ठाणे महापालिका क्षेत्रातील दर्शनी इमारतीच्या खड्ड्यामुळे शेजारील इमारतीस धोका
ठाणे महापालिका क्षेत्रातील दर्शनी इमारतीच्या खड्ड्यामुळे शेजारील इमारतीस धोका अनिल ठाणेकर ठाणे: महानगरपालिका क्षेत्रातील गुरुकुल सोसायटी जवळील महापालिका मंजूर नगररचना क्रमांक १ अंतिम भूखंड क्रमांक ३४१ या भूखंडावर संबंधित विकासकाने दर्शनी इमारतीचे काम करताना तीन ते चार वर्षांपूर्वी मोठा खड्डा खणून ठेवलेला आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्षांनी दिली. सदर खड्ड्यांमध्ये दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी साचत असल्याने परिसरात मलेरिया ,डेंगू सारख्या गंभीर आजारांची परिसरातील नागरिकांना लागण होत असल्याचा गंभीर प्रकार वारंवार उघडकीस आलेला आहे . त्यातच सदरच्या खड्ड्यामुळे आमच्या इमारतीच्या कंपाऊंडला तडे गेलेले असून बाजूची इमारत कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची गंभीर बाब वारंवार आपल्या निदर्शनास आणलेली,आहे ,येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . सदर गंभीर प्रकरणे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच गणेश कृपा हाउसिंग सोसायटीचे माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका यांचे कडे वारंवार तक्रारी करूनही सदर प्रकरणी कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याने येथील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे .तसेच सदर दर्शनी इमारतीची महापालिकेची सी. सी.परवानगी एप्रिल महिन्यात संपत आहे. सदर प्रकरणी त्वरित कारवाई न केल्यास महापालिकेवर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल,आपण या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागास आवश्यक त्या सूचना करून सदर समस्या सोडवावी ही नम्र विनंती.
