Month: August 2026

 मुरबाडच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून १० कोटींचा ऐतिहासिक निधी मंजूर

भूमिगत विद्युत वाहिनी आणि सी.सी टी.व्ही प्रकल्पामुळे मुरबाडच्या विकासाला नवी गती राजीव चंदने मुरबाड : मुरबाड नगरपंचायत क्षेत्राचा कायापालट करण्याच्या उद्देशाने माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना (शिंदे गट)मुरबाड तालुका प्रमुख, रामचंद्र दुधाळे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.  त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुरबाडकरांच्या दीर्घकालीन मागणीला मंजुरी देत १० कोटी रुपयांचा ऐतिहासिक निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे मुरबाड शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल होणार आहे. या निधीतून राबवल्या जाणाऱ्या दोन प्रमुख प्रकल्पांमुळे मुरबाडच्या चेहरा-मोहऱ्यात आमूलाग्र बदल होईल. सद्यस्थितीत असलेली मुरबाड नगरपंचायत ते शिरवली जलकुंभपर्यंतची जीर्ण आणि ओव्हरहेड विद्युत वाहिनी पूर्णपणे भूमिगत करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे एकीकडे शहराचे सौंदर्य वाढेल तर दुसरीकडे पावसाळ्यात होणारे वीज खंडित, अपघात, आणि वीज, वाहिन्यांचे नुकसान याला पूर्णविराम मिळेल. नागरिकांना अखंड, सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणे शक्य होईल. तसेच मुरबाड नगरपंचायत हद्दीतील सर्व प्रमुख चौक, बाजारपेठा, शाळा आणि गर्दीच्या ठिकाणी अत्याधुनिक सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले जाणार आहे. या माध्यमातून शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता येईल आणि २४x७ केंद्रीय नियंत्रण कक्षातून शहरावर लक्ष ठेवता येईल. या विकासकामांच्या मंजुरीमुळे मुरबाडकरांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. रामचंद्र दुधाळे यांच्या दूरदृष्टीमुळे आणि नेतृत्वामुळे मुरबाडच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली आहे. दुधाळे यांच्या प्रयत्नांमुळे शहराला हा निधी मिळाल्याबद्दल समस्त मुरबाडकरांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी नगराध्यक्ष रामचंद्र दुधाळे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. ‘मुरबाडला स्मार्ट आणि सुरक्षित शहर बनवणे हे माझे स्वप्न आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या या निधीमुळे ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. मुरबाडकरांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी मी कटिबद्ध आहे.’ असे वक्तव्य मुरबडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र दुधाळे यांनी व्यक्त केलं. ०००००

राज्यस्तरीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत रायगडला विजेतेपद

पनवेल : नुकत्याच छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय थाईबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रायगडने विजेते पदाचा मान मिळवला. रायगडने या स्पर्धेत ४४ सुवर्ण, २१ रौप्य, ८ कांस्य अशी एकूण…

महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा मजबूत दुवा: नितेश राणे

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव; नागरिकाभिमुख व पारदर्शक प्रशासनावर भर सिंधुदुर्ग : प्रतिनिधी महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील सर्वात महत्त्वाचा दुवा असून जन्मदाखल्यापासून ते शेतजमिनीच्या नोंदीपर्यंत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी…

 सीईओ खेबूडकरांचा पुढाकाऱ्याने गरीब कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात

संवेदनशील प्रशासनाचा आदर्श…! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य र्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली- पागावाडी येथील जनाबाई पाटील यांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे पाटील यांच्या मोडकळीस आलेल्या घराची दुरुस्ती पूर्ण झाली असून शासनाच्या विविध योजनांचाही लाभ त्यांना मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पाटील यांच्या घराचे छप्पर अत्यंत जीर्ण झाल्याने या कुटुंबाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी या संबंधात खेबूडकर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर पाटील यांच्या घराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून देत काम पूर्ण होण्यासाठीही पुढाकार घेतला. घराचे काम पूर्ण झाल्यानंतर खेबूडकर  यांनी पुन्हा एकदा पाटील यांच्या घरी भेट देऊन घराच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी घरासाठी आवश्यक असलेले दरवाजे तसेच पत्रे व अन्य किरकोळ कामांसाठी स्वतःच्या खिशातूनच आर्थिक मदत केली. खेबूडकर यांनी या निमित्ताने संवेदनशील प्रशासनाचा आदर्श घालून दिला आहे. खेबुडकर हे एवढेच करून थांबले नाहीत  तर त्यांनी या कुटुंबांना अंत्योदय रेशन कार्ड,शासकीय पेन्शन योजनेचा त्यांना  लाभ मिळावा तसेच आवश्यक औषधोपचार व पुढे  औषधे मिळण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचनाही  दिल्या. सिंधुदुर्गात जि. प. चे   मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून   रुजू झाल्यानंतर खेबुडकर यांनी  शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण, महिला व बालकल्याण या विभागांच्या कामकाजात विशेष लक्ष घालून ग्रामीण जनतेला दिलासा मिळेल असे महत्वाचे  निर्णय घेतले आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, अशा सेविका यांच्या प्रश्नात लक्ष घालून त्यांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर त्यांचा विशेष भर आहे आणि त्या दृष्टीने ते काम करीत आहेत. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी आणि त्यांना औषधे घरपोच मिळावीत यासाठी ते सतत आग्रही असतात आणि तशा सूचना त्यानी  जिल्हा आरोग्य अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पाटील कुटुंबाच्या बाबतीत खेबुडकर यांनी जो संवेदनशील पण दाखवला त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ००००

 ‘जेन झी’ने एका पक्षाची आणि एका माणसाची दहशत संपविली: डॉ. जितेंद्र आव्हाड

पुढील महापालिका निवडणुकीत १२ वरून ५० नगरसेवक निवडून आणू: मनोज प्रधान ठाणे : अनिल ठाणेकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने जयभगवान हॉल येथे आयोजित…

४०० हून अधिक एनएसएस स्वयंसेवकानी घेतली नशा मुक्तीची शपथ

कल्याण  : ‘नशामुक्त भारत – विकसित भारत’ या राष्ट्रीय संकल्पाला युवकांची ताकद जोडत ठाणे जिल्हास्तरीय ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान’ रविवारी एस.एस.टी. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे…

नवी मुंबईतील एसआयआर कामाचा जिल्हाधिकारी व आयुक्तांचा आढावा

नवी मुंबई : प्रतिनिधी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्यानंतर नवी मुंबईतील १५० ऐरोली व १५१ बेलापूर मतदारसंघांमध्ये १ ते ३ ऑगस्टदरम्यान १७३ विशेष शिबिरे…

लोकमान्यांना वाहिली विधान भवनात आदरांजली

मुंबई, दि.  (प्रतिनिधी) :  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आज  महाराष्ट्र विधानपरिषदेचे उप सभापती सचिन अहिर यांनी विधान भवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.  याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव…

उमा तेंडोलकर यांच्या निरुपणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमान्य टिळक पुण्यतिथी सुविद्यालयात साजरी मुंबई : सुविद्या प्रसारक संघाचे सुविद्यालय, बोरीवली पश्चिम येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्या ह. भ. प. उमा गजानन तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जीवन प्रवास, त्यांचे कार्य, त्यांचा दृढनिश्चय आणि स्वातंत्र्यलढा आपल्या मधुर वाणीत समजावून सांगितला. टिळकांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी रंगवून सांगताना त्यांनी आपल्या निरूपणाला संस्कृत श्लोक तसेच संतांच्या अभंगांची छान जोड दिली. या कार्यक्रमात सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे हे अध्यक्षस्थानी होते. तसेच विशेष निमंत्रित म्हणून इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा सरिता गुजराथी व सुविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी प्रतिमा राजवाडे सुविद्या प्रसारक संघाच्या कार्याध्यक्षा देवयानी सबनीस, सुविद्यालयाचे मुख्याध्यापक जयंतीलाल निकम आदी मान्यवर उपस्थित होते.  लोकमान्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश पारकर, कार्यवाह संजय दळवी आणि सदस्य राजेंद्र मोहिते यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. लोकमान्य प्रतिष्ठान तर्फे सतीश पारकर व संजय दळवी यांनी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे यांना प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्त केल्याचे पत्र सुपूर्द करून त्यांना सन्मानित केले. लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून सुविद्यालयाचा प्रथम पारितोषिक वितरण समारंभही संपन्न झाला. शालांत परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच शालेय अभ्यासक्रमामध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन कौतुक करण्यात आले. शाळेच्या नादब्रह्म समूहाने  संगीत शिक्षिका निशा शिंदे टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम गीते सादर केली. कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला.

लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वराज्यभूमीच्या कामांना गती देण्याचे संकेत मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी मुंबईतील टिळक स्मारक परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्वसामान्य नागरिकांसह विविध…