Author: bittambatami.com

महिलेच्या विनयभंग प्रकरणी वसईतील महिला आक्रमक!

तहसीलदर कार्यालयात केलं शृंगार त्याग आंदोलन वसई तालुक्यातील वासळई येथे तीन दिवसापूर्वी तलाठी कार्यालयात महिलेवर  विनयभंग करण्याचा प्रयत्न तलाठ्याने केल्याच्या घटनेचे आता तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळतात. याप्रकरणी आज वसईतील महिलांनी वसई तहसीलदार कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी अनोख्या पद्धतीने शृंगार त्याग आंदोलन केले. यावेळी त्या तलाठ्यावर कठोर कारवाईची मागणी करत शासनाला शृंगार भेट देण्यात आला. यावेळीराज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठीचे निवेदन तहसीलदारांकडे देण्यात आले. या घटनेची नोंद घेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सदर तलाठ्याला निलंबित केल्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. फेरफार करण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा वासळई-सजेतील तलाठ्याने विनयभंग केल्याची घटना घडली असून, या तलाठी विशाल करे याला वसई पोलीसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. मात्र त्याची जमीनावर लगेच सुटका झाली. या प्रकरणी प्रारंभापासून वसई पोलीस आरोपीस पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा निषेध आणि संबंधित तलाठ्याच्या निलंबनाच्या मागणीसाठी वसईतील महिला संघटना, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, तसेंच सामान्य वसईकरांतर्फे वसई तहसीलदार कार्यालयावर जाहीर मोर्चा काढण्यात आला. तलाठ्यावर कठोर कारवाई करण्याची आणि त्याच्या निलंबनाची मागणी यावेळी तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याकडे महिला तर्फे करण्यात आली. तसेच राज्याचे गृहमंत्री आणि महसूलमंत्र्यांना याबाबतचे निवेदन आणि शृंगार तहसीलदार यांना देण्यात आला. त्यानंतर महिलांनी आपला मोर्चा वसई पोलीस ठाण्यावर नेला होता. त्यांनाही विनयभंग केलेल्या तलाठ्याला तातडीने जमीन कसा मिळाला अशी विचारणा केली. तर पोलिसांच्या वतीने आता तलाठ्याच्या जामीन रद्द करण्या बाबत न्यायालयात बाजू मांडणार असल्याचे आश्वासन महिलांना दिले आहे. तहसीलदार कार्यालयावर आंदोलन सुरु असतानाच जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सदर तलाठ्याला निलंबित केल्याचा फॅक्स आल्याचे सांगण्यात आले. आजच्या मोर्च्यात वसईतील सर्वच पक्षातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य डॉमनिका डाबरे, माजी नगरसेविका किरण चेंदवणकर ,वेरोनिका रिबेलो , सिता जाधव, रश्मी राव, साधना डिक्रूज, वेरोनिका डाबरे, मिलिंद खानोलकर,ऍड. सुमित डोंगरे यांच्या सह मोठ्या प्रमाणत महिला सहभागी झाल्या होत्या.

विरार पूर्व उपविभागात 10 कोटींची वीज चोरी

विरार : महावितरणच्या विरार पूर्व उपविभागात मागील एक वर्षात तब्बल 10 कोटी रुपयांची वीज चोरी पकडण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी आढळलेले चार लाइनमन निलंबित करण्यात आले आहेत. यातील बहुतांश…

कोपरमधील उद्यानाच्या आरक्षणावरील बेकायदा इमारतीवर हातोडा?

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग हद्दीत सर्वाधिक बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. या बेकायदा बांधकामांवर ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांकडून कारवाई होत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे वाढल्या आहेत. निवडणूक कामामुळे…

ई- केवायसी व बँक खाती आधार संलग्न करा-विकास पाटील

अशोक गायकवाड रायगड : ई- केवायसी व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र व इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या मार्फत कार्यपूर्तता करावी, असे विकास पाटील,कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे. प्रधानमंत्री किसान योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा १७ वा हप्ता वितरणापूर्वी स्वत: बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता ५ ते १५ जून, २०२४ या कालावधीत या विशेष मोहिमेमध्ये करून घेण्याचे आवाहन शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २००० रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६००० रुपये लाभ अदा करण्यात येते.लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ई-केवायसी केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या या तिन्ही बाबींची पूर्तता राज्यातील ९० लाख २० लाभार्थ्यांनी केलेली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक ०५ जून, २०२४ ते १५ जून, २०२४ या कालावधीत या बंधनकारक बाबींची उर्वरित लाभार्थींनी पूर्तता करण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व ई-केवायसी साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे. त्यानुसार भूमी अभिलेख नोंदीनुसार नुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता या विशेष मोहिमेमध्ये करून घ्यावी. यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या लाभार्थींनी संबंधित तलाठी / तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. त्याचप्रमाणे ई- केवायसी व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र व इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या मार्फत कार्यपूर्तता करावी, असे विकास पाटील,कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे. 00000

विजयासाठी मेहनत घेणाऱ्या कट्टर मुस्लिम कार्यकर्ऱ्यांचा खासदार नरेश म्हस्के यांनी केला सत्कार 

ठाणे : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करण्याचा फतवा मौलवींनी काढला होता. तर राबोडी विभागातील कट्टर शिवसैनिक असलेल्या डॉ. असगर मुकादम यांना धमक्या दिल्या गेल्या. मात्र कोणत्याही दबावाला बळी न…

५० हजाराहून अधिक कोयी जमा करत नागरिकांचा पर्यावरणशील सहभाग

आंब्याच्या कोयी संकलन उपक्रम नवी मुंबई : वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शहर स्वच्छतेत तसेच पर्यावरण रक्षण – संवर्धनात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिली असून याच धर्तीवर जागतिक पर्यावरण…

बियाणे खरेदी करताना काळजी घ्या -छायादेवी शिसोदे

ठाणे : ठाणे जिल्हयात खरीप हंगामास सुरूवात झालेली असून जिल्हयात खरीप हंगामाखाली 60,000 हेक्टर एवढे क्षेत्र आहे, त्यापैकी भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 56,000 हेक्टर एवढे आहे. भात बियाण्यांची विक्री मोठ्या…

वस्ताद वसंतराव पाटील यांना ‘राष्ट्रीय गरुड झेप’ पुरस्कार प्रदान

मुंबई : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदरचे सर्वेसर्वा वस्ताद गुरुवर्य वसंतराव पाटील यांनी कुस्ती क्षेत्रात तीन दशकांपेक्षा जास्त काळ दिलेल्या भरीव योगदानाबद्दलसांगली…

छत्रपती शंभूराजे यांची पुण्यतिथी ‘बलिदान दिवस’ म्हणून फाल्गुन अमावस्येला पाळण्यात यावा

शिवभक्त श्री राजू देसाई यांचे कळकळीचे आवाहन मुंबई : गुढीपाडव्याच्या सणासाठी श्रीखंड त्याच दिवशी आणा आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावस्येला नको. कारण तो दिवस छत्रपती शंभूराजे यांची पुण्यतिथी असून तमाम हिंदूंनी हा दिवस बलिदान दिवस म्हणून पाळला पाहिजे, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त श्री राजेश उर्फ राजू देसाई यांनी कळकळीचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या शिवराजाभिषेक दिनानिमित्त जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील मागाठाणे मित्र मंडळाच्या प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयात शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त श्री राजेश शांताराम उर्फ राजू देसाई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाभिषेकसह अनेक घटना खड्या आवाजात कथन केल्या तसेच औरंगजेबाने छत्रपती शंभूराजे यांचा तब्बल चाळीस दिवस अतोनात छळ केला. शंभूराजे यांचे हात तोडण्यात आले. डोळे काढण्यात आले, शीर धडापासून वेगळे केले पण छत्रपती शंभूराजांची ना नजर झुकली, ना मान झुकली‌. हमने हमारी फौजमें कैसे कैसे सूरमा पालके रखे हैं, शाहिस्तेखान गया तो शिवाने उसकी उंगलियाॅं काटके भेज दिया, अफझलखान को शिवाने वहीं दफना दिया. हमको दुष्मन भी मिला तो शिवा जैसा और शंभू जैसा. अगले जनम में हमें शंभू जैसा शूरवीर बेटा मिले, असे औरंगजेबाने म्हटले असल्याचे खफीखान या औरंगजेबाच्या इतिहासकाराने लिहून ठेवले आहे, असे जेंव्हा राजू देसाई यांनी सांगितले तेंव्हा उपस्थित शिवभक्तांच्या अंगावर काटा उभा राहिला. साहित्यिक विजय मडव, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, मनोहर देसाई, वसंत सावंत, दिनेश विचारे, अभिलाष कोंडविलकर, दिलीप चव्हाण, संजना वारंग, सुभाष देसाई, हेमंत पाटकर, कांचन सार्दळ, रोहिणी चौगुले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पालघर : वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमिवर नागरिकांनी सार्वजनिक…