उल्हासनगर : राज्यभर तिरंगा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असुन उल्हासनगर महापालिकेने हर घर तिरंगा उत्सवा निमित्ताने दररोज कार्यक्रमाची उधळन सुरु केली आहे. आज महापालिकेच्या वतीने महिला कर्मचारी, शिक्षिका आणि विविध क्षेत्रातील महिला रण रागिनीनी फेटे परिधान करुन बाईक वर स्वार होवुन रॅली काढुन तिरंग्याचे महत्व पटवुन दिले.
केंद्र शासन व राज्य शासन यांच्या आदेशाने उल्हासनगर महापालिकेने विविध कार्यक्रमाची सुरवात केली असुन १३ ऑगॅस्ट ते १५ ऑगस्ट या दिवशी घरावर तिरंगा लावुन देशाप्रती प्रेमाची भावना व्यक्त करावे. तेव्हा आज महापालिका आयुक्त डॉ. अझीझ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका महिला कर्मचारी , शिक्षिका आणि विविध क्षेत्रातील महिला रणरागिनी यांनी तिरंगा उत्सवात सहभागी होवुन डोक्यावर फेटे परिधान करुन बाईकवर स्वार होवुन रॅली काढुन तिरंग्याचे महत्व पटवुन दिले. या रॅलीत मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.
00000
