पोयसर जिमखान्याच्या धनुर्धरांनी ३५ पदके पटकावली
मुंबई महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड इंडोअर इनडोअर आर्चेरी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ मुंबई, ३ ऑगस्ट २०२६ – ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील शहाजी राजे भोसले क्रीडा…
मुंबई महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड इंडोअर इनडोअर आर्चेरी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ मुंबई, ३ ऑगस्ट २०२६ – ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील शहाजी राजे भोसले क्रीडा…
दिवा : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत रविवारी सकाळी एक सुन्न करणारी घटना घडली. अवघ्या १८ वर्षीय तरुणी कामावर जाते सांगत घराबाहेर पडली होती. दिवा- कोपर दरम्यान लोकलच्या धडकेत तिचा जागीच दुर्दैवी…
पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, पनवेलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या अत्याधुनिक ‘मूट कोर्ट’चे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते…
दहावीपासून पदव्युत्तर व कुशल उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी पनवेल : रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना नामांकित कंपन्या व विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या वतीने ‘महारोजगार मेळावा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट सकाळी ९ वाजता चांगू काना ठाकूर महाविद्यालय, खांदा कॉलनी येथे होणार आहे.या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर तसेच विविध कौशल्ये असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विविध नामांकित कंपन्या व उद्योग या मेळाव्यात सहभागी होणार असून, उमेदवारांना थेट रोजगाराच्या संधी मिळण्याबरोबरच जॉब इंटरव्ह्यू, करिअरच्या संधी आणि उत्तम नेटवर्किंग करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. रोजगाराच्या संधींच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असून, ‘रोजगार शोधणाऱ्यांना सुवर्णसंधी’ या उद्देशाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून, जाहिरातीतील क्यूआर कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून उमेदवार नोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी ७४९८०७४१०५ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महारोजगार मेळाव्यात सहभागी होऊन युवकांनी आपल्या भविष्याची दिशा निश्चित करावी आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 0
अशोक गायकवाड कर्जत : महसूल दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व महसूल दिन’ कार्यक्रमात कर्जतचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. सन २०२५-२६ या महसूली वर्षात शासनाच्या धोरणे व उद्दिष्टांनुसार अत्युत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रशस्तिपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, माजी खासदार धैर्यशील पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, महेंद्र दळवी, विक्रांत पाटील तसेच सिंधुदुर्गचे आमदार प्रमोद जठार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि कृषी सभापती वैकुंठ पाटील उपस्थितीत होते . प्रशासनाच्या वतीने कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, महसूल अपर आयुक्त वैशाली उंटवाल, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदुलकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ०००००००००
रमेश औताडे मुंबई : जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिव सुदर्शन गृहनिर्माण संस्थेच्या ओमकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुनर्वसन प्रकल्पाबाबत अखेर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. ओमकार बिल्डर्सवर रहिवाशांचे तब्बल १३३ कोटी रुपयांचे भाडे थकीत असून, हे थकीत भाडे तात्काळ मिळावे आणि रहिवाशांचे पुनर्वसन व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जोगेश्वरी तालुकाध्यक्ष सचिन लोंढे यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत पाठपुरावा केला. या रखडलेल्या प्रकल्पाबाबत नुकतीच एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नगरसेवक अजितदादा रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर हेदेखील उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार बिल्डर्सकडे सुमारे १३३ कोटी रुपयांचे भाडे थकीत असून यावर आता कडक कारवाई केली जाणार आहे.
कल्याण : कल्याण नजीक आंबिवली मधील मोहने परिसरातील यादव नगर स्मशानभूमीजवळ उल्हास नदीकाठी तारीख संपलेल्या औषधांचा ढीग आढळून आला आहे. त्यामुळे नदी किनाऱ्याच्या आणि परिसराच्या स्वच्छतेचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.…
एका बाजूला पाणीटंचाई, तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शुद्ध पाणी वाया कल्याण: कल्याण-डोंबिवलीतील अनेक भागांमध्ये नागरिकांना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना, दुसरीकडे केडीएमसीच्या टिटवाळा येथील मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात दररोज लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केडीएमसीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात गळती, तांत्रिक बिघाड आणि देखभालीअभावी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचा आरोप होत आहे. एकीकडे शहरातील अनेक भागांत नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे जलशुद्धीकरण केंद्रातूनच शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. पाण्यासारख्या अत्यावश्यक नैसर्गिक संसाधनाची होणारी ही नासाडी तातडीने थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोहिली केंद्रातील गळती व तांत्रिक समस्या त्वरित दूर करून नियमित देखभाल आणि देखरेख व्यवस्था मजबूत करण्याची गरज आहे. 0000
वाहनांचा ताफा घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न हिललाईन पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल कल्याण : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसाटणे परिसरात सराईत गुन्हेगारांची वाढती दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. गंभीर…
आदिवासी भागातील ‘होमस्टे’मुळे स्थानिकांना रोजगार हरिभाऊ लाखे नाशिक: पावसाची एक सर कोसळली की नाशिककरांना वर्षा सहलीचे वेध लागतात. शहरातील सोमेश्वर धबधबा, गोदाकाठ, तर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, सुरगाणा परिसरातील धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांनी फुलून जातात. या गर्दीमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत असली, तरी आदिवासीबहुल भागातील स्थानिकांसाठी हा पावसाळा रोजगाराची नवी संधी घेऊन येत आहे. विशेषतः ‘होमस्टे’ संकल्पना, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि रानभाज्यांमुळे या भागातील पर्यटनाला वेगळी ओळख मिळत आहे. उन्हाच्या कडाक्यानंतर पडणाऱ्या पावसाच्या पहिल्याच सरी वर्षा सहलीचे निमंत्रण घेऊन येतात. यंदा जूनमध्ये तुरळक पाऊस झाला. त्यानंतर जुलैमध्ये अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही काळ पर्यटनावर परिणाम झाला असला, तरी मुसळधार पाऊस, धबधबे आणि निसर्ग अनुभवण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. नाशिक शहरातील सोमेश्वर धबधबा, गोदाकाठ आणि इतर पर्यटनस्थळांवर दर आठवड्याच्या शेवटी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पावसात चिंब भिजल्यानंतर गरमागरम मका कणीस, भुट्टा, वडापाव, कांदा भजी, खारे शेंगदाणे आणि फुटाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची रांग लागते. त्यामुळे लहान-मोठ्या विक्रेत्यांच्या व्यवसायालाही चांगली चालना मिळत आहे. त्र्यंबकेश्वरमधील आंबोली, वाघेरा घाट, कश्यपी धरण, हरसूलमधील दावलेश्वर, खैराई किल्ला, तसेच सुरगाणा परिसरातील भिवतास धबधबा, खोकविहीर येथील केळावण, तातापाणी, पिंपळसोड, भारुंडी आदी ठिकाणे पावसाळ्यात पर्यटकांना खुणावत आहेत. शहराच्या कोलाहलापासून दूर असलेल्या या आदिवासीबहुल परिसरात नाशिकसह मुंबई, पुणे आणि परराज्यांतील पर्यटकही मोठ्या संख्येने येत आहेत. दिवसभर निसर्गाचा आणि जैवविविधतेचा अनुभव घेतल्यानंतर आदिवासी कुटुंबांकडून त्यांचा पारंपरिक पाहुणचार केला जातो. त्यामुळे या सहलींना केवळ पर्यटन नव्हे, तर ग्रामीण आणि आदिवासी जीवनशैलीचा अनुभव अशीही ओळख मिळत आहे. नाशिकमधील काही पर्यटन व्यावसायिकांकडून या सहलींचे नियोजन केले जाते. त्याअंतर्गत आदिवासी बांधवांच्या घरांमध्ये पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था केली जाते. महिला बचत गटांकडून भोजनाची जबाबदारी सांभाळली जाते. पर्यटकांच्या पसंतीनुसार शाकाहारी किंवा मांसाहारी भोजनाची व्यवस्था केली जात असली, तरी बहुतांश पर्यटक शाकाहारी जेवणालाच पसंती देतात. भात, डाळ, उडीद डाळीचे भुजिया, नागलीची भाकरी, विविध रानभाज्या आणि स्थानिक पद्धतीचे पदार्थ यांचा समावेश असलेले अमर्यादित भोजन अवघ्या १२० ते १५० रुपयांत उपलब्ध करून दिले जाते.