शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील

कल्याण : कल्याणातील मेट्रो आता खडकपाडा मार्गेच धावणार असून पुढील २ महिन्यांत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.  ठाणे–भिवंडी–कल्याण मेट्रोच्या नव्या मार्गाला राज्य शासनाची अधिकृत मान्यता मिळाली असून प्रकल्पासाठी वाढीव निधीही मंजूर करण्यात आला आहे. महिन्याभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करून अवघ्या ६० दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन असून शहराच्या विकासाला गती देणाऱ्या या निर्णयासाठी शहरप्रमुख रवी पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.

या पत्रकार परिषदेला केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना उपनेत्या व नगरसेविका विजया पोटे, नगरसेवक गणेश जाधव, रोहन कोट, बंदेश जाधव, किरण भांगले, अनघा देवळेकर, प्रतिक पेणकर, रुपेश सकपाळ, माजी नगरसेवक मयुर पाटील, विजय काटकर, श्रेयस समेळ, अरविंद पोटे, युवासेनेचे सुजीत रोकडे, सुचेत डामरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

धामणकर नाका भिवंडी ते कल्याण दुर्गाडी ५ मेट्रो व मेट्रो५ अ म्हणजे दुर्गाडी चौक आधारवाडी -खडकपाडा -भोईरवाडी – उल्हास नगर या मेट्रो च्या  सुधारित कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून एका महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल. यामुळे कल्याण डोंबिवलीकरांचे स्वप्न पूर्ण होईल. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे आभार शहरप्रमुख रवि पाटील यांनी मानले.

यावेळी रवि पाटील यांनी सांगितले की सन २०१५ मध्ये भारतानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिवंडी – कल्याण मेट्रोच्या कामाचे भुमिपुजन झाले होते, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे काम थांबले होते, परंतु आता नव्याने पुन्हा काम सुरू होणार आहे, भिवंडी -कल्याण व कल्लाण ते उल्हासनगर पुढे बदलापूर चिखलोली पर्यंत मेट्रो धावणार आहे. पुर्वी मेट्रोचा मार्ग वेगळा होता, त्यामुळे कल्याण पश्चिम भागातील काही नागरीकांना  मेट्रोचा काहीच उपयोग नव्हता, म्हणून मेट्रो चा मार्ग बदलण्यासाठी  सन २०१६ पासून शिवसेना शहरप्रमुख रवि पाटील याचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

अखेर तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिल्ली येथे बैठक घेऊन संबंधित अधिकारी यांना मेट्रो मार्ग बदलण्यासाठी बैठक झाली व  त्यानी मान्य केले. नवीन मेट्रो मार्ग आधारवाडी, खडकपाडा बिर्ला  परिसरातील व कल्लाण पश्चिम भागातील पाच लाख नागरिकांना फायदा होणार आहे.

००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *