काँग्रेसची गोची !
भारतीय राष्री्रय काँग्रेस महाराष्ट्रात सध्या मोठ्याच अडचणीत सापडलेली आहे. जिंकण्याची शक्यता असणारी निवडणुक सुरु झालेली आहे. दहा वर्षानंतर राज्यातली भाजपेतर बाजूचा सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरू शकेल, असे 2024 च्या…
भारतीय राष्री्रय काँग्रेस महाराष्ट्रात सध्या मोठ्याच अडचणीत सापडलेली आहे. जिंकण्याची शक्यता असणारी निवडणुक सुरु झालेली आहे. दहा वर्षानंतर राज्यातली भाजपेतर बाजूचा सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरू शकेल, असे 2024 च्या…
दखल शंतनु चिंचाळकर 1985 मध्ये आसाम कराराच्या निमित्ताने अस्तित्वात आलेले, बेकायदा स्थलांतराच्या समस्येवर आधारित असलेले कलम – 6 अ अखेर सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले. स्थलांतरितांची देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या,…
अहमदनगर: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलगी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजापाचे नेते वसंत देशमुखांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी पातळी सोडून जयश्री थोरांतावर टिका केली…
जालना : मी किंवा माझ्या जवळचे कोणीही इच्छुक उमेदवारांना तिकिटासाठी पैसे मागत नाहीत. आपलं तिकीटही किंवा पाठिंबाही फुकट असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. कुणीही पैशाचा व्यवहार करू नये…
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर कल्याण शहराचे पक्षप्रमुख निष्ठेने सांभाळणाऱ्या सचिन बासरे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. कल्याण पश्चिमेत महायुती व महाविकास आघाडीमध्ये ‘कांटे की टक्कर’ होणार आहे.…
चेंगराचेंगरीत ९ प्रवासी जखमी, दोन जणांची प्रकृती गंभीर मुंबई : मुंबईमधील रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा माणूसकी चिरडली गेली. यावेळी वांद्रे रेल्वे स्थानकात राखीव नसेलल्या जागा पटकावण्यासाठी भयंकर रेटारेटी झाली. आणि त्यानंतर…
निलेश राणे, मुरजी पटेल शिंदेंच्या शिवसेनेकडून दत्तक स्वाती घोसाळकर मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेची दुसरी यादी जाहिर करताना राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांना बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरेंच्या विरोधात…
अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजितदादा गट) आणि रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्या खोपट येथील मध्यवर्ती निवडणुक कार्यालयाचे उद्घाटन भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते…
मुंबई : एका डॉक्टर दाम्पत्याने मेडिकल दुकान मालकाची १.२७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून नवी मुंबईच्या एन आर आय पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ४०६, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार कल्पेश व्यास यांचे मालाड मध्ये वडीलोपार्जित मेडिकल स्टोअर्स आहे. 2013 मध्ये व्यास यांच्या बिल्डिंग मध्ये राहणारे कन्हैयालाल देराश्री यांनी त्यांचा मुलगा डॉ. धवल देराश्री आणि त्यांची पत्नी डॉ. लता देराश्री वडील कन्हयालाल देराश्री यांचे नवी मुंबई सीवडुस येथे स्वतः मालकीचे मोठे सुयश हॉस्पीटल असल्याचे सांगितले. या हॉस्पीटलच्या जागेमध्ये एक मेडीकल आस्थापणा आहे. ते मेडिकल आस्थापणा चालवण्याचा परवाना घेतल्यास तुम्हाला आम्ही ते भाड्याने देऊ. त्यामधुन तुम्हाला व्यवसाय चालु करता येईल असे त्यांनी सांगितले. देराश्री कुटुंबावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी त्या आस्थपणासाठी ४९ लाख रुपये बँक व्यवहाराने दिले. मेडिकल स्टोअर्स सुरू झाल्यावर या जोडप्याने ४८ लाख रुपयांची औषधे देखील खरेदी केली. तसेच ३० लाख रुपये उसने घेतले. या संपूर्ण व्यवहारात देराश्री कुटूंबियांनी आमची फसवणूक केल्याचा आरोप व्यास यांनी केला आहे. तक्रारदाराला डॉक्टरांनी सेटलमेंटमध्ये दिलेला फ्लॅट सिटी बँकेकडे गहाण ठेवला होता. आजपर्यंत आरोपीने तक्रारदाराला कोणतीही रक्कम दिलेली नाही असे ॲड मित अशोक राजपोपट यांनी सांगितले. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे. 0000
मुंबई :शाळा महाविद्यालय मधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्याने तामिळनाडू येथे ९४ विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आग प्रतिबंध कायदा कठोर केला होता. प्रत्येक राज्याने त्याची अंमलबजावणी सुरू करा असे आदेश दिले होते. मात्र अजूनही अनेक शाळा महाविद्यालये मनमानी करत कायदा पाळत नाहीत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मी चे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी सरकारकडे केली आहे. मुंबईतील वाळकेश्वर येथील गोपी बिर्ला मेमोरियल शाळेमध्ये अग्नी सुरक्षा यंत्राची अद्ययावत स्थिती नसल्याने मोठा वाद झाला होता. अग्निशामक विभागातील काही अधिकारी व शाळा मधील काही अधिकारी मनमानी कारभार करत मुलांच्या जीवाशी खेळत आहेत असा आरोप अशोक कांबळे यांनी केला आहे. ही शाळा यश बिर्ला समूहाद्वारे चालवली जाते. शाळा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगला मलबार हिल येथे आहे. विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालुन अग्नी सुरक्षा नियमाचे उल्लंघन करून मनमानी करण्याचा यांना अधिकार कोणी दिला ? असा सवाल अशोक कांबळे यांनी केला आहे. खाजगी अग्निशमन सुरक्षा यंत्रे पुरविणाऱ्या कंत्राटदाराला जबाबदार धरणे म्हणजे शाळेने जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. शाळेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून या समिती भीम आर्मी संघटनेचा विभागीय प्रतिनिधी घेण्यात यावा अशी मागणी अशोक कांबळे यांनी केली आहे.