मराठी व्यावसायिकांनो गुजरात काबीज करा
पालकमंत्री गणेश नाईक यांचा व्यावसायिकांना सल्ला ० ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ आणि ‘कोकण सरस’ प्रदर्शनाचे नाईक यांच्या हस्ते उद्घाटन योगेश चांदेकर पालघरः मराठी माणूस कुठेही कमी नाही. त्याला प्रोत्साहन दिले तर…
trendlyne-news
पालकमंत्री गणेश नाईक यांचा व्यावसायिकांना सल्ला ० ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ आणि ‘कोकण सरस’ प्रदर्शनाचे नाईक यांच्या हस्ते उद्घाटन योगेश चांदेकर पालघरः मराठी माणूस कुठेही कमी नाही. त्याला प्रोत्साहन दिले तर…
उल्हासनगरात टँकर पॉईंट येथील पिण्याच्या पाण्याचा गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापर उल्हासनगर : एकीकडे उल्हासनगर शहरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या नागरिकांना भेडसावत असताना दुसरीकडे टँकर पॉइंट येथील पिण्याच्या पाण्याचा वापर मलनिःसारण सफाईच्या गाडीमधून पिण्याचे पाणी भरून ते चक्क गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ॲड प्रशांत चंदनशिव यांनी उघडकीस आणून याबाबत अभियंता पालिका आयुक्त व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना तक्रार केली आहे. ॲड प्रशांत चंदनशिव यांनी सांगितले उल्हासनगर शहरातील पूर्व परिसरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये दसरा मैदान जवळ टँकर पॉईंट आहे. शहरात ज्या ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होत नाही अशा ठिकाणी या टँकर पॉइंटवरून पिण्याचे पाणी टँकर मध्ये भरून त्या परिसरातील नागरिकांना पुरवले जाते. पण १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ च्या सुमारास ॲड प्रशांत चंदनशिव हे त्या ठिकाणाहून जात असताना त्या टँकर पॉईंट इथे मलनिःसारण सफाईची गाडी उभी होती. टँकर पॉईंट वरील पिण्याचे पाणी त्या गाडीत भरत असताना दिसून आले. ते पाणी गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापरले जात असल्याचे त्यांना चौकशीत समजले. एकीकडे शहरात काही परिसरात पाण्याची भीषण टंचाई. तर काही ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने. तर काही भागात कमी दबावाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे नागरिकांच्या हक्काचे हे टँकर पॉईंट मधील पाणी मलनिःसारण सफाई करण्याकरिता वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडत असताना याकडे संबंधित अधिकाऱ्याचे व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात असल्याचे ॲड प्रशांत चंदनशिव यांनी सांगितले या घटनेबाबत ॲड प्रशांत चंदनशिव यांनी तक्रार करण्यासाठी उल्हासनगरातील कॅम्प नंबर ५ येथील उपविभागीय कार्यालय मध्ये गेले असता अभियंता मिरकुटे यांना या घटनेबाबत त्यांनी तक्रार केली. तसेच पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना ई-मेल द्वारे तक्रार करून पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देखील तक्रार केली आहे. आताही अधिकारी मंडळी या घटनेबाबत कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुनर्वसनाचे धोरण ठरल्याशिवाय निष्कासन करू नये : वर्षा गायकवाड मुंबई : बर्मा शेल रेल्वे लाईन लगतच्या राजीव गांधी नगर, इंदिरा नगर, सुमन नगर आणि चिखलवाडी येथील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.…
टरबूजावर साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची कोरीव प्रतिकृती कल्याण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याण येथील कला शिक्षक यश महाजन यांनी यावर्षी टरबूजावर ब्लेडच्या साहाय्याने महाराजांची आकर्षक कोरीव प्रतिकृती साकारली. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी त्यांना सुमारे दोन ते अडीच तासांचा कालावधी लागला. दरवर्षी न चुकता महाराजां विषयी चा आपला श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी महाजन विविध माध्यमांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटत असतात. यामध्ये भाकरी, पिंपळाचे पान, तुळशीचे पान, केळीचे पान, दगड, माती, तांदूळ, खडू वरील कोरीव काम तसेच रांगोळी, पोर्ट्रेट आणि कॅनव्हास पेंटिंग अशा विविध माध्यमांचा समावेश आहे. यंदा त्यांनी टरबूज वर तसेच मोराच्या पंखांवर ही महाराजांची प्रतिकृती साकारत आपल्या कले. द्वारे अभिवादन केले आहे. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीचे शालेय स्तरावर तसेच परिसरात कौतुक होत आहे. कलेच्या माध्यमातून इतिहासाबद्दल आदर आणि प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा हा उपक्रम स्तुत्य मानला जात आहे.
जय मल्हार चषक पर्व पहिले जल्लोषात मुकुंद रांजणे माथेरान : विविध क्षेत्रात भरारी घेत असताना यावेळी प्रथमच क्रीडा क्षेत्रात उत्तुंग झेप घेत जय मल्हार संघाने १६ ते १८ दरम्यान येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलावर भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने आयोजित केले होते त्यास क्रीडा प्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. या सामन्यात विक्रांत संघाला विजेतेपद प्राप्त झाले असून मुकदर क्रिकेट संघाला उप विजेतेपद मिळाले आहे. प्रथम क्रमांकासाठी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या कडून रोख रक्कम रुपये ६१००० आणि आकर्षक चषक तसेच उप विजेत्या संघाला नगरसेविका प्रतिभा घावरे यांच्याकडून ३१००० ₹ रोख आणि आकर्षक चषक मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, झेल, मॅन ऑफ दि मॅच असे अनेक पारितोषिक खेळाडूंना प्रदान करण्यात आली. सलग तीन दिवस येथील क्रीडा संकुलावर प्रेक्षकांची मोठया प्रमाणावर गर्दी पहावयास मिळाली.विजेत्या विक्रांत संघाचे धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण नियोजनासाठी मंगेश गोरे, रामा आखाडे,सुरेश आखाडे, किरण आखाडे,दत्ता, रवी, तुषार,ओंकार, मनोज, रमेश,संजय तसेच जय मल्हार संघाच्या समस्त पाठीराख्यांनी हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. उत्कृष्ट समालोचन मंगेश मोरे, सागर जोशी, मयुरेश कदम, अनिल नाईकडे यांनी करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
सर्वधर्मसमभाव ही शिवाजी महाराजांची शिकवण काँग्रेस पक्ष पुढे नेत आहे – राजकुमार पातकर कल्याणमध्ये कॉंग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन सुराज्य निर्माण केलं. त्यामुळे शिवाजी महाराजांची सर्वधर्मसमभाव हि शिकवण कॉंग्रेस पक्ष पुढे नेत असल्याचे मत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांनी व्यक्त केले. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी’ तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यालयात करण्यात आले यावेळी पातकर बोलत होते. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राजकुमार पातकर यांच्यासह राजेश वाघमारे, मामा पगारे, सलीम शेख, गोपाळ शर्मा, दशरथ पाटील, अरुण वायले, हाफिज कुरेशी, संकेत लोके, अमोल गायकवाड, शामराव यादव, सुजित सिंह, चंद्रकांत पगारे, हरिश्चंद्र पाटील, जयराज पवार, वैशाली वाघ, किशोर वाघ आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलतांना पातकर यांनी सांगितले कि, शिवाजी महाराज शौर्याचे प्रतीक होते. शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमी होत असते. वर्षाचे 365 दिवस जरी जयंती साजरी केली तरी कमी आहे कारण त्यांचं कार्य तेवढं मोठं आहे. त्यांची जयंती साजरी करणे आपले आद्य कर्तव्य आहे. कल्याणच्या सुभेदारांच्या सुनेचा सन्मान करून स्त्रियांचा आदर करण्याचे शिवाजी महाराजांनी शिकवले. काँग्रेस पक्ष सर्वधर्मसमभाव ही शिवाजी महाराज यांची शिकवण पुढे नेत असल्याचे पातकर यांनी सांगितले.
शुक्रवारपासून रामशेठ ठाकूर मैदानावर रंगणार कबड्डीचा थरार पनवेल : दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष निमित्ताने रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवेनोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी २०२६ स्पर्धेचा उदघाटन सोहळा शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते होणार आहे. उलवे नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल जवळील रामशेठ ठाकूर मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील यांची तर शिव छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे, शिव छत्रपती पुरस्कार विजेते सुर्यकांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०६ वाजता पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाचे अध्यक्ष म्हणून पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह ऍड. आस्वाद पाटील यांची तर अर्जुन पुरस्कार विजेते शकुंतला खटावकर, अर्जुन पुरस्कार विजेते अभिलाषा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेच्या धर्तीवर जिल्ह्याचा संघ निवड करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत जिल्ह्यातील १९८ पुरुष कबड्डी संघ आणि ३२ महिला संघ सहभागी होणार आहेत. यातून निवड झालेल्या खेळाडूंचा संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने जवळपास १०० पंच कार्यरत असणार आहेत. सुसज्ज अशी चार क्रीडांगणे त्याचबरोबर मुख्य स्टेज, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, प्रथमोपचार केंद्र, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर पूरक सुविधा या ठिकाणी आहे. या स्पर्धेचा कबड्डी रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह चित्राताई पाटील, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धा संयोजन समितीचे सचिव शरद कदम यांनी केले आहे.
साई चौक, सह्याद्री नगर ते कल्याण स्टेशन केडीएमटी बस सेवा सुरु शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत बराच काळ बंद असलेली मार्ग क्र.३ साई चौक-सह्याद्री नगर-कल्याण स्टेशन बससेवा परिवहन कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गुरुवारपासून नागरिकांच्या सेवेत पुन्हा सुरू झाली आहे. आज गुरुवारी सकाळी खडकपाडा साई चौक येथे या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. जेष्ठ नागरिकांच्याहस्ते नारळ फोडून या बसला भगवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, उपशहर प्रमुख सुनील वायले, नगरसेवक किरण भांगले, रुपेश सकपाळ, नगरसेविका शालिनी वायले, प्रमिला पाटील, तनुजा वायले, युवासेना कल्याण उपशहर प्रमुख अनिरुद्ध पाटील, प्रथमेश पाटील आदी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, महिला, स्थानिक नागरिक, परिवहन सेवेचे अधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साई चौक, सह्याद्री नगर ते कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन हे अंतर ४ किलोमीटर असून या मार्गासाठी नागरिकांना २५ ते ३० रुपये भाडं रिक्षाला मोजावे लागत होते. मात्र आता केडीएमटीच्या बससेवेमुळे नागरिकांना अवघ्या १० रुपयांत स्टेशनपर्यंत जाता येणार आहे. नागरिकांच्या मागणीनुसार आणि शिवसेनेच्या पाठपुराव्याने हि बससेवा पुन्हा सुरु करण्यात आली असून या बसचा मार्ग साई चौक-साईबाबा मंदिर-ब वार्ड-संघवी इस्टेट-इंदिरा बंगला-आरटीओ-सह्याद्री नगर-कोकण वसाहत-सह्याद्री नगर फाटा-बिर्ला कॉलेज-इंदिरा नगर-भवानी चौक,प्रेम ऑटो-पौर्णिमा चौक-सिंडिकेट-स्टेट बँक-बाईचा पुतळा-रामबाग-कल्याण स्टेशन या महत्त्वाच्या ठिकाणांमार्गे धावणार असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली.
भांडुपमधून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत झाला नगरसेवक अनिल ठाणेकर मुंबई, मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भांडुप गावातील प्रभाग क्रमांक १११ मधून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सीएमई विभागातून जून १९९१ साली सेवानिवृत्त झालेले राजाराम विष्णू (सावंत ) देसाई, चार्जमन, लोको शेड यांचा मुलगा दीपक सावंत हा शिवसेना ( उबाठा ) पक्षातून नगरसेवक म्हणून निवडून आला आहे. पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत नगरसेवक झाला म्हणून त्यांचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली साधारण ३२ वर्षांपूर्वी दीपक सावंत यांना शिवाजी नगर, शिवडी, मुंबई पोर्ट ट्रस्ट कॉलनी वडाळा या प्रभागातून शिवसेनेची उमेदवारी नक्की झाली होती. पक्षाचा AB अर्ज मिळाला होता. त्यामुळे पोर्ट ट्रस्ट वसाहतीमधील रहिवाशांना खूप आनंद झाला. कॉलनीत मिरवणूक, फटाके, ढोल ताशे वाजू लागले. पोर्ट ट्रस्ट कॉलनी मध्ये आनंद पसरला. पोर्ट ट्रस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाला उमेदवारी मिळाली म्हणून घराघरात आनंद झाला.घराघरातून ओवाळणी झाली. फुलांच्या अक्षता पडल्या. परंतु हा आनंद रहिवाशांना जास्त मिळाला नाही. पक्षात चक्र फिरली. की फिरवली. दुसऱ्या दिवशी उमेदवारी फिरवली गेली. संपूर्ण वसाहत शोक सागरात बुडाली. जणू काही सुतक पडले. परंतु दीपक सावंत शांत होता. त्याने सगळ्यांना शांत केले. संधी हुकली. परंतु तो निष्ठेने शिवसेनेचे काम करत राहिला. दीपक सावंतचे वडील राजाराम सावंत मुंबई पोर्ट ट्रस्ट मधून १९९१ साली निवृत्त झाले. ते वसाहत सोडुन भांडुप गावात स्थायिक झाले. दीपक सावंत नोकरी बघून शाखेचे काम प्रामाणिक पणे आजतागायत करत आला. भांडुप गावचा तो शिवसैनिक झाला. दरम्यान संघटनेवर अनेक संकटे आली. परंतु दीपक सावंत निष्ठेने कम करत होता. आणि एवढ्या वर्षांनी पक्षाने परत संधी दिली आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भांडुप गावातून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत नगरसेवक झाला.
जिल्हा परिषद ठाणे कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी अनिल ठाणेकर ठाणे : १९ फेब्रुवारी रोजी टीएमसी पार्किंग प्लाझा, ८ वा मजला, लक्ष्मी नगर, ज्युपिटर हॉस्पिटलजवळ येथील प्रकल्प संचालक कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची…