सरळ सेवा भरती परिक्षा १८ जुलै पासून सुरू – रोहन घुगे
ठाणे : सरळ सेवा भरती पुढील टप्प्यातील परिक्षा 18 जुलै रोजी मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, 19 व 23 जुलै रोजी आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), 20, 22 व 23 जुलै रोजी…
ठाणे : सरळ सेवा भरती पुढील टप्प्यातील परिक्षा 18 जुलै रोजी मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, 19 व 23 जुलै रोजी आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), 20, 22 व 23 जुलै रोजी…
आमदार निरंजन डावखरे यांची विधान परिषदेत मागणी ठाणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत राज्य सरकारमध्ये कंत्राटी पद्धतीने अल्प वेतनावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश करावा, अशी…
ठाणे : मागील आठवडाभर घोडबंदर रोडवर होत असलेल्या वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज पूर्वद्रुतगती महामार्गावरील माजिवडा जंक्शन ते कापूरबावडी जंक्शनपर्यत विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मेट्रो प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच विविध प्राधिकरणाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील खड्डे देखील दुरूस्त करण्याचे आदेश देत असतानाच सर्व प्राधिकरणाने समन्वयाने कामे करावीत असेही सूचित केले.यावेळी अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी ज्युपिटर हॉस्पिटल, माजिवडा नाका, कापूरबावडी परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. विविध ठिकाणी मेट्रोच्या कामासाठी बॅरिगेटींग केलेले असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असून या कामामध्ये बाधा न आणता वाहतूक कोंडी कशाप्रकारे सोडविता येईल या दृष्टीकोनातून नियोजन करावे. कापूरबावडी जंक्शनवर पेपर प्रॉडक्टस कंपनीलगत असलेल्या पुलावर गर्डर उभारण्याचे काम गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे, हे काम युद्धपातळीवर पुर्ण करुन सदरचा पूल वाहतूकीसाठी खुला करावा अशीही सूचना आयुक्तांनी यावेळी दिली. तसेच पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पडणारे खड्डे तातडीने बुजविता यावेत यासाठी महापालिकेकडून आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करण्यात आले असून त्यांच्यामार्फत तातडीने उपाययोजना करण्यात येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील रस्ते हे कोणत्या प्राधिकरणाच्या अखत्यारित येतात हे न पाहता ज्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत ते तातडीने बुजविण्यात येतील. पावसाळा दरम्यान करावयाच्या कामांबाबत सर्व प्राधिकरण समन्वयाने काम करुन नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले. 00000
रमेश औताडे मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींबाबत सरकारकडून खबरदारी घेण्यात येत असतानाच काही ठिकाणी इमारतींमधे छताचा भाग कोसळणे तर काही ठिकाणी ईमारत खाचने, पडणे अशा घटना घडत आहेत. मानखुर्द येथील पी एम जी पी कॉलनीत जीर्ण झालेल्या इमारतीचा छताचा भाग कोसळल्याने भयभीत झालेले रहिवाशी संतप्त झाले आहेत. ईमारत क्रमांक २० मधील पहिल्या मजल्यावरील छताचा भाग कोसळला. पहाटे घटना घडल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. यापूर्वीही अशा छोट्या घटना घडल्या असल्याने तात्पुरती मलमपट्टी करून प्लास्टर करण्यात येत होते. अशी तात्पुरती मलमपट्टी अजून किती दिवस करत राहायची ? असा सवाल येथील रहिवाशी करत आहेत. आमचा जीव गेल्यावर सरकार लक्ष देणार आहे का ? निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी मतांचा जोगवा मागण्यासाठी येतात व आश्वासन देऊन जातात.छताचा भाग पाडून आमचा जीव जाणार आहे. लोकप्रतिनिधींचा नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशी देत आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, गटारे नाले योग्य प्रकारे साफसफाई होत नसल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात छताचा भाग कोसळण्याची टांगती तलवार कायम आहे. पुनर्विकास होण्यासाठी येथील काही रहिवाशी प्रयत्न करत आहेत मात्र काही रहिवाशी त्यांना सहकार्य करत नसल्याने नवीन टॉवर मध्ये राहण्याचे स्वप्न पाहून एक पिढी वयोवृध्द झाली आहे. त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्यासाठी व छताचा भाग कोसळून जीवित हानी होण्याअगोदर सरकारने अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गांभीर्याने विचार करावा अशी मागणी रहिवाशी करत आहेत. ०००००
खरीप हंगामसाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या बोनस पासून शेतकरी वंचित राजीव चंदने मुरबाड : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक वर्ष कार्यान्वीत असलेल्या आधारभुत किंमत धानखरेदी योजने अंतर्गत सब एजंट म्हणून नियुक्त केलेल्या मुरबाड तालुका शेतकरी संघाने २०२० -२१ मध्ये ३१ मार्च पर्यन्त ३८२२ शेतकऱ्यांचे ९३ ३३५ . ७२ क्विंटल भात खरेदी करून पावत्या दिल्या . मात्र सततचा विज पुरवठा खंडीत होणे, इंटरनेट सेवा बंद होणे, या बाबीमुळे ५९६ तालुक्यातील शेतकऱ्यांची ऑन लाईन नोंदणी ३१ मार्च पर्यंत झाली नाही. त्यांच्या नोंदणी नंतर केली. यामुळे तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी शासनाने जाहीर केलेल्या प्रती क्विंटल ५oo रु बोनस पासुन वंचीत राहीले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचा दोष नसतांना त्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांसाठी लोकमित्र रमेश हिंदुराव यांनी सतत पाठपुरावा केला असून नागपुर येथील झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी,अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून आपणांस बोनस देऊ असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला ५ महिने होऊन ही आश्वसनाची पुर्तता होत नसल्याने त्यांनी २८ . ६ २४ रोजी . आझाद मैदान येथे उपोषण केले असता सचीव अन्न नागरी पुरवठा विभाग यांनी सर व्यवस्थापकीय संचालक यांना याबाबत बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच शेतकरी संघ व आदिवासी सेवा सोसायटी वरील ताण कमी व्हावा म्हणुन शासनाने . सर्व सेवा सोसायट्यांना भात खरेदी करण्यास परवानगी द्यावी . अशी मागणी सुद्धा केली आहे. नुकतीच अंमलात आणलेल्या लाडक्या बहिणी साठी योजना राबवणाऱ्या सरकारने दुर्लक्षीत राहिलेल्या शेतकरी वर्गाचे ५ ९६ शेतकऱ्यांचे १४ १७५ . २७ क्विंटलचे रू ५०० रू प्रमाणे बोनसची रक्कम तात्काळ द्यावी अशी मागणी लोकमित्र रमेश हिंदुराव . सभासद मुरबाड तालुका शेतकरी संघ .यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री . व अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्या कडे लेखीपत्रा द्वारे केली आहे. ००००
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी राजीव चंदने मुरबाड : राज्यभरात गाजलेल्या “झोळी” प्रकरणाचे रोहित पवार यांनी ट्विट केले होते.त्या अनुषंगाने मुरबाड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिपक वाघचौडे आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुरबाड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्यसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून त्यास सर्वस्वी जबाबदार हे तालुका आरोग्य अधिकारी आहेत. असा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांची या तालुक्यातून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. मागील तीन महिन्यांपुर्वी तुळई प्राथमिक आरोग्य केंद्रात कागदोपत्री श्रेणी अ वर्गाच्या निवासी डॉक्टर असूनही ते निवासी नसल्याने एका शिक्षकाचा उपचारा अभावी बळी गेला. म्हसा यात्रेदरम्यान म्हाडस या एकाच गावात डेंग्यूचे पन्नास पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले होते. याच कालावधीत देवपे व सासणे येथे प्रत्येकी एक बालमृत्यू झाले होते.हे प्रकरण खुप गंभीर असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. धसई जवळील ओजिवले कातकरी वाडीतील महिलेला दि.23 जून रोजी रात्रभर डॉक्टर निवासी नसल्याने प्रसूती वेदना सहन कराव्या लागल्या.डॉक्टर दुसऱ्या दिवशी आल्याने तिची 24 रोजी प्रसूती झाली. मुळात माहेरघर नावाची योजना सुरू असताना ऐन प्रसूतीवेळी गर्भवतींना रुग्णालयात दाखल होण्याची गरज का पडते? मुरबाड तालुक्यात आजमितीस माहेरघर योजनेचा एकही लाभार्थी नाही.या माहेरघर योजनेवर दरवर्षी लाखो रुपये खर्च होत असताना त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.यास सर्वस्वी तालुका आरोग्य अधिकारी जबाबदार आहेत. वैशाखरे प्रधानपाडा येथील दोन वर्षाच्या बालकाला सर्पदंश झाला.त्या बालकाला टोकावडे ग्रामीण रुग्णालयात आणले.मोरोशी येथील गट अ वर्गाच्या डॉक्टर तेथे निवासी नसतात हे परिसरात सर्वश्रुत आहे.त्यामुळे या बालकाला टोकावडे येथे नेले.आणि त्याचा जीव गेला. जांभूर्डे येथील गर्भवतीला म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्र असताना याठिकाणी डॉक्टर निवासी नसल्याने मुरबाड ग्रामीण रुग्णालयात आणले.येथेही हे बाळ दगावले. सार्वजनिक आरोग्यसेवेची पुरती वाट तालुका आरोग्य अधिकारी यांनी लावल्याने तालुक्यात दररोज बळी जात आहेत.याचमुळे तालुक्यात दररोज नव्याने खासगी हॉस्पिटल निर्माण होत आहेत.हे सार्वजनिक शासकीय आरोग्य सेवेचे अपयश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कारभारावर तसेच याठिकाणी निवासी डॉक्टर नसल्या कारणाने तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे तालुका आरोग्य अधिकारी आहेत.असा आरोप त्यांनी बनसोडे यांच्यावर या निवेदनात करण्यात आला आहे.मुरबाडच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेतली असून या बाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे पत्र तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.त्यामुळे या एकूण कारभाराची काय चौकशी होते,व कुणावर काय कारवाई होते याकडे मुरबाडकरांचे लक्ष लागले आहे.दरम्यान कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिपक वाघचौडे यांनी दिला आहे. ०००००
मुंबई- मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ ही संस्था सातत्याने ११ वर्षे वाद्यवृंद निर्माते व कलावंताच्या प्रश्नावर काम करणारी संस्था आहे. सदर संस्थेच्या वतीने बुधवार दि .१७ जुलैला सायंकाळी ५ वाजता अण्णाभाऊ साठे…
अनिल ठाणेकर ठाणे : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अधिकची मतं मिळवून विजयी होतील. जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त आहेत. मह्मुंयुती सरकारकडून मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी १०५ कोटीचा निधी दिलाआहे.. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून महायुतीमधील तिनही नेत्यांनी भाऊ असल्याचे कर्तव्य केले, असा रोखठोक संवाद राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी साधला. शुक्रवारी होणाऱ्या विधान परिषद ११ जागांसाठी महायुतीचे ९ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी होतील आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या फेरीत विजयी होतील. महविकास आघाडीच्या तीन पैकी एका उमेदवाराचा पराजय निश्चित असून शिवसेना (उबाठा) चे मिलिंद नार्वेकर यांचे सगळ्यांशी संबंध चांगले असल्याने ते विजयी होऊ शकतात. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव होईल आणि हा पराभब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचा असेल. महायुतीच्या आमदारांची एकजूट पक्की आहे त्यामुळे घोडे बाजार होणार नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांवर पूर्ण विश्वास असल्याचे अजित पवार यांनी आधीच सांगितले आहे. शिवसेनेचे आमदार देखिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. भाजपाचे आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. महायुतीचे उमेदवार अधिकची मते मिळवून विजयी होतील, असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त आहेत.२०० कोटींमध्ये इमेज मेकओव्हर हा आरोप कथा कल्पित असून हा आकडा आला कुठून ? २०१९ साली ज्यावेळेला राष्ट्रवादीने मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये आमदारांना ठेवले होते ते हॉटेल राष्ट्रवादी शरद पवार गटाने विकत घेतले असं म्हणायचे का ? बेसलेस आरोपांना मी काही फारसे महत्त्व देत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपांकडे फार लक्ष देऊ नये. रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड सातत्याने खोटे आरोप करत असतात. लोकसभेच्या यशानंतर काँग्रेस महाविकास आघाडी मध्ये स्वतःला मोठा भाऊ समजायला लागली आहे. ते विधानसभेला २८८ उमेदवार उभे करायचा विचार करत आहेत. काँग्रेसचा एखादा सच्चा कार्यकर्ता मुंब्रा कळव्यातून तिकीट मागत नाही ना ? याकडे आव्हाडांनी लक्ष द्यावे. काँग्रेसचे ठाण्यातील नेते सातत्याने डॉ. जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील काँग्रेस संपवल्याचे आरोप करीत असतात. मी स्वतः पुढाकार घेऊन आव्हाड यांची भेट अजितदादा पवार यांच्याबरोबर करून द्यायला तयार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ५५ कोटी रुपयांचा विकास निधी आला आहे. आव्हाड यांच्या सोबतच्या अनेक नगरसेवकांनी हा निधी घेतलेला आहे. आता पुन्हा ५० कोटीचा विकास निधी आलेला आहे. मी, नजीब मुल्ला आणि स्थानिक नगरसेवकांच्या मागणीनुसार 50 कोटीचा विकास निधी आला आहे व तो खऱ्या विकासासाठी निधी वापरला जाईल. त्यामुळे निधी मिळाला नाही असं आव्हाड धादांत खोटे बोलत आहेत. आव्हाड यांच्या माध्यमातून निधी दिला तर एका ठराविक ठेकेदाराला कामे दिली जातात. निधीच्या बाबतीत महायुतीकडून कोणताही भेदभाव नाही. आतापर्यंत १०५ कोटी रुपये मुंब्रा-कळव्या साठी निधी आल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली. अजितदादा यांनी राज्यातील माता भगिनी, बळी राजा व सर्व घटकांना सुख समृद्धी लाभो, यासाठी सिद्धीविनायकाकडे साकडे घातले. १४ जुलै रोजी बारामतीमध्ये सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभेच्या तयारीला लागली आहे. लपून छपून नाही तर मीडिया आणि सर्व आमदारांना घेऊन दर्शनाला गेले. काही जण लपून छपून शनी अमावस्येला शनी शिंगणापूरला दर्शन घेतात. घड्याळ चिन्ह आम्हाला मिळेल याची खात्री आहे. महायुतीत कोणतेही मतभेद नाही. समन्वयाने सर्व निर्णय होतील. राजकीय प्रगल्भता असली पाहिजे. अनेक बहिणींना मदतीचा हात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून मिळणार आहे. वैयक्तिक भाऊ बहीण या नात्याबद्दल बोलणे टाळले पाहिजे. महायुतीमधील तिनही नेत्यांनी भाऊ असल्याचे कर्तव्य केले आहे, असेही प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.
रूग्ण संख्येत वाढ, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन ठाणे : जिल्ह्यात एकीकडे पावसाने जोर धरला असतानाच विविध शहरात डेंग्यु आणि मलेरियाच्या रूग्णसंख्येतही वाढ होत असल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात ३२ हून अधिक रूग्णांची शासनाच्या दफ्तरी नोंद झाली आहे. मात्र यात रूग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जाते आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात पावसाने चांगला जोर धरला. त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये हळुहळू वाढ होते आहे. पावसामुळे मोकळ्या आणि सखल भागात पाणीही साचते आहे. नैसर्गिक नाले प्रवाही झाले आहेत. त्याचवेळी शहरात रहिवासी भागांमध्ये मोकळ्या, सखल भागात, निर्माणाधीन इमारती, मोडकळीस आलेल्या आणि बंद घरांमध्येही पाणी साचू लागले आहे. परिणामी डासांची उत्पत्ती वाढून रोगराई पसरण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात डेंग्यु आणि मलेरियाच्या रूग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ३२ रूग्णांची नोंद झाली आहे. यातील डेंग्यु सदृश्य रूग्णांची संख्या मोठी आहे. अनेक जण लक्षणे दिसल्यास खासगी स्तरावर उपचार घेत असल्याने अशा अनेकांची नोंद स्थानिक पालिका प्रशासनाच्या लेखी नाही. गेल्या आठवडाभरात ठाणे जिल्ह्यात १० डेंग्यु रूग्णांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र त्याचवेळी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागात एकट्या बदलापूर शहरात १२ डेंग्यु रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डेंग्यु रूग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यातही एकाच घरात एकापेक्षा अधिक रूग्णांची नोंद झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे डेंग्युच्या रूग्णांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होते आहे. तर जिल्ह्यात मलेरियाच्या रूग्णांची संख्याही २० वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जाते आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपायोजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ताप उद्रेकाच्या ठिकाणी जलद ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे. हिवताप बाधित रुग्ण आढळ्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे देखील रक्त तपासणी साठी पाठवण्यात येत आहेत. तर भिवंडी मध्ये इतर शहरांतून कामासाठी येणाऱ्या मजुरांचे प्रमाण अधिक आहे. या मजुरांचे देखील सर्वेक्षण करण्यात येत आहे. तर ग्रामीण भागातील नाले, डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. तर ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात गप्पी माशांचे एक पैदास केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहेत. आरोग्य विभाग तपासणी पुरताच मर्यादीत जिल्ह्यातील सर्वच महापालिकांमधील आरोग्य विभाग हा डेंग्युचे रूग्ण आढळ्यानंतर तपासणी करत रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना सल्ले देण्यापुरताच मर्यादीत असल्याचे दिसून येते आहे. रूग्ण आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पथक रूग्णाच्या घरी जाऊन साचलेल्या पाण्याचे साठे तपासते. एखादी कुंडी, पाण्याची भांडी आढळल्यास त्यावरून रूग्णाच्या कुटुंबियांना सुनावले जाते. मात्र त्याचवेळी इमारतींच्या शेजारी असलेली डबकी, निर्माणाधीन इमारतींचे मालक यांना मात्र समज दिली जात नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.