुलाचे यशस्वीरित्या पुनर्वसन आणि स्वावलंबी होईपर्यंत संस्था आपली वचनबद्धता कायम ठेवते.संपर्कमधील पाच मुलींचे पुनर्वसन करून स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही NUSI च्या (नॅशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया) उपक्रमाबद्दल माहिती दिली,  हा आमच्या भेटीतील एक महत्त्वपूर्ण उद्देश होता. या पाच  तरुणींची गोव्यातील प्रतिष्ठित नुसी मेरीटाईम अकादमीमध्ये जीपी रेटिंग प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे, त्यांच्या  शिक्षणाचा प्रत्येकी दोन लाख रुपये खर्च नुसी करणार असून, नोकरीची शाश्वती देखील देत आहे. आता सागरी क्षेत्रात अनेक करिअरच्या आशादायक संधी उपलब्ध झाल्या आहेत.  वंचित मुलांच्या यशस्वी करिअरसाठी दोन्ही संस्था एकत्रितपणे कसे कार्य करू शकतात याचे  हे चांगले उदाहरण आहे .संपर्कचे सर्वांगीण बाल विकास  समर्पण आणि प्रत्येक मुलाच्या भविष्यासाठी त्यांची कायम वचनबद्धता खरोखरच प्रशंसनीय आहे. त्यांचे कार्य तरुणांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणने समर्पित सामाजिक कृतीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे.