Month: July 2026

पाच वर्षांनंतरही वाङ्मयचौर्य चौकशी अहवाल अद्याप गुप्त

 मुंबई विद्यापीठाने भूमिका स्पष्ट करावी – मनविसे ( राजेंद्र साळसकर ) मुंबई – मुंबई विद्यापीठाने प्रा. डॉ. किशोर गायकवाड यांच्या समितीने सुमारे पाच वर्षांपूर्वी सादर केलेल्या कथित वाङ्मयचौर्य (Plagiarism) प्रकरणातील चौकशी अहवाल, दोषनिश्चिती व त्यानंतर झालेल्या शिस्तभंगात्मक कारवाईबाबत आजपर्यंत कोणतीही स्पष्ट माहिती सार्वजनिक केलेली नाही. या विलंबामुळे शैक्षणिक प्रामाणिकता, पारदर्शकता आणि संशोधनाच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) राज्य सरचिटणीस ॲड. संतोष गांगुर्ड यांनी केला आहे. मनविसेच्या मते, या प्रकरणात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी आजपर्यंत कोणती भूमिका घेतली, चौकशी अहवाल अद्याप का जाहीर करण्यात आलेला नाही, चौकशी पूर्ण झाली असल्यास तो सार्वजनिक का करण्यात येत नाही आणि चौकशी प्रलंबित असल्यास त्यास जबाबदार कोण, याबाबत विद्यापीठाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे. यासंदर्भात मनविसेने मुंबई विद्यापीठाकडे पुढील प्रश्न उपस्थित केले आहेत— १) प्रा. संदेश वाघ यांच्या कथित वाङ्मयचौर्य प्रकरणातील चौकशीची सद्यस्थिती काय आहे? २). संस्थात्मक शैक्षणिक प्रामाणिकता समिती (Institutional Academic Integrity Panel) व संबंधित प्राधिकरणाने या प्रकरणात कोणते निष्कर्ष नोंदविले आहेत? ३)संबंधित प्रकरणात कोणती शिस्तभंगात्मक अथवा प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे? ४) चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यास कोणता कायदेशीर किंवा प्रशासकीय अडथळा आहे? याबाबत समाधानकारक खुलासा व आवश्यक कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (UGC) अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचा इशाराही मनविसेने दिला आहे. मुंबई विद्यापीठ हे राज्यातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांपैकी एक असल्याने वाङ्मयचौर्यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये मौन बाळगण्याऐवजी पारदर्शक, उत्तरदायी आणि कायदेशीर भूमिका घेणे ही विद्यापीठाची जबाबदारी असल्याचे मनविसेने स्पष्ट केले आहे.

 ३४० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

अजिंक्यतारा सामाजिक सेवा संस्था व सातारा जिल्हा रहिवासी संघाच्यावतीने दिवा: अजिंक्यतारा सामाजिक सेवा संस्था आणि सातारा जिल्हा रहिवासी संघ (दिवा शहर) यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप व…

दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या बेस्ट बसेस जगन्नाथ शंकरशेठ मार्गावरुन सुरु करा

दिनेश मराठे मुंबई : दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या बेस्ट बसेस जगन्नाथ शंकरशेठ मार्गावरुन सुरु कराव्यात अशी मागणी स्थानिक रहिवाशी माजी नगरसेवक दिलीप नाईक यांनी केली आहे. या बाबत त्यांनी बेस्ट प्रशासनाला पत्र दिले असून त्यांनी म्हटले आहे की, बस क्र. ६६, ६९, १२६, ८६, ८८ या बेस्ट बसेस पूर्वी जगन्नाथ शंकरशेट मार्ग गिरगांव मार्गे त्यांच्या दक्षिण मुंबई मधील स्थानकाकडे जात होत्या. मेट्रो रेल्वेच्या गिरगांव व काळबादेवी स्टेशनच्या कामामुळे संपूर्ण जगन्नाथ शंकरशेट मार्ग खोदण्यात आला होता. त्यामुळे वरील सर्व बेस्ट बसेस गिरगांव जगन्नाथ शंकरशेट मार्गावरुन न जाता महर्षी कर्वे मार्गावरुन दक्षिण मुंबईकडे वळवण्यात आल्या होत्या. सन २०१७ च्या एप्रिल/मे महिन्यांपासून या बेस्ट बसेसचा मार्ग वरील प्रमाणे बदलण्यात आला होता. गेल्या वर्षी मेट्रो रेल्वेची दोन्ही स्थानक गिरगांव व काळबादेवी नागरिकांसाठी खुली करण्यात आली पण रस्त्याची कामे मात्र पूर्ण झालेली नव्हती. गेली आठ वर्षहून अधिक काळ गिरगांवकर बसेससाठी एक ते सव्वा किलोमिटर पायपीट करून महर्षी कर्वे मार्ग येथील बस थांब्यावर जात आहेत. आता मात्र संपूर्ण जगन्नाथ शंकरशेट मार्गाचे रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्यामुळे बेस्ट बसेसचा मार्ग पुर्ववत करण्यास कुठलीही आडकाठी नाही. त्यामुळे बेस्ट बसेस पूर्वी प्रमाणे जगन्नाथ शंकरशेठ मार्गावरुन दक्षिण मुंबईकडे नेण्यासाठी लवकरात लवकर सुरुवात करुन नागरिकांना दिलासा द्यावा. 0000000

श्री गणेश आखाड्याच्या पैलवान विशाल जाधवची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी

रोहतक- हरियाणातील रोहतक येथे १० ते १२ जुलै दरम्यान सुरू असलेल्या सीनियर नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील…

पुढील विधानसभेच्या निवडणुकीतून विक्रांत पाटील आमदार होणार – चंद्रशेखर बावनकुळे

विक्रांत पाटील यांचा वाढदिवस सोहळा दिमाखात साजरा पनवेल : सभागृहात सर्वसामान्यांचे प्रश्न आ.विक्रांत पाटील सातत्याने मांडत असल्याने त्यांचे राजकीय भवितव्य उज्वल असल्याचे व पुढील काळामध्ये त्यांच्या छातीवर हिरवा मानाचा बिल्ला तुम्हाला दिसेल हा माझा शब्द आहे असे गौरवोद्गार पनवेल शहरातील रॉयल गार्डन बँक्वेट हॉल येथे विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार योगेश टिळेकर, आमदार धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी किशन जावळे, प्रांताधिकारी पवन चांडक, तहसीलदार मिनल भामरे-भोसले, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जे.एम.म्हात्रे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ बांठीया, शिवसेना जिल्हाप्रमुख व नगरसेवक  रामदास शेवाळे, नगरसेवक राजू सोनी, राजू शर्मा, आरिफ पटेल, तानाजी खंडागळे, प्रदीप देशमुख यांच्यासह मुंबई, नवी मुंबई व पनवेलमधील महानगरपालिकेचे नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी प्रस्तावनेत बोलताना विक्रांत पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करत असताना पनवेलमधील नागरिक, मातृशक्ती, युवाशक्ती आणि राज्यभरातील सहकाऱ्यांनी दिलेले प्रेम, विश्वास व पाठबळ हीच लोकहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा असल्याचे सांगितले. जनतेचा स्नेह आणि विश्वास यामुळे समाजाच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागरिकांना विविध लोकोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. यामध्ये सायकली, शिलाई मशीन, फूड प्रोसेसर, आटा चक्की, भात पेरणी यंत्र, छत्र्या, स्पीकर्स, महिलांसाठी साड्या, ग्लुकोमीटर, रेनकोट, सीएनजी कूपन तसेच आयुष्यमान भारत कार्ड यांचा समावेश होता. शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि आवश्यक मदत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी विक्रांत पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत समाजातील सर्व स्तरातील लोकांना न्याय देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच दिसून आला आहे. सभागृहात येवून त्यांना वर्ष झाले आहे तरी त्यांनी जे-जे विषय मांडले आहेत ते सर्वसामान्यांच्या हिताचे होते व त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळेच रायगड जिल्ह्याचे कलेक्टर, प्रांत व तहसीलदार यांना मी आदेश दिले आहेत की विक्रांत पाटील जे प्रश्न त्यांच्यासमोर मांडतील त्या प्रश्नांना न्याय मिळवून द्यावा व त्यांना योग्य सहकार्य करावे. सिडको, नैना या महत्वाच्या प्रश्नांकडे सुद्धा विक्रांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून तो सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच आज एवढ्या मोठ्या सभागृहात भरगच्च गर्दी दिसून येत आहे हीच त्यांच्या कामाची पोवपावती आहे, असेही त्यांनी गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि पनवेलकर नागरिकांचे विक्रांत पाटील यांनी आभार मानले. तसेच पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी भविष्यातही पूर्ण निष्ठेने व समर्पित भावनेने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

पीटीकेएसची जिम्नॅस्ट ईशिता रेवाळेची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मुंबई: महाराष्ट्रातील मुंबई येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल(PTKS) ची उदयोन्मुख जिम्नॅस्ट ईशिता रेवाळे हिची ग्लासगो (स्कॉटलंड) येथे २४ ते २८ जुलै दरम्यान होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी(Commonwealth Games 2026) भारतीय संघात…

मातंग महिला हत्या प्रकरणी सखोल तपासणीची मागणी

रमेश औताडे मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मातंग समाजातील महिलेची गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या घटनेबाबत सखोल आणि निष्पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणी समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य यांनी केली आहे. या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत, दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे म्हटले आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अशा घटना समाजासाठी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. हत्येमागील खरा सूत्रधार आणि कारणांचा सखोल तपास करून कोणालाही पाठीशी न घालता निष्पक्ष चौकशी करावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही सुनीता तुपसौंदर्य यांनी केली आहे. शासन आणि पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

बॉबी देओलच्या हस्ते कल्याण ज्वेलर्सचा शुभारंभ

रमेश औताडे मुंबई: कल्याण ज्वेलर्सने, विरारमध्ये आपल्या पहिल्या शोरूमचा भव्य शुभारंभ केला.  महाराष्ट्रातील आपल्या रिटेल विस्तारातील एक मोठा टप्पा ब्रँडने गाठला आहे. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य सोहळ्यामध्ये बॉबी देओल यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.  अनेक मान्यवर पाहुणे आणि स्थानिक ग्राहक यावेळी उपस्थित होते. रमेश कल्याणरामन, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, कल्याण ज्वेलर्स म्हणाले,”महाराष्ट्र नेहमीच आमच्या सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक राहिला आहे. विरारमध्ये आमचे पहिले शोरूम सुरू करून आम्ही आमचे स्थान अधिक मजबूत करत आहोत, याचा आम्हाला खूप आनंद आहे. हा विस्तार दर्शवतो की, आम्ही या संपूर्ण परिसरातील ग्राहकांपर्यंत कल्याण ज्वेलर्सचा सर्वोत्तम अनुभव पोहोचवण्यासाठी तत्पर आहोत.

मुंबईतील धोकादायक पागडी (उपकरप्राप्त) इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती

 प्रसाद लाड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मुंबई: मुंबईतील धोकादायक उपकरप्राप्त (पागडी) इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या लाखो नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेत प्रभावीपणे उपस्थित करणारे भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या सातत्यपूर्ण…

दिवंगत अर्जुन पाटील यांना भजन-कीर्तनद्वारे आदरांजली!

– महेंद्रशेठ घरत यांनी केले पत्रकार कृष्णा पाटील यांच्या परिवाराचे सांत्वन उलवे : उलवे नोडमधील मोरावे गावचे ज्येष्ठ नागरिक अर्जुन भोकाजी पाटील (वय- ७८) यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांचे ते वडील होत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांनी शनिवारी कृष्णा पाटील यांच्या परिवाराचे सांत्वन केले. यावेळी एम.जी. ग्रुपचे सहकारी उपस्थित होते. दिवंगत अर्जुन पाटील यांनी वारकरी सांप्रदायांशी आपली नाळ जोडलेली होती. ते भजन-कीर्तनात रममाण होत असल्याने त्यांना भजन-कीर्तनद्वारेच आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यामुळे दररोज सकाळी १० ते १२ ‘गरुड पुराणा’चे वाचन दत्ता म्हात्रे करतील, तर सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत दररोज भजन सेवा असेल. त्यामुळे रविवारी दत्त प्रासादिक भजन मंडळ, गव्हाण. बुवा- देवानंद कोळी, मृदंगमणी- प्रशांत कोळी. सोमवारी श्रीपत बाबा भजन मंडळ, गव्हाण. बुवा- ज्ञानेश्वर म्हात्रे, मृदंगमणी- गौरव म्हात्रे. मंगळवारी जय भवानी प्रासादिक मंडळ, धाकटी जुई. बुवा- मोहन पाटील, वेश्वी. मृदंगमणी- यश रसाळ (दिघोडे). बुधवारी श्रीकृष्ण प्रासादिक महिला भजन मंडळ, बेलपाडा. गायिका- वर्षा ठाकूर, गीता ठाकूर. मृदंगमणी- अलंकार कडू. गुरुवारी साईराम प्रासादिक भजन मंडळ, मोहा. बुवा- राहुल कोळी, मृदंगमणी- जगन्नाथ कोळी. शुक्रवारी कुलदैवत प्रासादिक भजन मंडळ, उलवे, तरघर. बुवा- सिद्धेश पाटील, विनायक खारकर. मृदंगमणी- किरण ओवळेकर, तबलावादक- सागर मढवी. शनिवारी नादब्रम्ह साधना भजन मंडळ, खारघर (रांजणपाडा), बुवा- पंडित निवृत्तीबुवा चौधरी, मृदंगमणी- निलेश पाटील (कोपरा). रविवारी श्री एकादशी भजन मंडळ, मोरावे. बुवा- महादेव पाटील, अंकुश पाटील, दत्ता म्हात्रे. मृदंगमणी- सागर मढवी. सोमवारी गावदेवी प्रासादिक भजन मंडळ, न्हावे. बुवा- महेश पाटील, मृदंगमणी- महादेव ठाकूर हे भजन करतील. मंगळवारी उत्तरकार्य आहे. त्यानिमित्त ह.भ.प. महेश महाराज साळुंखे (पाटणोली) यांचे कीर्तन होणार आहे. यावेळी पखवाज- आदित्य पाटील, गायक- अल्पेश पाटील, विनायक पाटील आणि सहकाऱ्यांची त्यांना साथ लाभणार आहे. हे सर्व कार्यक्रम अर्जुन भवन, मोरावे येथे होणार आहेत. 00000000