Category: ठाणे

Thane news

पोलिसांना सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांच्या संरक्षणात अडकवले तर नागरिक सुरक्षित कसे राहणार? – डाॅ.जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर     ठाणे : रोड सेफ्टी नावाचा प्रकारच सध्या अस्तित्वात राहिलेला नाही. सुमारे ८००-८०० पोलिसांना संरक्षणात गुंतवून ठेवले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन होणार कसे? मग, हीट अँड…

मो.ह.विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

ठाणे : जनरल एजुकेशन इंस्टिट्यूटचे मो.ह.विद्यालय व अभिरूची मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. अभिरुची मंडळ ही आजी-माजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या उत्कर्षासाठी १९७५ ला स्थापन…

आगामी निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी झटून कार्य करावे

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांना आवाहन, ठाण्यात सर्व जिल्हाध्यक्षांबरोबर संवाद       ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीच्या विजयासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी झटून काम करावे. विधानसभा…

दाेन वर्षांत भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा काेणी आणू शकले नाही

एकनाथ शिंदे यांचा टोला     ठाणे – गेल्या दाेन वर्षांत भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा सरकारवर काेणी आणू शकलेले नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे सरकारमध्ये राहिलेली महाविकास आघाडी ज्या पद्धतीने…

रस्ते दुरुस्तीच्या कामांची आयुक्त सौरभ राव यांनी पुन्हा केली पाहणी

    ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली. तीन हात नाका, माजिवडा नाका, आनंद नगर, कासारवडवली, नागला…

 ठाणे झेडपीत कर्मचाऱ्यांची वानवा

   शिक्षकांच्या ८०० पदांबरोबर तृतीय, चतुर्थ श्रेणीची एकूण १७०० पदे रिक्त     ठाणे, ता. १७ : ठाणे जिल्हा परिषदेत गेल्या काही महिन्यांपासून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने कर्मचाऱ्यांची…

डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी दिंडीत धरली फुगडी !

    अनिल ठाणेकर     ठाणे : कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आज विठू भक्तांची मांदियाळी आली. चंद्रभागा नदीत अभिषेक करून आणलेल्या विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी…

पुणे येथे कै. विनायक निम्हण राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

  पुणे : सोमेश्वर फॉउंडेशन व क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ २…

सिग्नल शाळेची अनोखी दिंडी

सुविचारांची पालखी घेतली खांद्यावर   ठाणे : पुस्तकांनी सजवलेली पालखी, सावळ्या विठ्ठल रखुमाईच्या वेशातील बालगोपाल, विविध विचारांचा संदेश देणारे फलक, ताळ, मृदुंग, लेझीम,लाठी काठी प्रात्यक्षिक करत सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनोखी दिंडी काढत पंढरीच्या विठ्ठलाला आळवले. सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध सण-उत्सवांचा परिचय करून देत त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असतो. शाळेत प्रत्येक सण-उत्सवांना विचार आणि कृतीची जोड देत उत्सव साजरे केले जातात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अशाच विचारांची पालखी खांद्यावर घेत मुलांनी दिंडी काढली. वृक्ष संवर्धन, सुविचारांचे जोपासन, आत्पातकालीन व्यवस्थापनेत असलेल्या नागरी सेवा कर्मचाऱ्यांना मानवंदना अशा विषयांचा संदेश देत सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल सायन्ना मंदिर अशी दिंडी काढली. दिंडीत पुस्तकांची पालखी, सुविचारांचे तुळशी वृंदावन, विविधांगी विचारांचे फलक, घेत टाळ-मृदुंग, लेझीमच्या गजरात ही दिंडी निघाली होती. विठ्ठल सायन्ना मंदिरात दिंडीचा समारोप झाला व तेथे मुलांनी भजन-किर्तन करत पांडुरंगाच्या रचणी आपली भक्ती अर्पण केली. 0000

विजेअभावी बदलापुरकरांवर आरोग्य, उद्योग आणि पाणी संकट

कार्यालये, बँका, शाळा, दुकानांसह सर्वसामान्य नागरिक जेरीस     बदलापूरः सुमारे तीन लाख लोकसंख्या असलेल्या आणि चौथी मुंबई अशी बिरुदावली मिरवणाऱ्या बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात बिघडलेल्या वीज वितरण व्यवस्थेमुळे आता नागरिक मेटाकुटीस आले आहेत. एकीकडे विजेअभावी पिण्याचे पाणी मिळणेही दुरापास्त झाले असताना वीज नसल्याने ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयातही वाताहत झाल्याचे चित्र दोन दिवसांपूर्वी दिसले. बदलापुरातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांवरही वीजसंकट असून उद्योग चालवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शाळा, बॅँकाचे व्यवहार आणि दुकानदार हैराण आहेत. गेल्या काही वर्षात अंबरनाथ आणि बदलापूर या चौथ्या मुंबईतील दोन शहरांची लोकसंख्या वेगाने वाढली. अनेका नामांकीत बांधकाम व्यावसायिकांनी बदलापूरसारख्या शहरात गृहसंकुले उभी केली. निसर्ग, पाणी आणि मोकळीक यामुळे शहराला नागरिकांनी पसंती दिली खरी मात्र आता शहराच्या लोकसंख्येला पायाभूत सुविधा पुरवणे यंत्रणांना कठीण होते आहे. त्यातही विजपुरवठा यंत्रणा काळानुरूप सक्षम झाली नाही. गेल्या काही दिवसात येथील महावितरणाच्या यंत्रणेने वीज पुरवठा करण्यासाठी सक्षम नसल्याचे दाखवून गुढघे टेकले आहेत. त्याचा परिणाम संपूर्ण शहरातील नागरिकांच्या आयुष्यावर होतो आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणेलाही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शहरात पाणीबाणी आहे. खुद्द प्राधिकरणाने याबाबत नागरिकांना सूचीत करत पाणी व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले आहे. जलशुद्धीकरण केंद्राला होणारा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी स्थानिक आमदार, महावितरणाचे वरिष्ठ आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क सुरू असल्याचे प्राधिकरणाच्या अभियंत्या माधुरी पाटील यांनी सांगितले आहे. दोनच दिवसांपूर्वी एका रोहित्राच्या दुरूस्तीमुळे येथील उपजिल्हा रूग्णालयाला पाच तास विजेविना काढावे लागले. रूग्णालयाची पर्यायी व्यवस्था सक्षम नसल्याने रूग्णांना त्याचा फटका बसला. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर महावितरणाकडून रूग्णालायातील रोहित्राची दुरूस्ती करण्याऐवजी थेट नवे रोहित्र बसवून देण्यात आले. सहा महिन्यात २७५ वेळा वीज खंडीत आधीच औद्योगिक वसाहतींभोवती वाढलेल्या रहिवासी इमारतींमुळे धोक्यात सापडलेल्या आणि स्थलांतरणाची टांगती तलवार असलेल्या बदलापूरच्या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना आता सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याचा फटका बसतो आहे. येथील उद्योजकांच्या बदलापूर इंडस्ट्रीयल वेल्फेअर असोसिएशन अर्थात बिवा संघटनेने गेल्या सहा महिन्यात २७५ वेळा वीज पुरवटा खंडीत झाल्याची नोंद केल्याची माहिती संघटेनेचे अध्यक्ष कुशल जैन यांनी दिली आहे. या औद्योगिक क्षेत्रात २९० कंपन्या असून त्यात कापड उद्योग, रसायन आणि अभियांत्रिकी कंपन्यांचा समावेश आहे. रासायनिक कंपनीत प्रक्रियेवेळीच वीज खंडीत झाल्यास काही अपघात घडण्याचीही भीती जैन यांनी व्यक्त केली आहे. शाळा, कार्यालयांनाही फटका सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे लहान शाळा, दुकानदार, कार्यालयांनाही फटका बसतो आहे. बॅंकांचे कामही विजेअभावी खोळंबते. तर शीतगृह, शीतकपाट असणाऱ्या दुकानदारांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे.