Category: होम

 सोमवारी रसिक श्रोत्यांची होणार तुफान गर्दी !

 प्रा. विसुभाऊ बापट घेऊन येताहेत आपला ३१५० वा महोत्सवी प्रयोग मुंबई, दि. (प्रतिनिधी) : संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराज, जनाबाई पासून बहिणाबाई चौधरी पर्यंत आणि कुसुमाग्रज, विं. दा. करंदीकर, मंगेश…

दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त ॲक्शन मोडवर

रस्त्यावर कचरा टाकल्यास दुकानदारांना बसणार दंड  नगरसेवक ऍड. आदेश भगत यांच्या मागणीला यश दिवा,: मागील काही वर्षांत दिवा शहराचे झपाट्याने शहरीकरण झाले असून स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आपला दिवा…

१८ वर्षे उलटूनही न्याय नसल्याने आंदोलनाचा इशारा

मेश औताडे मुंबई: श्री छत्रपती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अंतर्गत पुनर्वसन प्रकल्पाला तब्बल १७-१८ वर्षे उलटूनही न्याय मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुढील सात दिवसांत संयुक्त बैठक आयोजित करून प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घ्यावा, नाहीतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गृहनिर्माण विभागाने दिलेल्या निर्देशांचे अभियांत्रिकी विभागाकडून कथितपणे पालन न करता प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सनय छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मुंबई अध्यक्ष  सर्जेराव निकम व मुंबई सरचिटणीस  महेश महादेव लाड यांनी संस्थेचे पदाधिकारी अरविंद घाग मुख्य प्रवर्तक व मोहन पांचाळ सह प्रवर्तक एस आर ए चे सचिव शदत्तात्रेय नवले यांची भेट घेऊन  निवेदन सादर केले. स्थलांतर झाल्यानंतर ३ ते ४ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असलेला पुनर्वसन प्रकल्प आजही रखडलेला असून, रहिवाशांचे पुनर्वसन, कायदेशीर हक्क आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे. संबंधित प्रशासनाने विलंब न करता तातडीने योग्य निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याचा गौरव – अशोकराव टाव्हरे

रमेश औताडे मुंबई : केंद्रीय रस्तेवाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशासाठी मोलाचे योगदान दिले असल्याचे मत त्यांच्या कार्यावर आधारित विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ डेव्हलपमेंट या पुस्तकांचे लेखक अशोकराव टाव्हरे यांनी व्यक्त केले आहे. सध्या सोशल मिडीयावर इथेनाॅलच्या मुद्द्याबाबत गडकरींवर होत असलेली टीका चुकीची असून इराण – अमेरिका युध्दाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल,डिझेल टंचाई निर्माण होईल अशी परिस्थिती होती, त्यामुळे इथेनाॅलवरील वाहने वाढली पाहिजे या दृष्टीने नितीन गडकरी यांनी वक्तव्य केले होते. सध्या इथेनाॅलमिश्रीत पेट्रोलचा वापर होत आहे, परंतु इथेनाॅलची निर्मिती देशात होत असल्याने या वक्तव्यामागे आत्मनिर्भर भारत या हेतुने पाहिले पाहिजे होते असे टाव्हरे यांनी सांगितले. नितीन गडकरी हे  पंचवीस वर्षे महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य होते, सन २०१४ पासून लोकसभा सदस्य आहेत. ३७ वर्षाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, विधानपरिषद विरोधी पक्षनेते,भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष व बारा वर्षांपासून केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द दैदीप्यमान राहिली आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग खात्यासह त्यांनी काही काळ जहाजबांधणी, जलसंधारण, नदी विकास, सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या विभागांची जबाबदारीही सक्षमपणे पार पाडली होती. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग व मुंबईतील उड्डाणपूल हे त्यांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे. देशभरात राष्ट्रीय महामार्गांची वाढ, रस्ते प्रकल्प उभारणीतून होत असलेला पायाभूत सुविधांचा विकास, अनेक द्रुतगती महामार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. यामुळे देशासाठी मोठे योगदान दिलेल्या गडकरींवर सोशल मिडीयावर सुरू असलेली मोहीम चुकीची असल्याचे अशोकराव टाव्हरे यांनी नमुद केले आहे.

संपूर्ण अमली पदार्थ परिसंस्था नष्ट करण्यासाठी तीन वर्षांचा रोडमॅप सादर

ठाणे: भारताच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित गुंतागुंतीच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णायक नेतृत्वाचा विचार केला जातो, तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव ठळकपणे समोर येते. स्पष्ट रणनीती, कालबद्ध नियोजन आणि परिणामाभिमुख अंमलबजावणी ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये बनली आहेत. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांना यशस्वीपणे निर्णायक टप्प्यावर नेल्यानंतर आता त्यांचे पुढील ध्येय म्हणजे भारताला अमली पदार्थ आणि नार्को- दहशतवादाच्या संपूर्ण परिसंस्थेतून मुक्त करणे हे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गृहमंत्र्यांनी केवळ अमली पदार्थांच्या जप्तीत वाढ करण्यापुरता मर्यादित न राहता, उत्पादन, तस्करी, वित्तपुरवठा आणि वितरण या संपूर्ण साखळीचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने व्यापक तीन वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. या दृष्टीकोनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे नार्को-कोऑर्डिनेशन सेंटर (एनसीओआरडी)ची दहावी सर्वोच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीदरम्यान व्हिजन डॉक्युमेंट ऑन ड्रग कंट्रोल (२०२६–२०२९) प्रकाशित करण्यात आले, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला आणि सुमारे ₹६,००० कोटी मूल्याचे जप्त करण्यात आलेले २,०९,५०० किलोग्रॅम अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी ऑनलाइन ड्रग डिस्पोजल फोर्टनाईट कॅम्पेन सुरू करण्यात आले. ही केवळ एक नियमित सरकारी बैठक नव्हती, तर ठोस कृतींना कालबद्ध रणनीतीची जोड देत “अमली पदार्थमुक्त भारत” या उद्दिष्टाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेनुसार अमित शाह यांनी “डिटेक्ट, डिसरप्ट अँड डिस्ट्रॉय” या तत्त्वावर आधारित स्पष्ट आणि बहुस्तरीय रणनीती तयार केली आहे. या धोरणाची सुरुवात अमली पदार्थांच्या नेटवर्कची अचूक ओळख पटविण्यापासून होते. त्यानंतर पुरवठा साखळी, आर्थिक पायाभूत व्यवस्था आणि कार्यप्रणाली विस्कळीत करून अखेरीस संपूर्ण परिसंस्थेचे अशा प्रकारे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट आहे की ती पुन्हा उभी राहू शकणार नाही. पुढील तीन वर्षांसाठी ही चौकट भारताच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी धोरणाचा मुख्य आधार ठरणार आहे.

अजितसृष्टीसाठी पुनर्वसन प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य पद्धतीने राबवा –अण्णा बनसोडे

०००० अजितसृष्टीसाठी पुनर्वसन प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य पद्धतीने राबवा –अण्णा बनसोडेमुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची आणि आठवणींची जपणूक करणारी ‘अजितसृष्टी’ उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने…

शहापूरच्या घाटघर प्रकल्पाला हिरवाईचा साज

शहापूरच्या घाटघर प्रकल्पाला हिरवाईचा साजअविनाश उबाळे ठाणे : सहयाद्री पर्वतरांगांच्या माथ्यावरुन कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे चहुबाजूंने दिसणारे हिरवेगार वृक्ष रिपरिप पडणारा पाऊस त्यात पांढऱ्या धुक्यांचा खेळ आणि संपूर्ण हिरवेगार झालेले सहयाद्रीचे डोंगर माथे आणि निसर्गाचा अद्भूत अनुभव देणारे हे ठिकाण म्हणजे शहापूर तालुक्यातील घाटघर प्रकल्पाचा परिसर डोळ्यात सामवणारा इथला निसर्ग व धबधबे तर अक्षरशः रोमांचित करणारे असे आहेत. ठाणे जिल्हयातील शहापूर पासून ५० किलोमीटर अंतरावर डोळखांब जवळ चोंढा येथे जलविद्युत प्रकल्प जलसंपदा विभागाने सुमारे अकराशे कोटी रुपये खर्च करुन या ठिकाणी वीज प्रकल्प उभा केला आहे.संपूर्ण जपान तंत्रज्ञानाचा वापर करुन घाटघर धरणाच्या पाण्यावर अडीचशे मॅगवेट एवढी वीज येथे तयार केली जात आहे.घाटघर धरण हे अगदी निसर्गाच्या कुशीत लपलेले आहे.या परिसराचे पावसाळ्यातील देखणे रुप म्हणजे निसर्ग प्रेमींना पर्वणीच म्हणावी लागेल हा सर्व परिसर पावसाळ्यातील जून महिन्यात हिरवागार होऊन जातो उंच डोंगरमाथ्यावरुन खळखळ आवाज करत कोसळणारे येथील पांढरे शुभ्र धबधबे आणि त्यातून उंच उडणारे तुषार आणि पांढऱ्या शुभ्र गडद धुक्यामुळे काही वेळ गडब होणारे डोंगर माथे हा मिलाप तर पाहण्यासारखा  दुसरा आनंद नाही घनदाट जंगल पशुपक्षी,दुर्मिळ वन्यजीवांसाठी येथील वनराई खऱ्या अर्थाने वरदान ठरली आहे.घाटघर धरणाकडे जाणारी नागमोडी रस्ते,वृक्षांची सभोवताली रांग ,डोंगर दऱ्यांतून कोसळणाऱ्या धबधब्यांचा दूरवरून येणारा आवाज, पक्षांचा किलबिलाट हा सारा अनुभव एकदा घ्यावा असा हा घाटघर धरण परिसर आहे.घाटघर धरणाला एकूण ७ दरवाजे आहेत धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास ते सातही दरवाजे उघडतात पावसाळ्यात पडणाऱ्या धुक्यांच्या छायेत हा परिसर जणू स्वर्गीय वाटतो.पावसाळ्यांत या ठिकाणावरील हिरवेगार नयनरम्य दृश्य हे अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं निसर्ग सौंदर्य तुम्हाला चोंढे घाटघर प्रकल्पाला भेट दिल्यास अनुभवायला मिळेल अशा या हिरव्यागार परिसर सध्या हिरवाईने नटला आहे.

Heading – मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध

 मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोधSlug – द्विपक्ष राजकीय प्रणाली आणा — करणी सेना रमेश औताडे मुंबई : लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा निर्णयापेक्षा देशातील राजकीय अस्थिरता नष्ट करण्यासाठी “द्विपक्षीय राजकीय प्रणाली” साठी घटना दुरुस्ती करा असे “महाराष्ट्र करणी सेना” प्रमुख अजय सिंह सेंगर यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात सेंगर यानी देशाची प्रगति व विकास हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन सारखा होऊ शकली नाही यास बहुपक्षीय राजकीय प्रणाली कारणीभूत आहे असा उल्लेख केला आहे. या पत्रात अनेक राज्यात प्रादेशिक राजकीय पक्ष हे जाती, धर्म व भाषावाद सारखे मुद्दे व राजकीय भ्रष्टाचाराच्या समस्या निर्माण करून सामाजिक विषमता निर्माण करत आहेत. याबाबत त्यांनी  चिंता व्यक्त केली. राजकीय स्थिरता एक सफल लोकतंत्रासाठी द्विपक्षीय प्रणालीची आवश्यकता फार जरूरी आहे. द्विपक्षीय प्रणाली मध्यमार्गी विचारांना प्रोत्साहन देते आणि राजकीय पक्षांना अशा समान भूमिका घेण्यास प्रवृत्त करते, ज्या मतदारांच्या मोठ्या वर्गाला आकर्षित करतात. यामुळे राजकीय स्थिरता येऊ शकते, त्यात कमी मतभेद आणि अधिक सलोखा असतो यामुळे विकासाला चालना मिळेल असे सेंगर यांनी सांगितले. बहुपक्षीय प्रणालींमुळे काहीवेळा त्रिशंकू संसद निर्माण होऊ शकते, राजकीय अस्थिरताने विकास खूटला जातो. प्रत्येक पक्ष हा फोड़ा फोड़ीच्या राजकारणात व्यस्त आहे, देशात बहुपक्ष राजकीय प्रणालीने लोकशाहीला नाकारत धनशाही आणली आहे परिणामी भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढला आहे. द्विपक्ष राजकीय प्रणाली सोबत अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहण्याची तरतूद करण्यात यावी. जर निवडून आल्यापेक्षा बरोबर त्यांनी कोणत्याही एका पक्षात पक्ष प्रवेश करावा जेणेकरून प्रत्येक नागरिकाला निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार सुद्धा प्राप्त होईल असे या पत्रात नमूद केले आहेत.

Heading – राष्ट्रीय चर्मकार संघाच्या नवी मुंबई  कार्याध्यक्षपदी विनोद पाखरे

 मुंबई प्रदेश महिला कार्याध्यक्षपदी पायल खरे मुंबई :  नवी मुंबईतील नेरळ येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाखरे आणि मुंबईतील नायगाव येथील समाजसेविका पायल राजेंद्र खरे यांची अनुक्रमे राष्ट्रीय चर्मकार संघचे नवी मुंबई प्रदेश आणि मुंबई प्रदेशच्या महिला कार्याध्यक्ष म्हणून अलीकडेच नियुक्ती करण्यात आली आहे.या नवीन नियुक्तीची पत्रे राष्ट्रीय चर्मकार संघाचे  अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांनी त्यांना माटुंगा लेबर कॅम्प येथे अलिकडेच  झालेल्या समाजाच्या मेळाव्यात दिली. यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी, मुंबई प्रदेशाध्यक्ष विलास गोरेगावकर, कार्याध्यक्ष अशोक देहरे, मुंबई प्रदेशच्या  महिला प्रदेशाध्यक्ष शारदा नवले आदी उपस्थित होते. नेरळ येथील संत रोहिदास सेवा फाऊंडेशनचे विनोद पाखरे हे  अध्यक्ष असून या सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्या,शैक्षणिक साहित्य, छत्र्यांचे वाटप केले जाते. याचबरोबर नेरळमध्ये या संस्थेतर्फे रक्तदान शिबिरे,आरोग्य शिबिरे घेतली जातात. या फाऊंडेशनचे वैशिष्ट्य म्हणजे गरजू, बेरोजगार तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार खाजगी व सरकारी नोकरी मिळवून देण्याबाबत योग्य मार्गदर्शन केले जाते. अशा प्रयत्नांतून अनेक तरुणांना खाजगी, सरकारी नोकऱ्या मिळून त्यांचे आयुष्य उज्वल झालेले आहे. याचा आपल्याला अभिमान असल्याचे विनोद पाखरे यांनी सांगितले. विनोद पाखरे पुढे म्हणाले   मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चर्मोद्योग कामगार सेनेचा सरचिटणीस आहे. मात्र  राष्ट्रीय चर्मकार संघामध्ये  आम्ही पक्षीय विषय बाजूला ठेवून चर्मकार समाजासाठी एकदिलाने काम करीत राहणार आहे. एसएनडीटी विद्यापीठाची सामाजिक शास्त्राची एम.एस.डब्ल्यू . ही पदवी घेऊन पायल खरे यांनी काही काळ बँकिंग क्षेत्रात काम केले. परंतु समाजातील गरजू महिला, युवक, वंचित घटकांसाठी काम करण्याच्या उद्देशाने ही नोकरी सोडून २००९ पासून त्यांचा समाजसेवेचा प्रवास सुरू झालेला आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने  त्यांनी व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी संभाषण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू केलेले आहे. यानंतर त्यांनी मेणबत्ती कॅण्डल आणि बॅग निर्मिती यासारखे लघु उद्योग सुरू करून अनेक महिलांना रोजगार आणि स्वाभिमानाचे एक दार उघडून दिलेले आहे. पायल खरे  म्हणाल्या महिला सक्षमीकरण, युवक कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, समुपदेशन, आरोग्य जनजागृती आणि आर्थिक मार्गदर्शन या क्षेत्रात सातत्याने मला काम करण्याची संधी मिळालेली आहे.सध्या मी मोटिव्हेशशनल स्पीकर अर्थात एक प्रेरणादायी वक्ता, समूह समुपदेशक,हेल्थ कन्सल्टंट,  हेल्थ ॲडव्हायझर आणि फायनान्शियल ॲडव्हायझर म्हणून कार्यरत आहे.तसेच मागील गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रेन्यूअरशिप डेव्हलपमेंट मध्ये (एम.एस.ई.डी.) प्रोग्राम ऑर्गनायझर म्हणून मी काम करीत आहे. आमच्या कार्याची दखल घेऊन माजी आमदार बाबुराव माने यांनी  आमची  राष्ट्रीय चर्मकार संघाच्या  कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली त्याबद्दल  आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत.आम्ही आमच्या पदाला चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा समाजाच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे पायल खरे, विनोद पाखरे  यांनी म्हटले आहे. ००००

ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेतर्फे आमदार माधवी नाईक यांचा सन्मान

अनिल ठाणेकर ठाणे:  ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेतर्फे विधान परिषदेतील भाजपच्या आमदार अॅड. माधवी नाईक यांचा अॅड. विजय आगाशे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. आगामी काळात न्यायालयासंदर्भातील विविध प्रश्नांबरोबरच बार कौन्सिल आणि वकिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम कटिबद्ध राहीन, अशी भावना आमदार अॅड. माधवी नाईक यांनी व्यक्त केली. ठाणे न्यायालयात अनेक वर्षांपासून वकील म्हणून माधवी संजय नाईक यांनी कार्य केले आहे. ठाणे महापालिकेच्या नगरसेवकपदाबरोबरच त्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश पातळीवर संघटनात्मक कार्य केले. त्यांची नुकतीच भाजपतर्फे विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून अॅड. माधवी नाईक यांचा ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी `बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँण्ड गोवा’चे सदस्य गजानन चव्हाण, माजी उपमहापौर व ज्येष्ठ वकील सुभाष काळे, संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. आमदारपदाच्या माध्यमातून भविष्यात अधिक जनसेवा करण्याची संधी मिळाली आहे. ती सार्थ ठरविण्याचा माझा प्रयत्न असेल. विधी क्षेत्रातील वकील बंधू-भगिनींकडून मिळालेला हा सन्मान यापुढील काळात माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल. वकिली क्षेत्रातील माझे गुरू ॲड. विजय आगाशे यांच्या हस्ते झालेला हा सन्मान मोठा गौरव आहे. त्यांच्याकडून केवळ वकिलीचेच नव्हे, तर शिस्त, प्रामाणिकपणा, कामाप्रती समर्पण असे अनेक संस्कार मिळाले. ते कायम प्रेरणादायक राहतील, अशी भावना आमदार अॅड. माधवी नाईक यांनी व्यक्त केली. बार कौन्सिल व जिल्हा वकील संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले. माझ्या उमेदीच्या वर्षात ठाणे जिल्हा न्यायालयात अनेक दिग्गज वकिलांचे काम जवळून पाहू शकले. त्यात दिवंगत प्रभाकरभाई हेगडे आणि दिवंगत रमाकांतअण्णा ओवळेकर ही नामवंत व्यक्तिमत्व होती. त्यांच्या कार्याचा कायम अभिमान राहील, अशी भावना आमदार अॅड. माधवी नाईक यांनी व्यक्त केली.