Author: bittambatami.com

मराठा महासंघाचा जरांगेना पाठींबा

फडणवीसांचं कौतुक, भुजबळांवर टीका नागपूर : आरक्षणावरून महाराष्ट्रात मराठा विरुध्द ओबीसी वाद चिघळवला जात असताना आता अखिल भारतीय मराठा महासंघाने मनोज जरांगेंच्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला आहे.  अखिल भारतीय मराठा महासंघाला पुढच्या वर्षी 125 वर्षे…

देशात ‘शैक्षणिक आणीबाणी’

नीट, युजीसी नेट नंतर १२ तास आधी नीट पीजी परिक्षाही पेपरफुटीच्या भीतीने रद्द मुंबई : देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट, युजीसी नेट परिक्षांचे पेपर फुटल्याने विर्द्यार्थी चिंतेत असतानाच आता केंद्र सरकारने परीक्षेला अवघे 12 तास…

जी-7 मधील भारताच्या सहभागाचे ‘फलित’

विश्वसंचार – प्रा. डॉ. विजयकुमार पोटे जी-7 परिषद भारत-पश्चिम-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (आयएमईसी) सारख्या ठोस पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. नुकतेच या परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे…

साहित्याचा सन्मान !

ज्ञानपीठ पुरस्कारानंतर सर्वाधिक प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारांकडे पाहिले जाते. यंदा या पुरस्कारांमध्ये २१ इतर भाषिक तर दोन मराठी साहित्यिक आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे…

दोन दिवस माथेरानला पर्यटकांची तोबा गर्दी

माथेरान : चौथ्या शनिवारी सुट्ट्यांमुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती. सलग दोन दिवस घाटात नेहमीप्रमाणे प्रशासनाच्या निष्क्रिय व्यवस्थेमुळे आणि कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण…

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम

अशोक गायकवाड नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून जाणारा सायन पनवेल महामार्ग हा जरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असला तरी या मार्गावरून दररोज बाहेरच्या शहरातील हजारो नागरिक ये – जा…

महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कोंडी

माजिवाडा उड्डाणपुलासह खारेगाव टोलनाका भागात खड्डे ठाणे : ठाणे, घोडबंदर आणि नाशिक भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या माजिवडा, कापुरबावडी उड्डाण पुलावरील मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापुर्वी करण्यात आलेली असतानाच, या मार्गावर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच मुंबई-नाशिक मार्गावर रस्ते आणि पुल बांधणीची कामे सुरू असून त्यातच या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे खारेगाव नाका, माजिवाडा, मुंब्रा बाह्यवळण मार्गावर कोंडी झाल्याचे दिसून आले. ठाणे महापालिका क्षेत्रातील महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग मंदावून कोंडी होते. त्याचा परिणाम, शहरातील अंतर्गत मार्गांवर दिसून येतो. यंदाही हे चित्र कायम असल्याचे शनिवारी दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाला सुरूवात झाली. परंतु अर्ध्या तासांच्यावर पाऊस पडत नव्हता आणि पावसाचा जोरही फारसा नव्हता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून त्याचबरोबर सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ठाणे, घोडबंदर आणि नाशिक भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या माजिवडा पुलावरील घोडबंदरहून नाशिक आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर खड्डे पडले आहेत. या पुलाच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापुर्वी करण्यात आले होते. मास्टीक पद्धतीने या रस्त्याची बांधणी करण्यात आली होती. परंतु पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पुलावरून अवजड, हलक्या वाहनांसह दुचाकींची वाहतूक सुरु असते. या सर्व चालकांना खड्डे चुकत प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. त्याचबरोबर मुंबई-नाशिक मार्गावरील खारेगाव चौकाजवळील रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडतात आणि कोंडीची समस्या निर्माण होते. यंदाही पहिल्याच पावसात याठिकाणी खड्डे पड़ले असून ते संबंधित विभागाकडून बुजविण्याची कामे सुरु आहेत. या मार्गावर रस्ते आणि पुल बांधणीची कामे सुरू असतानाच, त्यात खारेगाव टोलनाका भागात खड्डे पडल्यामुळे शनिवारी येथे कोंडी झाली. मुंब्रा बाह्य वळण मार्गापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच माजिवाडा येथून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरही कोंडी झाली होती. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणेकरांना पावसाळ्यात कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

कचरा समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतींनी कायमस्वरूपी उपाययोजना करा – रोहन घुगे

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरालगत व हायवेलगतच्या ग्रामपंचायती मधील घनकचरा व्यवस्थापनाबाबत ठाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. भिवंडी, कल्याण, शहापूर, अंबरनाथ तालुक्यातील डंपिंग…

मोबाईल स्कूल उपक्रमातील ४७० मुलांचा शाळा प्रवेश-महेन्द्र गायकवाड

ठाणे : रस्त्यावरील बालकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत फिरते-पथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना राबविली होती. या उपक्रमांतर्गत ४७० मुलांना शाळा प्रवेशपत्र देण्यात आल्याची माहिती…

मर्जिया पठाण यांचा पाण्यासाठी ‘तिरडी मोर्चा’

ठामपा कार्यालयाच्या दारात फोडली मडकी ठाणे : विविध कारणे पुढे करून सातत्याने मुंब्रा- कौसावासियांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. या सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली…