अशोक गायकवाड
नवी मुंबई :भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आज पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाच्या सामान्य शाखेचे अपर आयुक्त संजीव पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
कोकण भवनातील पहिला मजला, समिती सभागृह येथे झालेल्या या बैठकीत सिडको अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी विजय राणे, उद्यान अधीक्षक विशाल भोर, पनवेल महानगर पालिकेचे दशरथ भंडारी,नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सुलभा बारघरे,रायगड विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता एस.डी कट्टी,बृहन्‌मंबई राज्य कर्मचारी संघटनेचे उपाध्याक्षा श्रीम. अस्मिता जोशी, कोकणि भवन विद्युत विभागाचे उप अभियंता प्रविणकुमार शिवदास, कोकण विभागातील विविध विभागातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. कोकण विभागीय स्तरावरील भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन समारंभ दि. २६ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ०९.१५ वाजता साजरा होणार आहे.मुख्य शासकीय ध्वजारोहण कळंबोली पोलीस मुख्यालय मैदानावर होणार आहे. त्या अनुषंगाने बैठकीत मार्गदर्शन करताना पलांडे यांनी कोकण भवनातील सर्व विभागाने हा सोहळा यशस्वीरित्या व उत्साहात साजरा करण्याबाबत सूचना दिल्या. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी आणि हा कार्यक्रम उत्साहात साजरा करावा, असे सांगून सर्वांनी शासकीय पोशाखात कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *