Month: October 2024

एक हजार पोस्टकार्डांवर भारती विद्यापीठ शाळेतील विद्यार्थ्यांनी दिला मतदान करण्याचा संदेश

नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान वाढीसाठी विधानसभा निवडणूक कार्यालय व महानगरपालिका यांच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न सुरू असून यामध्ये विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. असाच एक अभिनव उपक्रम भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, नवी मुंबई शाळेच्या विद्यार्थ्यांनी राबविला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना एक हजाराहून अधिक पत्रांतून मतदान करण्याविषयी आवाहन केले. हा अनोख्या पध्दतीने व्यापक स्वरूपात राबवण्यात आलेला मतदान जनजागृतीचा उपक्रम शाळेतील कलाशिक्षक श्री. नरेश लोहार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.  या विद्यार्थ्यांनी पत्रांतून आपल्या आई-वडिलांना व नातेवाईकांना – बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून माझ्या व भारताच्या उज्वल भविष्यासाठी आपण जरूर मतदान करावे आणि भारताची लोकशाही बळकट करावी ही विनंती, माझेही वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मीही मतदान करेन असे लिहिले आहे. तसेच मतदानादिवशी लागणारी ओळखपत्रे म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदार ओळखपत्र, बँक पासबुक, भारतीय पासपोर्ट, यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत जरूर असावे असाही संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना व नातेवाईकांना पत्राद्वारे दिलेला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही विद्यार्थ्यांनी मतदार आणि लोकशाही यावर  विधानसभा मतदानासंदर्भात लग्नपत्रिका तयार करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने मतदान जनजागृती केली आहे. याप्रसंगी उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त श्री. श्रीकांत तोडकर, सहायक आयुक्त डॉ.अमोल पालवे, स्वच्छ्ता अधिकारी श्री सूर्यकांत म्हात्रे तसेच  प्राचार्य श्री. बेल्लम आर टी व इतर शिक्षक उपस्थित होते.

माथेरानमधील गरजवंतांना दिवाळी फराळाची भेट

माथेरान : सर्वांचा आवडती सण दिवाळी लवकरच येते असून हा सण साजरा करताना अनेकांची  आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. हातावर पोट भरणाऱ्या कष्टकरी तसेच विधवा महिलांना तसेच अपंगांना हा सण साजरा करता यावा यासाठी येथील हॉटेल वे साईडचे मालक अब्बास अल्ली हुसेन पिरभोय यांच्या माध्यमातून त्यांचे चिरंजीव हैदर अब्बास अल्ली पिरभोय यांच्या हस्ते हॉटेल वे साईड इन मध्ये गरजवंतांना दिवाळीच्या फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये साखर, रवा,तेल, डालडा, बेसनपीठ या साहित्याचा समावेश आहे. अनेक गरजवंत विधवा महिलांनी याचा लाभ घेतला. अब्बास अली हुसेन पिरभोय गरजवंतांना साहित्याचे वाटप करत असतात.यावेळी अब्बास अल्ली हुसेन पिरभोय यांच्यासह हॉटेल व्यवस्थापक मेहमूद खान उपस्थित होते. माथेरान साठी काहीना काही सढळ हस्ते मदत करण्यासाठी अब्बास अल्ली यांचा सिंहाचा वाटा असतो. येथील दवाखान्यात पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याची त्यांची इच्छा असून हे पर्यटनस्थळ पब्लिक प्लेस असल्यामुळे इंग्रजी भाषेवर युवा वर्गाचे प्रभुत्व असावे यासाठी लवकरच आपल्या हॉटेलमध्ये मोफत इंग्रजी स्पिकिंग कोर्स सुरू करणार आहेत.

कल्याणमध्ये निवडणूक भरारी पथकाकडून लाखो रूपयांची विदेशी दारू जप्त

  कल्याण : येथील पूर्व भागातील चक्कीनाका भागात विधानसभा निवडणूक भरारी पथकाने शनिवारी संध्याकाळी एक लाख १० हजार रूपयांची विदेशी दारू एका वाहनातून जप्त केली. या दारू खरेदी, विक्रीच्या पावत्या आणि याविषयी सविस्तर माहिती वाहनातील इसम देऊ शकला नाही. त्यामुळे भरारी पथकाने हे वाहन अधिकच्या चौकशीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. निवडणूक विभागाचे भरारी पथक कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात शनिवारी संध्याकाळी संशयास्पद वाहनांची तपासणी करत होते. यावेळी या चौकातून एक मोटार वेगाने जात होती. पथकाने ही मोटार अडवली. या मोटारीत बडवायझर कंपनीच्या ३८ इंचाच्या बाटल्यांचे खोके आढळून आले. वाहनातील इसमाकडे पथकाने या विदेशी दारू खरेदी आणि विक्रीच्या पावत्या मागितल्या. त्याची माहिती वाहन चालकासह त्याचा साथीदार देऊ शकला नाही. निवडणूक कामात या विदेशी दारूचा गैरउपयोग होण्याची शक्यता असल्याने पथकाने ही माहिती तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आर. डी. आव्हाड यांना दिली. हवालदार वाय. के. गायकवाड, पंच सुनील कशिवले, रोहिदास डोक यांच्या उपस्थितीत या विदेशी दारूसह वाहनाचा पंचनामा करण्यात आला. ही वाहने उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांच्या ताब्यात निवडणूक भरारी पथकाने अधिकच्या चौकशीसाठी दिली.ही विदेशी दारू मोटारीतून वहनाचे काम डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील संतोष किट्टना शेट्टी (४०) हे करत होते.

 ‘उत्पादन शुल्क’च्या स्वयंघोषित कर्मचाऱ्याकडून लाखोंची वसुली

 अधिकाऱ्यांचे अभय असल्याने शिरजोर योगेश चांदेकर पालघर : उत्पादन शुल्क विभागात कोणत्याही पदावर अधिकृत नियुक्ती नसताना दापचरी सीमा तपासणी नाक्याच्या भरारी पथकात कर्मचारी असल्याचे भासवून लाखो रुपयांची वसुली एक खासगी व्यक्ती करत आहे. अशा प्रकारच्या वसुलीमुळे अवैध मद्य वाहतूक, तस्करी आणि साठा याला चालना मिळत असून उत्पादन शुल्क विभागाच्या धोरणालाच हा हरताळ फासण्याचा प्रकार आहे. पालघर जिल्ह्याच्या काही तालुक्यातील सीमेवर दीव-दमण, दादरा नगर हवेली आणि गुजरात असल्याने या भागातून दीव-दमण बनावटीची दारू महाराष्ट्रात येत असते. बनावट, अवैध मद्य कर चुकवून आणले जाते. उत्पादन शुल्क विभाग बनावट, अवैध मद्य वाहतूक आणि तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत असताना त्यांच्याच विभागातला  स्वयंघोषित चालक दत्ता लोखंडे उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी असल्याचे सांगून अवैध बनावट मद्याच्या तस्करीला आणि साठवणुकीला वरकमाईतून प्रोत्साहन देत आहे. अवैध धंद्यांना ‘वरकमाई’तून संरक्षण दत्ता लोखंडे हा अवैध दारू विक्रते यांच्याकडून लाखोंची वसुली करत असून. त्यासाठी संबंधितांना फोन पे आणि गुगल पेद्वारे त्याच्या पत्नीच्या खात्यात पैसे वर्ग करायला सांगतो. काही वर्षे लोखंडे हा एका अधिकाऱ्याच्या हाताखाली खासगी चालक म्हणून काम करत होता. वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर काही काळ त्याचा विभागाशी संबंध नव्हता; परंतु आता दापचारी सीमा तपासणी नाक्याच्या भरारी पथकात तो विभागाचा स्वयंघोषित चालक म्हणून काम करतो. वास्तविक त्याच्या नियुक्तीचा कुठलाही प्रशासकीय आदेश किंवा परवानगी नाही, तरीही तो उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी असल्याचे भासवून संबंधितांकडून अवैध आणि बनावट दारू विक्री प्रकरणी वसुली करून संबंधितांच्या अवैध धंद्यांना पैशाच्या बदल्यात संरक्षण देत आहे. वसुलीकडे डोळेझाक, की लागेबांधे? एक खासगी कथित कर्मचारी वर्षानुवर्षे उत्पादन शुल्क विभागात काम करत असताना त्याचा पगार कोण करतो, त्याची नियुक्ती कोणी केली आणि नियुक्ती केली नसेल तर तो तेथे काम का करतो असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. सरकारी कर्मचारी नसताना तो अन्य राज्यातून येणाऱ्या अवैध आणि बनावट मद्यप्रकरणी परस्पर वसुली करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत असताना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी काय करतात, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. लोखंडेच्या कृष्णकृत्याचे पुरावे ‘लक्षवेधी’च्या हाती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे लोखंडे याच्याशी असलेले संबंध लक्षात घेता अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच तो वसुली करत असावा आणि त्याचा वाटा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असावा अशी शंका घ्यायला जागा आहे. दरम्यान, दत्ता लोखंडे याच्या कृष्णकृत्याचे पुरावे ‘लक्षवेधी’च्या हाती आले असून त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. पोलिस कारवाईत पुढे, उत्पादनशुल्क ‘वसुली’त! पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग वारंवार बनावट मद्यतस्करी प्रकरणी कारवाई करत आहेत. गेल्या दोन दिवसांत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने २७ लाखांचे अवैध मद्य आणि मालमत्ता जप्त केली. कारवाई करण्याची ज्या विभागाची खरी जबाबदारी आहे, तो उत्पादन शुल्क विभाग मात्र थातूरमातूर कारवाई करून अवैध मद्याच्या तस्करीला पाठीशी घालत असल्याचा आरोप आहे. ज्यांच्या हाताखाली दत्ता लोखंडे काम करतो, ते उत्पादन शुल्क विभागाचे दापचरी सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक संभाजी फडतरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले. वास्तविक गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून दत्ता लोखंडे हा फडतरे यांच्या हाताखाली काम करत असून त्यांच्या आशीर्वादाने त्याची वसुली सुरू होतीका, अशी चर्चा आता सर्वत्र आहे. लोखंडेच्या टीपमुळे मद्यतस्करीला आळा घालण्यात मर्यादा विशेष म्हणजे अवैध मद्य तस्करी, बनावट मद्य वाहतूक प्रकरणी भरारी पथके कुठे कुठे आहेत आणि ते काय काय कारवाई करतात याची टीप हा दत्ता लोखंडे संबंधित अवैध धंदे करणाऱ्यांना देत असल्याचा संशय असून त्यामुळे अवैध बनावट मद्याची तस्करी पकडण्याचे प्रयत्न फोल ठरतात. पोलिसांच्या कारवाईलाही मर्यादा येते. शासकीय यंत्रणेचे हात धरून एखादी खासगी व्यक्ती कशी वसुली करते, याचा हा उत्कृष्ट नमुना असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम यांचे त्यांच्या खात्यावर नियंत्रण नाही का, असा प्रश्नही आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कोट ‘दत्ता लोखंडे आमच्याकडे चालक म्हणून कामाला नाही. खासगी पंच म्हणून त्याला आम्ही अनेकदा मदतीला घेतले. त्याने परस्पर वसुली केली असेल, तर त्याची आम्हाला माहिती नाही. गेल्या आठ दिवसांपासून त्याचा आणि आमचा काहीही संबंध नाही. -संभाजी फडतरे, निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग दापचरी सीमा तपासणी भरारी पथक

 प्रसारमाध्यमांना निवडणूक निकालांचे अंदाज प्रसारित करण्यास प्रतिबंध

 १३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत   ठाणे : सर्वत्र विधानसभा सार्वत्रिक २०२४ च्या  निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून निवडणूक शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निकालाचे अंदाज (Exit Poll) १३ नोव्हेंबर सकाळी ७ पासून ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत या कालावधीत प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यास प्रतिबंध केले आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.  मतमोजणीच्या ४८ तास आधीपासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यत निकालाचे व कोणत्याही सर्वेक्षणाचे अंदाज  प्रसिद्ध करु नये.  तरी आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन सर्व प्रसारमाध्यमांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रसारमाध्यमांवर निकालाचे अंदाज (Exit Poll) (प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, दूरदर्शन आकाशवाणी) प्रकाशित करू नये. तसे आढळून आल्यास लोकप्रतिनिधी कायदा १९५१ कलम १२६ अ कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी नमूद केले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचे आदर्श आचारसंहिता सुरू असून भारतीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यमांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. विधानसभा सार्वत्रिक  निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी  स्वीपच्या माध्यमातून सर्व  विधानसभा मतदारसंघात जनजागृती करण्यात येत आहे. गुरूवारी (२४ नोव्हेंबर) १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील वागळे इस्टेट येथील के.बी.पी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावावा, आपले मत अमूल्य आहे, अशा प्रकारची जनजागृती करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली. तसेच संकल्पपत्राचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी देखील २० नोव्हेंबर रोजी आपण मतदान करणार आहे, तसेच मतदानासाठी घरातील पालक, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक व मित्रपरिवाराला देखील मतदान करण्याबाबत आवाहन करणार असल्याचा विश्वास स्वीपच्या टीमला  दिला. यावेळी महाविद्यालयातील एक विद्यार्थ्यांना मतदान जनजागृतीपर तयार केलेली कविता सादर केली. रॅलीच्या माध्यमातून केली मतदानाची १५९ कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात स्वीपच्या माध्यमातून ठामपा शाळा क्र. ७३ मधील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान रॅली काढून परिसरातील नागरिकांना मतदान करण्याचा संदेश दिला.“मतदान हमारा अधिकार है, इससी अपनी सरकार बनती है..” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसरातून जनजागृती काढली. या रॅलीत शाळेतील शिक्षक देखील सहभागी झाली होते. यावेळी  विद्यार्थ्यांना आपल्या घरातील पालकांना तसेच परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे असा संदेश देण्यात आला. या रॅलीस नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कळवा-मुंब्र्यात अहंकार विरुद्ध विकास हीच लढाई आहे – नजीब मुल्ला

– लोकसभेप्रमाणेच कळवा मुंब्रा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनाही निवडून आणायचे आहे – डॉ. श्रीकांत शिंदे   अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा निवडणुकीतील माझ्या विजयाप्रमाणेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कळवा-मुंब्रा विधानसभेतील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनाही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे जाहीर उद्गार कल्याण लोकसभेतील शिवसेना खासदार डाॅ श्रीकांत शिंदे यांनी काढले. तर कळवा मुंब्र्यात अहंकार विरुद्ध विकास हीच लढाई आहे असे मत कळवा मुंब्रा विधानसभेतील महायुतीचे उमेदवार नजीव मुल्ला यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील माता भगिनींमधील मातृशक्ती नजीब मुल्ला यांना निवडून आणणार असल्याचा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला. तर कळवा मुंब्र्यात नजीब मुल्ला यांना विजयी करुन महायुतीचे वर्चस्व निर्माण करा. असे आवाहन भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, आरपीआय – आठवले गट, आरपीआय – कवाडे गट महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांच्या निवडणुक प्रचारार्थ कळवा विभागाच्या वतीने शनिवारी सायबा हॉल, मनिषा नगर, कळवा येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिका-यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वरील मान्यवर मार्गदर्शन करताना बोलत होते. कल्याण लोकसभा मतदारसंघात  शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने माझा विजय झाला. पण कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात आपला माणूस नसल्याने माझ्यामार्फत कामे होताना त्रासही होत आहे. यासाठी पक्ष न पाहता महायुतीचा उमेदवार म्हणून नजीब मुल्ला यांना निवडून आणायचे आहे. आपल्या मतदारसंघातील आपला हक्काचा माणूस म्हणून नजीब मुल्ला यांना निवडून आणण्यासाठी प्रचाराचे नियोजन करा, असे आदेशच कल्याण लोकसभेतील शिवसेना खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी मोबाईलवरून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्रिय सहकार्याने व कल्याण लोकसभेतील खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या मदतीमुळ माझ्यामार्फत खासदार निधी व ठाणे महापालिकेचा निधी कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात खर्च झाला. यामुळेच कळवा मुंब्र्यात विकासकामे होऊ शकली. असे असताना स्थानिक आमदार या विकास कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अजितदादांनी माझ्यामार्फत १५० कोटी रुपये कळवा मुंब्र्यातील विकासकामांसाठी दिले. कळवा मुंब्र्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मराठी, हिंदी, उर्दू या भाषेतील महापालिका शाळा सुरु करणे इतर नागरी प्रश्न मार्गी लावणे या सेवाभावनेतुन कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मी लढवित आहे. कळवा मुंब्रा विधानसभेतील ४५  डजार लाडक्या बहीणींच्या आशिर्वादाने या मतदारसंघातील दादागिरी संपविणे आणि अहंकार विरुद्ध विकास यासाठी ही लढाई सुरु असल्याचे महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे महाराष्ट्राचे शीर्ष नेतृत्व व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला माता भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ही मातृशक्ती कळवा मुंब्र्यातील विधानसभेतील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना भरभरून मतदानरुपी आशिर्वाद देईल अशी आशा आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला. कळवा मुंब्र्यातील विकासासाठी शिवसेना भाजप व नजीब मुल्ला यांच्यामुळे ठाणे महापालिकेचा निधी आला आहे. पण स्थानिक आमदार याचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळेच शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षातील कार्यकर्त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत कळवा मुंब्रा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांना विजयी करुन महायुतीचे वर्चस्व येथे निर्माण करावे, असे आवाहन मेळाव्याचे अध्यक्ष  व भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले. यावेळी शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष आठवले आणि कवाडे गट आदी महायुतीतील पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून मनोगत व्यक्त करण्यात आले. सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी केले.

‘खोक्या’नंतर आता ‘सोने’ जप्त

–138 कोटींच्या सोन्याने भरलेला ट्रक निवडणूक भरारी पथकाने पुण्यात पक़डला पुणे : गुरुवारी एकाच दिवशी बावन्न कोटींची रक्कम पकडणाऱ्या निवडणूक भरारी पथकाने आज चक्क १३८ कोटींचे सोने असलेला ट्रक पुण्यात जप्त केला. ५२…

शेअर बाजार कोसळला १० लाख कोटीचा फटका

मुंबई : एन निवडणूकीच्या धामधुमीत शेअअर मार्केट पत्याच्या बंगल्यासारका कोसळला. शुक्रवारी सकाळपासून शेअर बाजारात मोठी घसरण झाली.  सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजार कमी तोट्यात होता, पण हळूहळू तीव्र घसरण होत गेली. काही वेळातच गुंतवणूकदारांचे…

निष्ठेला तिकीट, श्रध्देला ‘सबुरी’

स्वाती घोसाळकर मुंबई : शिवडी मतदार संघात तिकीट वाटप करताना उद्धव ठाकरेंसमोर मोठाच पेच होता. एकीकडे निष्ठा होती तर दुसरीकडे श्रद्धा. एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतरही शिवडीचे आमदार अजय चौधरीयींन मातोश्रीवरील निष्ठा दाखवित…