Category: ठाणे

Thane news

राष्ट्रवादी महीला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकरांचा राजीनामा

राष्ट्रवादी महीला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकरांचा राजीनामा भोंदूगिरी भोवली पोलिसांकडूनही चौकशी होण्याची शक्यता ० पुणे : भोंदूबाबा अशोक खरातच्या नादी लागलेल्या रुपाली चाकणकरांना अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा…

ठाण्यात बाटली-कॅनमधून पेट्रोल-डिझेल विक्रीला बंदी

ठाण्यात बाटली-कॅनमधून पेट्रोल-डिझेल विक्रीला बंदी ठाणे : पेट्रोल आणि डिझेलचा तुटवड्याच्या पार्श्वभुमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि ज्वलनशील पदार्थांच्या गैरवापरामुळे कोणतीही अनुचित घटना घडू…

वीज दरवाढ टळली

वीज दरवाढ टळली मुंबई : महावितरणच्या पुढील पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश आज प्रसिद्ध केला आहे. महावितरणने पाच वर्षात वीजदर कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक…

रहिवासी जागेत शेड, गोदाम उभारू देणार नाही- नरेंद्र मेहता

रहिवासी जागेत शेड, गोदाम उभारू देणार नाही- नरेंद्र मेहता मिरा – भाईंदर : मिरारोड (पुर्व) परिसरातील प्लेझंट पार्क या भागात मंगळवारी सांयकाळी ८.३० च्या सुमारास मंडप डेकोरेटर्सचे साहित्य असलेल्या मोकळ्या भुखंडावर मंडप शेडला भीषण आग लागल्याची घटना घडली, मिरा भाईंदर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले, मात्र आजुबाजुला असलेल्या इमारतीमध्ये राहणा-या रहिवाश्यांच्या घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले ही घटना अतिशय दुर्देवी असल्याचे मत आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केली. सुदैवाने कोणतीही जिवितहानी यामध्ये झाली नसली तरी यामध्ये नागरिकांच्या घरातील साहित्यांचे व सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने सर्वेक्षण करुन संबधित नागरिकांच्या झालेल्या वित्तहानी बाबत योग्य उपाययोजना करुन निर्णय घ्यावा अशा सुचना आमदार नरेंद्र मेहता यांनी केल्या. घटनास्थळी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सोबत प्रभाग अधिकारी प्रियांका भोसले, अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र चव्हाण, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे, महिला व बालकल्याण सभापती श्रीम.अनिता पाटील,नगरसेवक मोहन म्हात्रे, मनस्वी पाटील, सुरेखा सोनार,मनीष पराशर उपस्थित होते.मोकळ्या जागेत उभारलेली गॅरेज, गोडाऊन, फर्निचर दुकाने, झोपड्या इ. तात्काळ हटवणे व ज्वलनशील साहित्य साठवणाऱ्या अनधिकृत ठिकाणांवर कडक कारवाईचे करण्याचे निर्देश दिले आहे. मिरा भाईंदर शहरात यानंतर नागरी वस्तीत एकही गोदाम, शेड उभारू दिले जाणार नाही असे आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले.

पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची सह-समन्वयक म्हणून नियुक्ती

पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची सह-समन्वयक म्हणून नियुक्ती उल्हासनगर: ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (अल्पसंख्यांक विभाग) तर्फे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली व इमरान प्रतापगढी यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी सह-समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही नियुक्ती त्यांच्या संघटन कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि संविधाननिष्ठ कार्यपद्धतीवरील विश्वासाचे प्रतीक आहे. काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्रातील एक बौद्धिक व जनआधारित नेतृत्व म्हणून त्यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. डॉ. इंगळे यांनी यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीत जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. डॉ. प्रशांत इंगळे यांचे बालपण कन्नमवार नगर येथे गेले असून त्यांचे शालेय शिक्षण उल्हासनगर येथे झाले. डॉ. प्रशांत इंगळे त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असताना त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत विजय मिळवून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. सन २००८ मध्ये UDCT (आताचे ICT, मुंबई) येथे SC/ST/OBC विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी आंदोलन तसेच शिक्षकांच्या रोस्टरनुसार बढतीसाठी त्यांनी प्रभावी लढा उभारला होता .सन २००५ पासून कल्याण विद्यापीठ उपकेंद्र स्थापनेसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले, ज्यामुळे कल्याण–कर्जत भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.ते बहुजन समाज पक्षाचे (BSP) माजी राज्य महासचिव असून त्यांनी आमदार (MLA) व खासदार (MP) निवडणुका देखील लढवल्या आहेत. महाराष्ट्रात व शिक्षण क्षेत्रात त्यांचा मजबूत जनाधार आहे.ते भारतीय राज्यघटनेवर दृढ विश्वास ठेवणारे नेतृत्व आहे.डॉ. प्रशांत रमेश इंगळे हे दलित पँथर चळवळीच्या समृद्ध वारशात, त्यांचे वडील स्व. पँथर रमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले नेतृत्व आहे. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांच्या वडिलांनी सन १९७२ मध्ये माजगाव डॉक येथील व्यवस्थापक पदाचा त्याग केला होता.लहानपणापासूनच त्यांनी दलित पँथर चळवळ, लाँग मार्च आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन प्रत्यक्ष अनुभवले आहे.तसेच त्यांना त्यांचे काका एस.एल. इंगळे गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले असून, डीसीपी वसंत इंगळे यांनी घाटकोपर येथील रामाबाई आंबेडकर नगर येथील गोळीबार प्रकरणानंतर अन्यायाविरुद्ध भूमिका घेत ३०० PSI सह दिलेला राजीनामा हा त्यांच्या विचारांवर प्रभाव टाकणारा ठरला आहे. पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची सह-समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ देऊ नये – रणजित यादव

कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ देऊ नये – रणजित यादव अनिल ठाणेकर ठाणे : गुरुवारी, २६ मार्चला मुरबाड तालुक्याचा दौरा करून विविध ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रे तसेच सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाच्या सर्वसमावेशक व लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक सजग व तत्पर राहावे, तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, असे स्पष्ट निर्देश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी यावेळी दिले. दौऱ्याची सुरुवात मासले ग्रामपंचायतीपासून करण्यात आली. येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. ‘एक कुटुंब एक संचिका’ उपक्रम तसेच ‘पोषण परसबाग’ यांची पाहणी करून त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक केले. महिला बचत गटांशी संवाद साधताना स्थानिक स्तरावर होत असलेल्या उपक्रमांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. न्हावे येथे ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होईल यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शेलशेत येथील अंगणवाडी तसेच किशोर व सरळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देण्यात आली. औषध साठा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, माता-बालकांचे आरोग्य व पोषण या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. यामध्ये आढळलेल्या त्रुटी तात्काळ दूर करण्याच्या सूचना देत सेवा अधिक गुणवत्तापूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सिंचन सुविधांचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. शिरवली (जानपाटलाचापाडा) येथील लाभार्थी नारायण घागस तसेच शिवळे येथील अशोक इसामे यांच्या सिंचन विहिरींची पाहणी करून आधुनिक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. टेम्भरे येथील ‘दुर्गा स्वयंसहाय्यता समूहा’कडून चालविण्यात येणाऱ्या खाकरा उत्पादन उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. या समूहाला यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे व बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ‘जनमन’ योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.संपूर्ण दौऱ्यात विकासकामांचा वेग, योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. स्थानिक पातळीवर लोकसहभाग वाढवून शाश्वत विकास साधण्यावर त्यांनी विशेष भर दिला.यावेळी गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, उप अभियंता बांधकाम जडे, उपअभियंता पाणीपुरवठा जगदीश बनकरी, गटशिक्षणाधिकारी मधुकर गोरड, सर्व विभागाचे विस्तार अधिकारी, संबंधित ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सीआरपी,  स्वयंसहाय्यता समूहाचे सदस्य तसेच पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

६२ कोटींच्या ग्रीन कर्जरोख्यानंतर घनकचरा फाईव्ह स्टार होणार का? – शानू पठाण

६२ कोटींच्या ग्रीन कर्जरोख्यानंतर घनकचरा फाईव्ह स्टार होणार का? – शानू पठाण अनिल ठाणेकर ठाणे- ठामपा आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाला एका एजन्सीने थ्री स्टार दिले आहेत. या स्टार्सची विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी खिल्ली उडविली. शर्टवर स्टार चिकटवून तसेच बॅगला स्टार लटकवून सर्वसाधारण सभेत प्रवेश केला. ठाणे महानगर पालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त सौरव राव यांनी सादर केले असून या अंदाजपत्रकावर सध्या सभागृहात चर्चा झाली. या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाचे कौतूक करून एका एजन्सीने थ्री स्टार मानांकन दिले आहे. या मानांकनाची शानू पठाण यांनी खिल्ली उडविली. छातीवर तीन तारे आणि बॅगला तीन तारे लावून शानू पठाण हे सभागृहात प्रवेशकर्ते झाले. याप्रसंगी पत्रकारांशी  बोलताना शानू पठाण यांनी, घनकचरा विभागाचे कौतूक व्हावे, हा एक विनोदच आहे. कारण, ठाणे शहरात कदाचित कचरा दिसत नसेल पण मुंब्रा, कौसा आणि दिवा भागात कचरा वहनाची व्यवस्थाच नसल्याने कचऱ्याचे ढिग लागलेले दिसत असतात. हे स्टार देताना एजन्सीने कोणत्या दुर्बिणीतून पाहिले असेल ती दुर्बिण आम्हालाही द्या, अशी टीका केली. दरम्यान, ६२ कोटींच्या ग्रीन कर्जरोख्यानंतर घनकचरा फाईव्ह स्टार होणार का, असा सवालही उपस्थित केला.

विशाल जाधव ठरला कोपरी केसरी २०२६ चा मानकरी

विशाल जाधव ठरला कोपरी केसरी २०२६ चा मानकरी ठाणे : सत्यनारायण प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ कोपरे विरार ( पूर्व ) , यांच्यातर्फे  सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त आयोजित केलेल्या श्री सत्यनारायणाच्या  भव्य यात्रे निमित्त भरवलेल्या कोपरी कुस्ती केसरी २०२६ या स्पर्धेत मिरा भाईंदर येथील श्री गणेश आखाड्यातील युवा कुस्तीपटू विशाल सुनील जाधवने  कोपरी केसरी किताबाचा मान मिळवीला. किताबाच्या झालेल्या लढतीत विशालने कल्याणच्या विजय म्हात्रेचा  अटीतटीच्या लढतीत पराभव केला. ही कुस्ती तब्बल अर्धा तास चालली .या कुस्तीमध्ये विशालने झोळी या डावावर विजयला  अखेर चित्तपट करत प्रेक्षणीय विजय संपादन केला. त्याला बक्षीस म्हणून आकर्षक चषक , गदा व ११,००० रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या कुस्ती मैदानामध्ये श्री गणेश आखाड्यातील प्रतीक बोबडे , विपीन गौतम , ओम जाधव , अनिकेत यादव यांनी देखील शानदार कुस्त्या करून कुस्तीप्रेमींची मने जिंकली . या मैदानात  ठाणे, कल्याण , भिवंडी, मुंबई उपनगर ,मुंबई शहर ,नवी मुंबई भाईंदर, पालघर येथील १५० पेक्षा जास्त  कुस्तीपटूंनी भाग घेतला . विशाल सध्या अभिनव कॉलेजच्या कला शाखेतील शेवटच्या वर्षात शिकत आहे. त्याला वसंतराव पाटील व  एन.आय.एस.कुस्ती प्रशिक्षक वैभव माने यांचे  मार्गदर्शन मिळत आहे.  . विशाल सध्या जाणता राजा कुस्ती केंद्र लोणीकंद येथे सराव करतो. या मैदानाचे पालघर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव व मीरा-भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशामन दलाचे अधिकारी .सदानंद पाटील यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली कल्याण नगरी

जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली कल्याण नगरी रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण : श्रीरामनवमी निमित्त कल्याण शहरात आयोजित करण्यात आलेल्या सकल हिंदू समाजाच्या भव्य शोभायात्रेला नागरिकांचा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा नगरसेविका हेमलता पवार, तसेच शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.  मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या शेकडो महिला, अनेक रामभक्त आणि युवक त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शोभायात्रेला कल्याण पश्चिमेतील किल्ले दुर्गाडी येथील भवानी चौक येथून सायंकाळी प्रारंभ झाला. दुर्गाडी देवीची आरती करून शोभायात्रा सुरू झाली. तिथून पुढे लालचौकी, आग्रारोड, सहजानंद चौक, देवी अहिल्याबाई होळकर चौक, टिळक चौकमार्गे पारनाका येथील श्रीराम मंदिरापर्यंत अत्यंत उत्साहात काढण्यात आली. त्यानंतर येथील श्रीराम मंदिरामध्ये महाआरती करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे या शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा भव्य चित्ररथ, महापराक्रमी श्री बजरंगबलींची आकर्षक झांकी, विविध पारंपरिक चित्ररथ, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच साहसी खेळांचे प्रात्यक्षिक यांचा समावेश होता. यामुळे नागरिकांना आपल्या पारंपरिक कला, संस्कृती आणि अध्यात्म यांचे दर्शन घडले. त्यामध्ये कल्याण कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे वंदे मातरम् ला दिडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित माहिती देणारा चित्ररथ, शीख बांधवांचे नववे धर्मगुरू गुरु श्री तेग बहाद्दुर यांच्या पराक्रमावर आधारित चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गिनिज बूक मध्ये नोंद झालेले नारायणी लेझीम पथक, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विद्यालय, उज्वला महिला मंडळ व राष्ट्रीय सेविका समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कृत भारती योग विद्याधाम संस्था, स्वराज्य मित्र मंडळ, लयभारी हास्य क्लब, कराओके, श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवा ट्रस्ट, बालक मंदिर संस्थेचे कॅप्टन रवींद्र माधव ओक शाळेचे लेझीम पथक, विश्व मांगल्य बालसभा, श्री गजानन महाराज शेगाव भक्त, श्री संत राम मारुती, सात संगिनी फाउंडेशन ट्रस्ट, बोहरा आदिवासी नृत्य, भटके विमुक्त समाजाचे मरीआई पोथराज, बंजारा समाजाच्या महिला, इस्कॉन मंदिर संस्था असे शहरातील अनेक नामांकित संस्थांचा समावेश होता. या रामनवमी उत्सवानिमित्त नागरिकांनी आपल्या घरांवर भगवे ध्वज फडकवून, रांगोळी काढून तसेच दीप प्रज्वलित केल्याने संपूर्ण शहर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात रंगून गेले होते. या शोभायात्रेचे लालचौकी, आग्रा रोड, सहजानंद चौक, पारनाका आदी मार्गावर जोरदार पुष्पवृष्टीद्वारे स्वागत करण्यात आले. तर या मार्गावर ठिकठिकाणी सामाजिक संस्था, नागरिकांकडून पिण्याचे पाणी, आइस्क्रिम तसेच सरबत वाटप केले जात होते.

चरईमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने रहिवाशांना हुसकावण्याचा डाव – संजय केळकर

चरईमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने रहिवाशांना हुसकावण्याचा डाव – संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे, सर्वसामान्य रहिवाशांना दमदाटी करुन त्यांना जुन्या इमारतीमधून हुसकावण्याचा प्रयत्न बिल्डरकडून होत असल्याचा प्रकार ठाण्यातील चरई भागात उघडकीस आला आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. या कार्यक्रमात नगरसेवक विकास पाटील, अनिल भगत, किशोर मसुरकर, राजेश गाडे उपस्थित होते. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात चरईतील एका जुन्या इमारतीमधील रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत माहिती देताना श्री.केळकर यांनी सांगितले की चरई हा ठाण्यातील जुना भाग असून येथे अनेक जुन्या इमारती आहेत. या इमारतींना अधिकाऱ्यांना हाताशी धरून धोकादायक घोषित करण्याचे आणि रहिवाशांना हुसकावून लावण्याचे प्रकार विकासकांकडून होत आहेत. रहिवाशांच्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली. बिल्डरकडून रहिवाशांना दमदाटी करण्यात येत असून रहिवासी आणि विकासक यांच्यात योग्य करार झाल्याशिवाय रहिवाशांवर घरे खाली करण्याचा दबाव आणू नये, त्यांचा हक्क अबाधित राहावा, अशा स्पष्ट शब्दांत अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती श्री.केळकर यांनी माध्यमांना दिली. या कार्यक्रमात ठाण्यातील एका सीबीएसई शाळेतील पालकही उपस्थित होते. पालक आणि शिक्षकांचा समावेश असलेल्या शाळा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करता विविध उपक्रमांच्या माध्यमातून ज्यादा शुल्क वसूल करून आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार या पालकांनी केली. याबाबत आमदार संजय केळकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित शाळेची चौकशी करून कारवाई करण्याची सूचना केली. विविध प्रकल्पांत बाधित झालेल्या रहिवाशांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. बाधित रहिवाशांना हक्काची घरे मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रेंटल घरे प्रशासनाने दिली आहेत. मात्र त्या ठिकाणी सुविधांअभावी रहिवासी नरकयातना भोगत आहेत. त्यामुळे हक्काचे घरही नाही आणि आता रेंटलची घरेही सोडण्याच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत. या प्रकरणी आता जन आंदोलनाची तयारी करत असल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली. करवसुलीबाबतही सर्वसामान्य नागरीकांना मानसिक त्रास देऊन मालमत्ता सील करणे आणि नळ जोडणी तोडण्याची कारवाई केली जात आहे. दुसरीकडे कोट्यवधींची थकबाकी असलेल्या मोठमोठ्या आस्थापना, विकासक यांना मोकाट सोडले जात आहे. सर्वसामान्य नागरीक कर भरण्यास तयार आहेत पण प्रशासनाने सापत्न वागणूक देऊ नये, अशी तंबीही केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिली.