Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

माथेरान युनियन बँकेच्या सेवेचा बोजवारा

माथेरान युनियन बँकेच्या सेवेचा बोजवारा मुकुंद रांजाणे माथेरान: माथेरान मध्ये एकमेव राष्ट्रीयकृत युनियन बँक असून नेहमीच या बॅंकेत सेवेचा बोजवारा पहावयास मिळत असून ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सेवा उपलब्ध होण्यास दिरंगाई आणि वेळ लागत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. माथेरान हे पर्यटनक्षेत्र असल्यामुळे मोठया प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते सहसा कुणीही रोख रक्कम स्वतःजवळ ठेवत नसल्याने ते याच युनियन बँकेच्या भरवशावर अवलंबून असतात परंतु या बँकेचे एटीएम सुध्दा नेहमीच तांत्रिक कारणास्तव अथवा नेटवर्किंग मुळे बंद असते.याच बँकेची छोटी शाखा एका कुटूंबाकडे देण्यात आली असून त्याठिकाणी सुध्दा अनेकदा सर्व्हर डाऊन असते त्यामुळे काही व्यवहाराची कामे पूर्ण होत नाहीत. येणाऱ्या पर्यटकांना एटीएममधून पैसे उपलब्ध होत नसल्याने त्यांना बाजारात काही वस्तूंची खरेदी करता येत नाही ग्राहकांसह पर्यटक सुध्दा या बँकेच्या अकार्यक्षम सुविधेबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.माथेरान मध्ये अन्य एखादी राष्ट्रीयकृत बँक उपलब्ध व्हावी जेणेकरून ग्राहकांना याचा नाहक त्रास सोसावा लागणार नाही अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर- राजेंद्र सावंत

सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर- राजेंद्र सावंत अशोक गायकवाड अलिबाग: विधी सेवा समितीच्या माध्यमातून जिल्हा व तालुका स्तरावर विधी सेवा समितीकडून वेळोवेळी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येत असतात. विधी सेवा समितीकडून अनेक बाबतीत मोफत कायदेविषयक सेवा पुरविली जाते. विधी सेवा समितीच्या या कार्याची माहिती सर्वांना व्हावी तसेच सर्वांसाठी न्याय ही संकल्पना सर्वत्र पोहोचावी आणि समाजातील सर्व घटकांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा समितीचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी शनिवार आरसीएफ हॉल कुरूळ येथील सभागृहात संपन्न झालेल्या विधी सेवा महशिबिर, शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्यात केले. या शिबिरास जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक आँचल दलाल, जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिव तेजस्विनी निराळे, जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार, अलिबाग बार असोसएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील, जिल्ह्यातील न्यायालयांतील न्यायाधिश, शासनाच्या विविध खात्याचे अधिकारी, जिल्हा व जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समिती मधील वकील वर्ग, अनेक मान्यवर, शासकीय कर्मचारी तसेच बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत म्हणाले की, या महामेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि त्यांना योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हे आहे. जिल्हा विधी प्राधिकरणामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू जनतेला व्हावी तसेच तळागाळातील विविध समाजातील घटकांपर्यंत पोहचावी आणि कोणताही नागरिक न्यायापासून वंचित राहू नये याकरिता हा महामेळावा आयोजित करण्यात आहे. संविधानाने सर्वांना समान न्यायाची संधी दिली आहे. त्यामुळे हा उपक्रम महत्वाचा असून सर्व घटकातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सावंत यांनी जिल्हा व तालुका स्तरावर विधी सेवा समितीकडून राबविले जाणारे विविध उपक्रम व सेवांची माहिती उपस्थितांना दिली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रायगड मधील माझ्या कारकिर्दीतील हा दुसरा महामेळावा असून अशा महामेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत कायदेविषयक ज्ञान पोहचविणे, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे हा मुख्य उद्देश असल्यामुळे महामेळावा अतिशय महत्वाचा आहे. उच्चशिक्षित व्यक्तींनाही कायद्याचे ज्ञान नसते. त्यामुळे राष्ट्रीय विधी सेवा समितीने भविष्यात शाळेय स्तरावर कायद्याची तोंड ओळख देणारे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या महामेळाव्यात शासनाच्या विविध विभागांचे 32 स्टॉल लावण्यात आले असून प्रत्येक विभागांनी आपल्या असलेल्या योजनांची तातडीने, तळमळीने अंमलबजावणी करुन योजनेचा लाभ तळागाळातील दुर्बल घटकांपर्यंत पोहचवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. हुडबळी नसलेला जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख आहे. तसेच रायगड जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक माणूस हा सतत कामकाजामध्ये मग्न असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या प्रमाण शून्य असलेला हा जिल्हा आहे. जिल्ह्यात नवनवीन प्रकल्प येत असून तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीमुळे भविष्यात रायगड जिल्हा विकासाचा केंद्र बिंदू म्हणून ठरणार आहे.याचवेळी त्यांनी महसूल खात्याकडून राबविल्या जाणाऱ्या विविध महत्त्वकांक्षी योजनांची सखोल माहिती दिली. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी आपल्या मनोगतात सामान्य प्रशासनाच्या विविध प्रकारच्या कर वसुलीमध्ये लोक अदालतीचा होणारा उपयोग सांगितला. तसेच त्यांच्या प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि ग्रामीण भागातील बचत गटांचे कार्य तसेच इतर बाबतीत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी आपल्या मनोगतात पोलीस विभागांकडून राबविण्यात येणारे कायदे व त्याची अंमलबजावणी याबाबत उपस्थितांना माहिती दिली. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांनी येथील महामेळाव्यात योजनांची मिळणारी माहिती कार्यक्रमास उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहचवावी, असे सांगितले. अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या दारी शासनाच्या योजना पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच सहकारी वकील संतोष पवार यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला, विविध कायदेशीर हक्क, सरकारी योजना तसेच न्यायालयीन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. या महामेळाव्यात शासनाच्या विविध खात्यांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारे ३२ स्टॉल लावण्यात आले होते. याच कार्यक्रमात शासनाच्या विविध खात्यांमधील लाभार्थ्यांना धनादेश तसेच वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी सांगितले की, शासनाकडून राबविण्याल्या जाणाऱ्या नाविन्य पूर्ण योजनांची माहिती तळागाळातील घटकांपर्यंत पोहचावी याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याकरिता आलेल्या सर्वांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी शासकीय योजना व कायदे विषयक असलेल्या सोयी-सुविधांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी विविध शासकीय विभागांनी लावलेल्या स्टॉलची पाहणी करुन योजनांची माहिती जाणून घेतली.

राहुल गांधी शनिवारी  भिवंडी न्यायालयात

भिवंडी:  राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणी साठी लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी येत्या शनिवार २१ फेब्रुवारी रोजी भिवंडी न्यायालयात हजर होणार आहेत.२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकी काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक या संघटनेचा हात असल्याचे विधान केले होते.त्याविरोधात  संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात आर एस एस संघटनेची बदनामी झाल्याबद्दल भा.दं.सं.कलम ५०० प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल केली होती.या प्रकरणात राहुल गांधी यांनी दिलेले जमीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात नवीन जामीनदार सादर करण्यात येणार आहे.त्या साठी राहुल गांधी न्यायालयात येत असल्याची माहिती त्यांचे वकील अँड.नारायण अय्यर यांनी दिली आहे.या प्रकरणात राजेश कुंटे यांची सरतपासणी आणि उलटतपणी झालेली आहे.

महाराष्ट्रात आजपासून दहावीची परीक्षा

    मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने  घेतली जाणारी दहावीची परीक्षा शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६ पासून  सुरू होत आहे. यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा शुक्रवार २० फेब्रुवारी पासून होईल. शेवटचा पेपर बुधवार १८ मार्च २०२०६ रोजी आहे. दहावीची परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाईल. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८ लाख ६५ हजार ७४० मुलगे तर ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ तृतीयपंथी आहेत. यंदाच्या दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या वेबसाईटवर १५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार ६८३ शाळांमधून नोंदणी पूर्ण झाली आहे आणि राज्यभरातील ५११९ केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल.

अमृता फडणवीसांनी दिला अ‍ॅक्सिस बँकेच्या नोकरीचा राजीनामा

मुंबई : तब्बल २३ वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अ‍ॅक्सिस बँकेतील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्ट करून दिली. अमृता फडणवीस यांनी जवळपास २३ वर्षे…

भारतरत्न मास्टरब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी आज पत्नी अंजली यांच्यासह नंदनवन निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन मुलगा अर्जुन याच्या विवाहाचे आमंत्रण दिले.

मुंबई विमानतळावर  हिरे, सोनंसह  कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही  कस्टम विभागाने मोठी कारवाई करत कोट्यवधिचं साहित्य जप्त केलं आहे. हिरे, सोनेसह कोट्यावधींचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहे.याप्रकरणी, ८ जणांना अटकही करण्यात आलीय. मुंबई कस्टम झोन – ३ (एअरपोर्ट) यांनी मोठी कारवाई करत विविध प्रकरणांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, हिरे, सोने आणि परकीय चलन जप्त केले आहे. या कारवाईत एकूण ८ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. कस्टम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारवाई जवळपास १६.७ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, ३८ लाख रुपयांचे हिरे, १५ लाख रुपयांचं सोनं आणि विविध प्रकरणात १.१३ कोटी रुपयांचे परकीय चलन असा मोठा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सुमारे १६.७५६ किलो संशयित एनडीपीएस (हायड्रोपोनिक वीड) जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत १६.७५६ कोटी इतकी आहे. तसेच २४६.७५ कॅरेट नैसर्गिक व लॅब-ग्रोउन हिरे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे ३८.२८ लाख आहे. याशिवाय १०४ ग्रॅम २४ कॅरेट सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे १५.२४ लाख आहे. विविध प्रकरणांत मिळून ₹१.१३ कोटींचे परकीय चलन देखील जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, कस्टम्स विभागाकडून विमानतळावर तस्करीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून संबंधित प्रवाशांविरुद्ध एनडीपीएस व कस्टम्स कायद्यांतर्गत पुढील तपास सुरू आहे.

छत्रपतींची ४००वी शिवजयंती वर्ल्डक्लास करणार – फडणवीस

पुणे – छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली…

खळबळजनक : ब्रिटनचे राजपुत्र अँड्र्यूंना अटक

 जेफ्री एपस्टीन प्रकरणात केली अटक ० लहान मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक इंग्लंड : बाल लैंगिक शोषणाच्या विकृतीचा मास्टरमाईंड जेफ्री एपस्टीन याच्याशी कथित संबंधांच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश राजघराण्याचे सदस्य राजपुत्र अँड्र्यू यांना लंडनमध्ये ब्रिटिश पोलिस यांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली…

स्वराज्याचा सूर्योदय झाला…

हिंदवी स्वराज्याचा सुर्योदय ज्यांच्यामुळे पहाता आला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर पार पडलेल्या शिवजन्म सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा, फुलांची सजावट आणि भक्तिभावाच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे भव्य आणि उत्साहपूर्ण…