Category: ठाणे

Thane news

‘ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यामुळे आपत्ती नियंत्रण जलद होईल’

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर त्याची आगाऊ सूचना नागरिकांना मिळावी, यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या प्रकारच्या यंत्रणेची आवश्यकता या प्राथमिक कृती आराखड्यामुळे अधोरेखित झाली आहे. एखाद्या आपत्तीचा इशारा मिळाल्यानंतर त्याच्याशी निगडित यंत्रणांनी कशाप्रकारे जलद गतीने त्या आपत्तीचा सामना करावा, त्याचे अपेक्षित परिणाम काय आहेत, याची एक प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यास ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्याची मदत होईल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या काळात साचणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूर स्थितीचा धोका नियंत्रणात आणण्यासाठी ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्याची प्राथमिक रुपरेषा गुरूवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना सादर करण्यात आली. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात साठणारे पाणी, भरतीच्या काळात असताना पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्यापासून होणारा अडथळा, महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे, नाल्यातील कचऱ्याचा उपद्रव आदींमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही प्रसंगात जीवितहानी होण्याचीही भीती असते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून ही पूर सदृश स्थिती कशी हाताळायची, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेसाठी कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हार्यन्मेंट अॅण्ड वॉटर (सीईईडब्ल्यू) ही वातावरण बदल क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था या कृती आराखड्याचे काम करत आहेत. याच संस्थेने महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका यांच्यासोबत ठाणे महापालिका क्षेत्रासाठी उष्णता उपाययोजना कृती आराखडाही (Heat Action Plan) तयार केला आहे. आपत्ती नियंत्रणात प्रत्यक्ष घटनास्थळी काम करणारे कर्मचारी यांचे अद्ययावत प्रशिक्षण आणि नागरिकांमध्ये कमालीची जागरूकता या दोन गोष्टींचाही उहापोह या कृती आराखड्यात करण्यात आला आहे. तो महत्त्वाचा असून एखाद्या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हाताशी असल्यास प्रतिसाद जलद देता येतो. त्याशिवाय, माध्यमांच्या मदतीने नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांनाही आपत्तीबाबत सजग करता येते. आवश्यकता असल्यास त्यांचे तात्पुरते विस्थापन करता येते, असेही राव यांनी स्पष्ट केले. नाल्यात पडणारा कचरा ही शहराची मोठी समस्या आहे. हा कचरा रोखण्यासाठी काय आणि कसे उपाय करता येतील, नागरिकांचे प्रबोधन कसे करता येईल, त्यांना कचरा टाकण्यासाठी सोयीचे कोणते पर्याय देता येतील, याचा विचार करून उपाय सुचवण्याची सूचना आयुक्त राव यांनी ‘सीईईडब्ल्यू’च्या प्रतिनिधींना केली. सहा महिन्यांपासून या कृती आराखड्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभाग यांच्याकडून मिळालेली माहिती तसेच, आपत्ती व्यवस्थापनबाबतच्या शास्त्रीय संकल्पना आदींची सागंड घालून सीईईडब्ल्यू यांनी प्राथमिक कृती आराखडा तयार केला आहे. त्यात, पूर स्थितीस कारणीभूत घटक, त्यावरील अल्प आणि दीर्घ कालीन उपाय, त्यातून साध्य होणारा परिणाम आणि नागरिकांना त्याचा होणार उपयोग आदींबाबत मुद्द्यांचा समावेश आहे. हा प्राथमिक अहवाल आता महापालिकेच्या संबंधित सर्व विभागांना देण्यात आला असून त्यावर त्यांची मते आणि सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. सीईईडब्ल्यूचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी नितीन बस्सी आणि विश्वास चितळे यांनी हा अहवालाचे सादरीकरण करून त्याची प्रत महापालिका आयुक्त सौरभ राव यांना प्रदान केली. याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे,  सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आदी उपस्थित होते.

वाल्मिकी बेडर सामाजिक संस्थेचे सभासद महायुतीच्या पाठीशी

डोंबिवली : वाल्मिकी बेडर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वाल्मिकी बेडर सामाजिक संस्थेने कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज डोंबिवली येथे भेट घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. वाल्मिकी बेडर सामाजिक संस्थेचे सदस्य असलेली शेकडो कुटुंबे कल्याण लोकसभेत वास्तव्याला आहेत. हे सर्वजण सक्रियपणे महायुतीच्या पाठीशी उभे राहणार असून कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या अभूतपूर्व विकासाने प्रभावित होऊन आपण हा पाठिंबा देत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वाल्मिकी बेडर सामाजिक संस्थेचे आभार व्यक्त केले असून येत्या २० मे रोजी सर्वांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान करण्यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.  

आमच्या पध्दतीने काम केल्यास त्याला जबाबदार पोलीस

जितेंद्र आव्हाड यांचा इशारा ठाणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. अशातच शरद पवार गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांकडून विनाकारण नोटीसा पाठविण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच या नोटीसा मागे न घेतल्यास आमच्या पध्दतीने काम केल्यास त्याला जबाबदार पोलीस असतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. येत्या २० मे रोजी ठाण्यात पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ठाणे पोलिसांकडून चुकीच्या पध्दतीने ऐन निवडणुकीच्या काळात १४४ – २ अंतर्गत नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार १५ ते १९ मे पर्यंत फिरकू नये असे सांगितले जात आहे. परंतु एखाद्या कार्यकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही, अशा व्यक्तींवर नोटीस बजावणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. त्याचा एवढाच गुन्हा आहे की तो निवडणुकीत प्रभावी ठरू शकणार आहे, त्यामुळेच त्याच्यावर नोटीस बजावण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी पक्षातील अनेकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांना नोटीसा बजावल्या जात नाहीत. केवळ अशा पध्दतीने टारगेट करुन त्याला ऐन निवडणुकीच्या काळात घराबाहेर काढण्याचाच हा प्रयत्न असून पोलीस दबावाखाली काम करीत असल्याचेही ते म्हणाले. परंतु ज्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे, त्याला मी माझ्या गाडीतून घेऊन फिरणार आहे, करा तुम्हाला काय कारवाई करायची आहे, असा इशाराही त्यांनी दिला. या संदर्भात निवडणुक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे ही नोटीस मागे घ्यावी अन्यथा उलटी पावले उचलावी लागतील, वेळ प्रसंगी बंद पाळावा लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

बोगस कुष्ठरोगी दाखवून लाटले कोट्यवधी रूपये

‘ठाण्यात कुष्ठरूग्ण घोटाळा’ अनिल ठाणेकर ठाणे : स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनेक पुरस्कार घेणाऱ्या ठाणे महानगर पालिकेमध्ये “कुष्ठरूग्ण” घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. ठाणे पूर्वेकडे असलेल्या  कोपरी विभागात  फक्त १०० ते १५० कुष्ठरूग्ण असताना सुमारे ७१० जणांना ठाणे महानगर पालिकेकडून प्रत्येकी २४ हजार रूपयांचा निधी वाटप केला आहे. या अतिरिक्त लाभार्थ्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची नावे असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता अजय जेया यांनी उघडकीस आणला आहे. या घोटाळ्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा मोठा सहभाग असल्याचा आरोपही जेया यांनी केला आहे. अजय जेया यांनी ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली मिळविली आहे.   ठाणे पूर्वेकडील  कोपरी येथील गांधीनगर ही वसाहत आहे. या वसाहतीमध्ये राहणाऱ्या कुष्ठरुग्णांना दरवर्षी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून, प्रत्येकी २४ हजार रुपयांची मदत केली जाते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे,  या भागात शंभर ते सव्वाशे कुष्ठरूग्ण असताना  ७१० कुष्ठरुग्णांची नावे लाभार्थी म्हणून यादीत समाविष्ट  केली आहेत. साधारणपणे ३५० जणांचे बोगस प्रमाणपत्रे बनवून, त्यांच्या नावाखाली लाखो रुपये लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कुष्ठरोग निधीच्या नावाखाली, गेल्या अनेक वर्षांपासून, ठाणे महानगरपालिकेची फसवणूक करण्यात येत असून, यामागील खरे सूत्रधार ठाणे शहराचे माजी महापौर आणि ठाणे लोकसभेचे विद्यमान उमेदवार नरेश म्हस्के हेच असल्याचा थेट आरोप अजय जेया यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला आहे. दरम्यान,  या घोटाळ्यासंदर्भात अधिक माहिती देताना समाजसेवक अजय जेया पुढे म्हणाले की, नौपाडा कोपरी प्रभाग समितीत काम करणारे  अधिकारी अकबर शेख , नरेश म्हस्के यांच्या सूचनेनुसार, कुष्ठरोग निधी मिळण्याबाबतचे अर्ज लाभार्थ्यांना वितरित करतो, त्यानंतर याच परिसरात वास्तव्यास असणारा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हील हॉस्पिटल) कर्मचारी असणारी ॲलेक्स फर्नांडिस ही व्यक्ती यादीतील सर्व लाभार्थ्यांचे बोगस प्रमाणपत्र बनवते.  त्याबाबतचा मोबदला तो रोख पैशाच्या स्वरुपात घेतो. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर, ७१० लाभार्थ्यांपैकी अवघ्या १०० ते १५० कुष्ठरुग्णांना  24हजार रुपये दिले जातात . या कामी शिंदे गटाचे  शाखाप्रमुख, उप-शाखाप्रमुख व महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग असल्याचा आरोप अजय जेया यांनी  केला. याप्रकरणी शासनाचे कुष्ठरोग विभाग, ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन, कुष्ठरोग निधी घोटाळ्यामागील मुख्य सूत्रधार नरेश म्हस्के यांच्यावर कठोर, कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी समाजसेवक अजय जेया यांनी केली आहे.

‘नालेसफाई केल्यावर काढून ठेवलेला गाळ तत्काळ उचलण्यात यावा’

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांचे निर्देश ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या नालेसफाईची कामे सुरू आहेत. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा काढला जात असून तो रस्त्यावर जास्त काळ न ठेवता तत्काळ उचलण्यात यावा. परिसरात दुर्गंधी पसरू नये, अशा सूचना ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शुक्रवारी नौपाडा, कोपरी, वागळे इस्टेट या भागातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी गाळ उचलण्याबाबत सूचना दिला. ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील नाल्याच्या कामाचीही पाहणी रोडे यांनी केली. नालेसफाईच्या कामांचा वेग वाढवून कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेेळेत ही कामे पूर्ण करण्यात यावे. त्यासाठी दैनंदिन स्वरुपात या कामांचा आढावा घेण्याच्या सूचनाही रोडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागास दिला. या पाहणीच्या वेळी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)  तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी उपस्थित होते.

निवडणूक तयारीचा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत- एस.चोक्कलिंगम ठाणे: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक च्या ठाणे जिल्ह्यातील तयारीचा प्रधान सचिव व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज निवडणूक तयारीचा आढावा घेतला.…

आज कामोठेत कुस्तीच्या दंगली

‘परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्ती सामन्यांचे आयोजन; पै. देवा थापा आणि पै. नविन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते डॅशिंग युवा नेते परेश ठाकूर…

ठाण्यातील १५० शाळांमध्ये झाले सर्वंकष स्वच्छता अभियान

मतदान केंद्र आणि परिसर स्वच्छ करण्यावर भर महापालिका आणि खाजगी शाळांचा सहभाग ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार, २० मे रोजी होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील १५० शाळा…

शिवाजीपार्कवर आज ‘मनसे’ कमळ फुलणार

स्वाती घोसाळकर मुंबई : दादरचे शिवाजीपार्क अनेक एतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. भारतातील सर्वपक्षीय अनेक दिग्गज नेत्यांनी या मैदानावर सभा गाजवल्या आहेत. याच एतिहासिक सभांच्या मालिकेत भर टाकणारी सभा उद्या शुक्रवारी दादरच्या शिवाजी…

मुरबाड भागात बस न पाठविल्याने कथोरे समर्थक नाराज

मोदींच्या कल्याणमधील सभेसाठी कल्याण : भिवंडी लोकसभेचे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरे हातात हात घालून एकत्रित प्रचार करत असताना पाटील समर्थक काही पदाधिकारी कथोरे समर्थकांना लोकसभा निवडणूक वातावरणातही दुजाभावाची वागणूक देत असल्याने कथोरे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी कल्याणमध्ये प्रचार सभा होती. या सभेसाठी मुरबाड भागातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांनी अधिक संख्येने यावे म्हणून या भागाचे आमदार किसन कथोरे यांनी जय्यत तयारी केली होती. या तयारीप्रमाणे कपील पाटील यांच्याकडून मुरबाड भागात या कार्यकर्त्यांना कल्याण मधील सभा ठिकाणापर्यंत आणण्यासाठी बसची व्यवस्था केली जाईल, असे आमदार कथोरे समर्थकांना वाटले होते. परंतु, ठरल्याप्रमाणे मुरबाडमधील काही भागात भाजप कार्यकर्त्यांना आणण्यासाठी पाटील समर्थकांकडून बस पाठविण्यात आल्या नाहीत, त्यामुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे समजते. सकाळी ११ वाजल्यापासून मुरबाड मधील अनेक नागरिक, भाजप कार्यकर्ते आपल्या गावच्या नाक्यावर उमेदवार कपील पाटील यांच्याकडून पाठविण्यात येणाऱ्या बसची वाट पाहत बसले होते. शेवटपर्यंत बस न आल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. मोदी यांच्या सभेसाठी विशेष निमंत्रितांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष अति महत्वाच्या व्यक्तिंसाठी तयार करण्यात आलेल्या प्रवेश पासवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, श्रमजिवी संघटनेचे विवेक पंडित, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील असे एकूण २८ जणांच्या प्रतिमा आहेत. या मध्ये मुरबाड मतदारसंघाचे आमदार असुनही आणि या भागाचे तारांकित प्रचारक असुनही किसन कथोरे यांची या विशेष पासवर प्रतिमा नाही. त्यामुळेही कथोरे समर्थक नाराज झाले आहेत. कपील पाटील यांना कथोरे यांच्या प्रचार कामाविषयीची माहिती आहे, पण कपील पाटील यांचे उजवे, डावे समर्थक कथोरे यांना प्रत्येक गोष्टीत डावलून पाटील आणि कथोरे यांच्यात दुरावा निर्माण करत असल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारे कटु वातावरण आवश्यक नसताना ते मुद्दाम निर्माण केले जात असल्याबद्दल भाजपच्या मुरबाड भागताली अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्य्रांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाटील समर्थकांनी मात्र मुरबाड भागात वेळेवर बस पाठविल्या होत्या, असे सांगितले. कथोरे गावागावात मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असल्याने त्यांच्या विजयासाठी कपील पाटील या्ंच्या विजयासाठी कथोरे यांनी मुरबाड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गाव पिंजून काढला आहे. कोणत्याही परिस्थितीत पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यासाठी कथोरे प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. कोट “भिवंडी,कल्याणमधील महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आपण कपील पाटील यांचा कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार करत आहोत. कोठेही नाराजी, कुरबुरीचे वातावरण नाही. कुठे असेल तर ते तात्काळ शमविले जाते. काल मोदींच्या सभेसाठी मुरबाड भागातून बहुतांशी कार्यकर्ते दाखल झाले होते.” किसन कथोरे, आमदार, मुरबाड विधानसभा.