Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

 मुंबई स्नायपर्सच्या विजयात जेना सूर्या चमकली

बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग साउथ मुंबई मॅनियाक्सवर दोन गुणांनी मात मुंबई, २७ ऑगस्ट: ऑलिंपिया स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सतर्फे आयोजित आणि नॉर्थ मुंबई डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशनच्या विद्यमाने खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगच्या (बीडीएल) मुंबई पर्वात, १३-वर्षांखालील मुलींच्या गटातील चुरशीच्या सामन्यात मुंबई स्नायपर्सने साउथ मुंबई मॅनियाक्सचा ३९-३७ (मध्यंतरापर्यंत १५-१२) असा पराभव केला. या विजयात जेना सूर्याने मोलाची भूमिका बजावली. गोरेगाव (पश्चिम) येथील विबग्योर हायस्कूलच्या कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत स्नायपर्सच्या आक्रमणाची धुरा सांभाळणाऱ्या जेनाने सर्वाधिक २४ गुण नोंदवत संघाला विजय मिळवून दिला. साउथ मुंबईकडून इंचारा कडलीने १७ गुण मिळवले. तत्पूर्वी, रायगड क्रॉसर्सने ४५-१९ (मध्यंतर १८-१०) असा सहज विजय मिळवला. रायगड क्रॉसर्सकडून वाणी मेनन (११ गुण), टियाना सिक्वेरा (१० गुण) आणि बरजाताने (८ गुण) सर्वाधिक योगदान दिले. मुलांच्या गटात चुरशीच्या सामन्यात, साउथ मुंबईने मुंबई स्निपर्सवर एका गुणाने विजय मिळवला. विजेत्या संघाकडे मध्यंतरापर्यंत २९-२८ अशी निसटती आघाडी होती. त्या आधी, एका एकतर्फी सामन्यात जेबी नवी मुंबईने पुणे ग्लोबल स्पोर्ट्सवर ७१-३५ (मध्यंतर ३६-२४) असा विजय मिळवला. निकाल (मुली): रायगड क्रॉसर्स (वाणी मेनन ११, टियाना सिक्वेरा १०, बरजाता ८) विजयी विरुद्ध नवी मुंबई स्पोर्ट्स स्ट्रायडर्स (रिया जैन ६) – ४५-१९ (मध्यंतरापर्यंत १८-१०). मुंबई स्नायपर्स (जेना सूर्या २४) विजयी विरुद्ध साउथ मुंबई मॅनियाक्स (इंचारा कडली १७) – ३९-३७ (मध्यंतरापर्यंत १५-१२). मुले: साउथ मुंबई मॅनियाक्स (मोईन के. २५, तनाय बदानी ९) विजयी. मुंबई स्निपर्स (जोहान जोशुआ ३०, झायाद एस. ११) – ६०-5९ (HT: २९-२८). जेबी नवी मुंबई (अर्नेश गांगुली २5, अभिर शेट्टी १२, ज्ञान पारेख १०) पुणे ग्लोबल स्पोर्ट्स (वेदांत कदम २०) – 7१-३5 (३६-२4) असा पराभव केला.

बॉम्बे जिमखाना स्क्वॉश स्पर्धेसाठी ६९० प्रवेशिका

मुंबई, २७ ऑगस्ट: ५९ व्या बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य खुल्या स्क्वॉश स्पर्धेसाठी ६९० इतक्या प्रवेशिका (एन्ट्रीज) आल्या आहेत. बॉम्बे जिमखाना येथील ग्लास-बॅक कोर्ट्सवर २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत एकूण…

पारमिता धर्मादाय न्यासातर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

कल्याण : पारमिता धर्मादाय न्यास, कल्याण (प.) यांच्या वतीने शहापूर तालुक्यातील अंदाड येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस…

दाक्षिणात्य चित्रपटासाठी ‘समर्थ’ ला चित्रपटगृह नाकारले

रसिक प्रेक्षकांमध्ये तीव्र संताप मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात आलेला आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारा श्री समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण समाजासमोर आणणारा मराठी चित्रपट ‘समर्थ’ ला केवळ दाक्षिणात्य चित्रपटासाठी चित्रपटगृह नाकारण्यात आले. यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कडे साकडे घालण्यात आले आहे. ‘समर्थ’ चित्रपटाची कथा संकल्पना साकार करणारे निर्माते रवींद्र पाठक यांनी या संदर्भात आपली कैफियत मांडतांना सांगितले की, १४ ऑगस्ट रोजी समर्थ हा समर्थ रामदास स्वामी यांनी केलेल्या समाजप्रबोधनाचे विचार समाजासमोर आणण्यासाठी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. याचवेळी दोन मोठे बहुचर्चित हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. परंतु समर्थ चित्रपट लोकप्रियता मिळवू लागला. सुमारे दहा हजार विद्यार्थी विद्यार्थिनींनी हा चित्रपट पाहिला. विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या साठी आम्ही हा चित्रपट सवलतीच्या दरात दाखविले. आणखीही काही शाळांमधील विद्यार्थ्यांनी/विद्यार्थिनींनी हा चित्रपट पाहण्यासाठी तयारी दाखविली. त्याचवेळी एक दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला आणि समर्थ या मराठी चित्रपटाला अनेक ठिकाणी प्रयत्न करुनही चित्रपटगृह नाकारण्यात आले. दाक्षिणात्य चित्रपट जी कमाई आम्हाला मिळवून देणार आहे ती कमाई आम्हाला समर्थ चित्रपट लावून मिळणार नाही, मग आमचे नुकसान कोण भरुन देणार? असे उर्मटपणे उत्तर ऐकायला मिळते. या चित्रपटाला सर्व चित्रपट समीक्षकांनी दर्जेदार म्हणून गौरविले आहे. अशा परिस्थितीत जर मराठी चित्रपटाला चित्रपटगृह नाकारण्यात येत असतील तर काय होणार? असा उद्विग्न सवालही समर्थ चे निर्माते रवींद्र पाठक यांनी केला आहे. शंकर महादेवन, पंडित संजीव अभ्यंकर, आर्या आंबेकर, जयदीप वैद्य, अनिरुद्ध जोशी, रोहित राऊत यांनी गीते गायली असून  केदार पंडित आणि रोहित राऊत हे संगीत दिग्दर्शक तर आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. क्रिएटिव्ह प्रोड्युसर अमोल भगत आणि दिग्दर्शक योगेश फुलफगर आहेत.

मुंबई लाइट फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून फ्लोटिंग कॅनव्हास कंपनीच्या इमर्सिव्ह प्रोजेक्शन मॅपिंगसह कुलाब्यातील मुंबईचे ऐतिहासिक अफगाण चर्च उजळले. (छाया: शत्रुघ्न सिंग)

 गणेशोत्सवासाठी अधिकृत वीज जोडणी घ्या

महावितरणचे गणेश मंडळांना आवाहन मुंबई: यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी वीज सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच उत्सव कालावधीत केवळ अधिकृत वीज जोडणीच (वीज कनेक्शन) घ्यावी, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे. उत्सवाच्या काळात कोणतीही अप्रिय घटना वा दुर्घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्ते तसेच गल्लीबोळांतील विजेच्या तारांची (वीजवाहिन्या) उंची लक्षात घेऊनच गणेशमूर्तीची उंची व रथाची रचना निश्चित करावी. त्याचप्रमाणे मंडप आणि रोषणाईसाठी वीज संचाची मांडणी करताना सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जावे. अपघात टाळण्यासाठी केवळ प्रमाणित आणि कुशल विजेच्या ठेकेदारांकडूनच हे काम करून घ्यावे. गणेश मंडळांसाठी वीज जोडणी घेण्याची प्रक्रिया महावितरणने अत्यंत सोपी केली आहे. मंडळांना महावितरणच्या अधिकृत मोबाईल अ‍ॅप किंवा ऑनलाईन संकेतस्थळावरून अर्ज करून त्वरित तात्पुरती वीज जोडणी मिळवता येणार आहे. सार्वजनिक सुरक्षेचा विचार करता कोणत्याही मंडळाने अनधिकृतपणे विजेचा वापर करू नये, तसेच विजेच्या तारा किंवा खांबाजवळ मंडप उभारताना पुरेशी काळजी घ्यावी, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

केडीएमसी महापौरांनी केली आधारवाडीतील आदिवासी वस्तीची पाहणी

पालिका क्षेत्रातील सर्व आदिवासी वस्त्यांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश कल्याण:  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी अधिकाऱ्यांसह कल्याण पश्चिम येथील आधारवाडी परिसरातील आदिवासी वस्तीची पाहणी केली. पाहणीदरम्यान, रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळवण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली. पाहणीदरम्यान, संकुलात वीज, पाणी, रस्ते आणि स्वच्छता यासंबंधी गंभीर समस्या उघडकीस आल्या. संकुलात सर्वत्र पसरलेली घाण आणि अव्यवस्था पाहून महापौर हर्षाली चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले आणि त्यांना तातडीने आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले. महापौरांनी सांगितले की, रहिवाशांना केवळ आधारवाडीतच नव्हे, तर नगरपालिका क्षेत्रातील सर्व आदिवासी वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत. त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील पाहणी दौऱ्यापूर्वी संकुलातील सर्व प्रमुख समस्या सोडवण्याचे निर्देश दिले. महापौरांच्या भेटीमुळे आदिवासी वस्तीला भेडसावणाऱ्या दीर्घकाळच्या मूलभूत सुविधांच्या समस्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

कल्याणमध्ये पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्साहात

कल्याण : आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ, कल्याण यांच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी पारंपरिक उत्सव आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गाडी गणेश घाट या मार्गावर…

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी महापालिका सज्ज; ३० हजार स्पर्धकांची नोंदणी

अनिल ठाणेकर ठाणे : येत्या ३० ऑगस्टला होणारी ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यशस्वी आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. आतापर्यंत ३० हजारांहून अधिक स्पर्धकांनी…

खुटल (बा) मध्ये घरकुल घोटाळा!

पक्क्या घरवाल्यांना लाभ, बेघर गरिबांना डावलले राजीव चंदने मुरबाड :  तालुक्यातील खुटल (बा) ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल योजनेसाठी एकूण ३२५ लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेत तयार करण्यात आली आहे. मात्र या यादीवर गावातील ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की, ज्यांच्याकडे आधीच पक्के स्लॅबची घरे आहेत अशा सुस्थितीतील व्यक्तींची नावे घरकुलाच्या यादीत घेण्यात आली आहेत. तर ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, जे पत्र्याच्या झोपडीत राहतात आणि ज्यांना खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे अशा गरीब कुटुंबांची नावेच सर्वेक्षण यादीत घेतली गेली नाहीत. घरकुलासाठी करण्यात आलेले सर्वेक्षण हे सरपंच, उपसरपंच, सदस्य, संगणक ऑपरेटर आणि रोजगार सेवक यांनी आपल्या नातेवाईकांना आणि मर्जीतील लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या बोगस कारभाराविरोधात ग्रामस्थांनी १८ ऑगस्टला झालेल्या बोगस ग्रामसभेबाबत भूमिपुत्र एल्गार संघटनेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस दिनेश जाधव यांची भेट घेऊन झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर भूमिपुत्र एल्गार संघटनेने तात्काळ ग्रामपंचायतीच्या विरोधात पंचायत समिती मुरबाड येथे धरणे आंदोलन करण्याचे आयोजन केले. या आंदोलनात संघटनेने प्रशासनाकडे मागणी केली की, गटविकास अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन फेर स्थळ पाहणी करून यादीची तपासणी करावी. यादीतील प्रत्येक लाभार्थ्याच्या घराची प्रत्यक्ष पाहणी करून पक्के घर असलेल्या अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळावीत आणि घर नसलेल्या खऱ्या गरजू कुटुंबांची नव्याने पाहणी करून त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा. या धरणे आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचौरे आणि किसळ ग्रामपंचायत सरपंच कॉ. कविता वरे यांनी जाहीर पाठिंबा दिला. या वेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दिनेश जाधव, तालुका अध्यक्ष जगदीश शिद, उपाध्यक्ष बुधाजी खंडागळे, तालुका प्रवक्ता बाळा दळवी, उपाध्यक्ष हरिश्चंद्र पादीर, कैलास खंडागळे, मारुती वाघ, सुरेश मोढवे, तानाजी भला, कांताराम पोकळा, पंढरीनाथ दळवी इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ०००००००००