Author: bittambatami.com

उन्हाळी गर्दीला दिलासा; कोकणासाठी मध्य रेल्वेच्या ४ वातानुकूलित विशेष गाड्या

राजेंद्र साळसकर मुंबई :प्रवाशांच्या उन्हाळी हंगामातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकण मार्गावर ४ वातानुकूलित विशेष रेल्वे सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (सीएसएमटी) ते मडगाव दरम्यान…

५० वर्षांनी उपसणार खाडीतील गाळ काढून सुशोभिकरण होणार-संजय केळकर

ठाणे, गेली पाच दशके सिडको ते कळवा पूल लगतच्या खाडीत गाळ मोठ्या प्रमाणात साचून भरतीच्या वेळी रस्त्यावर दुर्गंधीयुक्त आणि गाळयुक्त पाणी पसरते. याबाबत आमदार संजय केळकर यांनी आज मेरीटाईम बोर्डाच्या…

बहुराष्ट्रीय कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणसंबंधित कडक अंमलबजावणी करण्यात यावी

डॉ डी एल कराड यांची मागणी अनिल ठाणेकर नाशिक, शहरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार तसेच युवकाचा धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात नाशिक पोलिसात एकूण ९ गुन्हे दाखल असून ६ संशियतांना अटक केली आहे. हे एक अत्यंत गंभीर प्रकरण आहे.  बहुराष्ट्रीय कंपनीतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करा व त्यांची ही चौकशी करा.सर्व आस्थापनामध्ये महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समिती(ICC)  गठित करणे व या कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याबाबत तातडीने कारवाई करा,अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी केली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य, संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली हे  स्वागतार्ह आहे.  तक्रारदारांमध्ये ८ महिला तर १पुरुषाचा समावेश आहे. युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची तक्रार आहे. या कंपनीतील महिलांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. परंतु वरिष्ठांनी तक्रारीची दखल घेतली नाही. नाशिक जिल्ह्यात व शहरात अनेक उद्योग व आस्थापनांमध्ये महिला कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु कायद्यानुसार अंतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन केलेल्या नाहीत असे दिसून आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणून ज्या आस्थापना मध्ये महिला कर्मचारी काम करतात त्या आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती (ICC) स्थापन झाली पाहिजे. तसेच कर्मचाऱ्यांचे समुपदेशनही करणे आवश्यक आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करा व त्यांची ही चौकशी करा.सर्व आस्थापनामध्ये महिलांच्या तक्रारीसाठी अंतर्गत तक्रार समिती(ICC)  गठित करणे व या कायद्याची कठोर अमलबजावणी करण्याबाबत तातडीने कारवाई करा.या बाबत वरील मागणी करण्यात आली.यावेळी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली मा. विकास माळी साहेब,कामगार उपायुक्त, नाशिक व मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे सिताराम ठोंबरे, ॲड.तानाजी आप्पा जायभावे, देविदास आडोळे, तुकाराम सोनजे,कॉ मोहन जाधव, संतोष कुलकर्णी, गौतम कोंगळे, छाया जाधव, विजया टिक्कल, कॉ हिरामण तेलोरे, युवराज पाटील उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे भर उन्हात न्यायासाठी आमरण उपोषण

मुंबई: वारंवार निवेदन देऊनही तसेच मंत्री स्तरावर आदेश होऊनही न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी भर उन्हात आमरण उपोषण सुरू केले. भाऊसाहेब नळकांडे, अविनाश नळकांडे, रेखा नळकांडे, लीलाबाई नळकांडे, विठ्ठल नळकांडे, बापूसाहेब…

 वेंगुर्ला शहरात होणार  ‘नमो उद्यान’

नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन  वेंगुर्ला : वेंगुर्ला शहरात विकसित होणाऱ्या ‘नमो उद्याना’मुळे केवळ शहराचाच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक होणार आहे. शासनाच्या  योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच पर्यटनामध्ये देखील वाढ होणार आहे. म्हणून राज्यात आदर्श ठरेल असे दर्जेदार ‘नमो उद्यान’ साकारुन प्रथम क्रमांक मिळविण्याचे आवाहन जिल्ह्याचे  पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे केले. वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील भटवाडी येथे या ‘नमो उद्यान’चा भूमिपूजन समारंभ राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दर्जेदार व सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देणारे ‘नमो उद्यान’ विकसित करा. या आराखड्यात पर्यावरणपूरक नियोजन, नागरिकांसाठी विरंगुळ्याची आधुनिक साधने तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधा यांचा समावेश या उद्यानात करण्यात येणार असून, हा प्रकल्प राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. यावेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्यासह नगरसेवक, स्थानिक नागरिक उपस्थित होते.  नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पालकमंत्री राणे यांचे स्वागत केले. सुहास गवंडळकर, गौरी मराठे व स्थानिक नागरिकांच्या वतीने राणे यांचा सन्मान करण्यात आला.

चर्नीरोड स्थानकावर भीम जयंतीचा जल्लोष

रेल्वे कर्मचारी, अधिकारी व समाजसेवकांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन मुंबई :महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त चर्नीरोड (प. रेल्वे) स्थानकावर भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रेल्वे कामगार, अधिकारी…

‘मी कल्याणकर’ सामाजिक संस्थेने साकारला काळाराम मंदिराचा देखावा

कल्याण : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील मी कल्याणकर सामाजिक संस्थेतर्फे यावर्षी नाशिक येथील काळाराम मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. काळाराम मंदिराचा लढा हा केवळ…

रक्तदानातून बाबासाहेबांना आदरांजली

कल्याण : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित रिजन्सी सर्वम क्लब हाऊस,टिटवाळा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित एक सामाजिक बांधिलकी जपत व त्यांच्या विचारांना कृतीत आणण्यासाठी रक्तदान हेच जीवनदान या उक्तीनुसार रक्तदान शिबिराचे रिजन्सी सर्वम डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांनी आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित अभिवादन केले. रक्तदान शिबीरास मध्यवर्ती रुग्णालय,उल्हासनगर ३ व रेड स्वस्तिक सोसायटी यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व रेड स्वस्तिक सोसायटी चे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. 0000000

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाणे जिल्हा परिषदेतर्फे अभिवादन

ठाणे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद, ठाणे येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी उज्वला सपकाळे तसेच समाजकल्याण…

मीरा-भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांचा “लोकदरबार”

मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांच्या समस्यांना मिळणार आता हक्काचं व्यासपीठ. प्रशासकीय कामांतील अडथळे असोत किंवा नागरी समस्या, आता प्रत्येक प्रश्नावर थेट चर्चा आणि तात्काळ निवारण मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मीरा-भाईंदरचे लाडके…