ठाणे : सतत कामगाराला ब्रेक देणे, त्यामुळे पगार येत नसल्यामुळे कुटुंबाचा सांभाळ करू शकत नाही असे बोलून कंत्राटी सफाई कामगारा विरोधी धोरणामुळे मुंब्रा जेपी नगर येथील सफाई कामगार जितेश कांबळे यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
दाढी न करणे, एक मिनिट उशीर होणे किंवा इतर छोट्या कारणावरून घरी बसवणे, पुन्हा कामावर घेण्यासाठी पैशाची मागणी करणे, कामाचा योग्य मोबदला न देणे ,नवीन कामगाराला घेताना त्याच्याकडून एक लाख रुपये घेणे ,महिला सह इतर कामगारांनाही खूप छळ केला जातो अशी व्यथा आईला रडून जितेश ने आत्महत्या करण्यापूर्वी सांगितली. उद्यापासून मी कामाला जात नाही कारण मला पुन्हा दहा दिवस घरी बसवले त्यामुळे पगार येणार नाही, पगार आला नाही तर मी तुमचे पालम पोषण करू शकणार नाही .यामुळे माझ्या जीवाचे मी काही बरे वाईट केले तर तू आणि पप्पा कंपनीला सोडू नको असे बोलून सुसाईड नोट लिहून ठेवली व पाच ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान घरातच गळफास घेऊन जितेशने आत्महत्या केली.
या करिता मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी कामगार नेते मिलिंद वानखेडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक कमिटीचे अध्यक्ष बुद्धभूषण कुंदन गोटे यांच्याकडे मयत जितेश कांबळे यांच्या आई वडिलांनी धाव घेतली .यानुसार कामाचा योग्य मोबदला न देणे, नोकरीत अडथळा निर्माण करणे, वारंवार अपमानित करून शारीरिक, आर्थिक ,मानसिक,छळ करून सफाई कामगाराच्या विरोधातील चुकीच्या धोरणामुळे आत्महत्येस प्रवृत्त करणारे कंपनीचे मालक, संचालक, व्यवस्थापक ,इन्चार्ज, सुपरवायझर व संबंधित सर्व अधिकारी- कर्मचारी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारित कायदा 2015 चे कलम 3(1 )(आर ),3(1) (झेड सी), 3(1) (za)(E), 3(2 )(5).भारतीय संहिता 2023 चे कलम 108, नागरी हक्क संरक्षण संहिता 1955, कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना भेटून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) कामगार आघाडीने केली. संबंधितावर योग्य कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आश्वासनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी शिष्टमंडळाला दिले .
जितेश कांबळे या कंत्राटी कामगारांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही ,जोपर्यंत कंपनीच्या संबंधित सर्वांवर कायदेशीर कारवाई होऊन जितेश कांबळेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही असे आरपीआय( ए)कामगार आघाडी ठाणे प्रदेशाध्यक्ष मिलिंद वानखेडे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मिरवणूक कमिटीचे अध्यक्ष बुद्धभूषण कुंदन गोटे, मयत कामगार जितेश कांबळे यांचे वडील नारायण कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भुजंग साळवे, सुनील शिंदे, राजा पराड ,दीपक साळवे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होतेण्
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *