मुंबई / रमेश औताडे

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागामध्ये हप्ते वसुलीबाबतचा मोठा भ्रष्टाचार तसेच वाहन चालक मालक यांची आर्थिक लूट, वाहन चालकांवर होणाऱ्या अन्याय त्वरित बंद करावा अशी मागणी ऑल इंडिया चालक मालक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कामगार नेते रमेश समुखराव यांनी केली. सरकारने आमच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार केला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.

राज्यातील सर्व जिल्हयामध्ये आर. टी. ओ. अधिकारी ओव्हरलोडच्या नावाखाली वाहन चालक मालकांकडून प्रती महिना सर्रास हप्ते वसुली करीत असतात. आर.टी. ओ. कार्यालयामध्ये वाहन चालक व मालकांची गाडी पासिंग व ड्रायव्हर लायसन्स रिनिव्ह करण्याच्या नावाखाली आर्थिक लूट होत आहे. राज्यातील सर्व चेक पोस्ट वर वाहन पेपर तपासणीच्या नावाखाली वाहन चालक व मालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. राज्यामध्ये वाहन चालक एन्ट्री देत नाही म्हणून वाहन चालकास गंभीर मारहाण केली जाते.

गाडी मालक व वाहन चालक यांनी आर.टी.ओ. अधिकारी किंवा वाहतुक पोलिस यांना एन्ट्री नाही दिली तर अक्षरशा पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात गाडीला आग लावले जाते अशा अनेक घटना घडत आहेत. असे प्रकार राज्यामध्ये सोशल मिडीयावर आपण सर्व पहात आहोत. गाडी खाली असतानासुध्दा ऑनलाईन नाहक चलन टाकला जातो. राज्यातील शहरी भागामध्ये वाहतुक पोलिस शुल्लक कारणावरून वाहन चालकांकडून मोठया प्रमाणात पैसे वसुली करतात. राज्यातील सर्व राज्य महामार्गावर टोल नाक्याच्या माध्यमातून चुकीच्या पध्दतीने लुटमार चालू आहे असे डॉ एल एच पाडुळे यांनी सांगितले.

राज्यातील सर्व टोलनाके बंद करून नवीन धोरण तयार करणे. वाहन चालकांच्या अपघाती मृत्यु पश्यात त्याच्या परिवारास मदत म्हणून तात्काळ १० लाख रुपयाची तरतूद करण्यात यावी व त्या परिवारातील एक सदस्य सरकारी सेवेत रुजू करावे. राज्यातील सर्व महामार्गावर प्रती १०० किलोमीटर अंतरावर वाहन चालकांसाठी स्वतंत्र विश्रांती गृह बनवावे. महाराष्ट्र राज्य सरकारने वाहन चालक अभ्यास आयोग गठीत करावा. अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *