Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

स्वराज्य स्पोर्ट्स, स्वस्तिक क्रीडा मंडळ अजिंक्य

मुलुंड क्रीडा केंद्र कब्बडी स्पर्धा मुंबई : मुलुंड (पूर्व) येथील छत्रपती संभाजी राजे मैदानात मुलुंड क्रीडा केंद्रातर्फे आयोजित कबड्डी महोत्सव २०२६ मध्ये महिला गटात कांजूरमार्ग येथील स्वराज्य स्पोर्ट्सने आणि पुरुष…

वहाँ दिया जला दू,  जहाँ अंधेरा है या भूमिकेतून स्थापन झालेल्या जविकिरण काव्य मैफल मिरा रोड येथे संपन्न

वहाँ दिया जला दू,  जहाँ अंधेरा है या भूमिकेतून स्थापन झालेल्या जविकिरण काव्य मैफल मिरा रोड येथे संपन्न मिरा – भाईंदर : जविकिरण काव्य मैफल आणि स्वरसंगम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मीरा रोड येथील विरंगुळा केंद्र सभागृहात एका काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार कवी सुनील ओवाळ होते.  ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कवी हृदयेश मयंक, ज्येष्ठ गझलकार भागवत बनसोडे, सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर, कवी प्रा. डॉ. अनिल साबळे, कवयित्री प्रांजली काळबेंडे, गझलकार मुस्तहसन अज्म,  कवी डॉ. मुक्तार खान, कवयित्री प्रा. संध्या वैद्य यांच्यासह ज्यांच्या नावातील जवि या आद्याक्षरांवरून ही संकल्पना सुचली ते मराठीतील ज्येष्ठ आंबेडकरवादी कवी ज.वि.पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मैफल संपन्न झाली. सुप्रसिद्ध निवेदक आणि जविकिरण काव्य मैफलीचे चिटणीस प्रा.उत्तम भगत यांनी सूत्रसंचालन केले. या संमेलनात एकूण ३२ कवींनी आपल्या रचना सादर केल्या. यावेळी प्रा. संध्या वैद्य यांच्या आव्हान व प्रा. भीमराव पेटकर यांच्या आयुष्याच्या वळणावर या कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सिने-नाट्य सृष्टीतील हरहुन्नरी कलाकार  अशोक चाफे यांनी केलेल्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वरमाउली फाउंडेशन व जविकिरण काव्य मैफल पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला मिरा भाईंदर परिसरातील श्रोत्यांची उपस्थिती लाभली.

जंगल गप्प… आवाज माणसांचा!

येऊर : ठाणे परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या जैवविविधतेने समृद्ध उद्यान परिसरात वाढती वाहन रहदारी, पर्यटकांची गर्दी आणि विविध कार्यक्रमांमधून होणाऱ्या कर्कश ध्वनीप्रदूषणामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त…

 ठाणे जिल्हा माध्यवर्ती बॅकेंची निवडणूक कधी?

ठाणे जिल्हा माध्यवर्ती बॅकेंची निवडणूक कधी? निवडणूक कार्यक्रमाला उशीर का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल कल्याण: ठाणे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत येत्या ३१ मार्च ला संपत आहे. अवघे तीस दिवस उरले असताना या बँकेचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर न झाल्याने शेतकरी वर्गात संताप वेक्त केला जात आहे. ठाणे जिल्हा माध्यवर्ती बँक ठाणे पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य बँक म्हणून गणली जात आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून हीं बँक राज्यात  नावारूपास आलेली बँक आहे. या बँकेत शेतकऱ्यामधून तसेच गृह निर्माण संस्था, पत संस्था, मच्छिमार सहकारी संस्था, शेतकरी सेवा सोसायटी, मंजूर सहकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिनिधी निवडून दिले जातात. २१ संचालक या बँकेच्या संचालक मांडळावर निवडले जातात. या संचालकांचा कार्यकाळ ३० मार्च २०२६ रोजी संपत आहे. कार्यकाळ संपण्यासाठी अवघे ३५ दिवस शिल्लक असताना निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झालेला आहे. सहकार विभागाने निवडणुकी बाबत नवीन नियमावली केलेली आहे. या  नियमाचा फटका बसणार असल्याने विद्यमान संचालक मंडळातील  १५ संचालकांना निवडणूक लढविण्यास प्रतिबंध होणार असल्याने अनेक वर्ष या बँकेत संचालक पदावर असणाऱ्या विद्यमान संचालकांना धक्का मानला जात आहे.

मोबाईलचा अतिरेक वापर टाळा असा संदेश देत होळी साजरी

मोबाईलचा अतिरेक वापर टाळा असा संदेश देत होळी साजरी कल्याण:  सम्राट अशोकची लेकरं गाऱ्हाने घालताव रे महाराजा. जो काय आमच्या लेकरानो मोबाईलचो  नाद लागलो हा तो नाद काढून घे  महाराजा. अशा मालवणी भाषेत विद्यार्थ्यांनी पारंपारिक गाऱ्हाने घालत कल्याणच्या सम्राट अशोक शाळेत होळी साजरी करण्यात आली. मोबाईलचा अतिरेक वापरामुळे विद्यार्थी अभ्यासात दुरावत चालली त्याचा परिणाम गुणवत्तेवर होतोय म्हणून मोबाईलचा अतिरेक वापर टाळा असा संदेश दिला. तसेच होळी खेळतांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका. नैसर्गिक रंगांचा वापर करा. पर्यावरण रक्षण करा. अशी जनजागृती ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील विजया तांबे तसेच शिक्षक शिक्षकेतरांसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सोलापूरात

४२ जिल्ह्यांतील ४००हून अधिक खेळाडूंचा सहभाग पुणे: सोलापूर येथे २८ व २९ मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे संयोजन निर्झरा केअर फाऊंडेशन, सोलापूर यांच्याकडे सोपविण्यात आले असून ४२ जिल्ह्यांतील ४००हून अधिक महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तीन वेळा किताब पटकावलेल्या भाग्यश्री फंड हिच्याकडे चौथ्या विजेतेपदासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे. निर्झरा केअर फाउंडेशनच्या संचालिका आणि संस्थापक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे, संस्थेच्या संस्थापक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघचे अध्यक्ष रामदास तडस व सरचिटणीस योगेश दोडके यांनी माहिती दिली. स्पर्धा सोलापूरमधील हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. स्पर्धेसाठी ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२ किलो तसेच महाराष्ट्र केसरी गट (६५ ते ७६ किलो) असे वजनी गट ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके देण्यात येणार असून महाराष्ट्र केसरी विजेत्या खेळाडूला मानाची गदा प्रदान करण्यात येणार आहे. भाग्यश्रीसमोर अमृता पुजारी, प्रगती गायकवाड, अंकिता फटाले व वेदांतिका पवार यांचे आव्हान असणार आहे. भाग्यश्रीने स्पेनमध्ये झालेल्या २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले असून थायलंड येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. गतवर्षीच्या अंतिम लढतीत तिने अमृतावर मात करत किताब पटकावला होता. स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी वडील सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ २०२३ मध्ये निर्झरा केअर फाऊंडेशनची स्थापना केली. सोलापूर जिल्ह्यातील महिला कुस्तीपटूंना दर्जेदार सुविधा व व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आश्वासन देत आयोजकांना पाठिंबा दर्शविला.

फिरकीचा जादूगार शेन वॉर्न

बरोबर चार वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ( ४ मार्च २०२२ ) क्रिकेट विश्वाला धक्का देणारी बातमी आली आणि या बातमीने संपूर्ण क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली. ही बातमी होती फिरकीचा जादूगार ऑस्ट्रेलियाचा…

बोटे मोडण्याचे विज्ञान…

बोटे मोडण्याचे विज्ञान… आजीच्या काळात बाळाला दृष्ट लागली असेल म्हणून त्याच्या डोक्याला हात लावून ती आपल्या कानांच्या वरच्या बाजूला बोटे मोडीत असे. आवाज आला तर दृष्ट लागली असेल असे मानले…

 भूमी अभिलेख सुधारणा वेगात

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान’ आढावा अशोक गायकवाड मुंबई : राज्यातील भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या सेवा अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या अभियानाच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचे जलद व प्रभावी निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर अधिक परिणामकारकपणे शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे, शेलेश नवाल यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, महसूल सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पारदर्शक आणि जलद गतीने पोहोचवणे ही शासनाची प्राथमिकता आहे. फेरफार प्रकरणे, भूमी अभिलेख दुरुस्ती, उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रीमी लेयर अशी विविध प्रकारची प्रमाणपत्रे, अकृषक परवानगी, गाव दप्तर अद्ययावत करणे आदी सेवा या शिबिरांद्वारे तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात. कोणताही नागरिक प्रलंबित प्रश्नामुळे त्रस्त राहू नये यासाठी कालमर्यादेत प्रकरणांचा निपटारा करण्यावर भर देण्यात यावा. पुढील दोन वर्षांत विभागातील प्रलंबित कामे, कार्यालयांचे आधुनिकीकरण, ऑनलाईन सुविधा आणि जमाबंदी यंत्रणा अधिक सक्षक करण्याचे नियोजन करून प्रत्येक अधिकाऱ्याने आपले काम जबाबदारीने आणि वेळेत पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले. नागरिकांना कार्यालयांमध्ये वारंवार येण्याची गरज भासू नये, हीच या अभियानाची खरी फलश्रुती ठरावी. भूमी अभिलेख नोंदींचे अद्ययावतीकरण, डिजिटायझेशन, ऑनलाईन सेवा सुलभ करणे आणि प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे यावर विशेष भर देण्यात यावा. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला वेळेत न्याय मिळावा, अशी भूमिका मंत्री बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केली. ‘महाराजस्व समाधान शिबीर’ या अभियानाचा पहिला टप्पा मार्च ते मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून राज्यात ७ आणि १४ मार्च, १० आणि १७ एप्रिल तसेच ८ आणि १५ मे या कालावधीत विविध स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण केले जाणार आहे. या शिबिरांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावी याकरिता व्यापक प्रसिद्धी आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. दैनंदिन कामकाजाचा अधिक गतीमान होण्यासाठी कार्यप्रणाली तयार करावी. यानुसार महसूल यंत्रणेने काम केल्यास राज्यातील महसूल सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवून महाराष्ट्र देशात आदर्श ठरेल, असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. ००००००

इराण-इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन – डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

इराण-इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन – डॉ.श्रीकृष्ण पांचाळ अनिल ठाणेकर ठाणे- इराण-इस्रायल या देशांमधील संभाव्य युद्धजन्य परिस्थिती पाहता ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इस्रायल येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. या संदर्भात मंत्रालयातील आपत्कालीन संचालन केंद्राशी (SEOC) संपर्क साधण्यात आलेला असून, कोणत्याही नागरिकाकडून इराण-इस्रायल येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांना कळविण्यात येईल.याची नोंद घेवून नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे नियंत्रण कक्ष : ०२२-२५३०१७४०/९३७२३३८८२७, ठाणे पोलीस नियंत्रण कक्ष : ०२२२५४४५३५३/०२२२५४४२८२८/०२२-२५४४३६३, मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई :९३२१५८७१४३/ ०२२-२२०२७९९०