मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या वैद्यकीय खात्यातील सॅनिटरी विभागाच्या सफाई कामगार जनाबाई बाळू नरवडे यांचा ३१ जानेवारी २०२५ रोजी सेवानिवृत्तीबद्दल वडाळा येथील कायाकल्पमधील सॅनिटरी कार्यालयामध्ये ॲड. एस. के. शेट्ये यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर व युनियनचे उपाध्यक्ष प्रदीप नलावडे, माजी बोर्ड मेंबर व युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे, विजय रणदिवे, उपाध्यक्ष शीला भगत, प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, प्रशासकीय अधिकारी जया धिरवाणी, सरपंच शुभांगी पडवळ, सेवानिवृत्त सुपरवायझर दंताळा, सेवानिवृत्त कार्यकर्ते प्रकाश पारधी, भालेराव, कार्यकर्ते संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
