Month: August 2026

७ सप्टेंबरला ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे आयोजन

 निवेदन २२ ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे नागरिकांना आवाहन ठाणे : ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार, ७ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी म्हणजेच २२ ऑगस्ट पर्यंत त्यांचे अर्ज-निवेदने महापालिका भवन, नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावेत. निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदना सोबत प्रपत्र-१ (ब) सादर करणे आवश्यक आहे. प्रपत्र-१ (ब) नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक क्र. प्रसुधा-१०९९/सीआर-२३/९८/१८-अ, दिनांक २६ सप्टेंबर २०१२ नुसार माहे डिसेंबर- २०१२ पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचे निवेदन न स्विकारता, हे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये, परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेत, तसेच ज्या निवेदनावर १ महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी, एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक, विविध न्यायालयात, लोकआयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे, तसेच राजकीय पक्षाच्या, नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी केलेला अर्ज, तक्रार वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

खाजगी वाटाघाटीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र

 राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय अनिल ठाणेकर | ठाणे राज्यातील सार्वजनिक प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटीद्वारे स्वेच्छेने जमीन उपलब्ध करून देणाऱ्या भूमीधारकांना आणि त्यांच्या वारसांना आता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील आणि राज्यमंत्री ॲड.…

निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेकडून ५० लाख मोफत वह्यांचे वितरण अभियान

अनिल ठाणेकर ठाणे-निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने कोकणातील विद्यार्थ्यांसाठी ५० लाख मोफत वह्यांचे वितरण अभियान राबविण्यात येत असून, रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण…

‘हर घर तिरंगा’ मोहीमेंतर्गत लोकसहभागातून होणार विविध उपक्रमांचे आयोजन

०००००००० नवी मुंबई : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने सन २०२२ पासून ‘हर घर तिरंगा’ ही अभिनव मोहीम सुरू करण्यात आलेला आहे. जनतेच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी सदस्यांनी २२ अतिकुपोषित मुलांना घेतले दत्तक

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन, पदाधिकारी आणि सदस्यांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.जिल्ह्यातील तीव्र कुपोषित (SAM) श्रेणीतील मुलांना दत्तक घेऊन त्यांना कुपोषणमुक्त करण्याची जबाबदारी आता या…

नामांतर आंदोलनातील भीम सैनिकांना पेन्शन लागू करा

रमेश औताडे मुंबई : मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन हे लोकशाहीच्या हिताचे तर होतेच, पण ते आणीबाणीपेक्षाही अधिक भयानक होते. वर्तमान शासनाने ‘मिसा’ कायद्यानुसार आणीबाणीच्या काळात जेलमध्ये राहिलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर लोकशाही आणि अस्मितेसाठी तब्बल सोळा वर्षे संघर्ष करणाऱ्या नामांतर आंदोलनातील भीम सैनिकांनाही शासनाने पेन्शन घोषित करून त्यांचा सन्मान करावा, असे आवाहन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले. नामांतर शहीद भीम सैनिक दिनानिमित्त इंदौरा, १० नंबर पूल येथील शहीद स्मारकात आयोजित मानवंदना कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सुधा जनबंधू यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी दामू दादा कावरे, प्रवीण आवळे, प्रा. रमेश दुपारे, चरणदास गायकवाड, राजू कांबळे, जयदेव चिंवडे, वैशाली तभाने, नरेश खन, विद्यानंद गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

 सुनेत्रा पवार प्रकरणावर नाशिकमध्ये राजकीय रणकंदन

 काँग्रेस कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा हरिभाऊ लाखे नाशिक: राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट) अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा उल्लेख समाजमाध्यमांवरील एका चित्रफितीत ‘गुंगी गुडिया’ असा करण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर आंदोलकांनी काँग्रेस पक्ष कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या राजकीय घडामोडींमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपला मोर्चा महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस पक्ष कार्यालयाकडे वळवला. आंदोलनादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. या आंदोलनात आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, भगूर नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, दिलीप खैरे यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चा एम. जी. रोडवरून पुढे सरकत असताना पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, काँग्रेसने ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांच्याविषयी अपशब्द वापरले, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्यातील सर्व महिला सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. दरम्यान, आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. या गदारोळात आमदार अहिरे काँग्रेस पक्ष कार्यालयापर्यंत पोहोचल्या, तर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. वातावरण तणावपूर्ण होताच पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. यावेळी सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चाने राष्ट्रवादीचे हसू झाले… राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने काँग्रेस पक्ष कार्यालयावर मोर्चा काढून स्वतःचेच हसू करून घेतले आहे. त्यांनी आमच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी नाशिककरांच्या प्रश्नांवर, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांवर आणि त्यात अनेक नागरिकांना गमवावे लागलेल्या जीवांच्या जबाबदारीचे भान ठेवून महानगरपालिकेवर मोर्चा काढला असता, तर त्यांचे हसू झाले नसते. त्यांना बुद्धी मिळो, हीच माफक अपेक्षा. — निलेश (बबलू) खैरे, अध्यक्ष, नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी, नाशिक ०००००

अतिरिक्त आयुक्तपदावर मनिष जोशी, गजानन गोदेपुरे यांच्या शिफारशीवर आक्षेप

 नियमबाह्य असल्याचा नारायण पवार यांचा आरोप ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदासाठी विद्यमान उपायुक्त मनिष जोशी आणि गजानन गोदेपुरे यांच्या नावांची सर्वसाधारण सभेतून करण्यात आलेली शिफारस नियमबाह्य असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.…

 टिटवाळ्यात शाळेसमोरच जीवघेणा खड्डा

केडीएमसीच्या ढिसाळ कारभाराने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर कल्याण : टिटवाळ्यातील हरी ओम व्हॅली सोसायटीजवळील ओम संकुल परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. विवेकानंद इंग्लिश हायस्कूलच्या भिंतीलगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने भला मोठा खड्डा खोदून ठेवला असून, या धोकादायक कामामुळे शाळकरी विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणापासून अगदी लगतच गटार उपलब्ध असतानाही पावसाचे पाणी त्यामध्ये वळविण्याऐवजी रस्त्यालगत खोल खड्डा खोदण्यात आल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य आणि बेफिकीर कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. त्याचबरोबर पालक, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवाशांचीही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्याने त्याची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे एखादा विद्यार्थी, पालक किंवा दुचाकीस्वार या खड्ड्यात पडून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काम सुरू करताना कोणतीही सुरक्षितता उपाययोजना करण्यात आलेली नाही. खड्ड्याभोवती संरक्षक कठडे, इशारा फलक किंवा रात्री परावर्तित होणारी सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा परिसर अधिक धोकादायक बनला आहे. शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. याबाबत संबंधित अधिकारी हरून इनामदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, “करतो… पाहतो… माणूस पाठवतो…” अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्याप कोणतीही दुरुस्ती अथवा सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, हा धोकादायक खड्डा तातडीने बुजवून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी शाश्वत व्यवस्था करावी, तसेच या निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्याची गरज व्यक्त करत, “प्रशासनाला जाग येण्यासाठी एखादा निष्पाप जीव गमवावा लागणार आहे का?” असा संतप्त प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. ०००००००

 ‘शक्ती ऑन व्हील्स’ उपक्रम राबवण्यात यावे – आदिती तटकरे

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे: शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तू शासकीय कार्यालये व वसतीगृहांमध्ये सहज उपलब्ध झाल्यास नोकरदार महिलांना मोठा…