श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रथम विभागीय पुरुष व महिला गटाच्या खो-खो स्पर्धेत पुरुषांच्या उपांत्य गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे), शिर्सेकर्ल महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी  (मुंबई उपनगर), सरस्वती क्रीडा केंद्र (मुंबई शहर) व  ग्रिफिन जिमखाना (ठाणे) ह्या संघाने प्रवेश केला. तर, महिलांच्या  उप-उपांत्य गटात रा. फ. नाईक संघ (ठाणे), ज्ञानविकास फॉउंडेशन संघ (ठाणे), शिवभक्त स्पोर्ट्स क्लब (ठाणे) व शिर्सेकर्ल महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी (मुंबई उपनगर) ह्या संघाने प्रवेश केला.
महिला गटातील पहिल्या उप उपांत्य सामन्यात ठाण्याच्या रा. फ. नाईक संघाने ठाण्याच्या राजश्री शाहू महाराज संघाचा ०८-०४ असा ४ गुणांनी पराभव करीत एकतर्फी विजय मिळविला. मध्यन्तराला  रा. फ. नाईक संघाने २ गुणांची  आघाडी घेतली ती गीतांजली नरसाळे हिने केलेल्या उत्तम संरक्षणामुळे. तिला दीक्षा काटेकरची  उत्तम साथ लाभली.   ह्या सामन्यात  गीतांजली नरसाळे (४:४० मि.,६:१० मि. संरक्षण), दीक्षा काटेकर(३:३० मि. २:४० मिनिटे संरक्षण व ३ गुण)   यांनी संघाला विजय मिळवून देण्यास मोलाचा वाटा उचलला पराभूत संघाकडून काजल शेख हिने (३:१० मि. ,१:१० मि. संरक्षण व १ गुण) पराभव टाळण्याचा प्रयत्न केला.
महिला गटातील दुसऱ्या उप-उपांत्य सामन्यात ठाण्याच्या शिवभक्त स्पोर्ट्स क्लब संघाने  मुंबई शहरच्या ओम साईश्वर सेवा मंडळाचा ७-६ असा १ गुण आणि ६ मिनिटे राखून विजया मिळविला.  शिवभक्त स्पोर्ट्स क्लब संघाच्या   किशोरी मोकाशीने (६:६० मि., ६:३० मि. संरक्षण ) संघाचा   विजय सुकर केला.
पुरुष गटातील पहिल्या उप उपांत्य सामन्यात ठाण्याच्या विहंग क्रीडा मंडळाने मुंबई शहरच्या विद्यार्थी क्रीडा मंडळ संघाचा  १०-०९ असा १ डाव १ गुणांनी   पराभव केला.  विहंग क्रीडा मंडळाच्या आकाश साळवे (३ मि., २:२० मि संरक्षण )  व आशिष  गौतम (२:१० मि. संरक्षण व २ गुण ) यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर  पराभूत संघाकडून सम्यक जाधव  (१:४० मि. व २ गुण )  व ओंकार मिरगळ (१:१० मि., १:३० मि. व १ गुण ) यांनी चांगला खेळ केला.
पुरुष गटातील सऱ्या उप-उपांत्य सामन्यात  ठाण्याचा ग्रिफिन संघाने मुंबई उपनगरच्या श्री सह्याद्री संघावर  १४-११ असा ३ गुणांनी विजय मिळविला.   ग्रिफिन संघाच्या  रुपेश कोंबकर (२:२० मि., १:२० मि.  नाबाद  ), सिद्धेश चिकणे (१:३० मि., २:१० मि. व ४ गुण) व आकाश तोरणे (१:४० मि., १:४० मि. व १ गुण  ) यांनी संघास विजय मिळवून दिला. तर, पराभूत संघाकडून अक्षय भांगरे (२:०० मि. १:५० मि. व १ गुण ) व सदाशिव पालव (१:२० मि ., १:४० मि. व १ गुण ) यांनी चांगला खेळ केला.
उप-उपांत्य फेरीचे इतर निकाल
पुरुष गट
शिर्सेकर्ल महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी  (मुंबई उपनगर)  X  शिवभक्त क्रीडा मंडळ (ठाणे)
२५ X १४
सरस्वती क्रीडा केंद्र (मुंबई शहर)  X युवक किडा मंडळ  (ठाणे)
१६ X ११
महिला  गट
ज्ञानविकास फॉउंडेशन संघ (ठाणे) X श्री सह्याद्री संघ (मुंबई उपनगर)
१४ X०५
शिर्सेकर्ल महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी (मुंबई उपनगर)    X  श्री समर्थ व्यायाम मंदिर (मुंबई शहर )
११ X ०४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *