कल्याण : पाथरवट समाज उन्नती मंडळ, कल्याण यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही क्रिकेट चषक २०२६ चे आयोजन मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात करण्यात आले. समाजबांधवांना एकत्र आणणे, सामाजिक बांधिलकी जपणे आणि सकारात्मक उपक्रमांना चालना देणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पाथरवट समाज उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पद्माकरदादा लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजाचे अध्यक्ष डॉ. किरण टोकेकर यांच्या नियोजनातून आणि सर्व समाजबांधवांच्या सहकार्याने हे क्रिकेट सामने यशस्वीरीत्या पार पडले. “सर्वांचे सहकार्य असेल तरच कोणतेही कार्य उत्तमरीत्या पार पडते,” असे मत डॉ. किरण टोकेकर यांनी व्यक्त केले. समाज एकत्र यावा, सामाजिक जाणीव टिकून राहावी आणि चांगल्या कार्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, यासाठी मंडळ सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच विश्वकर्मा जयंती ही कोणाच्या एकट्याच्या घरची नसून ती सर्व समाजाने एकत्र येऊन साजरी केली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. प्रत्येकाने सामाजिक भान ठेवून कार्यरत राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या स्पर्धेदरम्यान समाजातील ज्येष्ठ नागरिक भटू टोकेकर हे शेवटपर्यंत उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देत होते, हे विशेष उल्लेखनीय ठरले.
११ जानेवारीला इन्फिनिटीतर्फे संकेत कॉलेजच्या मागे, चिंचपाडा, कल्याण पूर्व येथे हे क्रिकेट सामने उत्साहात पार पडले. यावेळी ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी सर्व सहभागी क्रिकेट संघांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *