Category: ठाणे

Thane news

कळवा-मुंब्र्यात अहंकार विरुद्ध विकास हीच लढाई आहे – नजीब मुल्ला

– लोकसभेप्रमाणेच कळवा मुंब्रा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनाही निवडून आणायचे आहे – डॉ. श्रीकांत शिंदे   अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा निवडणुकीतील माझ्या विजयाप्रमाणेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कळवा-मुंब्रा विधानसभेतील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनाही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे जाहीर उद्गार कल्याण लोकसभेतील शिवसेना खासदार डाॅ श्रीकांत शिंदे यांनी काढले. तर कळवा मुंब्र्यात अहंकार विरुद्ध विकास हीच लढाई आहे असे मत कळवा मुंब्रा विधानसभेतील महायुतीचे उमेदवार नजीव मुल्ला यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील माता भगिनींमधील मातृशक्ती नजीब मुल्ला यांना निवडून आणणार असल्याचा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला. तर कळवा मुंब्र्यात नजीब मुल्ला यांना विजयी करुन महायुतीचे वर्चस्व निर्माण करा. असे आवाहन भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, आरपीआय – आठवले गट, आरपीआय – कवाडे गट महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांच्या निवडणुक प्रचारार्थ कळवा विभागाच्या वतीने शनिवारी सायबा हॉल, मनिषा नगर, कळवा येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिका-यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वरील मान्यवर मार्गदर्शन करताना बोलत होते. कल्याण लोकसभा मतदारसंघात  शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने माझा विजय झाला. पण कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात आपला माणूस नसल्याने माझ्यामार्फत कामे होताना त्रासही होत आहे. यासाठी पक्ष न पाहता महायुतीचा उमेदवार म्हणून नजीब मुल्ला यांना निवडून आणायचे आहे. आपल्या मतदारसंघातील आपला हक्काचा माणूस म्हणून नजीब मुल्ला यांना निवडून आणण्यासाठी प्रचाराचे नियोजन करा, असे आदेशच कल्याण लोकसभेतील शिवसेना खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी मोबाईलवरून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्रिय सहकार्याने व कल्याण लोकसभेतील खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या मदतीमुळ माझ्यामार्फत खासदार निधी व ठाणे महापालिकेचा निधी कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात खर्च झाला. यामुळेच कळवा मुंब्र्यात विकासकामे होऊ शकली. असे असताना स्थानिक आमदार या विकास कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अजितदादांनी माझ्यामार्फत १५० कोटी रुपये कळवा मुंब्र्यातील विकासकामांसाठी दिले. कळवा मुंब्र्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मराठी, हिंदी, उर्दू या भाषेतील महापालिका शाळा सुरु करणे इतर नागरी प्रश्न मार्गी लावणे या सेवाभावनेतुन कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मी लढवित आहे. कळवा मुंब्रा विधानसभेतील ४५  डजार लाडक्या बहीणींच्या आशिर्वादाने या मतदारसंघातील दादागिरी संपविणे आणि अहंकार विरुद्ध विकास यासाठी ही लढाई सुरु असल्याचे महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे महाराष्ट्राचे शीर्ष नेतृत्व व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला माता भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ही मातृशक्ती कळवा मुंब्र्यातील विधानसभेतील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना भरभरून मतदानरुपी आशिर्वाद देईल अशी आशा आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला. कळवा मुंब्र्यातील विकासासाठी शिवसेना भाजप व नजीब मुल्ला यांच्यामुळे ठाणे महापालिकेचा निधी आला आहे. पण स्थानिक आमदार याचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळेच शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षातील कार्यकर्त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत कळवा मुंब्रा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांना विजयी करुन महायुतीचे वर्चस्व येथे निर्माण करावे, असे आवाहन मेळाव्याचे अध्यक्ष  व भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले. यावेळी शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष आठवले आणि कवाडे गट आदी महायुतीतील पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून मनोगत व्यक्त करण्यात आले. सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी केले.

लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही जनतेचा कौल महायुतीला मिळेल-संजय केळकर

अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे साथ दिली तशीच साथ जनता विधानसभा निवडणुकीत महायुतीला देईल. असा विश्वास भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,रिपाई महायुतीचे उमेदवार आ. संजय केळकर यांनी व्यक्त केला.…

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांकरिता केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

ठाणे : विधानसभा मतदारसंघ 134 भिवंडी (ग्रामीण), 135 शहापूर, 136 भिवंडी (पश्चिम), 137 भिवंडी (पूर्व) व 138 कल्याण (पश्चिम) या मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून श्री.रविंदर सिंधू (IRS) हे जिल्ह्यात…

अमलीपदार्थ विक्री, व्यवसाय, वितरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा !

  मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : अमलीपदार्थ विक्री आणि त्याचा व्यवसाय अथवा वितरण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी…

१३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत प्रसारमाध्यमांना निवडणूक निकालांचे अंदाज प्रसारित करण्यास प्रतिबंध- अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे : सर्वत्र विधानसभा सार्वत्रिक २०२४ च्या  निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून निवडणूक शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निकालाचे अंदाज (Exit Poll) १३ नोव्हेंबर सकाळी…

26 व 27 ऑक्टोबर या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज स्वीकृती व वाटप असणार बंद

ठाणे : विधानसभा निवडणूक 2024 साठी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात दि.22 ऑक्टोबर 2024 पासून नामनिर्देशन अर्जाचे वाटप व नामनिर्देशन पत्र स्विकारणे ही प्रक्रिया सुरू झाली असून नामनिर्देशनपत्र स्व‍िकारण्याची…

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून 17 उमेदवारांनी केले अर्ज दाखल

तर एकूण 241 नामनिर्देशन पत्रांचे वाटप   ठाणे,दि.24(जिमाका):- ठाणे विधानसभा निवडणूक 2024 साठी नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यास सुरूवात झाली असून आज ठाणे विधानसभा मतदारसंघातून विविध पक्षांच्या एकूण 17 उमेदवारांनी नामनिर्देशन…

पनवेल येथे बुध्दिष्ट वधु-वर परिचय महामेळावे

  ठाणे.भव्य बुध्दिष्ट वधू-वर परिचय महामेळावे रविवारी २७ ऑक्टोबर रोजी ठाणे,पनवेल येथे होणार आहेत. हे महामेळावे ठाणे जिल्हा परिषदेसमोर मराठी ग्रंथ संग्रहालय येथे स.१० ते दु.२ पर्यत तर जुने पनवेल…

बडोदा-मुंबई महामार्गाच्या माथेरान डोंगरातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण

पनवेल – बडोदा-मुंबई महामार्गाच्या शेवटच्या पॅकेजमधील माथेरान डोंगर रांगांखालील शिरवली गावालगतचा पहिल्या बोगद्याचे खोदकाम ऑगस्ट महिन्यात आरपार झाल्यानंतर दूसरा बोगद्याचे खोदकाम कधी पुर्ण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. १६…

 त्या अपघातांनंतर रेमंड रियॅलिटी आक्रमक भूमिकेत

 लिफ्ट अपघातास कारणीभूत ठरलेल्या थायसन कृप एलिव्हेटर कंपनीवर गुन्हा दाखल करणार   ठाणे : ठाण्यातील टेन एक्स या गृहप्रकल्पात मंगळवारी सदोष जोडणीमुळे घडलेल्या लिफ्टच्या अपघातानंतर या प्रकल्पाचे विकासक रेमंड रियॅलिटी कंपनीने आक्रमक भूमिका घेतली आहे. एका बालकाच्या दुखापतीला कारणीभूत ठरलेल्या या लिफ्टची उभारणी आणि त्याच्या देखभालीचे काम पाहणाऱ्या थायसेन कृप एलिव्हेटर या आंतरराष्ट्रीय कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. या अपघातानंतर रेमंड रियॅलिटी कंपनीने  स्वतःहून या दुर्घटनेची सखोल चौकशी केली. या चौकशी दरम्यान सदर दुर्घटनेस थायसन ग्रुप एलिव्हेटर कंपनी जबाबदार असल्याचा निष्कर्ष कंपनीने काढला. सदर लिफ्ट कंपनीने लिफ्टची जोडणी आणि तिच्या देखभाल – दुरुस्तीचे पाच वर्षाचे कंत्राट घेतले आहे. यासंदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारनाम्याप्रमाणे, लिफ्ट मधील क्लिप तुटून चैन खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेची  जबाबदारी हि  थायसन कृप  एलिव्हेटर कंपनीची असल्याचे  रेमंड रियॅलिटीचे अधिकारी प्रशांत राठोड यांनी सांगितले. राठोड म्हणाले,आम्ही अत्युच्च दर्जाची उपकरणे, साधने वापरत हा प्रकल्प बनवलेला आहे. त्यासाठी आवश्यक त्या  सर्व बाबी पडताळत,करारनामे करत वस्तू विकत घेतलेल्या आहेत. असे असतानाही कोणाच्या तरी हलगर्जीपणामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर प्रामाणिक प्रयत्न करून देखील आमची बदनामी होत असल्याचे लेखी पत्र देत वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी रेमंड रियालिटी कडून करण्यात आली आहे . गत मंगळवारी संध्याकाळी रेमंड रियॅलिटीच्या गृहसंकुलातील टेन एक्स या प्रकल्पात इमारत क्रमांक ए (विस्ता) या ४२ मजल्याच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये तांत्रिक दोष झाल्यामुळे या लिफ्टची साखळी लिफ्ट वर कोसळली त्यामुळे लिफ्ट बंद पडून ती सेफ्टी लॉक झाली. साखळी कोसळल्यामुळे या लिफ्टच्या काचा फुटल्याने त्यात अडकलेल्या चौघा जणांपैकी एक बालक काच लागून दुखापतग्रस्त झाला. या अपघातांनंतर त्या इमारतीतील सुरक्षा रक्षकांनी लगेंचच त्याठिकाणी धाव घेत लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढून जखमी झालेल्या त्या लहान मुलावर प्रथमोपचार केले. एवढ्या मोठ्या प्रकल्पातील या दुर्घटनेनंतर त्या इमारतीतील नागरिकांनी सुरक्षेतेतेबाबत हेळसांड केल्याबद्दल थायसेन कृप एलीव्हेटर कंपनीच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या दुर्घटनेमुळे गगनचुंबी इमारतींच्या लिफ्ट उभारणी, दुरुस्ती आणि त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक ते धोरण शासनाने ठरवायला पाहिजे असल्याचे प्रतिक्रिया बांधकाम क्षेत्रात उमटत आहे.