Author: bittambatami.com

आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धेचे आयोजन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धा संस्थेच्या सभागृहात आयोजित केली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२५ या दिवशी सकाळी ९.३० वाजता…

 मार्केटिंगच्या नवनव्या तंत्राची आगरी महोत्सवात तरुणांना ओळख

 प्रसिद्ध यूट्यूबर निकुंज लोटिया -बीयुनीक यांचा टॉक शो   डोंबिवली : डोंबिवलीत सुरू असलेल्या आगरी महोत्सवात प्रसिद्ध यूट्यूबर निकुंज लोटिया-बीयुनीक यांच्या टॉक-शो मध्ये नव्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच मार्केटिंगच्या तंत्राची ओळख करुन देण्यात आली. आता सोशल मीडियात `एआय’ची नवी क्रांती येणार असून, नव्या पिढीने `एआय’ तंत्र आत्मसात केल्यास भविष्य उज्जवल होईल, असे आवाहन निकुंज यांनी केले. आगरी समाजाबरोबरच राज्यातील तरुणांना सोशल मीडियाबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस रामकृष्ण पाटील यांच्यासह पांडुरंग म्हात्रे, रंगनाथ ठाकूर, दत्ता वझे, जालिंदर पाटील, गजानन मंगरूळकर, बंडू पाटील, भास्कर पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीकर रहिवाशी व लाखो फॉलोअर्स असलेल्या निकुंज लोटिया-बीयुनीक यांना निमंत्रित केले होते. मंडळाचे ज्येष्ठ सदस्य शरद पाटील यांनी खुमासदार शैलीत निकुंज यांची मुलाखत घेत सोशल मीडियातील आव्हाने, कार्य आणि अपेक्षित उत्पन्नाबाबत तरुणांच्या विविध प्रश्नांना उत्तरे मिळवून दिली. डोंबिवलीतील रहिवाशी असलेल्या निकुंज लोटिया यांचे जगभर लाखो फॉलोअर आहेत. त्यांची प्रत्यक्ष मुलाखत ऐकण्यासाठी आगरी महोत्सवात तरुणांची गर्दी झाली होती. अत्यंत साध्या सोप्या शैलीत निकुंज यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. आम्ही दहा वर्षांपूर्वी सोशल मीडियावर काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी यूट्यूब हे माध्यम नवीन होते. पण मेहनतीने आम्ही आता स्थिरावलो. पण दररोज आव्हाने उभी आहेत. दर्शकांच्या अपेक्षा वाढत आहेत. सोशल मीडियामध्ये करिअरसाठी येणाऱ्या तरुणांनी आपल्याला अन्य मार्गाने निश्चित उत्पन्न मिळेल, याची तरतूद करावी. त्यानंतर सोशल मीडियात काम सुरू करावे. आता सोशल मीडियात सध्या असलेल्या माध्यमांऐवजी भविष्यात `एआय’ तंत्रज्ञानाचा बोलबाला असेल. त्यात तरुणांनी एकाग्रता व मेहनत घेऊन दररोज एक तास व्हिडिओ पाहून नवे तंत्र आत्समात करावे. नोकिया ही सर्वश्रेष्ठ मोबाईल कंपनी होती. पण अॅड्राईड आल्यानंतर त्यांनी बदल न केल्यामुळे ते नामशेष झाले. त्यामुळे जीवनात बदल हे करीत राहावे, असे आवाहन निकुंज यांनी केले. तुम्ही करीत असलेल्या व्हिडीओमुळे किती जणांचे समाधान होते, ते महत्वाचे आहे. दर्शकांना होणाऱ्या फायद्यातून तुमचे त्यांच्या मनातील स्थान पक्के होईल. दर्शक (व्ह्यूअर्स) वाढविणे, हे टार्गेट ठेवू नये. तुम्ही कामामध्ये उत्साह व नवनव्या कल्पना मांडल्यास तुम्हाला यश मिळेल, असा मंत्र निकुंज यांनी दिला. अविनाश-विश्वजीतच्या संगीताने रसिक मंत्रमुग्ध प्रसिद्ध मराठी चित्रपटातील संगीतकार अविनाश-विश्वजीत यांनी सादर केलेल्या संगीताने रसिक मंत्रमुग्ध झाले. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या प्रायोजकत्वाखाली या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका जुईली जोगळेकर, रोहित राऊत, मनिष राजगिरे, रवींद्र खोमणे, संजना अरुण, प्रणव देहेरकर, साक्षी चौहान यांची सुमधुर गीते, हास्यकलाकार सुप्रिया पाठारे, गौरव मोरे, दिगंबर नाईक आणि प्रणव रावराणे यांच्या विनोदी किस्स्याने हास्याचे फवारे उडाले. अमिशिक कामठे व आरती पानसरे यांनी सादर केलेल्या लावण्यांना `वन्स मोअर’ मिळाला. दीप्ती भागवत यांनी संगीत रजनीचे सूत्रसंचालन केले.

 मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत इंदू इन्फ्राच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

 अभिनेते पारस कलनावत, तन्मय फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला उद्घाटन सोहळा   पनवेल : उलवे तसेच पुष्पकनगर येथे आपल्या बांधकाम व्यवसायाची झेप घेवून नव उद्योजक अखिल यादव यांनी यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून भरारी घेतली आहे. उलवे नोड मधील सुप्रसिद्ध इन्सिग्निया शगुन रिॲलिटी या टॉवरच्या ११ व्या मजल्यावर अखिल यादव यांनी आपल्या आईच्या नावाने तयार केलेल्या इंदू इंफ्रा या कंपनीच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस आणि विविध वेबसिरीज आणि सिरियल्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे युवा अभिनेते पारस कलनावत यांच्या हस्ते या कार्यालयाचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. उलवे नोड परिसरात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवून जनतेशी नाळ जोडणारा असा सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण आपल्यापरीने यथाशक्ती समाजसेवा करीत आज बांधकाम व्यवसायातही प्रगत होत असून त्याने असेच पुढे जात राहावे, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी अखिल यादव यांना दिल्या. सदर उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी अखिल यादव यांना भेटून त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छांचा वर्षाव केला. 0000

ज्ञानपीठ विद्यालयाचा विज्ञान प्रकल्पाला प्रथम क्रमांक

ठाणे : ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी संचलित, ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मनोरमा नगर , ठाणे (पश्चिम) या विद्यालयातील प्राथमिक विभागाचा  विज्ञान प्रकल्पाला  ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय  विज्ञान प्रदर्शन 2024 –…

 दिल्लीच्या पथकाने आरोग्य शिबिराला दिली भेट

 राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप /डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत विशेष शिबीरांचे आयोजन केले जात असून या शिबिरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शिबिरांना भेटी दिलेल्या नागरिकांमध्ये हिवताप /डेंग्यू आजारांबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली. आज राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, दिल्ली यांच्या संचालक डॉ. तनु जैन यांनी माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय येथे भेट दिली असता हिवताप व डेंग्यू नियंत्रणाबाबत उपाययोजनांची पाहणी केली.  त्यांच्यासोबत त्यांचे पथक आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा, पुणे सहसंचालक डॉ. बबीता कमलापूकर, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर तसेच सहाय्यक संचालक, कोकण भवन डॉ. बाळासाहेब सोनावणे  उपस्थित होते. केंद्रीय पथकाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदिरानगर येथील आजच्या जनजागृती शिबिराला भेट दिली.   शिबिरामध्ये घरातील व घराभोवतालील डासोत्पत्ती स्थानांची प्रात्यक्षिके बघून या नाविन्यपूर्ण शिबिराची प्रशंसा केली आणि देशातील इतर राज्यातही अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन व्हावे या उद्देशाने  त्याचे पूर्ण व्हिडीओ शूटिंग  काढून घेतले. याप्रमाणे नमुंमपा कार्यक्षेत्रात जास्तीच जास्त नागरिकांपर्यंत पोहचून जनजागृती करण्याकरिता 13 डिसेंबरला 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विविध ठिकाणी जाहीर शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरांकरिता 9983 नागरिकांनी भेट दिली असून, 1040 रक्तनमुने घेण्यात आले. नमुंमपा कार्यक्षेत्रात हिवताप / डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्याकरिता दिनांक 03/08/2024 ते दिनांक 13/12/2024 या कालावधीत एकुण 342 जाहीर शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून 149826 नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये एकूण 13814 रक्त नमुने घेण्यात आले आहेत. याशिवाय गणेशोत्सव कालावधी, नवरात्रौत्सव कालावधी व इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिवताप / डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्याकरिता शिबीरांचे आयोजन करण्यात येते. सदर शिबिरांचे वैशिष्टय म्हणजे यामध्ये ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून तसेच पाणी साठवून ठेवलेले ड्रम ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्याबरोबरच घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थानांची माहिती करून देणे, पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करुन कोरड्या ठेवणे, भंगार साहित्य टायर्स इ. नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे व ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे याबाबत नागरीकांना प्रोत्साहित करुन आवाहन करण्यात येते. तरी आरोग्य विभागाच्या कार्यवाहीसोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आजुबाजूचा परिसर / टेरेसवरील भंगार नष्ट करणे आदी बाबींवर लक्ष दिले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे. ०००००

वैशाली माडे फाऊंडेशन प्रस्तुत ‘नाईन्टीज पहला नशा’ हा गाण्यांचा अनोखा कॉन्सर्ट

अनिल ठाणेकर ठाणे : संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय संध्याकाळ साजरी करण्यासाठी, वैशाली माडे फाऊंडेशन प्रस्तुत  ‘नाईन्टीज पहला नशा: द एरा ऑफ लव्ह अँड रिदम’ या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २० डिसेंबरला  रात्री ८:३० वाजता ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सादर होणार आहे. यावेळी वैशाली माडे आणि अन्य गायक ९०च्या दशकातील सुरेल गाणी सादर करणार असून सरत्या वर्षात संगीतप्रेमींना एक अनोखा नजराणा अनुभवायला मिळणार आहे. वैशाली माडे, ज्यांनी आपल्या मोहक आवाजाने लाखो श्रोत्यांची मने जिंकली आहेत. त्यांचा आवाज केवळ मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील गाजला आहे. या कार्यक्रमात वैशाली माडे यांच्यासोबत सहगायक म्हणून मनीषा जांबोटकर आणि प्रेमकुमार यांचा सहभाग असेल, ज्यामुळे ही संगीत मैफल अधिकच रंगतदार ठरेल. तसेच संगीत संयोजनाची धुरा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अविनाश चंद्रचूड यांनी सांभाळली आहे. या मैफलीचे मुख्य आकर्षण म्हणजे ३५ वादकांच्या भव्य ऑर्केस्ट्राचा समावेश. तसेच सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्या उपस्थितीने या मैफलीला चारचांद लागणार आहेत. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन शिरीष पवार, अनुसया आर्ट्स प्रॅाडक्शन्सने केले आहे. वैशाली माडे म्हणतात, “‘पहला नशा’ हा केवळ एक संगीत कार्यक्रम नाही, तर ९०च्या दशकातील प्रेम, आनंद आणि मैत्रीच्या आठवणींना उजाळा देणारा एक जादुई अनुभव आहे. त्या काळातील गाणी आपल्या भावनांना अनोख्या भाषेत व्यक्त करायचे आणि ती आजही आपल्या हृदयात जिवंत आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू हा आहे की, यातून जमा होणारी रक्कम आम्ही काही सामाजिक संस्थांना मदत म्हणून देणार आहोत. या फाऊंडेशची ही सुरूवात असून यापुढे असे अनेक कार्यक्रम करून त्यातून मिळणारी रक्कम सामाजिक संस्थांना देण्याचा आमचा मानस आहे.’’ ००००

कायदेतज्ञ रमाकांत दत्तात्रय ओवळेकर स्मरणार्थ पुरस्कार सोहळा संपन्न

ठाणे : कायदेतज्ञ रमाकांत दत्तात्रय ओवळेकर स्मरणार्थ पुरस्कार सोहळा-2024 नुकताच डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निरंजन डावखरे, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश…

जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रेल्वे, पोस्ट ऑफिसमधला कार्यानुभव

नीलम शेख ठाणे : विद्या प्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला आणि ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), ठाणे येथील बी.कॉम (लेखा आणि वित्त) (BAF) विभाग यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत बुधवार ११ डिसेंबरला एक नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रम राबविला. हिंदी आणि मराठी भाषेचा दैनंदिन कामकाजातील वापर  विद्यार्थ्यांना समजावा यासाठी  प्रा. श्र सुदाम अहिरराव आणि प्रा.  जीवन माळी यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रेल्वे स्टेशन अनाऊंसमेंट सेक्शन आणि पोस्ट ऑफिस येथे होणारा भाषेचा कामकाजातील उपयोग यासाठी तिथे अभ्यास भेटीचे आयोजन केले. प्रभावी सार्वजनिक घोषणा आणि रेल्वेच्या कामकाजात सुरळीतपणे संवाद सुरु राहावा यासाठी हिंदी भाषेचे असणारे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. पोस्ट ऑफिस कार्यालयात पत्रव्यवहार आणि सार्वजनिक संवादासाठी मराठी हे महत्त्वाचे माध्यम कसे काम करते याबद्दल तेथील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. BAF विभागाच्या समन्वयिका डॉ. नीलम शेख यांनी देखील या अनोख्या कार्यक्रमाची संकल्पना आणि अंमलबजावणी करण्यात मोलाची भूमिका बजावली. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळाली.

सिंधुदुर्गात गेल्या सात महिन्यात आढळले कुष्ट रोगाचे २९ रुंग्ण…!

जिल्हा ‘कुष्टरोग मुक्ती’ची पुन्हा नव्याने घोषणा….!   सिंधुदुर्गनगरी :सिंधुदुर्ग जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेम्बर ,२४,या ७ महिन्यात तब्बल २९ कुष्टरोगाचे रुंग्ण आढळले आहेत. यामध्ये २१ पुरुष,७ महिला व एक लहान मूल…