पालघर : गोरगरिबांना आनंदात सणं साजरा करता यावा. सणाला त्यांना ही गोडधोड खायला मिळावे म्हणून आनंदाचा शिधा ही योजना महायुती सरकार ने आणली आहे.
मात्र, यंदाच्या गणेशोत्सवाला शासनाकडून राज्यातील लाभार्थी संख्ये एव्हढा आनंदाचा शिध्याचा पुरवठा न करता त्याला कात्री लावुन अपूर्ण किटचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानांना केला आहे. त्यामुळे हजारो आदिवासी, गोरगरीब कुटूंब आनंदाच्या शिध्या पासुन वंचित राहणार आहेत. एकट्या मोखाडा तालुक्यात सुमारे एक हजार; आदिवासी कुटूंबाना या शिध्यापासुन वंचित रहावे लागणार आहे. यंदा त्यांचा गणेशोत्सव कडु होणार आहे.
गोरगरिबांना सणांला गोड खाता यावे, म्हणून महायुती सरकार ने आनंदाचा शिधा ही योजना गतसालापासुन राज्यात अंमलात आणली आहे. गरीब कुटुंबाना केवळ 100 रूपयांत प्रत्येकी एक किलोचे रवा, साखर, पामतेल आणि चणाडाळीचे किट, स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब शिधा पत्रिका धारकांना देत आहे. त्यामुळे ही योजना खुपच लोकप्रिय झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाला या किट ची अपेक्षा गोरगरिबांना लागली आहे.
मात्र, महायुती ने सरकार ने यंदाच्या गणेशोत्सवाला लाभार्थी कुटुंबांच्या संख्या एव्हढा आनंदाचा शिध्याचा पुरवठा न केल्याने, हजारो कुटुंब या शिध्यापासुन वंचित राहणार आहे. यंदा त्यांचा गणेशोत्सव कडु होणार आहे.
मोखाडा तालुक्यात 64 स्वस्त धान्य दुकाने आहेत. तालुक्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब अशी एकुण 19 हजार 83 लाभार्थी कुटुंब संख्या आहे. यामध्ये अंत्योदय चे 48 हजार 745 तर प्राधान्य कुटुंब शिधा पत्रिका धारक 42 हजार 887 असे एकूण 91 हजार 632 लाभार्थी संख्या आहेत.
तर ऑनलाईन नोंदणी प्रमाणे मोखाड्यात 18 हजार 690 कुटुंब आनंदाचा शिधा योजनेसाठी पात्र लाभार्थी शिधा पत्रिका धारक कुटुंब आहेत. मात्र, शासनाकडून तालुक्याला 16 हजार 755 आनंदाचा शिध्याचे किट ऊपलब्ध झाले आहेत.
त्यामुळे सुमारे 1 हजार 935 लाभार्थी कुटुंब आनंदाच्या शिध्यापासुन वंचित राहणार आहे. एकट्या मोखाडा तालुका अथवा पालघर जिल्ह्यात ही स्थिती नसुन संपुर्ण राज्यात आनंदाच्या शिध्याचे कमी संख्येने वितरण करण्यात आल्याचे सरकारी अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबांचा गणेशोत्सव कडु होणार आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *