कल्याण: डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये ‘पावसाळा तोंडावर… नाले सफाई अपूर्ण’ या संदर्भात बातमी आली होती. मिलापनगर मध्ये असलेल्या नाल्याची संरक्षक भिंत ही नाल्याची साफसफाई करण्यासाठी तोडण्यात आली होती. त्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक इत्यादी मोठ्या प्रमाणात होता. याबाबत वृत्तपत्रात बातमी आल्यावर केडीएमसी प्रशासन जागे झाले आणि त्यानी नाल्याची तोडलेली संरक्षक भिंत बांधून टाकली पण नाल्याची साफसफाई मात्र अद्याप केली नाही. आता या नाल्याची साफसफाई कधी होणार की नाही होणार याबाबत केडीएमसीने सांगावे असे येथील रहिवाशांनी विचारले आहे. या नाल्याची तोडलेली संरक्षक भिंत पुन्हा बांधली, याबद्दल येथील रहिवाशांनी प्रसारमाध्यमांचे आभार मानले आहेत.
