Category: ठाणे

Thane news

 ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन – डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

इराण-इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन – डॉ.श्रीकृष्ण पांचाळ अनिल ठाणेकर ठाणे- इराण-इस्रायल या देशांमधील संभाव्य युद्धजन्य परिस्थिती पाहता ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इस्रायल येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. या संदर्भात मंत्रालयातील आपत्कालीन संचालन केंद्राशी (SEOC) संपर्क साधण्यात आलेला असून, कोणत्याही नागरिकाकडून इराण-इस्रायल येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांना कळविण्यात येईल.याची नोंद घेवून नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे नियंत्रण कक्ष : ०२२-२५३०१७४०/९३७२३३८८२७, ठाणे पोलीस नियंत्रण कक्ष : ०२२२५४४५३५३/०२२२५४४२८२८/०२२-२५४४३६३, मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई :९३२१५८७१४३/ ०२२-२२०२७९९०

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा पाहणी दौरा

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा पाहणी दौरा कल्याण: काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांनी वालधुनी नदी परिसराचा पाहणी दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था यांनी नदीतील वाढते प्रदूषण, गाळ साचणे व पूरस्थिती याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित विभागाकडे निवेदन सादर केले. संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी उपस्थित राहून नदीची सद्यस्थिती, पूरकाळातील अडचणी व नागरिकांच्या समस्या यांची सविस्तर माहिती दिली. भवानीनगर, अनुपम नगर, घोलप नगर, योगिता, त्रिमूर्ती कॉलनी, गुरु आत्मा स्मार्ट सिटी शाळा, बंदर पाडा, मोना रोड, वालधुनी विभाग, छत्रपती शिवाजी महाराज नगर, मिलिंद नगर आदी भाग नदी पात्रालगत आहेत. जुलै महिन्यात पूर आल्यावर या परिसरातील नागरिकांना स्थलांतर करावे लागते. पाच ते सात फूट पाणी दुकाने व घरांमध्ये शिरते. पूर ओसरल्यानंतर दोन दिवस सरकारी यंत्रणेकडून साफसफाईसाठी प्रतीक्षा करावी लागते. स्थानिक नागरिकांचे स्पष्ट मत आहे की,‘आम्हाला तात्पुरती मदत नको; पण नदी कायमस्वरूपी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करा. वालधुनी नदीचे सुशोभीकरण करून पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा’. यावेळी डॉ. राजाकुमार पातकर यांनी संस्थेला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. ‘वालधुनी नदी संदर्भात कोणताही विषय असेल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.’ असे त्यांनी स्पष्ट केले. वालधुनी नदीचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, रुंदी व खोली वाढवणे, प्रदूषणमुक्ती आणि सुशोभीकरण या कामांसाठी प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

एकनाथ शिंदेंचे मिशन दुबई

एकनाथ शिंदेंचे मिशन दुबई दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी दोन खाजगी विमान व्यवस्थांची व्यवस्था दुबईच्या फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअर दोन विमानाव्दारे केली व्यवस्था   मुंबई: इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे आखाती देशातील विमानवाहतूकसेवा पुर्णता…

 कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केडीएमसीने केले गुन्हे दाखल

कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केडीएमसीने केले गुन्हे दाखल ड प्रभागक्षेत्र कार्यालयाकडून विनायक कॉलनी येथे कारवाई कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत विनायक कॉलनी परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या परिसरात घंटागाडी नियमितपणे जाऊनही काही नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा न करता सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच काही ठिकाणी कचरा साठवून अस्वच्छता निर्माण होत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन याबाबत उपायुक्त रामदास कोकरे कडक भूमिका घेत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याशी समन्वय साधून कोळशेवाडी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या सहकार्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी उपआयुक्त रामदास कोकरे, सहाय्यक आयुक्त उमेश यमगर, स्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड व उदय निकुंभ, स्वच्छता निरीक्षक सचिन सूर्वे, हितेश सोळंकी व अमित भालेराव, मुकादम किशोर जाधव, सानु वर्गीस, साहिल साठे, महेश बनकर व इतर कर्मचारी उपस्थित होते. कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना एकूण १३ समजपत्रे देण्यात आली तसेच जागेवर एन.सी. नोंदी करण्यात आल्या. गंभीर स्वरूपाच्या उल्लंघनांबाबत भारतीय न्याय संहिता, २०२३ अनुषंगाने २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस प्रशासनामार्फत सुरू आहे. महानगरपालिकेच्या नियमांनुसार प्रत्येक नागरिकाने ओला व सुका कचरा वेगळा करून निश्चित वेळेत घंटागाडीतच देणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, जाळणे किंवा साचू देणे हे कायद्याने दंडनीय असून संबंधितांविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल. स्वच्छ भारत अभियान व स्थानिक स्वच्छता नियमांच्या अनुषंगाने प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत असूनही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

कल्याण धावणार डबल डेकर कॉरिडॉरवर

कल्याण धावणार डबल डेकर कॉरिडॉरवर खाली रस्ता, मध्ये फ्लायओव्हर आणि वर मेट्रो कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या सर्व मेट्रो मार्गिका ‘डबल डेकर’ पद्धतीने उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. म्हणजेच…

पूरग्रस्तांना मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटनेकडून १ लाख २५ हजार रुपयांची मदत

पूरग्रस्तांना मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटनेकडून १ लाख २५ हजार रुपयांची मदत ठाणे: राज्यामध्ये दिवाळी मोसमात झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटने मार्फत मदत म्हणून मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटनेने आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात पुढे करत संघटनेने १ लाख २५ हजार रुपयांचा निधी नैसर्गिक आपत्ती करिता (महापूर) निधी म्हणून सरकाकडे जमा केला आहे.सदर निधीचा धनादेश २७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मंत्रालय येथे सहाय्यक संचालक वित्त विभागाचे प्रमुख धनावडे यांच्याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केला आहे.यावेळी मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सचिव निलेश मोरे,सल्लागार ज्ञानेश्वर सांडभोर सदस्य मुकेश उबाळे,प्रवीण गटकुळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर ट्रेडिंग फसवणूक प्रकरणी ठाण्यात अखेर गुन्हा दाखल

आरोपी सागर कारिवडेकर फरार अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्रातील अनेक गुंतवणूकदारांकडून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून करोडो रूपयांसह फरार झालेल्या सागर कारिवडेकर याच्यावर दोन महिन्यांच्या प्राथमिक तपासानंतर  अखेर ठाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींच्या तक्रारीनुसार, ठाणे येथील सचिन राणे आणि प्रिती राणे यांच्या कार्यालयामधून सागर कारिवडेकर नामक इसमाने अनेक गुंतवणूकदारांकडून करोडो रूपयांच्या ठेवी स्वतःच्या खात्यावर घेतल्या आणि नंतर तो हे पैसे परत देण्यास टाळाटाळ करू लागला. यामुळेच ज्यांचे कार्यालय या व्यवहारासाठी वापरण्यात आले त्या सचिन राणे यांचेही नाव आरोपी म्हणून FIR मधे समाविष्ट करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागर कारिवडेकर याने आपलीही फसवणूक केली असून तो पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळी कारणे संशयास्पद व्हिडिओ प्रसारित करून देत आहे. फरार असलेल्या सागर कारिवडेकरने पोलीसांसमोर हजर होऊन या फसवणुकीत सचिन राणे अथवा आणखी कोणी सामील असल्यास पुरावे देणे अपेक्षित आहे अशी भूमिका प्रिती राणे यांनी मांडली आहे. स्वतः फरार राहून या प्रकरणात दिशाभूल करणारी वक्तव्ये करणाऱ्या सागर कारिवडेकर याच्यावर पोलीसांकडून लवकरच कारवाई होईल अशी खात्री प्रिती राणे यांनी व्यक्त केली.या प्रकरणात आजअखेरपर्यंत कोणालाही अटक झाली नसून , पोलीसांकडून सचिन राणे यांची प्राथमिक चौकशी सुरू आहे आणि फरार असलेला आरोपी सागर सुबोध कारिवडेकर याचा शोध सुरू आहे. गुंतवणूकदारांकडून या प्रकरणात कठोर कारवाईसाठी आणि सागर कारिवडेकरला पोलीसांनी ताब्यात घ्यावे यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करण्यात येत असून दाखल तक्रारीनुसार फसवणूक करण्यात आलेली रक्कम एक कोटी अठ्ठयाहत्तर लाखाच्या आसपास असली तरी आरोपी सागर कारिवडेकरने फसवणूक केलेल्या रकमेचा आकडा आणखी मोठा असल्याची माहिती प्रिती राणे यांनी दिली आहे.दरम्यान सागर कारिवडेकर याचा शोध घेण्याचे आणि गुंतवणूकदारांकडून या प्रकरणाची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलीसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पर्यावरण पूरक होळीसाठी गोकास्ट होळी साजरी

पाटीदार समाज डोंबिवलीतर्फे कल्याण: गोमय पर्यावरण पूरक होळीसाठी गोकास्ट गाईच्या शेणापासून बनविलेले लाकूड याला मोठी मागणी आली असून अनेक ठिकाणी या प्रकारची होळी ही सोमवारी पेटविण्यात आली. अशा प्रकारची एक…

अपघात मुक्त प्रवास हेच परिवहन विभागाचे उद्दिष्ट-प्रताप सरनाईक

अपघात मुक्त प्रवास हेच परिवहन विभागाचे उद्दिष्ट-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर ठाणे, राज्याच्या परिवहन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विभागाच्या कार्याचा गौरव करताना, हा केवळ एका विभागाचा वर्धापन दिन नसून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि लोकसेवेच्या अखंड परंपरेचा उत्सव आहे,’असे प्रतिपादन केले. वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवर, अधिकारी वर्ग, कर्मचारी बांधव-भगिनी आणि नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री सरनाईक म्हणाले की, परिवहन विभाग हा राज्याच्या अर्थकारणाचा आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे. रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करणे नव्हे तर ‘अपघात मुक्त प्रवास’ हेच भविष्यात परिवहन विभागाचे उद्दिष्ट असले पाहिजे! ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच उद्योग-व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी हा विभाग थेट जोडलेला आहे. दुर्गम आदिवासी पाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुरक्षित, शिस्तबद्ध  वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे ही विभागाची अभिमानास्पद परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विभागात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यात आल्याचे सांगताना त्यांनी ऑनलाइन परवाना प्रक्रिया, डिजिटल सेवा, रस्ता सुरक्षा उपक्रम आणि अवैध वाहतुकी विरुद्धची कठोर कारवाई यांचा विशेष उल्लेख केला. ‘आपल्या कर्मचाऱ्यांचे कष्ट, समर्पण आणि शिस्तबद्ध कामगिरी हीच विभागाची खरी ताकद आहे,’ असे ते म्हणाले. उन्हाळा, पावसाळा किंवा कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असेल, परिवहन विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात, याचा अभिमान असल्याचे मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. आगामी काळात *सुरक्षित, हरित आणि स्मार्ट परिवहन* सेवा उभारणी हे शासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ता सुरक्षा जनजागृती, पर्यावरणपूरक वाहने, पारदर्शक प्रशासन आणि जनसहभाग यावर अधिक भर देऊन राज्याच्या विकासाला नवे वेग देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुटुंबियांसह उपस्थित होते.

आधारवाडी जेलमधील दोन कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

कल्याण: कल्याण आधारवाडी जेल येथे कार्यरत असलेल्या दोन जेल कर्मचाऱ्यांना लाच घेताना अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. शरद पानपाटील आणि सतीश…