Category: ठाणे

Thane news

निष्ठावंत शिवसैनिकांच्या उपस्थितीत राजन विचारे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

ठाणे : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे विधानसभेचे अधिकृत उमेदवार राजन विचारे यांनी आज निष्ठावंत शिवसैनिकाच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी ११:०० वा. चरई येथील  शिवसेना शाखेतून राजन विचारे…

 आरपीआय नेते जगदीश गायकवाड ॲक्शन मोडवर

 अलिबागमध्ये महेंद्र दळवी तर बेलापूरमध्ये संदीप नाईक यांना देणार दमदार समर्थन   राज भंडारी पनवेल : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू असतानाच नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यामध्ये मात्र सर्वच विधानसभा क्षेत्रात तिहेरी किंवा चौरंगी लढतीच्या तयारीत उमेदवार आहेत. यामध्ये आरपीआय १९५६ पक्षाचे कोकण विभाग अध्यक्ष जगदीश गायकवाड हे मात्र या सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या उमेदवारांना नक्कीच मदत करेन मात्र ज्या उमेदवारांना निवडून यायचे आहे त्या त्या उमेदवारांनी प्रथम माझ्याकडे जगदीश्वर मठात यावं, असं उमेदवारांना सूचित करताना त्यांनी भाजपच्यावतीने कशा पद्धतीने पनवेल महानगरपालिकेत भ्रष्टाचार करण्यात आला, दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाच्या विमानांच्या चाचण्या घेण्याचे भासवून किती भ्रष्टाचार केला जात आहे, यासह अनेक विषयांवर त्यांनी पनवेल – उरणमधील भाजपच्या नेत्यांवर आसूड उगवत आक्रमकता दाखविली. तसेच काही दिवसांपूर्वी जगदीश गायकवाड यांची उमेदवारी पक्षाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी पनवेलसाठी जाहीर केली होती. अर्ज दाखल करण्याची तारीख २९ असल्यामुळे २८ तारखेला यावर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आपल्या स्फोटक मुलाखतीमध्ये त्यांनी नवी मुंबई येथे राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप नाईक यांनी तुतारी हातात घेत उमेदवारी मिळविली आहे त्यांच्यासह अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगून इतर उमेदवारांनी जगदीश गायकवाड यांच्या घरातील जगदीश्वर मठात यावे, जो येऊन भेटेल तो निवडून येईल, असेही त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये मिश्कीलपणे सांगितले. जगदीश गायकवाड पुढे म्हणाले, भविष्यात पनवेल महानगरपालिका भ्रष्टाचारमुक्त करावी लागेल. पनवेल महानगरपालिकेची ओळख भ्रष्टाचारी महापालिका म्हणून मलिन झाली आहे. पनवेल मधील सर्व कामे निकृष्ट दर्जाची आहेत. रस्त्यांच्या कामात तर प्रचंड भ्रष्टाचार आहे. केवळ ठराविक कंत्राटदारांनाच कामे दिली जातात. आगरी-कराडी समाजातील २८८  कंत्राटदार देशोधडीला लागले आहेत. घरातील दागदागिने विकण्याची त्यांच्यावर वेळ आली. तरीही पनवेल महानगरपालिकेकडून त्यांना कामे दिली जात नाहीत. पनवेल महानगरपालिकेतील कामे केवळ चार ठराविक कंत्राटदारांनाच दिली जातात. त्यामुळे ही चौकडी नष्ट करणारी ही निवडणूक असेल असे माझे ठाम मत आहे. पनवेलकरांना मालमत्ता कराचा प्रश्न भेडसावत आहे. सत्तेत असतानाही टॅक्सच्या विरोधात मी स्वतः आवाज उठवला होता. नागरिकांना पाच वर्षे टॅक्स नको याबाबत मी व माजी नगरसेविका विद्याताई गायकवाड यांनीही ठाम भूमिका मांडली होती. चार महापालिकेंचे संदर्भ देऊन मालमत्ता कराला विरोध दर्शवला होता. त्यावेळी माझी एक व्हिडिओ क्लिप देखील चर्चेत आली होती. त्याचबरोबर टॅक्स भरणे का गरजेचे आहे याचे महत्त्व देखील पटवून दिले होते. मात्र त्याचे प्रमाण किती असावे  याबाबतही अभ्यासपूर्वक भूमिका  स्पष्ट केली होती. शहरी भागातील नागरिकांनी सिडकोला सेवा कर दिला आहे. त्यामुळे ग्रामीण भाग व शहरी भागातील नागरिकांनी किती कर द्यावा याबाबत बाजू उचलून धरली होती, असेही जगदीश गायकवाड म्हणाले. कोविड काळानंतर नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. नोटबंदीचा जबरदस्त फटका सर्वांनाच बसला. राज्यात व देशात हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. ईडी सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भाजपविरोधात प्रचंड रोष आहे. भाजपच्या या जाचाला कंटाळून नवी मुंबईत संदीप नाईक यांनी देखील पक्ष सोडला. ते वैयक्तिकरित्या देखील आमदार होऊ शकतात. मात्र त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावण्याला भाजप जबाबदार असल्याचे मत जगदीश गायकवाड यांनी व्यक्त केले. पनवेलमधील लेडीज बारचा प्रश्न गहन असून सर्व लेडीज बार बंद झाले पाहिजेत. पनवेलमध्ये रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची संख्या लेडीज बारमुळेच बळावली आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकही त्रस्त आहेत. विधानभवनात लेडीज बारविरोधात अनेकदा आवाज उठवण्यात आला. मात्र आजपर्यंत पनवेलमधील लेडीज बार का बंद झाले नाहीत? बार चालकांना कोणाचा आशीर्वाद  आहे? या धंद्यात कोण पार्टनर आहे का?  असे विविध प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. यावेळी पनवेल – उरणच्या भाजप नेत्यांवर आसूड उगवताना जगदीश गायकवाड यांनी बोलताना सांगितले की, ज्या पद्धतीने विमानतळाला दि. बा. पाटील साहेबांचे नाव द्यायला पाहिजे ते दिले गेले नाही तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून त्याचा सातत्याने उल्लेख हा पनवेल – उरणच्या आमदारांकडून केला जात आहे. आणि आता जनतेच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची वेळ आल्यानंतर विमानतळावर चाचण्या घेण्याची नौटंकी करून त्या माध्यमातून देखील पैसे लाटण्याचा जो प्रकार सुरू आहे तो जनतेच्याही लक्षात येतोय. विमानाची चाचणी घेण्यासाठी ७ लाख रुपयांचा खर्च आणि यांची ७० लाखांची बिले, हा भ्रष्टाचार सुद्धा बाहेर आलाच पाहिजे. यासाठी माझ्या दलित, मुस्लिम, आगरी, कोळी, कराडी यांच्यासह बारा बलुत जनतेने यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्र केलं, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजासाठी सुरक्षित संविधान बनवून त्यांना त्यांचे हक्क दिले आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी दिवंगत दी.बा.पाटील साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह रक्तरंजित आहुती दिल्या, जेलमध्ये गेले, गोळीबार झेलले आणि आता दिबांच्या नावाचे राजकारण करून जनतेला वेडे बनविण्याचा धंदा या निवडणुकीत बंद झाला पाहिजे, असे जनतेला आवाहन करून त्यांनी भाजपच्या नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्याचबरोबर विमानतळाच्या आंदोलनामध्ये सर्वाधिक गुन्हे माझ्यावर दाखल झालेले असतानाही माझ्या नावाचा वापर न करता भाजपने श्रेय लाटण्याचा प्रकार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

अर्ज दाखल करण्यापूर्वी आनंद दिघे यांच्या स्मारकासमोर मनसे नेते अविनाश जाधव नतमस्तक

ठाणे : शहर मतदार संघातून मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी शक्ती प्रदर्शन केले तसेच शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकासमोर…

कल्याण पूर्वेत शक्तिप्रदर्शन करत सुलभा गायकवाड यांनी भरला उमेदवारी अर्ज

 शिवसेनेतील नाराज गटाची मिरवणुकीकडे पाठ   कल्याण : कल्याण पूर्वेतील महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज गुरूवारी महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयातील निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेनेतील नाराज गटाने महायुतीच्या या मिरवणुकीकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. गोळीबार प्रकरणामुळे भाजपचे कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड तुरूंगात आहेत. त्यामुळे यावेळी भाजपने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार असल्याचे वातावरण भाजपने बुधवारी निर्माण केले होते. पण व्यस्ततेमुळे तेही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येऊ शकले नाहीत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी मंत्री कपील पाटील, आमदार कुमार आयलानी, रिपब्लिकन पक्षाचे अण्णा रोकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका माधुरी काळे सहभागी झाले होते. तिसगाव नाका येथील आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसाई हाऊस येथून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. मिरवणुकीत चित्ररथ, ढोल-ताशा, कर्णकर्कश वाद्ये यांचा समावेश होता. महायुती आणि सुलभा गायकवाड यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सजविलेल्या रथामधून उमेदवार सुलभा गायकवाड, मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, सुलभा गायकवाड यांचे कुटुंबीय उपस्थितांना अभिवादन करत होते. शिवसेनेतील स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासह शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी या मिरवणुकीकडे पाठ फिरवली होती. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्याण पूर्वेत आणून महायुतीमधील नाराजांना सूचक इशारा देण्याचा प्रयत्न केला जाणार होता. पण, या नाराजांवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची पूर्ण नजर राहणार असल्याची चर्चा आहे. मिरवणुकीच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोट अनेक वर्ष कल्याण पूर्वेतील निवडणूक शिवसेना-भाजप युतीमधून लढवत आहेत. आमदार गणपत गायकवाड यांचा दांडगा जनसंपर्क येथे आहे. अनेक विकास कामे या भागात त्यांनी केली आहेत. तोच विकासाचा अजेंडा समोर ठेऊन सुलभा गायकवाड या निवडणूक लढवित आहेत. त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल. रवींद्र चव्हाण (भाजप नेते)

‘गद्दारांना क्षमा नाही’ आणि निष्ठावंतांचे अस्तित्व टिकू द्या’

 ठाण्यात निष्ठावान शिवसैनिकांचे शक्तीस्थळावर गाऱ्हाणे, राजन विचारे यांनी भरला उमेदवारी अर्ज ठाणे : गद्दारांना क्षमा नको आणि निष्ठावंतांचे अस्तित्व टिकू द्या असे म्हणत ठाण्यातील निष्ठावान शिवसैनिकांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर राजन विचारे यांचा गुरुवारी अर्ज दाखल केल्यानंतर गाऱ्हाणे घातले. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी चरई येथील त्यांच्या कार्यालयापासून ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन केले. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे त्यांनी दर्शन घेतले. महायुतीचे उमेदवार संजय केळकर आणि मनसेचे अविनाश जाधव यांचे राजन विचारे यांच्यासमोर आव्हान आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर आमदार असले तरी, हा मतदारसंघ महायुतीसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत शिवसेना(शिंदेगट) खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना (ठाकरेगट) माजी खासदार राजन विचारे यांचा पराभव केला. या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यावर त्यांचाच प्रभाव असल्याचे दाखवून दिले होते. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राजन विचारे ४८ हजार मतांनी पिछाडीवर होते. तर, कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजीवडा या मतदारसंघातही विचारे यांना मोठा फटका बसला. परंतू, शिंदे यांच्या पक्षातील एक मोठा गट भाजप आमदार संजय केळकर यांच्या विरोधात आहे. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे काही निकटवर्तीय देखली आग्रही होते. परंतू, या मतदारसंघातून केळकर यांना उमेदवारी मिळाल्याने शिंदे गटातून माजी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच माजी नगरसेवक संजय भोईर यांनी बंड पुकारल्याचे चित्र आहे. तर, विचारे हे २००९ मध्ये ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. या पार्शभूमीवर पुन्हा एकदा ठाकरे गटाने माजी खासदार राजन विचारे यांनाच ठाणे शहर विधानसभा मतदार संघातुन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. राजन विचारे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी चरई येथील त्यांच्या कार्यालयापासून ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन केले. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे ही दर्शन घेतले. तर, अर्ज दाखल केल्यानंतर दिघे यांच्या शक्तीस्थळावर दर्शन घेऊन सर्व निष्ठावान शिवसैनिकांनी गद्दारांना क्षमा नाही आणि निष्ठावंतांचे अस्तित्व टिकू द्या, यासाठी आपले शिलेदार राजन विचारे यांचा सर्वाधिक मतांनी विजय व्हावा असे म्हणत गाऱ्हाणे घातले. 00000

मोहम्मद सालेमउद्दीनला ठाणे ‘जिल्हा नॅचरल श्री’ किताब

ठाणे : ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स संघटना आणि अमित नांदगावकर आयोजित रमेश नांदगावकर आणि रत्नप्रभा रमेश नांदगावकर स्मृती ठाणे जिल्हा नॅचरल श्री  शरीरसौष्ठव स्पर्धेत सहाव्या गटातील युनिव्हर्सल फिजिक सेंटरच्या मोहम्मद सालेमउद्दीनने…

विधानसभेसाठी लोकराज्य पार्टीच्या  16 उमेदवारांची पहिली यादी जाहिर

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी लोकराज्य पार्टीची 16 उमेदवारांची पहिली यादी ठाण्यातील पत्रकार परिषदेत जाहिर करण्यात आली. लोकराज्य  पार्टीचे महासचिव अॅड. किशोर दिवेकर यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. नरेंद्र पाटील – 172 अणुशक्ती नगर, मुंबई; निल शिवडीकर – 183 शिवडी, मुंबई; कमलेश पोखरे – 173 चेंबूर, मुंबई; संजीवनी वैती. – 155 मुलुंड, मुंबई; बाबुकुमार कांबळे – 147 कोपरी पंचपाखाडी; सुनील विश्वकर्मा – 146 ओवळा माजिवडा; जालिंदर सिनलकर – 148 ठाणे शहर, धीरज मोरे – 118 सटाणा; हेमंत कोळी – 190 उरण; अॅड.  विलास निकुम – 2 शहादा, नंदुरबार (ST); सुभाष बाविस्कर – 105 कन्नड, संभाजी नगर (औरंगाबाद); रवींद्र जाधव – 111 गंगापूर, संभाजी नगर (औरंगाबाद); भूपेंद्र गवते – 150 ऐरोली, नवी मुंबई; सौ. ज्योती गायकवाड-पवार – 174 कुर्ला, मुंबई (SC); सौ. संगीत जामनेकर – 37 बडनेरा, अमरावती आणि विशाल बगाळे – 39 तिवसा, अमरावती अशी त्यांची नावे आहेत. राज्यातील सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जाती-जमातींचा सर्वांगीण विकास साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे लोकराज्य  पार्टी चे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे मराठा बहुजनांसह सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक यांची सामाजिक मोट बांधून महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या 50 विधानसभा मतदारसंघातून आणि ज्या ज्या ठिकाणी अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमातींचे प्रचंड संख्याबळ असेल अश्या निवडक 40 ते 50 विधानसभा मतदारसंघांतून लोकराज्य पार्टीतर्फे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व अनुसूचित जातीजमातींसह इतर मागासवर्गीय बहूजनांचे प्राबल्य  असलेल्या सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी सामंजस्याने संघटितपणे निर्णय घेऊन “एकमेव उमेदवार उभा करून तो भरघोस मतांनी निवडून आणणे” हा लोकराज्य पार्टीचा ध्यास आहे, अशी माहीती लोकराज्य पक्षाचे महासचिव अॅड. किशोर दिवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 0000

ठाण्यात आजपासून प्रचाराची रणधुमाळीला सुरूवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव अर्ज भरणार अर्ज भरण्यासाठी शरद पवार आणि राज ठाकरे हे उपस्थित राहणार   ठाणे : आजचा गुरुपुष्यामृत योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड, मनसे नेते अविनाश जाधव हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे अर्ज दाखल करण्यापुर्वी तिन्ही पक्षांकडून शहरात मिरवणुका काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. आव्हाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे तर, अविनाश जाधव यांचा अर्ज भरण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. यामुळे गुरूवारपासून ठाण्यातील मतदार संघांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार असल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी-पाचपखाडी मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुक लढविणार असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. या जागेची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केली होती. परंतु शिवसेना (ठाकरे गट) या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार आणि उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असतानाच गुरुवार, २४ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला सुरूवात करणार आहेत. अर्ज भरण्यापुर्वी त्यांच्याकडून मिरवणुक काढली जाणार असून त्यात ते शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे समजते. कल्याण ग्रामीणमधील मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनासाठी सोमवारी मनसे प्रमुख राज ठाकरे हे कल्याण ग्रामीण भागात आले होते. त्यावेळी त्यांनी कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील यांची तर, ठाणे शहरातून अविनाश जाधव यांची उमेदवारी घोषित केली. अविनाश जाधव हे सुद्धा गुरुवार, २४ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जाधव यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे हे ठाण्यात येणार आहेत. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड हे चौथ्यांदा निवडणुक लढविणार आहेत. ते सुद्धा गुरुवार, २४ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आव्हाड हे मुंब्रा भागात मिरवणुक काढून शक्ती प्रर्दशन करणार आहेत. ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेले भाजपचे आमदार संजय केळकर हे वसुबारसचा मुहूर्त साधत सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पुर्वी ते मिरवणुक काढून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. असे असले तरी त्यांनी मंगळवारी दमाणी इस्टेटमधील दत्त मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात केली आहे. भाजपा घर चलो अभियानांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून यामध्ये ४०० बुथवरील पदाधिकारी घरोघरी जाऊन केळकर यांची माहिती पत्रकांचे वाटप करणार आहेत. गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी चंद्र संपूर्ण दिवस-रात्र पुष्य नक्षत्रात रहाणार असल्याने दुर्मिळ असा ‘ गुरुपुष्यामृत योग ‘ आला आहे. या दिवशी सकाळी सूर्योदयापासून ( सकाळी ६.३७ ) दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत ( शुक्रवारी सकाळी ६.३७ ) हा योग आहे. गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. तसेच चांगल्या कामांचा प्रारंभ या दिवशी करण्याची प्रथा आहे, असे पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितले.

ठाणे, पालघरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ‘जिजाऊ’ संघटना

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघामधून अपक्ष निवडणूक लढवून दोन लाखाहून अधिक मते घेत सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का देणारे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह…

‘माझी टीएमटी’ मोबाईल ॲप ची केवळ घोषणा

ठाणे : परिवहन सेवेतील प्रवाशांचा सुट्ट्या पैशाचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण केलेले माझी टीएमटी हे ॲप केवळ घोषणाच आहे का…