माथेरान :पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने माथेरान व्हॅली इंग्लिश स्कूल वंजारपाडा येथील मैदानावर तालुकास्तरीय शिक्षक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या मध्ये धावणे, कबड्डी, गोळा फेक, थाळी फेक, लांब उडी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या उपक्रमास रा. जि.प.माननीय प्रभारी शिक्षणाधिकारी भोपळे साहेब उपस्थित होते. विजेत्यांना माननीय गट शिक्षणाधिकारी संतोष दौंड यांनी प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देवून सन्मानित केले. वैजनाथ केंद्राची माहे जानेवारीची कार्यशाळा ५ जानेवारीला गौळवाडी शाळेत संपन्न झाली. यावेळी. महिला कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्या कारणे केंद्राचे केंद्रप्रमुख नारायण सोनवणे यांनी केंद्राच्या वतीने केंद्रातल्या शिक्षिकेचा सत्कार केला. सविता बोराडे, सानिका हांडे, अर्चना शिंदे, वसुधा आंधळकर , वैशाली बांगर, संगीता खाडे, नीता वझरेकर, दर्शना वाडीले, अर्चना देशमुख. या शिक्षिकेचा सत्कार करण्यात आला. केंद्रातील नितीन थोरात तंत्रस्नेही शिक्षक ,मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि मान्यवर वर्ग कार्यक्रमास उपस्थित होते.
00000