Category: महाराष्ट्र

Maharashtra News

मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली

जालना : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज जालना येथे मोर्चा काढण्यात आला.   या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील सहभाग घेतला. जालना…

आता ७२ तासांच्या आत खड्डा बुजणार

हरिभाऊ लाखे नाशिक : नाशिक विभागात वर्षभरात जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील 98 टक्के खड्डे बुजविण्याचा दावा नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची माहिती त्वरीत मिळावी यासाठी बांधकाम विभागाने पीसीआरएस हे मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. अ‍ॅपवर माहितीनुसार 72 तासांच्या आत खड्डा बुजविण्यात येतो. मात्र नाशिक – त्र्यंबक रोड, नाशिक – दिंडोरी या खड्डेमय मार्गांकडे विभागाचे लक्ष वेधले असता निधीअभावी खड्डे बुजविण्याचे काम थांबले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित नाशिक विभागातील 23 हजार किलोमीटरचे रस्ते येतात. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील २२00 किलोमीटर, तर धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यातील ५२00 किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहे. या सर्व रस्त्यांची नियमितपणे देखभाल दुरुस्ती बांधकाम विभागाकडून करण्यात येते. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांना खड्डे पडतात, यामुळे वाहने चालवताना वाहनचालक बेजार होतात. गतवर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यासाठी मोठी मोहीम राबविली. मोहिमेवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष ठेवले. मोहिमेनंतर 98 टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा विभागाकडून करण्यात आला आहे. पीसीआरएस अ‍ॅपवर द्या खड्ड्यांची माहिती जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पीसीआरएस हे अ‍ॅप विकसित केले आहे. अ‍ॅपवर तक्रार दाखल झाल्यानंतर 72 तासांच्या आत खड्डे बुजविण्यात आल्याचे उत्तर अ‍ॅपद्वारे देण्यात आले. अ‍ॅपचा वापर सहजपणे करता येत असल्याने नागरिकांकडून तक्रारी दाखल करण्यात वाढ झाली आहे. कोट पीसीआरएस अ‍ॅपमुळे खड्ड्यांची माहिती त्वरीत उपलब्ध होते, यामुळे खड्डे बुजविणे सोपे झाले आहे. नागरिकांचा प्रवास सहज आणि सुलभ व्हावा यासाठी खड्डेमुक्त रस्ते तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. काही कारणास्तव जिल्ह्यातील मार्गांवर खड्डे असल्यास ते त्वरेने बुजविले जातील. प्रशांत औटी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक. ००००

स्मार्ट हरितक्षेत्र परियोजना रद्द करा मुख्यमंत्री फडणवीस यांना नाशिकच्या शेतकऱ्यांचे साकडे हरिभाऊ लाखे

नाशिक : नाशिक महापालिका हद्दीतील मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरातील 753 एकर क्षेत्रावर स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रस्तावित हरितक्षेत्र विकास परियोजना अर्थात ग्रीनफील्ड योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आ. देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखालील…

उत्तर भारत  थंडीने हैराण

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत मंगळवारी सकाळी दाट धुके पसरल्याने दृश्यमानता कमालीची घटली. त्यामुळे किमान २५ रेल्वे नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावल्या. पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशसह डझनहून अधिक राज्यांत धुक्यामुळे दृश्यमानता कमालीची घटली होती. जम्मू-काश्मीरात काही ठिकाणी तापमानात वाढ…

वन इलेक्शनबाबत झाली जेपीसीची पहिला बैठक

नवी दिल्ली : देशातील लोकसभा आणि सर्व राज्यांमधील विधासभा निवडणुका एकत्र घेण्याची तरतूद असलेल्या दोन विधेयकांवर विचारविनिमय करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक बुधवारी झाली. भाजपाचे…

मुंबई-गोवा महामार्गला आता  जूनच मुहुर्त !

नवी दिल्ली: मुंबई-गोवा महामार्गला आता जूनचा मुहुर्त मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा मुहुर्त दिला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परिस्थितीमुळे मला रोज प्रवाशांची नाराजी सहन करावी लागते. ही नाराजी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समजते. यामुळे…

ई रिक्षा चालू ठेऊन बिनधास्तपणे उपोषण करा!

पर्यटकांसह पालकांची मागणी माथेरान : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरान मध्ये प्रायोगिक तत्त्वावर एकूण २० ई रिक्षा सुरू आहेत. सहा महिन्यांचा हा पायलट प्रोजेक्ट डिसेंबर मध्ये पूर्ण झाला असून उर्वरित ७४…

एसटीच्या भाईंदर -पश्चिम येथील जागेचा मीरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून विकास करणार- प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर/अरविंद जोशी एसटीच्या भाईंदर पश्चिम येथील जागेचा मीरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून विकास करण्यात येणार असून या प्रकल्पांतर्गत भव्य असे वातानुकूलित मच्छी मार्केट बनविण्यात येणार आहे. याबरोबरच परिवहन विभागाचे उपप्रादेशिक कार्यालय…

मुलांच्या बौध्दिक विकासाबरोबरच, शारीरिक व मानसिक विकासासाठीही बालमहोत्सव – न्या. एस एस गोसावी

अशोक गायकवाड रत्नागिरी : मुलांचा केवळ बौध्दिक विकास करुन चालणार नाही, तर त्याबरोबरच शारीरिक मानसिक विकासासाठी त्यांच्यामधील कला, क्रीडा, कौशल्य अशा सुप्त गुणांना वाव बाल महोत्सवाच्या माध्यमातून शासनामार्फत दरवर्षी केला…

वैजनाथ केंद्रातील शिक्षिकेचा सत्कार

माथेरान :पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने माथेरान व्हॅली इंग्लिश स्कूल वंजारपाडा येथील मैदानावर तालुकास्तरीय शिक्षक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या मध्ये धावणे, कबड्डी, गोळा फेक, थाळी फेक, लांब उडी अशा…