Month: August 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती…

मुंबई दि. ५ ऑगस्ट – राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिला प्रदेशाध्यक्षा पदी वैशाली नागवडे आणि युवक प्रदेशाध्यक्ष पदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती सकाळी करण्यात आली तर दुपारी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिन्मय गाढे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन २००९ पासून काम करत आहेत. नाशिक विद्यार्थी शहराध्यक्ष, युवक शहर कार्याध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत आणि आता विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे. ०००००००

युवा सक्षमीकरण व करिअर विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनारला देश-विदेशातून उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण:  इंद्रायणी शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागांच्या संयुक्त विद्यमाने “युवा सक्षमीकरण आणि करिअर: आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन” या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनारचे…

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कल्याणच्या साई फिटनेस जिमचा दमदार ठसा

कल्याण: इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या मान्यतेखाली गणेश मैदान, गोवंडी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कल्याणच्या वाडेघर गावातील साई फिटनेस जिमच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध गटांमध्ये पदकांची लयलूट केली. खेळाडूंच्या…

क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षकांची सर्वसाधारण सभा

कल्याण: ठाणे जिल्हा राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका व सर्व तालुक्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन क्रीडा शिक्षकांची सर्वसाधारण सभा रविवार ९ ऑगस्ट,…

मतदारयादी विशेष पुनरीक्षणासाठी अर्ज दाखल करण्यास १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

नवी मुंबई : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत गणनापत्र (Enumeration Form) दाखल करण्याची मुदत भारत निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टवरून १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे मतदारांना आता १७…

अन्नसुरक्षेसाठी कृषी संशोधन आणि अनुभवाधारित शिक्षणाला चालना देणे काळाची गरज – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे संशोधन प्रकल्पांची पाहणी विद्यार्थी, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी साधला संवाद अशोक गायकवाड रायगड- कर्जत :देशाची अर्थव्यवस्था आजही मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर आधारित असून देशाची अन्नसुरक्षा कायम राखण्यासाठी शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीला शेतीशी जोडणे ही काळाची गरज असून राज्यातील शहरी भागातील प्रत्येक शाळेने वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आयोजित शास्त्रज्ञ, शेतकरी व विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे तसेच डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशीद, कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय तोरणे, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी.डी.वाघमोडे, मालाडच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विजय लेले, मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे कार्याध्यक्ष स्वप्नील सावरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासमोर अन्नसुरक्षेचे मोठे आव्हान होते. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे आज भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला असून इतर देशांनाही अन्नधान्य पुरवणारा देश म्हणून ओळख निर्माण केली आहे. हे यश केवळ शेतकऱ्यांच्या कष्टामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे देशाची अन्नसुरक्षा कायम राखण्यासाठी कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की,मालाडच्या उत्कर्ष मंदिर शाळेचे विशेष कौतुक करीत संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली कृषी अभ्यास सहल हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. पुस्तके, संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञान मिळत असले तरी प्रत्यक्ष अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन शेती, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहिल्यास त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध होते. राज्यातील सर्व शहरी भागातील शाळांनी वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून सन २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील शेतकरी संपन्न, सक्षम आणि समाधानी असणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना सर्वतोपरी मदत करणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करत अथक परिश्रमाने देशाला अन्न सुरक्षित ठेवत आहेत. त्यांच्या हितासाठी कृषी संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनाचा देशभरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून विद्यापीठाच्या विकासासाठी कोणत्याही बाबतीत कमतरता भासू दिली जाणार नाही. विद्यापीठाच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसमवेत भात लागवड दौऱ्यादरम्यान विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष शेतात भात लागवडीत सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शेतीविषयी प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याचे महत्त्व विशद केले, तर शेतकऱ्यांशी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि शाश्वत शेतीबाबत चर्चा करत कृषी क्षेत्रातील संशोधन आणि प्रत्यक्ष शेतातील अनुभव यांची सांगड घालणे,ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. तसेच भात जलद पैदास (स्पीड ब्रीडिंग) केंद्राची पाहणी करून आधुनिक संशोधन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. यांत्रिकी पद्धतीने भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाला त्यांनी भेट दिली.     यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणून ऍड.अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने यांनी केले. कार्यक्रमास प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ, विद्यापीठाचे उपसंचालक( बियाणे ) डॉ. अरुण माने, मंडळ अधिकारी चिचवली श्रीमती वैशाली पाटील, ग्राम महसूल अधिकारी आकाश काळे, भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे, भाजपचे उत्तर रायगड इंजिनियर सेल अध्यक्ष मंदार मेहंदळे यांच्यासह प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 विश्वचषक विजेत्या खो-खोपटूंना रोख पारितोषिक व शासकीय नोकरी द्या!

आमदार सतीश चव्हाण यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी – तातडीने कार्यवाहीचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश छत्रपती संभाजीनगर: पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना अद्यापही शासनाने जाहीर केलेली रोख पारितोषिकाची रक्कम मिळालेली नसल्याचा मुद्दा आता विधान भवनापर्यंत पोहोचला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन विश्वविजेत्या खेळाडूंना शासन निर्णयानुसार ₹२.२५ कोटींचे रोख पारितोषिक आणि शासकीय सेवेत नोकरी देण्याची ठाम मागणी केली. दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत झालेल्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्य सरकारने ₹१० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ७ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशिप / वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या सांघिक क्रीडा प्रकारातील खेळाडूंना ₹२.२५ कोटींचे रोख पारितोषिक देण्याची तरतूद असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून देशाला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना अद्यापही जाहीर केलेले पारितोषिक मिळालेले नाही. त्यामुळे शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून संबंधित खेळाडूंना रोख बक्षीस तसेच शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली. या मागणीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या विषयावर त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी दिली.

मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियममध्ये आयोजित “पल पल दिल के पास – म्युझिक फॉर अ कॉज” या संस्मरणीय संगीत मैफिलीत संगीत, आठवणी आणि संवेदनांचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला. दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर यांच्या उपस्थितीत, त्यांचे सुपुत्र अमित कुमार आणि सुमित कुमार, तसेच नात मुक्तिका गांगुली यांनी किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांचे सादरीकरण करत त्यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) आयोजित या कार्यक्रमातून वंचित कर्करोगग्रस्त कर्करुग्णांसाठी निधी उभारण्यात आला. संगीत, वारसा आणि मानवतेचा सुंदर संगम घडविणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

कागदी जीर्ण अवस्थेतील जातीच्या नोंदी डिजिटल करा

रमेश औताडे मुंबई: राज्यातील वंचित समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जीर्ण अवस्थेतील कागदी जातीच्या नोंदी डिजिटल स्वरूपात जतन करण्याची मागणी इतर मागासवर्ग कल्याण समितीचे प्रमुख आमदार सुरेश भोळे यांच्याकडे करण्यात आली आहे. या नोंदी कागदी स्वरूपात असून जीर्ण झाल्याने नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत. हा ऐतिहासिक अभिलेख कायमस्वरूपी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे  रिपब्लिकन सेनेचे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष विजय माने, जनसेवा कामगार संघटनेचे सरचिटणीस अमित साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष हर्षल पाटील, ॲड. सुमेश परमार, ॲड. श्याम शुक्ला, ॲड. मेघनाथ तेलावडे, राजेश शर्मा, अजय बरुचा, अश्विन पाटणे यांनी अभ्यासपूर्ण महत्वाची मागणी सरकारकडे केली आहे. १९५० ते १९६७ किंवा त्यापूर्वीच्या कालावधीतील नोंदी संबंधित अभिलेखांचे तातडीने स्कॅनिंग करून त्यांचे डिजिटल जतन करण्यासाठी राज्यस्तरीय सुरक्षित डिजिटल अभिलेखागार निर्माण करून या डिजिटल नोंदींना अधिकृत पुरावा म्हणून मान्यता द्यावी. यामुळे बनावट कागदपत्रे, जात घुसखोरी व गैरव्यवहाराला आळा बसेल असे अमित साळुंखे यांनी सांगितले.

कागदी जीर्ण अवस्थेतील जातीच्या नोंदी डिजिटल करा

रमेश औताडे मुंबई: राज्यातील वंचित समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जीर्ण अवस्थेतील कागदी जातीच्या नोंदी डिजिटल स्वरूपात जतन करण्याची मागणी इतर मागासवर्ग कल्याण समितीचे प्रमुख आमदार सुरेश भोळे यांच्याकडे करण्यात आली आहे. या नोंदी कागदी स्वरूपात असून जीर्ण झाल्याने नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत. हा ऐतिहासिक अभिलेख कायमस्वरूपी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे  रिपब्लिकन सेनेचे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष विजय माने, जनसेवा कामगार संघटनेचे सरचिटणीस अमित साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष हर्षल पाटील, ॲड. सुमेश परमार, ॲड. श्याम शुक्ला, ॲड. मेघनाथ तेलावडे, राजेश शर्मा, अजय बरुचा, अश्विन पाटणे यांनी अभ्यासपूर्ण महत्वाची मागणी सरकारकडे केली आहे. १९५० ते १९६७ किंवा त्यापूर्वीच्या कालावधीतील नोंदी संबंधित अभिलेखांचे तातडीने स्कॅनिंग करून त्यांचे डिजिटल जतन करण्यासाठी राज्यस्तरीय सुरक्षित डिजिटल अभिलेखागार निर्माण करून या डिजिटल नोंदींना अधिकृत पुरावा म्हणून मान्यता द्यावी. यामुळे बनावट कागदपत्रे, जात घुसखोरी व गैरव्यवहाराला आळा बसेल असे अमित साळुंखे यांनी सांगितले.