मुंबई : १९४६ साली कुर्ला स्पोर्ट्स क्लबच्या स्थापनेत जी.एस.तथा गनाभाऊ वैद्य यांचा मोलाचा वाट होता. बारीक चणीचा हा हाडाचा क्रिकेटप्रेमी भरतण्याची संधी म्हणजे गेली ६६ वर्षे सुरु असलेली बाळकृष्ण् बापट स्मृती ढाल क्रिकेट स्पर्धा.”मैदानावरचा माणूस हि त्यांची ओळख होती.१७ व्या वर्षीचा वैद्य पुरस्कार हा माझ्यासाठी प्रेरणास्रोत ठरेल. आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ते वंदनीय आहेत, असे मनोगत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्यवाह अभय हडप यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर संजय गायतोंडे यांनी व्यक्त केले.
यावेळी गायतोंडे म्हणाले, पय्याडे संघाचा प्रशिक्षक असताना तब्बल नऊ वेळा बापट ढाल स्पर्धा जिंकली.तसेच सुमारे ८० जास्त स्पर्धातून विविध संघांच्या विजयात प्रशिक्षक म्हणून माझा सहभाग होता. यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर बापट ढाल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात वैद्य पुरस्कार स्वीकारल्यानंतर गायतोंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी मुंबई क्रिकेट संघटनेचे कार्यवाह अभय हडप, सहकार्यवाह दिपक पाटील. जी.एस वैद्य यांचे कनिष्ठ चिरंजीव बिपीन वैद्य उपस्थित होते.
0000
