Month: July 2026

जविकिरण काव्य मैफिलीला कवी व रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मिरा – भाईंदर : पँथर नेते ज. वि.पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जविकिरण काव्य मैफल, मुंबई व स्वर संगम फाऊंडेशन, मीरा रोड यांच्या संयुक्त विद्यमाने येथील विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या जविकिरण…

११६ वा आषाढी हरीनाम सप्ताह १८ ते २५ जुलैदरम्यान

ठाणे : चेंदणी कोळीवाडा कोळी समाज ट्रस्ट, ठाणे आणि श्री आनंद भारती समाज, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २५ जुलैदरम्यान चेंदणी कोळीवाडा येथील श्री विठ्ठल मंदिर, ठाणे (पूर्व) येथे…

उपवर्गीकरण परिषदेत नारायण बागडे उपस्थित राहणार

रमेश औताडे मुंबई : उपवर्गिकरण पोलखोल परिषदेचे आयोजन रिपब्लिकन नेते अण्णासाहेब कटारे यांनी नाशिक येथे केले असून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे या परिषदेस उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा नेते रविंद्र अहिरे यांनी दिली. अनुसूचित जातीचे उपवर्गिकरण  अ.ब.क.ड. करून देऊ अशी बतावणी म्हणजे थोतांड आहे. तुम्ही फक्त निळ्या सावलीत आसरा घेवू नका. तसेच फुले शाहु आंबेडकरी विचारांपासून फारकत घ्या  यासाठी आहे असे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक शासकीय विश्रामगृह गोल्ड क्लब येथे दुपारी १.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे बैठकीला बागडे सर संबोधित करणार आहेत . करिता कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रवींद्र अहिरे यांनी केले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी पालिकेचे प्रयत्न यशस्वी

रमेश औताडे मुंबई : साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त १ ऑगस्ट रोजी मुंबई महानगरपालिकेतर्फे उत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याच धरतीवर अशा प्रकारच्या उत्सवाच्या आयोजन नवी मुंबई महानगरपालिकेत  तसेच मिरा भाईंदर महानगरपालिकेत व्हावे याकरिता आमदार अमित गोरखे सातत्याने प्रयत्नशील होते. यासंदर्भात राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटनेचे राजीव मानकर आणि प्रकाश चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा करून नवी मुंबई महानगरपालिका तथा मीरा भाईंदर महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिकेत या उत्सवाचे आयोजन करण्याकरिता महानगरपालिकेकडून प्रस्तावना मान्य करून घेतलेली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातही जयंतीचे आयोजन करण्यात येणार आहे. मातंग समाजाने आमदार अमित गोरखे आणि राजीव मानकर यांचे आभार मानले आहेत.

आयुक्त कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपली

शहापूर प्रकल्प एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयाचा पराक्रम ठाणे : आदिवासी विकास विभाग आयुक्त कार्यालयाने ०४.११.२०२५ अन्वये, सन २०२५-२६ ते सन २०२९-३० या कालावधीत ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातील शेंडेगाव येथे आश्रम शाळांचे ‘सेंटर किचन’ (मध्यवर्ती स्वयंपाकगृह) सुरू करण्याचे आदेश दिले होते. आदेश प्राप्त होऊन जवळपास एक महिन्याचा  कालावधी उलटून गेला तरी अद्यापही शहापूर प्रकल्प एकात्मिक आदिवासी विकास कार्यलय यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हे सेंटर किचन अद्याप सुरू केलेले दिसत नाही. आयुक्त यांच्या आदेशाचे अशा प्रकारे उल्लंघन करणे हे प्रशासकीय शिस्तीच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात असून आयुक्तस्तरावरून आदेश देऊनही शेंडेगाव येथे सेंटर किचन’ (मध्यवर्ती स्वयंपाकगृह) सुरू करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि वेळेवर मिळणाऱ्या आहारापासून वंचित राहावे लागत असून, प्रशासकीय दिरंगाईबद्दल पालक वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट निर्देश देऊनही कंत्राटदारांच्या संगनमताने हे प्रकल्प रखडवले  जात आहे की काय अशी चर्चा पालक वर्गात सुरु आहे. सेंटर किचन सुरू झाल्यास धान्याची नासाडी थांबेल, गैरव्यवहाराला आळा बसेल आणि विद्यार्थ्यांना एकसमान व सकस आहार देणे शक्य होईल. या प्रक्रियेत कंत्राटदार अडथळे निर्माण करत असल्याचा दाट शक्यता असल्याचा संशय पालक वर्गात निर्माण झाला आहे. या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि पोषण आहाराशी खेळ सुरू असून, तात्काळ शेंडेगाव येथे आयुक्त यांच्या आदेशाचे पालन करून सेंटर किचन’ (मध्यवर्ती स्वयंपाकगृह) सुरु करावे अशी मागणी रिपब्लिकन ए. फेडरेशनचे तालुका सरचिटणीस राजू लोखंडे यांनी केली आहे.

 चिमुकलीच्या डोळ्यांत फुलला आशेचा नवा प्रकाश!

ठाणे सिव्हिल रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी अनिल ठाणेकर ठाणे : एखाद्या चिमुकलीच्या डोळ्यांत पुन्हा प्रकाश फुलणे, यापेक्षा मोठे समाधान डॉक्टरांसाठी दुसरे कोणते असू शकत नाही. जन्मापासूनच जग धूसर पाहणाऱ्या सात वर्षीय मुलीच्या आयुष्यात ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयाने आशेचा नवा किरण आणला असून, यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आता तिला दोन्ही डोळ्यांनी स्पष्ट दिसू लागले आहे. मुरबाड येथील छोट्या मुलीला जन्मजात दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होता. त्यामुळे तिचे बालपण इतर मुलांपेक्षा वेगळे ठरत होते. गेल्या वर्षी तिच्या एका डोळ्यावरील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या डोळ्याचीही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. या शस्त्रक्रियेत उच्च दर्जाच्या कृत्रिम लेन्स बसविण्यात आली असून या मुलीला आता दोन्ही डोळ्यांनी स्पष्ट दिसत असल्याची माहिती नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली. जन्मजात मोतीबिंदू असलेल्या लहान मुलावर शस्त्रक्रिया करणे हे वैद्यकीयदृष्ट्या मोठे आव्हान असते. मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांच्या कौशल्यामुळे मुलीच्या आयुष्यातील अंधार दूर झाला. सर्वसामान्य कुटुंबातील या चिमुकलीला नव्या दृष्टीसह उज्ज्वल भविष्याची आशा मिळाली आहे. या शस्त्रक्रियेसाठी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर, भूलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. चौकट जन्मजात मोतीबिंदूचे वेळेत निदान आणि उपचार झाल्यास मुलांची दृष्टी वाचू शकते. लहान मुलाला नीट दिसत नसल्याचा संशय आल्यास, डोळ्यात पांढरेपणा दिसल्यास किंवा प्रकाशाकडे प्रतिसाद कमी असल्यास कोणताही विलंब न करता नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. – डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे)

महावितरणचे शनिवारी ७२ ग्राहक मेळावे

स्मार्ट मीटरमुळे बिल वाढल्याची तक्रार? हरिभाऊ लाखे नाशिक : राज्यात महावितरणकडून बसविल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटरवरून मोठे वादळ उठले आहे. हे मीटर बसवल्यानंतर देयकांत वाढ झाली, बळजबरीने ते बसविले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्या विरोधात आंदोलने होत असून स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसविण्याचा आग्रह धरला जात आहे. स्मार्ट मीटरमुळे निर्माण झालेला संभ्रम आणि संशय दूर करण्यासाठी आता खुद्द महावितरणने पुढाकार घेतला आहे. स्मार्ट मीटरविरोधात नाराजी वाढत असल्याने नाशिक मंडळातील २८, मालेगाव मंडळातील १५ आणि अहिल्यानगर मंडळातील २९ अशा महावितरणच्या एकूण ७२ उपविभागीय कार्यालयांमध्ये शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत ग्राहक संवाद मेळावा पार पडणार आहे. मेळाव्यांना संबंधित महावितरणचे कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित राहून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करतील. तसेच स्मार्ट मीटरसंदर्भात असलेल्या शंकांची व वीज देयकांबाबतच्या तक्रारींची तपासणी करून त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. यावेळी स्मार्ट मीटरचे फायदे, वैशिष्ट्ये, कार्यपद्धती आणि अचूकतेविषयी माहिती देण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत किंवा कुठल्याही कारणाने आलेल्या वाढीव वीज देयकांबाबतच्या तक्रारींचे महावितरणकडून प्राधान्याने निराकरण करण्यात येणार आहे. परिमंडळात पावणे आठ लाख स्मार्ट (टीओडी) मीटर नाशिक परिमंडळात आतापर्यंत एकूण ७ लाख ६५ हजार ७०९ सर्व वर्गवारीच्या वीज ग्राहकांकडे स्मार्ट (टीओडी) मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक मंडळात ३ लाख ३८ हजार ८५५, मालेगाव मंडळात १ लाख १५ हजार ३७३ आणि अहिल्यानगर मंडळात ३ लाख ११ हजार ४८१ मीटरचा समावेश आहे. स्मार्ट मीटरचे फायदे व माहिती जाणून घेतल्यानंतर नाशिक परिमंडळातील मोठ्या प्रमाणात वीज ग्राहकांनी स्वेच्छेने स्मार्ट मीटर बसविण्यासाठी प्रतिसाद दिल्याचा दावा महावितरणने केला आहे. औद्योगिक ग्राहकांना साकडे? स्मार्ट (टीओडी) मीटर हे पूर्णतः अचूक असून सामान्य वीज ग्राहकांसाठी फायदेशीर असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळविण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर उपयुक्त ठरले आहेत. औद्योगिक ग्राहकांकडे अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे मीटर वापरात असल्याने वीज ग्राहकांनी मेळाव्यांना उपस्थित राहून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे. 000000000

स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी बचत गटांनी मालाचा दर्जा आणि पॅकिंगवर भर द्यावा- नारायण राणे

सिंधुदुर्गनगरी —जिल्ह्यातील बचत गट तयार करीत असलेल्या मलाचा दर्जा चांगला असेल आणि पॅकिंग चांगले असेल तरच आजच्या स्पर्धेच्या युगात बचत गटांचा टिकाव लागू शकेल.तेव्हा या दोन्ही बाबींवर भर देऊन वाटचाल…

– देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या सुखदुःखात पाठीशी उभे असणारे एकमेव नेतृत्व

 भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन डोंबिवली :“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी गावागावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव…