श्री आनंद भारती समाज संस्थेच्या

ठाणे : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या श्री आनंद भारती समाज संस्थेच्या अध्यक्षपदी २०२४ ते २०२७ या तीन वर्षांच्या कालावधी करता संस्थेचे जेष्ठ सदस्य हरेश्वर मोरेकर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत संस्थेच्या ननवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. संस्थेचे मावळते अध्यक्ष सुभाषचंद्र मोरेकर सभेच्या अध्यक्षस्थानी होते. १२ जणांच्या कार्यकारणीत विवेक मोरेकर, सचिन काटकर आणि सुनील कोळी यांची फेरनियुक्ती करण्यात आली. YA नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना नवनियुक्त अध्यक्ष हरेश्वर मोरेकर म्हणाले, संस्थेच्या वाटचालीतील माझ्या प्रदीर्घ कार्याची हि पोचपावती आहे. पण वयाच्या ८० व्या वर्षी तुम्ही माझ्याकडून पूर्वीची कार्यक्षमता अपेक्षा ठेवू नका.
संस्थेची नवीन कार्यकारिणी : अध्यक्ष – हरेश्वर मोरेकर, कार्याध्यक्ष – ओमप्रकाश धिरोलिया, उपाध्यक्ष – विनोद नाखवा, कार्यवाह – संदीप कोळी, सह कार्यवाह – माधुरी कोळी, खजिनदार – विवेक मोरेकर, सुनील कोळी, सचिन काटकर, कमलाकर कोळी, योगिता नांगरूत,सुनील नारायण कोळी, सम्राट कोळी, अंतर्गत हिशोब तपासनीस – कल्पक भगवान कोळी.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *