Category: महाराष्ट्र

Maharashtra News

बालभारतीच्या बनावट पाठ्यपुस्तकांवर छापा

नागपूर : नागपूर शहरात बालभारतीच्या बनावट पुस्तकांच्या छापखान्यावर हिंगणा पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकत २० हजारांची पुस्तके ताब्यात घेतली. त्यामुळे शिक्षणिक वर्तूळात पुन्हा एकदा बनावटगीरीमळे खळबळ उडाली आहे. बालभारतीचे अधिकारी राकेश पोटदुखे…

साताऱ्यात १४५ कोटींचे ड्रग्स जप्त

साताऱ्यात १४५ कोटींचे ड्रग्स जप्त  सुषमा अंधारेंकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी शिंदेंच्या सख्या भावाचा ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप पोलिसांच्या छाप्यात १४५ कोटीचे ड्रग्ज जप्त सातारा :  सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील असणाऱ्या  शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ४५ किलो ड्रग्जचा…

राज्याच्या युवा धोरण समितीवर युवा आमदार अमित गोरखे यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती

हरिभाऊ लाखे मुंबई : राज्याच्या युवा धोरणाच्या आराखड्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीवर पिंपरी-चिंचवडचे युवा आमदार अमित गोरखे यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. “ही समिती मा. मुख्यमंत्र्यांच्या…

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेचे बारामतीमध्ये थाटात उद्घाटन

बारामती : ‘वीज क्षेत्रासारख्या अत्यंत धकाधकीच्या क्षेत्रामध्ये राज्यातील तीन कोटींपेक्षा अधिक ग्राहकांना वीज सेवा देण्यासाठी सांघिकता अत्यंत महत्वाची आहे. दरवर्षीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडूवृत्ती व संघभावना निर्माण होते व…

उदय सामंत यांच्या हस्ते शासकीय रुग्णालयात ४ डायलिसीस मशीनचे लोकार्पण

अशोक गायकवाड रत्नागिरी : अंत्योदय प्रतिष्ठान व मी मुंबई अभिमान अभियान प्रतिष्ठान यांच्यामार्फत प्राप्त ४ डायलिसीस मशीनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फित कापून…

सिडकोत पाण्यासाठी आंदोलन

हरिभाऊ लाखे नाशिक : धरणांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही सिडकोतील काही भागात पाणी पुरवठा होत नसल्याने या कृत्रिम पाणी टंचाई विरोधात तसेच रायगड चौकात पाणी पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी…

नाशिक महापालिकेवर तक्रारींचा भडीमार

अतिक्रमणांशी संबंधित सर्वाधिक तक्रारी हरिभाऊ लाखे नाशिक : शहरातील विविध समस्यांविषयी महापालिकेवर तक्रारींचा भडीमार होत असून इ कनेक्ट ॲपसह मुख्यमंत्री सचिवालय, विभागीय आयुक्त, आपले सरकार यावरून आतापर्यंत २६४४ तक्रारी आल्या आहेत. यातील जवळपास निम्म्या तक्रारी अतिक्रमणाशी संबंधित आहेत. महापालिकेच्या साप्ताहिक आढावा बैठकीत मुख्यमंत्री सचिवालय, पीएम पोर्टल, आपले सरकार, एनएमसी इ कनेक्ट ॲप या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींची सद्यस्थिती मांडली गेली. महापालिकेच्या कामकाजात सुधारणा करून नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी कृती आराखडा करण्यात आला आहे. त्यात तक्रारींचा जलद निपटारा करण्यावर भर दिला गेला. नागरिक प्रामुख्याने इ कनेक्ट ॲपवरून तक्रारी करीत असल्याचे दिसून येते. या ॲपवरील तक्रारींची संख्या २५७७ इतकी आहे. यात अतिक्रमणशी संबंधित १२६८, घनकचरा व्यवस्थापन २५२, मलनिस्सारण १७७, उद्यान ८५, नगर नियोजन १७७, झोपडपट्टी ६६, सार्वजनिक बांधकाम १८३ या विभागांशी संबंधित तक्रारींची संख्या अधिक आहे. संबंधित विभागांना तक्रारींचा मुदतीत निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, इ कनेक्ट ॲपवर तक्रारींवरील कार्यवाहीची माहिती द्यावी लागते. कधीकधी मोघम उत्तर वा कारवाई दर्शवत तक्रारी बंद केल्या जातात. अथवा तक्रार अन्य विभागाशी संबंधित असल्याचे सांगून टोलवाटोलवी होते, असे तक्रार करणाऱ्या नागरिकांचे म्हणणे असते. विभागीय कार्यालयांविषयी तक्रारी मुख्यमंत्री सचिवालयाकडील १०, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून एकूण १७, पीजी पोर्टलवरील १२, आपले सरकार पोर्टलवरून २८ तक्रारी आल्याची माहिती बैठकीत मांडली गेली. यात नगरनियोजन, अतिक्रमण, शिक्षण, भूसंपादन, विभागीय कार्यालये, उद्यान आदी विभागांशी तक्रारींचा समावेश आहे. यामध्ये विभागीय कार्यालयांशी संबंधित सुमारे २५ तक्रारी आहेत. विभागीय कार्यालयांचे कामकाज कर्मचाऱ्यांच्या लहरींवर चालते. स्वागत कक्षात जबाबदारी सांभाळणारे कर्मचारी कार्यालयीन वेळेत अंतर्धान पावतात. कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी अकस्मात भेटीचे सत्र सुरू केल्यामुळे या प्रकारांना काहीअंशी आळा बसत आहे.

मोडीची गोडी प्रचारक बनून इतरांनाही लावा- प्रशांत सातपुते

अशोक गायकवाड रत्नागिरी : सराव माणसाला परिपूर्ण बनवितो. सराव म्हणजे गुणवत्ता टिकण्याचे सार. आत्मसात केलेल्या मोडी लिपीचा सराव करुन तिची गोडी प्रचारक बनून इतरानांही लावा, असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले. येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळेत समारोप प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, कोल्हापूर पुरालेखागार संशोधन सहायक सर्जेराव वाडकर, पुणे लेखागाराचे संशोधन सहायक लक्ष्मण भिसे उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी सातपुते म्हणाले, कोणतीही गोष्ट शिकल्यानंतर, आत्मसात केल्यानंतर ती कायमस्वरुपी दृढ करण्याच्या दृष्टीकोनातून तिचा सराव करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. मोडीलिपीचे घेतलेले ज्ञान हे स्वत:पुरते मर्यादित न ठेवता तिचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीकोनातून प्रचारक म्हणून काम करा, असे सांगून मोडीचा इतिहास, भाषानिर्मिती आणि बोरु या विषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ. साखळकर अध्यक्षीय भाषणात म्हणाले, महाविद्यालयात घेतलेल्या मोडीलिपी प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद मिळाला. नवीन कौशल्य शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते. मिळालेल्या नवीन कौशल्याच्या आधारावर व्यक्तीमत्व विकास त्याबरोबरच करिअर देखील उंचावता येते. संशोधन सहायक वाडकर यांनी मोडीलिपी प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रा. पंकज घाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी प्रशिक्षणार्थींनीही आपला अनुभव कथन केला. प्रा. मधुरा चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थी ओंकार आठवले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्याला मराठीतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते-शुभांगी साठे

अशोक गायकवाड रत्नागिरी : विद्यार्थ्याला मराठी भाषेतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमांतर्गत येथील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयात ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदिंडीचे आयोजन आज करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यानिमित्त आयोजित व्यासपीठावर मराठी भाषा समिती सदस्य आणि कवी केशवसुत स्मारक समिती मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एन. कासार, कोमसापचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, कोमसाप केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, अरुण मोरये, दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान मोटे आदी उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी नगर शिक्षण मंडळातर्फे सुमारे एक हजार पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते त्याचे उद्घाटन श्रीमती साठे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दामले विद्यालयातर्फे ग्रंथदिंडीचे मारुती मंदिर परिसरात आयोजन करण्यात आले आपले शिक्षण मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून, आता आपण उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे मराठी शिक्षण आपल्याला समृद्ध करते. याच मराठी भाषेतील शिक्षणाने उच्च पदापर्यंत पोहोचवले, असे मत उपजिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी व्यक्त केले. दामले विद्यालयासारखी मराठी माध्यमाची शाळा इतक्या उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण क्षेत्रात चौफेर आपला ठसा उमटवते, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. दामले विद्यालयाचे काम आदर्शवत असल्याचेही त्या म्हणाल्या .पाटील यांनी मराठी भाषेचा अभिजात भाषेपर्यंतचा प्रवास मुलांसमोर सोप्या भाषेत उलगडला. विद्यार्थ्यांनी रोज वाचण्याची सवय लावण्याची गरज असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कासार म्हणाले. आभार मुख्याध्यापक मोटे यांनी मानले.

विश्व मराठी संमेलनाचा कार्यक्रम जाहीर

पुणे: मराठी भाषा विभागाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विश्व मराठी संमेलनाची कार्यक्रम रूपरेषा अखेर जाहीर झाली आहे. मंगळवारी अधिकृत कार्यक्रमपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी संमेलनाविषयी प्राथमिक माहिती दिली होती. मात्र, त्यामध्ये नेमक्या कार्यक्रमांचा उल्लेख नव्हता. अखेर मंगळवारी विश्व मराठी संमेलनाच्या अधिकृत सोशल मीडिया पृष्ठावर संमेलनाचा संपूर्ण कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य ठळक मुद्दे: ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता, बालगंधर्व रंगमंदिर येथून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात येईल. ११ वाजता उद्घाटन समारंभ, ज्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांचा ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ हा विशेष कार्यक्रम. दुपारी १.१५ वाजता ‘माझी मराठी भाषा अभिजात झाली’ या विषयावर परिसंवाद व पुस्तक प्रकाशन. या चर्चासत्रात डॉ. सदानंद मोरे, ज्ञानेश्वर मुळे, लक्ष्मीकांत देशमुख आणि रवींद्र शोभणे सहभागी होणार आहेत. ‘मराठी भाषा आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर दुपारी ३.३० वाजता संपादकांचा परिसंवाद. त्यानंतर नव्या-जुन्यांचे कवी संमेलन रंगणार आहे. सायंकाळी ५.४५ वाजता, आंतरराष्ट्रीय मंच उपक्रमांचे सादरीकरण आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हे सर्व कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंचावर होतील. इतर महत्त्वाचे उपक्रम: प्र. के. अत्रे सभागृह (ॲम्फी थिएटर) येथे दुपारी २ वाजता मराठी बोलीभाषांचे सर्वेक्षण या विषयावर डॉ. सोनल कुलकर्णी यांचे सादरीकरण. ३.१५ वाजता अनुवाद विषयक चर्चासत्र, ज्यामध्ये रवींद्र गुर्जर, डॉ. उमा कुलकर्णी आणि लीना सोहनी सहभागी होतील. ही संपूर्ण कार्यक्रम रूपरेषा जाहीर झाल्यामुळे संमेलनाविषयी असलेली उत्सुकता आणखी वाढली आहे. विश्व मराठी संमेलन मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीसाठी एक महत्त्वाचा सोहळा ठरणार आहे.