Month: July 2026

हिंदू धर्माविषयी द्वेष यामुळे उबाठा राममंदिरावर प्रश्न विचारतायेत – नरेश म्हस्के

अनिल ठाणेकर ठाणे, सत्तेसाठी मुस्लिमांचे लांगुलचालन करणारे उबाठा हिंदू धर्माच्या द्वेषामुळेच  राम मंदिरावर प्रश्न विचारत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. वक्फ बोर्डातील भ्रष्टाचाराबाबत उलेमा बचाव टोळीचे प्रमुख गप्प का, असा सवाल खासदार म्हस्के यांनी यावेळी उपस्थित केला. ठाणे य़ेथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार म्हस्के म्हणाले की, २०१९ मध्ये शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत असताना उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी हिंदूत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडले. मतांसाठी मुस्लिम समाजाचे लांगुलचालन करणाऱ्यांना हिंदू देवदेवांबाबत आणि मंदिरांवर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली. वक्फ बोर्डाच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराबाबत उद्धव ठाकरेंनी कधी प्रश्न विचारले नाहीत. वक्फ बोर्ड बरखास्त करा, अशी बाळासाहेबांची भूमिका होती, मात्र वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला उबाठाने विरोध केला. वक्फ बोर्डाने हिंदूंच्या, देवस्थानाच्या जमिनी, शेतकऱ्यांच्या जमिनी, संरक्षण खात्याच्या आणि सरकारच्या जमिनी लाटल्या, तेव्हा उबाठाने प्रश्न विचारले नाहीत. तेव्हा उबाठाचे  हिंदुत्व कुठे गेले, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि ‘एनआरसी’बाबतही उबाठा कधी राष्ट्रहिताच्या बाजूने बोलले नाहीत. मुस्लिम समाजाच्या मतांसाठी उबाठाने कायम हिंदूविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे ते आता उलेमा बचाव टोळीचे प्रमुख झालेत, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वातील भाजपप्रणित एनडीए सरकारच्या काळात राम मंदिर उभं राहिलं. त्यामुळे उबाठाला पोटशूळ उठलाय. हिंदू धर्माबद्दलच्या आकसामुळेच उद्धव ठाकरे राममंदिर ट्रस्टवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यातून हिंदू धर्माची आणि हिंदू देवदेवतांवर ते टीका करत आहेत. उलेमा बचाव टोळीने वक्फ बोर्डाच्या गैरव्यवहारांवर बोलावे मगच राममंदिराचा विषय हाती घ्यावा, असे खासदार म्हस्के म्हणाले. नावात कन्हैया आहे म्हणून कोणी कृष्ण होऊ शकत नाही, ते रावण आणि कंसाच्या वृत्तीचे आहेत, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली. संसदेत शिवसेनेचे १३ खासदार आहेत. राज्यात ६० आमदार आहेत. शिवसेना काय आहे याची चिंता करण्यापेक्षा आपण कोण आहोत, निवडून येऊ शकतो का, याचा विचार कन्हैया कुमार यांनी करावा, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला. चौकट मविआच्या काळात तीन वेळा पेपरफुटी झाली, उबाठाने राजीनामा दिला का? नीट पेपर फुटीबाबत अभिजित दिपके यांच्याकडून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या आंदोलनाला उबाठाने पाठिंबा दिला. त्यावर खासदार म्हस्के यांनी टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उबाठा मुख्यमंत्री असताना राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा, म्हाडा भरती आणि आरोग्य विभाग भरतीमध्ये पेपरफुटी झाली होती, तेव्हा मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंनी राजीनामा दिला होता का, असा सवाल खासदार म्हस्के यांनी उपस्थित केला.

 वैभववाडीत एमआयडीसीसाठी हालचाली…!

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील २८ एकर उपलब्ध शासकीय जमिनीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी. ) स्थापन करण्याबाबत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकतीच  उद्योग व मराठी…

आझाद नगर दुर्घटनाग्रस्त मृत बालकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन तातडीच्या मदतीची मागणी- ॲड. निरंजन डावखरे

अनिल ठाणेकर ठाणे-कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाण्यातील आझाद नगर परिसरातील मद्रासी चाळ येथे काल घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी भेट देऊन…

 गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीला नवी संजीवनी

मुळदेत कार्प मत्स्यबीज निर्मितीला वेग…! कुडाळ : गोडया पाण्यातील मत्स्यशेतीला चालना मिळण्यासाठी शास्त्रज्ञ डॉ. हिरालाल चौधरी यांनी १० जुलै १९७० रोजी पहिल्यांदा प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे यशस्वीपणे कार्प मत्स्यबीज निमिर्तीचा प्रयोग साध्य केला. या महान कार्याचा गौरव म्हणून सन- २००१ पासून १० जुलै हा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील मत्स्य संशोधन केंद्रामध्ये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धेाडमिसे यांच्या हस्ते कटला जातीच्या नर आणि मादी या माशांना प्रेरक इंजेक्शन देऊन पार पडला. यावेळी मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विजय दळवी,  मत्स्य प्रकल्पाचे प्रमुख डॉ. कल्पेश शिंदे,  सहाय्यक प्राध्यापक,  डॉ. कृपेश सावंत, सहाय्यक प्राध्यापक, विनय सहस्रबुद्धे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, डॉ.वाघ,  डॉ. शेडगे, डॉ. गावडे आणि मत्स्य प्रकल्पातील कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होता. उद्यानविदया महाविद्यालय, मुळदे अंतर्गत मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प कार्यान्वित असून येथे गोडया पाण्यातील मत्स्य शेती, शोभिवंत मत्स्य शेती यासंबधी संशोधन कार्य तसेच विस्तार शिक्षण कार्यक्रम राबविले जातात. सिंधुदुर्ग जिल्हयातील गोडया पाण्यातील मत्स्यशेती व शोभिवंत मत्स्यशेतीला विकसित करण्यासाठी  शासनामार्फत राबविल्या जाणा-या  मत्स्यशेतीसंबधीत निधी वितरण योजनाच्या सहाय्याने  विविध प्रकल्प या केंद्रामध्ये राबविण्यात येत आहेत.  या अनुषंगाने गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचा विकास होण्याकरीता सुयोग्य आकाराच्या व उत्तम गुणवत्तेच्या कार्प मत्स्यबीजाचे सातत्यपूर्ण उत्पादन करुन मत्स्यबीजाची मागणी व पूरवठा यांमधील दरी भरून काढण्याच्या उद्दिष्टाने सिंधुरत्न समृध्द योजनेंतर्गत कार्प मत्स्यबीज केंद्र स्थापन करणे हा प्रकल्प मुळदे येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. याव्दारे निर्माण करण्यात आलेल्या विविध साधनसामग्रीचा विनियोग करुन प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाचा वापर करुन कटला,रोहू प्रजातीच्या मत्स्यबीजाची निर्मिती करण्यात येते व सदर मत्स्य बीज विविध आकारमानामध्ये संवर्धित करुन मत्स्यशेती करणा-या शेतकऱ्यांना पुरविण्यात येते. यामध्ये प्राधान्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर तसेच याव्यतिरिक्त मागणीनुसार कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापूर इत्यादी जिल्ह्यांमधील शेतक-यांचा समावेश आहे. 0000000

स्वखर्चातून पाच मोबाईल चार्जिंग व्हॅन वारीत दाखल

  प्रताप सरनाईक यांची अनोखी लोकसेवा अनिल ठाणेकर ठाणे, आषाढी वारी ही केवळ पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची यात्रा नसून, ती लाखो भाविकांच्या श्रद्धा, विश्वास आणि भावविश्वाला जोडणारी अखंड जीवनयात्रा आहे. या यात्रेत अनेक वारकरी दिवसन्-दिवस पायी चालत असतात. अशा वेळी त्यांच्या हातातील मोबाईल बंद पडला, तर केवळ एक उपकरण बंद होत नाही, तर त्यांच्या घरच्यांशी असलेला संवादही तुटतो. याच भावनेची जाणीव ठेवत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून ५ अत्याधुनिक मोबाईल चार्जिंग व्हॅन तयार करून त्या वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी समर्पित केल्या आहेत. या मोबाईल चार्जिंग व्हॅन युवा शिवसैनिकांच्या माध्यमातून वारीसोबत सातत्याने प्रवास करत आहेत. गरजेनुसार प्रत्येक वारकऱ्याला पूर्णपणे मोफत आणि अल्पावधीत मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. एका वेळी १०० मोबाईल चार्ज करण्याची क्षमता असलेल्या या व्हॅनमुळे हजारो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. वारीत चालताना अनेक वारकरी आपल्या कुटुंबीयांपासून शेकडो किलोमीटर दूर असतात. घरच्यांना केवळ एक फोन करून “मी सुखरूप आहे” एवढे सांगणेही त्यांच्यासाठी अमूल्य असते. मोबाईल चार्ज असल्यामुळे वारकरी आपल्या कुटुंबीयांशी २४ तास संपर्कात राहू शकतात, त्यांच्या मनातील काळजी दूर होते आणि वारीचा आनंद अधिक निश्चिंतपणे अनुभवता येतो. या उपक्रमाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “वारी ही सेवाभावाची परंपरा आहे. वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा. त्यांच्या हातातील मोबाईल चालू राहिला, तर त्यांच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य कायम राहील. ही सुविधा केवळ मोबाईल चार्ज करण्याची नाही, तर माणसामाणसांतील नाती, आपुलकी आणि विश्वास जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.” विठ्ठल नामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि सेवाभावाच्या या अनोख्या उपक्रमामुळे प्रताप सरनाईक यांनी वारकऱ्यांच्या यात्रेत आणखी एक भावनिक आणि माणुसकीचा अध्याय जोडला आहे. श्रद्धेच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणारी ही सेवा वारीतील लोकसेवेचा आदर्श ठरत आहे.

कल्याणमध्ये काँग्रेसच्या वतीने ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह आंदोलन

 अयोद्धेतील कथित राम मंदिर चोरी प्रकरणी आंदोलन कल्याण : अयोध्येतील कथित राममंदिर चोरी प्रकरणी कल्याण काँग्रेसच्या वतीने कल्याण जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिरा समोर…

भाजपा- शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

– ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकी पाठोपाठ आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

 अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना यू.एन.डी.पी. अंतर्गत भात बियाण्यांचे वाटप

– पनवेल तालुका कृषी विभागाचा दिलासादायक उपक्रम राज भंडारी पनवेल : यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पनवेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये भात बियाण्यांची पेरणी बाधित झाली असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाच्या सततच्या तडाख्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली. ही परिस्थिती लक्षात घेऊन पनवेल तालुका कृषी विभागाने तातडीने पुढाकार घेत यू.एन.डी.पी. अंतर्गत भात बियाण्यांची मागणी केली. पनवेल तालुका कृषी विभागाच्या या मागणीनुसार महाबीजकडून भात बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करण्यासाठी आवश्यक बियाणे उपलब्ध झाले असून त्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. या संपूर्ण उपक्रमात पनवेल तालुका कृषी अधिकारी श्री. हेगडे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक प्रसाद पाटील यांनी शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून बियाणे वितरणाची प्रक्रिया सुरळीत पार पाडली. तसेच गुळसुंदे येथील कृषीभूषण पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी स्थानिक स्तरावर समन्वय साधत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. याशिवाय गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी जगताप तसेच ग्रामपंचायत लेखनिक नंदकुमार नवरंगे यांनी लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती संकलित करणे, वितरणाचे नियोजन करणे आणि आवश्यक प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देणे यामध्ये मोलाची भूमिका बजावली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी शासन, कृषी विभाग आणि महाबीज यांनी केलेल्या तातडीच्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात वेळेवर उपलब्ध झालेल्या भात बियाण्यांमुळे पुन्हा पेरणी करणे शक्य होणार असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पनवेल तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतीविषयक कोणतीही अडचण असल्यास संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ००००००००

कामगार कायद्यांच्या राज्य नियमावलीवर सविस्तर चर्चा करून अहवाल केंद्रास पाठवावा

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे कामगार नेत्यांच्या बैठकीत सचिवांना निर्देश (राजेंद्र साळसकर) मुंबई : केंद्र सरकारच्या चार नवीन श्रम संहितांच्या अनुषंगाने राज्य शासनाने तयार केलेल्या चार मसुदा नियमावलींवर कामगार व…