Month: June 2026

 राष्ट्रीय सब- ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका!

 अस्मि राऊत व यश शिंदे ‘बेस्ट पिचर’, तर आर्या चव्हाण ‘बेस्ट कॅचर’ ठाणे : भुवनेश्वर येथील प्रसिद्ध किट युनिव्हर्सिटीच्या मैदानावर पार पडलेल्या ३१ व्या राष्ट्रीय सब- ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मानाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने दिमाखात सुवर्णपदक  पटकावले, तर मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. २४ मे ते २९ मे या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. संघीय यशासोबतच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या वैयक्तिक कौशल्याने संपूर्ण स्पर्धकांचे लक्ष वेधून घेतले. अस्मि राऊत (मुलींचा संघ): स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘बेस्ट पिचर ऑफ द टूर्नामेंट’ (Best Pitcher). यश शिंदे (मुलांचा संघ): मुलांच्या गटात उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत ‘बेस्ट पिचर ऑफ द टूर्नामेंट’ (Best Pitcher) चा बहुमान पटकावला. आर्या चव्हाण (मुलींचा संघ): उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘बेस्ट कॅचर ऑफ द टूर्नामेंट’ (Best Catcher). आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाचा फायदा दोन्ही संघांना राष्ट्रीय पातळीवर सज्ज करण्यासाठी महाराष्ट्राच्या तज्ज्ञ आणि अनुभवी प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत अत्यंत मोलाची ठरली. मुलींच्या संघाला लाभलेल्या प्रशिक्षक आरती भगत आणि रिया आगवणे या दोन्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत. तर मुलांच्या संघाचे प्रशिक्षक सोमनाथ सपकाळ आणि धनंजय शिरसाट हे स्वतः राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आहेत. या दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनामुळे व रणनीतीमुळेच महाराष्ट्राच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत दिमाखात मजल मारत हे घवघवीत यश संपादन केले. अध्यक्ष डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कौतुक महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि सचिव राजेंद्र इखणकर यांनी दोन्ही संघांच्या या अभूतपूर्व कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे. “महाराष्ट्राच्या मुला- मुलींनी राष्ट्रीय पातळीवर राज्याचा नावलौकिक वाढवला आहे. खेळाडूंची जिद्द, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेत्या प्रशिक्षकांचे योग्य नियोजन यामुळेच हे सुवर्ण आणि रौप्य पदक आपण मिळवू शकलो. सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या मार्गदर्शकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो,” अशा शब्दांत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. महाराष्ट्राच्या या दुहेरी यशामुळे संपूर्ण राज्यातील क्रीडा क्षेत्रातून खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 00000000

राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत ठाणे जिल्ह्याची चमकदार कामगिरी

ठाणे : नुकत्याच झालेल्या ७४ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाच्या ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या धावपटूंनी स्पृहणीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत सात सुवर्णपदकांसह दोन रौप्य आणि…

वैभव सूर्यवंशीचा आदर्श घ्या, खो-खोमध्येही मोठी कामगिरी करा!

आमदार दिलीप माने यांचे खेळाडूंना प्रेरणादायी आवाहन सोलापूर, दि. ३ जून : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कुमार आणि मुली गटातील खो-खोपटूंनी क्रिकेटमधील युवा सनसनाटी वैभव सूर्यवंशी याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी साकारावी, असे प्रेरणादायी आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी केले. कमी वयात सातत्य, मेहनत आणि दर्जेदार कामगिरीच्या जोरावर वैभव सूर्यवंशीने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे खो-खो खेळाडूंनीही जिद्द, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा उंचावावा, असे त्यांनी सांगितले. भव्य वातावरणात स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन आणि किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५२व्या कुमार व मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे उद्घाटन नेहरूनगर येथील शासकीय मैदानावरील स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीत उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे होते. प्रारंभी अलकाताई राठोड, नागेश बिराजदार, मोहन रजपूत आणि शिवशंकर राठोड यांनी मान्यवरांचे स्वागत केले. ‘खेळाडू शपथ पाळतात, आम्ही राजकारणी नाही!’ कार्यक्रमात सोलापूरची राष्ट्रीय खो-खोपटू स्नेहा लामकाने हिने उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. या शपथविधीचा संदर्भ घेताना दिलीप माने यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवणारे, पण तितकेच वास्तववादी विधान केले. “खेळाडू नेहमी प्रामाणिकपणे घेतलेल्या शपथेचे पालन करतात आणि खेळाडूवृत्ती जपतात; मात्र आम्ही राजकारणी लोक त्याप्रमाणे आचरण करत नाही,” अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. राज्य स्पर्धांसाठी ‘रॉयल्टी’ कायमची बंद यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. महाराष्ट्र खो-खो संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ यापुढे राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनासाठी कोणत्याही जिल्हा संघटनेकडून किंवा आयोजक संस्थेकडून ‘रॉयल्टी’ आकारली जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी जोरदार स्वागत केले. तसेच या स्पर्धेतून निवडले जाणारे महाराष्ट्राचे कुमार व मुली संघ हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत राज्याचा गौरव वाढवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती या उद्घाटन सोहळ्याला गोविंद शर्मा, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पवन पाटील, डॉ. प्रशांत इनामदार, सचिन चव्हाण, डॉ. बापूसाहेब अडसूळ, अश्विनी चव्हाण, डॉ. अरुण मनगोळी, महेश गादेकर, श्रीकांत ढेपे, अजितकुमार संगवे, सुनील चव्हाण, श्रीरंग बनसोडे, उमाकांत गायकवाड, राजाराम शितोळे, अजित शिंदे आणि संतोष कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य अंबादास पांढरे यांनी प्रास्ताविक केले, सचिन मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीकृष्ण कोळी यांनी आभार प्रदर्शन केले.

 मध्यंतराच्या पिछाडीवरून लातूरची जालन्यावर थरारक मात

 ५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा सोलापूर, दि. ३ जून : स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी, नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर सुरू असलेल्या ५२व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद…

 मिरा – भाईंदरमध्ये मोठी दहशतवादविरोधी कारवाई

फरार आरोपी हुजैफा दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात मिरा -भाईंदर महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संयुक्त कारवाई करत मीरा-भाईंदर परिसरातून फरार दहशतवादी आरोपी हुजैफा याला अटक केली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये करण्यात आलेल्या अटक आणि चौकशीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हुजैफा हा कथितरित्या सैयद मुदस्सिर हुसेन उर्फ मुन्ना झिंगाडा यांच्या संपर्कात होता. मुन्ना झिंगाडाचा संबंध दाऊद इब्राहिम टोळीशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, तो या मॉड्यूलच्या कारवायांना मार्गदर्शन करत असल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील वांद्रे परिसरातील रेल्वे जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या तणावाचा फायदा घेत तरुणांना भडकवून बेकायदेशीर व दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करण्याचा कट रचला जात होता. या कटाचे संचालन पाकिस्तानातील कराची येथून होत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. हुजैफावर मुंबईत स्थानिक नेटवर्क उभारणे आणि कारवायांसाठी आर्थिक व्यवस्था करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तपासादरम्यान त्याला या नेटवर्ककडून सुमारे एक लाख रुपये मिळाल्याचे समोर आले आहे. तसेच काही तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करून कामाच्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात येत असल्याची माहितीही उघड झाली आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले तौकीर आणि साजिद शेख यांना अनुक्रमे कुर्ला आणि मुंब्रा येथून ताब्यात घेण्यात आले होते. दोघेही अमली पदार्थांच्या व्यसनाधीन असून सहज पैसा मिळविण्याच्या लालसेपोटी या नेटवर्कच्या संपर्कात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अंडरवर्ल्ड गँगस्टर मुन्ना झिंगाडाचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या हुजैफाला बुधवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी केली असून पुढील चौकशीसाठी त्याला दिल्लीला नेण्याची तयारी सुरू आहे. सध्या तपास यंत्रणा संपूर्ण नेटवर्क, त्याचे आर्थिक स्रोत आणि कथित दहशतवादी कारवायांशी असलेले संबंध यांचा सखोल तपास करत आहेत. 0000000

माजी खासदार धनंजय सिंह यांनी उल्हासनगर दौऱ्याचे दिले संकेत

 उल्हासनगरातील जौनपूर समुदाय आणि समर्थकांना भेटणार सुनिल इंगळे उल्हासनगर  : उत्तर प्रदेशचे प्रसिद्ध माजी खासदार आणि बाहुबली नेते धनंजय सिंह आणि कल्याण युवासेनेचे लोकसभा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की) यांच्या सदिच्छा भेटीनंतर उल्हासनगरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा तीव्र झाली आहे. कल्याण युवासेना लोकसभा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की) यांनी उत्तर प्रदेशचे माजी खासदार धनंजय सिंह यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी चहापानी दरम्यान विविध सामाजिक व जनहितार्थ विषयांवर चर्चा झाली. या भेटीदरम्यान धनंजय सिंह यांनी जौनपूर भागातील रहिवासी आणि त्यांच्या समर्थकांना भेटण्यासाठी तसेच त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी लवकरच ते उल्हासनगरला भेट देणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख प्रमोद पांडेय, शिवसेना वैद्यकीय शहर समन्वयक बिपिन सिंह, शाखा प्रमुख सुमित सिंग आणि समाजसेवक राजेश यादव हे देखील उपस्थित होते. जनसंपर्क, संघटना आणि समाजहित या विषयांवरील चर्चा अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी होती. युवा नेते हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की) यांनी उत्तर प्रदेशचे माजी खासदार धनंजय सिंह यांच्या सदिच्छा भेटीनंतर उल्हासनगरात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. धनंजय सिंह लवकरच उल्हासनगरमध्ये शक्ति प्रदर्शन दाखवणार असल्याचे बोलले जात आहे, धनंजय सिंह यांच्या संभाव्य दौऱ्याबाबत उत्तर भारतीय समाजात आणि त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सामाजिक ऐक्य आणि जनसंपर्काच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरू शकतो बोलले जात आहे. आता धनंजय सिंह यांचा उल्हासनगरचा प्रस्तावित दौरा केव्हा होतो आणि त्याचा स्थानिक सामाजिक व राजकीय समीकरणांवर कितपत परिणाम होईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 000000000

 माता रमाबाई नगरातील आंबेडकर पुतळा परिसर होणार आकर्षक

 आठवडाभरात आराखडा सादर करण्याचे विधानसभा उपाध्यक्षांचे निर्देश… मुंबई :   घटकोपर पूर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा, तसेच परिसरातील अनधिकृत बांधकामांची शहानिशा करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या मागणीनंतर विधानसभा उपाध्यक्षांच्या कार्यालयात यासंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बृहमुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए,म्हाडा विभागाचे अधिकारी आणि पुतळा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत बोलताना उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, माता रमाबाई आंबेडकर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा सामाजिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असून परिसराचे नियोजनबद्ध सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी पुतळा परिसरातील रस्ते, पदपथ, प्रकाशयोजना, स्वच्छता व्यवस्था, संरक्षक भिंत, हरित पट्टा तसेच नागरिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आराखडा तयार करण्यात यावा. तसेच पुतळ्याभोवती झालेल्या अनधिकृत बांधकामांची संबंधित विभागांनी तातडीने शहानिशा करावी. नियमबाह्य आढळणाऱ्या बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करून परिसर मोकळा करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. यामुळे पुतळ्याचे सौंदर्य वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना स्वच्छ व सुस्थित परिसर उपलब्ध होईल, असे त्यांनी नमूद केले. बैठकीदरम्यान सुशोभीकरणाच्या कामांचा सविस्तर प्रस्ताव तयार करून पुढील आठवड्यात सादर करण्यात या परिसराचा विकास करताना स्थानिक नागरिकांच्या भावना आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन कामे करण्यात यावीत असे निर्देशही उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

 राज्यातील प्रत्येक क्रीडांगणांवर स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, प्रकाशयोजनांसह सीसीटीव्ही सुविधा

अनिवार्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश मुंबई,: महाराष्ट्रातील महिला खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रोत्साहनपर वातावरण उपलब्ध…

ओबीसी मान्यतेसाठी डॉ. हेमराज शाह यांची ऐतिहासिक कामगिरी

– दहा गुजराती ज्ञातींना मिळाला मागासवर्गीय दर्जा मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गुजरातमध्ये अनेक जातींना इतर मागासवर्गीय समाजात मान्यता देण्यात आली आहे परंतु महाराष्ट्रात सुमारे दहा विविध ज्ञातींना इतर मागासवर्गीय ज्ञाती म्हणून मान्यता दिलेली नाही. यासाठी पुणे येथे खत्री आयोगाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ हेमराजभाई शाह यांनी अथक परिश्रम घेतले आणि ज्या दख्खनच्या राणीला नुकतीच ९६ वर्षे पूर्ण झाली त्या डेक्कन क्वीनचा पास काढून डॉ हेमराज शाह हे मुंबई हून सातत्याने पुणे येथे जात होते आणि न्यायमूर्ती खत्री यांच्याकडे आर्जवे करीत होते. अर्ज विनंत्या करीत होते की आमच्या विविध ज्ञातींना इतर मागासवर्गीय म्हणून मान्यता देण्यात यावी. या विनंतीचा सहानुभूतीने विचार करुन मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येऊन त्यांना मान्यता देण्यात आली. गुजराती कडिया (४५), लुहार सुथार मिस्त्री (९२), नावी हज्जाम पाणंद (१०८), दर्जी सइ सुथार (१५३), घांची (३००), परजिया सोनी जव्हेरी (५३), लोहार (२६६), पंचाल (१२१), सुथार (१७५), मणियार (३०७) या ज्ञातींना अत्यंत परिश्रमपूर्वक प्रयत्नांती महाराष्ट्र सरकारने इतर मागासवर्गीय समाजात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला, जो डॉ हेमराज शाह यांच्या प्रशंसेला निश्चितच पात्र मानण्यात येतो. बृहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ हेमराजभाई शाह यांनी यासाठी एकहाती पाठपुरावा केला आणि त्यांच्या अनेक वर्षांची तपश्चर्या फळाला आली.  उपरोक्त दहा विविध प्रकारच्या ज्ञाती बांधवांच्या युवकांना डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप प्राप्त झाले. हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला असून हे सर्व विद्यार्थी डॉ हेमराज शाह यांच्या ऋणात राहणे पसंत करतात.

राम शिंदे यांची जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांच्यासोबत सदिच्छा भेट

मुंबई, : भारत-जपान संबंध अधिक मजबूत करण्याची गरज असून भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्दिष्टासाठी जपानसारख्या देशांशी आर्थिक, तांत्रिक व सामरिक सहकार्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा.…