महाराष्ट्र करनी सेनेचे आवाहन
रमेश औताडे
मुंबई : ज्या ज्या महानगरपालिकेत पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि प्रचंड नागरिकांची हानी झाली असेल आणि जर महानगरपालिका नगरपालिका यांनी नागरिकांची नुकसान भरपाई दिली नाही तर नागरिकांनी प्रॉपर्टी टॅक्स भरू नये. असे आवाहन महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यानी केले. महानगरपालिकेत पावसाच्या पाण्याने रस्ते , निवासी क्षेत्र भागात पाणी शिरले व नागरिकांची आर्थिक हानी झाली या जबाबदार महानगरपालिकाच आहे. कारण त्यांनी नाल्याची साफसफाई केलेली नाही, फक्त कागदोपत्री साफसफाई केल्याचे दाखवून लाखो करोडो रुपये ठेकेदार आणि आयुक्त व संबंधित कंपनीने वसूल केले असे चित्र या पावसात दिसले.
पावसाचे पाणी घरात शिरून घरातील साहित्याची हानी झाली असेल तसेच मोटरसायकल कार आदी वाहनाचे नुकसान झाले असेल तर या नुकसान भरपाईसाठी महानगरपालिकेवर किंवा नगरपालिकेवर दावा करा. तसेच गटर नालेसफाई न केल्यामुळे झालेली नुकसान भरपाई नागरिक मागणी करू शकतात. जर झालेली नुकसान भरपाई महानगरपालिकांनी देण्यास नकार दिला तर यापुढे महानगरपालिकेचे प्रॉपर्टी टॅक्स कोणीही भरू नये असे आवाहन सेंगर यांनी केले.
