Month: October 2024

 आरवसह अर्जुनचे आव्हान संपुष्टात

 एमएसएलटीए-सीसीआय अखिल भारतीय रँकिंग टेनिस स्पर्धा   मुंबई : एमएसएलटीए-सीसीआय अखिल भारतीय रँकिंग टेनिस स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले गटात दुसरा मानांकित आरव छल्लानीसह तिसरा मानांकित अर्जुन मणिकानंदचे उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात…

बडोदा-मुंबई महामार्गाच्या माथेरान डोंगरातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण

पनवेल – बडोदा-मुंबई महामार्गाच्या शेवटच्या पॅकेजमधील माथेरान डोंगर रांगांखालील शिरवली गावालगतचा पहिल्या बोगद्याचे खोदकाम ऑगस्ट महिन्यात आरपार झाल्यानंतर दूसरा बोगद्याचे खोदकाम कधी पुर्ण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. १६…

भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील आता मनसेचे उमेदवार

हरिभाऊ लाखे नाशिक : भाजपने तिकीट वाटपात डावलल्याने बंडाचे निशाण फडकविणारे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांना मनसेने नाशिक पश्चिम मतदार संघातून मैदानात उतरविले आहे. पाटील यांच्या उमेदवारीने ही लढत रंगतदार होणार आहे. मध्यंतरी नाशिक दौऱ्यात राज ठाकरे यांनी कोणत्या भागात कोणत्या समाजाचे प्राबल्य आहे, याचा अभ्यास करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना केली होती. त्या आधारे मराठा समाजातील नाराज पाटलांना पक्षात प्रवेश देतानाच लागलीच उमेदवारी बहाल करण्याची चाल मनसेने खेळली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी होती. स्थानिक आमदार सीमा हिरे यांच्या उमेदवारीला संबंधितांनी जाहीर विरोध केला होता. तथापि, पक्षाने त्यास न जुमानता पहिल्याच यादीत हिरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटले. माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा मनसेत पक्ष प्रवेश होऊन उमेदवारी निश्चित झाली. मनसेने पहिल्या यादीत राज्यातील अनेक मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले होते. मात्र, त्यामध्ये नाशिकचा समावेश नव्हता. पाटील यांच्या प्रवेशानंतर तिसऱ्या यादीत नाशिक पश्चिमचा समावेश झाला आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात गंगापूर, सातपूर, अंबड, चुंचाळे, मोरवाडी, कामटवाडे अशा आठ ते १० गावांचा समावेश आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या या गावांमध्ये मराठा समाजाचे प्राबल्य आहे. मतदारसंघाचा बराचसा भाग कामगारबहुल असून कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) भागातून स्थायिक झालेल्यांची संख्या मोठी आहे. या सर्व बाबी मनसेनेही विचारात घेतल्याचे दिसून येते. मतांची टक्केवारी कशी ? नाशिक पश्चिम मतदारसंघात नितीन भोसले यांच्या माध्यमातून २००९ मध्ये पहिल्यांदा मनसेचा आमदार निवडून आला होता. तेव्हा पक्षाला ३५ टक्के मते मिळाली होती. त्यापुढील २०१४ च्या निवडणुकीत मतांची टक्केवारी ४.४ पर्यंत घसरून भोसले हे पराभूत झाले होते. गतवेळी म्हणजे २०१९ मध्ये मनसेच्या दिलीप दातीर यांना ११.८ टक्के मते मिळाली होती. सलग दोनवेळा गमवाव्या लागलेल्या या जागेवर पक्षाने यावेळी वेगळा प्रयोग केला आहे.

 दिग्गज नेत्यांना ठाकरे यांच्या नव्या चेहऱ्यांचे आव्हान

पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे दोन उमेदवार जाहीर सामाजिक कामाची पार्श्वभूमी असलेल्या दुबळा, वळवी यांना उमेदवारी योगेश चांदेकर पालघरः विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर जिल्ह्यातून दोघांची नावे जाहीर केली आहेत. पालघर विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र दुबळा यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झाली आहे, तर बोईसर विधानसभा मतदारसंघातूनही अपेक्षेप्रमाणे डॉ. विश्वास वळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे दोघेही सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असल्याने ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना आव्हान देतील, अशी चिन्हे आहेत. महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीतील उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. पालघर विधानसभा मतदारसंघातून अनेक उमेदवारांच्या नावाची चर्चा होती. बारा उमेदवार निवडणुकीच्या शर्यतीत होते; परंतु महाविकास आघाडीने पालघर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडला असून या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीच्या उमेदवारासोबत थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे डहाणू तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी उमेदवारीच्या स्पर्धेत होते; परंतु हा मतदारसंघच शिवसेनेच्या ठाकरे गटाला गेल्यामुळे चौधरी यांची उमेदवारी आपोआप निकालात निघाली आहे. ॲड. चौधरी यांनी पूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी महाविकास आघाडी जो उमेदवार देईल, त्या उमेदवाराचे काम करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना अशा तीन पक्षांनी दुबळा यांच्या विजयासाठी सामूहिक पद्धतीने प्रयत्न करण्यावर भर दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पालघर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या डॉ. हेमंत सवरा यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्यापेक्षा तीस हजार मते जास्त मिळाली होती. या पार्श्वभूमीवर आता दुबळा हे महायुतीचा उमेदवार जो ठरेल  यांच्याशी कशी लढत देतात, हे पाहावे लागेल. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित पालघर हा मतदारसंघ भाजपने स्वतःला मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले असून माजी खासदार राजेंद्र गावित यांचे तेथे पुनर्वसन करण्याचे घाटत होते; परंतु महायुतीतील तीन पक्षांच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार विद्यमान आमदार असलेली जागा त्याच पक्षाकडे ठेवण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीकडून नेमका उमेदवार कोण हे अजून गुलदस्त्यात आहे. पालघर विधानसभा मतदारसंघात जयेंद्र दुबळा यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. सामाजिकतेचा वसा घेऊन त्यांनी अनेक कामे केली. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यात डहाणू तालुक्यात झालेले प्रचंड नुकसान  अशावेळी दुबळा हे त्यांच्या मदतीला धावून आले. तसेच एखादा शब्द देणे सोपे असते; परंतु दिलेला शब्द पाळणे हे आव्हानात्मक असते, हे आव्हान त्यांनी पेलले. त्यासाठी अनेक आव्हानांवर त्यांना मात करावी लागली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादळात नुकसान झालेल्यांना मदत करण्याचे आश्वासन अनेकांनी दिले होते; परंतु वाणगाव परिसरातील नुकसानीच्या वेळी दुबळा हेच धावून आले होते आणि अनेक नागरिकांना त्यांनी आर्थिक मदत केली. आचारसंहितेच्या काळात अटी शिथिल करून नुकसानग्रस्तांना मदत करण्यात यावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘विश्वास’चा अनेकांना आधार शिवसेनेच्या शिंदे गटातून गेल्या काही दिवसापूर्वी डॉ. विश्वास वळवी यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. राजकारणातून समाजकारण करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वावर डॉ. वळवी यांचा विश्वास असून त्यांनी त्यांच्या ‘विश्वास फाउंडेशन’च्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील गाव, पाड्यात मोठे सामाजिक काम केले आहे. जिल्ह्याच्या सामाजिक कार्यात ते कायम अग्रेसर असतात. नवरात्रोत्सव सुरू करण्यात त्यांचा मोठा पुढाकार असतो. ‘विश्वास फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब जनतेची मोठी सेवा केली आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या सेवाकार्याचा मोठा लाभ शहरी व ग्रामीण आदिवासी बांधवांना झाला होता. वंचित घटक, आदिवासी आणि विद्यार्थी यांच्यासाठी विश्वास फाउंडेशन मोठा आधार ठरले आहे. दहा वर्षांनंतर उमेदवारी गेल्या दहा वर्षांपासून डॉ. वळवी हे बोईसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करीत होते; परंतु प्रत्येक वेळी अन्य कोणाला तरी उमेदवारी मिळत असल्याने त्यांना थांबावे लागत होते. शिवसेनेच्या ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या पालघर, बोईसर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीला कामडी बॅकफुटवर गेल्याने विधानसभा मतदारसंघात आर्थिकदृष्ट्या मजबूत उमेदवार देण्याची तयारी ठाकरे यांनी केली होती. कामडी यांना  ३२ हजार मते कमी होती. डॉ. वळवी यांच्या रूपाने आता चांगल्या उमेदवाराचा शोध संपला आहे. दुबळा आणि डॉ. वळवी या दोघांनाही सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असल्याने तसेच ते सातत्याने रस्त्यावर संघर्ष करीत असल्याने त्यांच्या उमेदवारीचा विचार ठाकरे यांनी केला. बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असले, तर पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. या वेळी पालघर जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात तिरंगी-चौरंगी लढती होण्याची शक्यता असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे हे दोन उमेदवार निवडणुकीला कसे सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 त्या अपघातांनंतर रेमंड रियॅलिटी आक्रमक भूमिकेत

 लिफ्ट अपघातास कारणीभूत ठरलेल्या थायसन कृप एलिव्हेटर कंपनीवर गुन्हा दाखल करणार   ठाणे : ठाण्यातील टेन एक्स या गृहप्रकल्पात मंगळवारी सदोष जोडणीमुळे घडलेल्या लिफ्टच्या अपघातानंतर या प्रकल्पाचे विकासक रेमंड रियॅलिटी कंपनीने आक्रमक भूमिका घेतली आहे. एका बालकाच्या दुखापतीला कारणीभूत ठरलेल्या या लिफ्टची उभारणी आणि त्याच्या देखभालीचे काम पाहणाऱ्या थायसेन कृप एलिव्हेटर या आंतरराष्ट्रीय कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. या अपघातानंतर रेमंड रियॅलिटी कंपनीने  स्वतःहून या दुर्घटनेची सखोल चौकशी केली. या चौकशी दरम्यान सदर दुर्घटनेस थायसन ग्रुप एलिव्हेटर कंपनी जबाबदार असल्याचा निष्कर्ष कंपनीने काढला. सदर लिफ्ट कंपनीने लिफ्टची जोडणी आणि तिच्या देखभाल – दुरुस्तीचे पाच वर्षाचे कंत्राट घेतले आहे. यासंदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारनाम्याप्रमाणे, लिफ्ट मधील क्लिप तुटून चैन खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेची  जबाबदारी हि  थायसन कृप  एलिव्हेटर कंपनीची असल्याचे  रेमंड रियॅलिटीचे अधिकारी प्रशांत राठोड यांनी सांगितले. राठोड म्हणाले,आम्ही अत्युच्च दर्जाची उपकरणे, साधने वापरत हा प्रकल्प बनवलेला आहे. त्यासाठी आवश्यक त्या  सर्व बाबी पडताळत,करारनामे करत वस्तू विकत घेतलेल्या आहेत. असे असतानाही कोणाच्या तरी हलगर्जीपणामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर प्रामाणिक प्रयत्न करून देखील आमची बदनामी होत असल्याचे लेखी पत्र देत वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी रेमंड रियालिटी कडून करण्यात आली आहे . गत मंगळवारी संध्याकाळी रेमंड रियॅलिटीच्या गृहसंकुलातील टेन एक्स या प्रकल्पात इमारत क्रमांक ए (विस्ता) या ४२ मजल्याच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये तांत्रिक दोष झाल्यामुळे या लिफ्टची साखळी लिफ्ट वर कोसळली त्यामुळे लिफ्ट बंद पडून ती सेफ्टी लॉक झाली. साखळी कोसळल्यामुळे या लिफ्टच्या काचा फुटल्याने त्यात अडकलेल्या चौघा जणांपैकी एक बालक काच लागून दुखापतग्रस्त झाला. या अपघातांनंतर त्या इमारतीतील सुरक्षा रक्षकांनी लगेंचच त्याठिकाणी धाव घेत लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढून जखमी झालेल्या त्या लहान मुलावर प्रथमोपचार केले. एवढ्या मोठ्या प्रकल्पातील या दुर्घटनेनंतर त्या इमारतीतील नागरिकांनी सुरक्षेतेतेबाबत हेळसांड केल्याबद्दल थायसेन कृप एलीव्हेटर कंपनीच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या दुर्घटनेमुळे गगनचुंबी इमारतींच्या लिफ्ट उभारणी, दुरुस्ती आणि त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक ते धोरण शासनाने ठरवायला पाहिजे असल्याचे प्रतिक्रिया बांधकाम क्षेत्रात उमटत आहे.

भिवंडी ग्रामीणमध्ये स्नेहा पाटील यांचा शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल

भिवंडी : भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काल्हेर येथील माजी सरपंच स्नेहा देवेंद्र पाटील यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या असलेल्या स्नेहा पाटील यांनी भिवंडी…

जागा वाटप निषेधार्थ आठवले गटाचा एल्गार

रमेश औताडे मुंबई :रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची भाजपा सोबत विधानसभा निवडणूकीत युती असूनही उमेदवारी वाटप संदर्भात सन्मानपूर्वक वाटाघाटी पूर्ण न झाल्याने गुरुवारी मुंबईत पक्षाच्या कार्यालयासमोर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निषेध एल्गार व्यक्त करण्यात आला. भारतीय जनता पक्षाने शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्याशी तिकीट वाटपाच्या सन्मानपूर्वक वाटाघाटी केल्या. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांना विश्वासात घेतले नाही. रिपाई पक्षाला सन्मानपूर्वक जागा मुंबई व महाराष्ट्रात सोडलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. मुंबई प्रदेश कार्यकारणीतील व सर्व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष, वार्ड अध्यक्ष, युवक आधाडी, महिला आघाडी व विविध आघाडी यांनी संघर्ष नायक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदास आठवले यांचे आदेश आल्याशिवाय महायुतीची सन्मानजनक जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व मुंबई प्रदेशचा आदेश आपणांस पारीत झाल्यानंतरच आपण आपल्या मतदार सघात निवडणूकीच्या कामास लागावे, असा आदेश देण्यात येत असल्याची माहिती मुंबई प्रदेश अध्यक्ष  सिध्दार्थ कासारे यांनी दिली. सरचिटणीस मुंबई प्रदेश विवेक गोविंद पवार, मुंबई प्रदेश युवा अध्यक्ष साचीनभाई मोहिते, महाराष्ट्र युवा अध्यक्ष पप्पू कागदे , दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष सोना कांबळे, दक्षिण मुंबई जिल्हा सरचिटणीस शिरीष चिखलकर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

निष्ठावंत शिवसैनिकांच्या उपस्थितीत राजन विचारे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

ठाणे : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे विधानसभेचे अधिकृत उमेदवार राजन विचारे यांनी आज निष्ठावंत शिवसैनिकाच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी ११:०० वा. चरई येथील  शिवसेना शाखेतून राजन विचारे…

 आरपीआय नेते जगदीश गायकवाड ॲक्शन मोडवर

 अलिबागमध्ये महेंद्र दळवी तर बेलापूरमध्ये संदीप नाईक यांना देणार दमदार समर्थन   राज भंडारी पनवेल : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू असतानाच नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यामध्ये मात्र सर्वच विधानसभा क्षेत्रात तिहेरी किंवा चौरंगी लढतीच्या तयारीत उमेदवार आहेत. यामध्ये आरपीआय १९५६ पक्षाचे कोकण विभाग अध्यक्ष जगदीश गायकवाड हे मात्र या सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या उमेदवारांना नक्कीच मदत करेन मात्र ज्या उमेदवारांना निवडून यायचे आहे त्या त्या उमेदवारांनी प्रथम माझ्याकडे जगदीश्वर मठात यावं, असं उमेदवारांना सूचित करताना त्यांनी भाजपच्यावतीने कशा पद्धतीने पनवेल महानगरपालिकेत भ्रष्टाचार करण्यात आला, दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाच्या विमानांच्या चाचण्या घेण्याचे भासवून किती भ्रष्टाचार केला जात आहे, यासह अनेक विषयांवर त्यांनी पनवेल – उरणमधील भाजपच्या नेत्यांवर आसूड उगवत आक्रमकता दाखविली. तसेच काही दिवसांपूर्वी जगदीश गायकवाड यांची उमेदवारी पक्षाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी पनवेलसाठी जाहीर केली होती. अर्ज दाखल करण्याची तारीख २९ असल्यामुळे २८ तारखेला यावर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आपल्या स्फोटक मुलाखतीमध्ये त्यांनी नवी मुंबई येथे राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप नाईक यांनी तुतारी हातात घेत उमेदवारी मिळविली आहे त्यांच्यासह अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगून इतर उमेदवारांनी जगदीश गायकवाड यांच्या घरातील जगदीश्वर मठात यावे, जो येऊन भेटेल तो निवडून येईल, असेही त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये मिश्कीलपणे सांगितले. जगदीश गायकवाड पुढे म्हणाले, भविष्यात पनवेल महानगरपालिका भ्रष्टाचारमुक्त करावी लागेल. पनवेल महानगरपालिकेची ओळख भ्रष्टाचारी महापालिका म्हणून मलिन झाली आहे. पनवेल मधील सर्व कामे निकृष्ट दर्जाची आहेत. रस्त्यांच्या कामात तर प्रचंड भ्रष्टाचार आहे. केवळ ठराविक कंत्राटदारांनाच कामे दिली जातात. आगरी-कराडी समाजातील २८८  कंत्राटदार देशोधडीला लागले आहेत. घरातील दागदागिने विकण्याची त्यांच्यावर वेळ आली. तरीही पनवेल महानगरपालिकेकडून त्यांना कामे दिली जात नाहीत. पनवेल महानगरपालिकेतील कामे केवळ चार ठराविक कंत्राटदारांनाच दिली जातात. त्यामुळे ही चौकडी नष्ट करणारी ही निवडणूक असेल असे माझे ठाम मत आहे. पनवेलकरांना मालमत्ता कराचा प्रश्न भेडसावत आहे. सत्तेत असतानाही टॅक्सच्या विरोधात मी स्वतः आवाज उठवला होता. नागरिकांना पाच वर्षे टॅक्स नको याबाबत मी व माजी नगरसेविका विद्याताई गायकवाड यांनीही ठाम भूमिका मांडली होती. चार महापालिकेंचे संदर्भ देऊन मालमत्ता कराला विरोध दर्शवला होता. त्यावेळी माझी एक व्हिडिओ क्लिप देखील चर्चेत आली होती. त्याचबरोबर टॅक्स भरणे का गरजेचे आहे याचे महत्त्व देखील पटवून दिले होते. मात्र त्याचे प्रमाण किती असावे  याबाबतही अभ्यासपूर्वक भूमिका  स्पष्ट केली होती. शहरी भागातील नागरिकांनी सिडकोला सेवा कर दिला आहे. त्यामुळे ग्रामीण भाग व शहरी भागातील नागरिकांनी किती कर द्यावा याबाबत बाजू उचलून धरली होती, असेही जगदीश गायकवाड म्हणाले. कोविड काळानंतर नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. नोटबंदीचा जबरदस्त फटका सर्वांनाच बसला. राज्यात व देशात हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. ईडी सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भाजपविरोधात प्रचंड रोष आहे. भाजपच्या या जाचाला कंटाळून नवी मुंबईत संदीप नाईक यांनी देखील पक्ष सोडला. ते वैयक्तिकरित्या देखील आमदार होऊ शकतात. मात्र त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावण्याला भाजप जबाबदार असल्याचे मत जगदीश गायकवाड यांनी व्यक्त केले. पनवेलमधील लेडीज बारचा प्रश्न गहन असून सर्व लेडीज बार बंद झाले पाहिजेत. पनवेलमध्ये रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची संख्या लेडीज बारमुळेच बळावली आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकही त्रस्त आहेत. विधानभवनात लेडीज बारविरोधात अनेकदा आवाज उठवण्यात आला. मात्र आजपर्यंत पनवेलमधील लेडीज बार का बंद झाले नाहीत? बार चालकांना कोणाचा आशीर्वाद  आहे? या धंद्यात कोण पार्टनर आहे का?  असे विविध प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. यावेळी पनवेल – उरणच्या भाजप नेत्यांवर आसूड उगवताना जगदीश गायकवाड यांनी बोलताना सांगितले की, ज्या पद्धतीने विमानतळाला दि. बा. पाटील साहेबांचे नाव द्यायला पाहिजे ते दिले गेले नाही तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून त्याचा सातत्याने उल्लेख हा पनवेल – उरणच्या आमदारांकडून केला जात आहे. आणि आता जनतेच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची वेळ आल्यानंतर विमानतळावर चाचण्या घेण्याची नौटंकी करून त्या माध्यमातून देखील पैसे लाटण्याचा जो प्रकार सुरू आहे तो जनतेच्याही लक्षात येतोय. विमानाची चाचणी घेण्यासाठी ७ लाख रुपयांचा खर्च आणि यांची ७० लाखांची बिले, हा भ्रष्टाचार सुद्धा बाहेर आलाच पाहिजे. यासाठी माझ्या दलित, मुस्लिम, आगरी, कोळी, कराडी यांच्यासह बारा बलुत जनतेने यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्र केलं, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजासाठी सुरक्षित संविधान बनवून त्यांना त्यांचे हक्क दिले आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी दिवंगत दी.बा.पाटील साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह रक्तरंजित आहुती दिल्या, जेलमध्ये गेले, गोळीबार झेलले आणि आता दिबांच्या नावाचे राजकारण करून जनतेला वेडे बनविण्याचा धंदा या निवडणुकीत बंद झाला पाहिजे, असे जनतेला आवाहन करून त्यांनी भाजपच्या नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्याचबरोबर विमानतळाच्या आंदोलनामध्ये सर्वाधिक गुन्हे माझ्यावर दाखल झालेले असतानाही माझ्या नावाचा वापर न करता भाजपने श्रेय लाटण्याचा प्रकार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

डोंबिवली आयरेतील बेकायदा साई रेसिडेन्सी जमीनदोस्त

डोंबिवली : येथील पूर्वेतील आयरे भागातील सद्गुरू नाना धर्माधिकारी उद्यानाजवळील बेकायदा साई रेसिडेन्सी इमारत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभाग अधिकाऱ्यांनी टप्प्याने नियोजनबध्दरितीने तेवीस दिवसांच्या कालावधीत भुईसपाट…