Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

महाराष्ट्राला सागरी जलतरण,कबड्डी, सॉकरमध्ये कांस्य

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६ महाराष्ट्राला सागरी जलतरण,कबड्डी, सॉकरमध्ये कांस्य दिक्षा यादवला रौप्‍यपदकाची हुलकावणी, कबड्डीत निसटता पराभव, सॉकरमध्ये अपयशी झुंज दीव:  खेलो इंडिया बीच स्‍पर्धेत महाराष्ट्राच्‍या खेळाडूंनी सागरी जलतरण, कबड्डी व सॉकरमध्येही कांस्यपदकांची लयलुट केली आहे. सागरी जलतरणात साताऱ्याच्‍या दिक्षा यादवचे रौप्‍यपदक  अवघ्या ७ दशांश सेकंदाने हुकले. पुरूषाच्‍या बीच कबड्डीत केवळ ३ गुणांनी महाराष्ट्र उपांत्‍य फेरीत पराभव स्‍वीकारावा लागला. दीवमधील अरबी समुद्रात सकाळच्‍या सत्रात १० कि.मी. सागरी जलतरणाचा थरार रंगला. महिलांच्‍या गटात सुरूवातीपासून महाराष्ट्राच्‍या २० वर्षीय  दिक्षा यादवे मुसंडी मारली होती. दुसऱ्या फेरीत ती मागे पडली. अखेरच्‍या टप्‍प्‍यात २.४८.०४ वेळ नोंदवून तीने कांस्य पदकाचा पल्‍ला गाठला. अवघ्या ७ दशांश सेकंदाने कर्नाटकच्‍या असरा सुधीरने रौप्‍य पदक तर २.४६.३४ वेळेत कर्नाटकच्‍याच अश्मिता चंद्राने सुवर्णपदकावर नाव कोरले. गतवर्षी याच प्रकारात दिक्षाने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. साताऱ्यातील दिक्षा ही  पुण्यातील शासनाच्‍या क्रीडा प्रबोधिनीत सराव करते. खेलो इंडिया विद्यीपीठ स्‍पर्धा, खेलो इंडिया युवा स्‍पर्धा तर खेलो इंडिया बीच स्‍पर्धेत १६ पदके जिंकण्याचा पराक्रम तीने केला आहे. महाराष्ट्रातील विजेत्‍यांची भेट घेत पथकप्रमुख नवनाथ फडतरे यांनी अभिनंदन केले आहे. घोघला समुद्र किनाऱ्यावर रंगलेल्‍या बीच सॉकर मैदानात महाराष्ट्राच्‍या मुलांनी साखळी लढतीत चमकदार कामगिरी करत उपांत्‍य फेरीत मुसंडी मारली होती. उपांत्‍य लढतीत बलाढय केरळकडून १६-१  गोलने महाराष्ट्र पराभूत झाला. या कामगिरीमुळे सलग दुसऱ्या वर्षी कांस्य पदकावर महाराष्ट्राला समाधाव मानावे लागले. बीच कबड्डीतील पुरूषांची महाराष्ट्र विरूध्द हरियाणा लढत लक्षवेधी ठरली. पूर्वार्धात अभिषेक गुंगेसह सुरज दूंदळे यशस्‍वी चढाय्या करीत लढतीत चुरस कायम राखली होती. पूर्वार्धात १५ -१७ गुणांनी हरियाणा आघाडीवर होता. हीच आघाडी निर्णायक ठरली. उत्तरार्धात तुल्‍यबळ खेळाचे प्रदर्शन करीत शेवटच्‍या मिनिटापर्यंत ३०-३० बरोबरी करण्यात महाराष्ट्र यशस्‍वी ठरला होता. शेवटच्‍या मिनिटाला हरियाणाने यशस्‍वी चढाई करीत महाराष्ट्राला ३ गुणांनी पराभूत करीत ३३-३० गुणांनी बाजी मारली. महिलांच्‍या उपांत्‍य सामन्‍यात राजस्‍थानकडून महाराष्टाला ५६-२८ गुणांनी पराभूत व्‍हावे लागले. उपांत्‍य फेरीतील अपयशामुळे महाराष्ट्राच्‍या दोन्‍ही संघाला कांस्यपदकावरच खेलो इंडिया मोहिमाचा समारोप करावा लागला आहे.

 महिला लीगच्या उद्घाटनीय सामन्यास ७५० शिक्षकांची  उपस्थिती

महिला लीगच्या उद्घाटनीय सामन्यास ७५० शिक्षकांची  उपस्थिती डॉ विशाल कडणे यांच्या माध्यमातून क्रीडा प्रेमी शिक्षकांसाठी ७५० तिकिटांची मोफत भेट मुंबई : मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ आणि मंडळाचे प्रमुख डॉ. विशाल कडणे यांच्या पुढाकाराने खरेदी केलेल्या तिकिटामधून, मुंबईतील क्रिकेटप्रेमी शिक्षकांसाठी महिला प्रीमिअर लीग २०२६ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या बहुचर्चित उद्घाटन सामन्याची मोफत तिकिटे देण्यासाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्यमातून निवड झालेल्या ७५० क्रीडा प्रेमी शिक्षकांना सदर सामन्यास मोफत उपस्थिती लावण्याचे भाग्य प्राप्त होणार आहे या उपक्रमास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षकांसाठी हा अनोखा क्रीडा अनुभव साकारता आला.  लकी ड्रॉचा निकाल ५ जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता, निवड झालेल्या ७५० भाग्यवान शिक्षकांना कळविण्यात आले आहे. या ५७ व्या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक किरण शेलार व आचार्य पवन त्रिपाठी यांनीही शिक्षकांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले. विजेत्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, मंडळाच्या वतीने अशा प्रेरणादायी उपक्रमांची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

आनंद भारती, महाराष्ट्र लोककलावंततर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

आनंद भारती, महाराष्ट्र लोककलावंततर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ठाणे : श्री आनंद भारती समाज आणि महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रितांच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री आनंद भारती समाजाचे सचिव संदिप कोळी…

शहाबाज पटेल यांना निवडून येण्याचा ठाम विश्वास

शहाबाज पटेल यांना निवडून येण्याचा ठाम विश्वास प्रभाग ३-ड मधून राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर पटेल लढवताहेत निवडणूक राज भंडारी पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३-ड मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार…

 काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेशचंद्र राजहंस यांची प्रचारात आघाडी

काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेशचंद्र राजहंस यांची प्रचारात आघाडी विजयी झाल्यास वार्डातील विकास कामे करण्याचे सुरेशचंद्र राजहंस यांचे आश्वासन मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली असून काँग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी…

 मतधिकार ॲपच्या प्रचारासाठी नौपाडा प्रभाग समितीची जोरदार मोहीम

मतधिकार ॲपच्या प्रचारासाठी नौपाडा प्रभाग समितीची जोरदार मोहीम ठाणे :  लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ व्हावी, या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या निवडणूक मतधिकार ॲपचा व्यापक…

 काँग्रेसचे उमेदवार पोरके; पक्षाने सोडली साथ

काँग्रेसचे उमेदवार पोरके; पक्षाने सोडली साथ हरिभाऊ लाखे नाशिक : निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच पक्ष आक्रमकपणे प्रचारात उतरले असताना काँग्रेस मात्र कोमात असल्याचे चित्र आहे. निवडणुकीत उमेदवारांना ताकद देण्याची गरज असताना…

वंदे मातरम आता ‘व्होट बँक मातरम’ बनलंय – शहजाद पूनावाला

वंदे मातरम आता ‘व्होट बँक मातरम’ बनलंय – शहजाद पूनावाला अनिल ठाणेकर ठाणे, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेले “वंदे मातरम” आता व्होट बँक मातरम बनले आहे. काही लोकांकरीता ही व्होट…

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचा टपाली मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचा टपाली मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद अनिल ठाणेकर ठाणे: राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता…

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचाल

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचाल एकाच दिवशी ७७८ ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिली माहिती अशोक गायकवाड रायगड-अलिबाग: शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री समृद्ध…