Category: मुंबई

Mumbai news

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणणार- देवेंद्र फडणवीस

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणणार- देवेंद्र फडणवीस मुंबई: युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांची हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर परदेशात अडकलेल्या भारतीयांबाबत राज्य शासन सतर्क असून त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य संजय केनेकर, ॲड. निरंजन डावखरे, सत्यजित तांबे, ॲड. अनिल परब, शशिकांत शिंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन करत असलेल्या उपाययोजनासंदर्भात प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर पर्यटक, व्यावसायिक तसेच ट्रान्झिटमध्ये असलेल्या नागरिकांचे संदेश आल्यानंतर तत्काळ केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला. त्याचबरोबर संबंधित देशांतील भारतीय दूतावासांना सक्रिय करण्यात आले असून नागरिकांना दूतावासाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर समन्वयाची जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नागरिकांसाठी विशेष व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला असून त्यावरून येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्री महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अडकलेल्या अनेक नागरिकांशी संवाद साधला आहे. मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गावंडे यांनाही जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी दूतावासांसोबत बैठक घेऊन आवश्यक एसओपी नागरिकांपर्यंत पोहोचविल्या आहेत. या सूचनांची माहिती ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावरूनही प्रसारित करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून परत आणण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्य शासनाने महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र केंद्र सरकारने सध्या असुरक्षित हवाई वाहतुकीमुळे  ही प्रक्रिया केंद्राच्या अखत्यारितच ठेवण्याचा सल्ला दिला आहे. विविध राज्यांनी स्वतंत्र प्रयत्न केल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो, असेही केंद्राचे मत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सध्या एअर इंडियाची काही विमाने संबंधित ठिकाणी जाऊ लागली असून टप्प्याटप्प्याने नागरिकांना परत आणले जात आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत परिस्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. कुवैतमध्ये ट्रान्झिट प्रवाशांना दिलासा कुवैत येथे ट्रान्झिटमध्ये असलेल्या काही प्रवाशांना व्हिसा नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र भारतीय दूतावासाच्या प्रयत्नांमुळे त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुबईत अन्नव्यवस्था मिहीर कोटेचा यांनी दुबई येथे ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांसाठी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था सुरू केली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना या उपक्रमाचा लाभ होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत परदेशातील भारतीयांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून परत आणण्याचा अनुभव केंद्र सरकारला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे, सर्व नागरिकांना सुरक्षित परत आणले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. तेलसाठा पुरेसा, शेतमाल निर्यातीचा मुद्दा तपासणार तेलसाठ्याबाबत सध्या देशाकडे सुमारे दोन महिन्यांचा साठा उपलब्ध असल्याने तातडीने दरवाढीची भीती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र युद्धामुळे परदेशात अडकलेल्या शेतमाल निर्यातीचा प्रश्न गांभीर्याने घेतला जाईल आणि आवश्यक त्या पातळीवर हस्तक्षेप करण्याचा विचार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना पूर्ण सुरक्षिततेने परत आणू, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाच्या माध्यमातून व्यक्त केला.

पारदर्शकता, नैतिकता आणि रुग्णांच्या कल्याणासाठी आम्ही वचनबद्ध

पारदर्शकता, नैतिकता आणि रुग्णांच्या कल्याणासाठी आम्ही वचनबद्ध मुंबई : लीलावती हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरने (लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्ट – एलकेएमएमटी) सध्या काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि डिजिटल चॅनेलद्वारे प्रसारित झालेल्या दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामीकारक बातम्यांचे आरोप फेटाळले आहेत. हे सर्व दावे खोटे आहेत असे रुग्णालयाचे म्हणणे आहे. लीलावती रुग्णालय हे वैधानिक नियमांचे पालन करत कार्यरत आहे. पारदर्शकता, नैतिकता आणि रुग्णांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल होताच रुग्णावर तात्काळ तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात येतात. चॅरिटेबल ट्रस्टच्या धोरणानुसार व कायदेशीर जबाबदाऱ्यांनुसार रुग्णांवर मोफत उपचार सुरू असून कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा उपचार नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे रुग्णालयाचे स्थायी विश्वस्त  राजीव किशोर मेहता यांनी स्पष्ट केले. हॉस्पिटलची बदनामी करणाऱ्या व्यक्तींविरोधात एक हजार कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले. एक रुग्णाची आई प्रमिला चौधरी सांगतात की, माझ्या मुलाला अपघातानंतर लगेच दहिसरच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर प्लास्टिक सर्जरीसाठी लिलावती हॉस्पिटलमध्ये आणले. कोणतीही ठेव रक्कम न घेता मानवतेच्या आधारावर त्याला रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. उपचार नाकारल्याचे जे कोणी आरोप करत आहेत ते चुकीचे आहे असे त्यांनी सांगितले.

साहित्य क्षेत्रातील अशोकराव टाव्हरे यांचे योगदान उल्लेखनीय – डॉ. श्रीपाल सबनीस

साहित्य क्षेत्रातील अशोकराव टाव्हरे यांचे योगदान उल्लेखनीय – डॉ. श्रीपाल सबनीस रमेश औताडे मुंबई : पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सतत तीन वर्षे कनेरसर, मुंबई , राजगुरुनगर येथे साहित्य संमेलन आयोजित करून विविध क्षेत्रात कार्यरत राहून साहित्यासाठी कवी-लेखक अशोकराव टाव्हरे हे उल्लेखनीय योगदान देत आहेत असे मत ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी तिसऱ्या पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. दोन कवितासंग्रह, लेखसंग्रह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर मराठी व इंग्रजीत पुस्तकांचे लेखन, अनेक स्मरणिका व विशेषांकाचे संपादन करून अशोकराव टाव्हरे हे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून नावारूपास येत आहेत. समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत राहण्याचे टाव्हरे यांचे कसब व त्यांची पत्नी सुरेखा टाव्हरे यांची त्यांना असलेली साथ गेली तीन वर्षे साहित्य संमेलनात अनुभवत आहे असे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी नमुद केले. पुर- कनेरसर चे सुपुत्र व विश्व साहित्य नामदेवराव ढसाळ यांचा वारसा जतन करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी टाव्हरे गेली तीन वर्षे साहित्य संमेलनाचे यशस्वीपणे आयोजन करीत आहेत.  ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे असे सांगून डॉ. श्रीपाल सबनीस व त्यांच्या सुविद्य पत्नी कवयित्री ललिता सबनीस यांनी टाव्हरे दाम्पत्याचा  सन्मान केला.

एकनाथ शिंदेंचे मिशन दुबई

एकनाथ शिंदेंचे मिशन दुबई दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी दोन खाजगी विमान व्यवस्थांची व्यवस्था दुबईच्या फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअर दोन विमानाव्दारे केली व्यवस्था   मुंबई: इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे आखाती देशातील विमानवाहतूकसेवा पुर्णता…

माईणकरांच्या ‘कटाक्ष’ लेखसंग्रहाचे ५ मार्च रोजी दिमाखदार लोकार्पण

माईणकरांच्या ‘कटाक्ष’ लेखसंग्रहाचे ५ मार्च रोजी दिमाखदार लोकार्पण मुंबई : परखड, अभ्यासू आणि थेट भाष्य करण्यासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ राजकीय पत्रकार जयंत माईणकर यांच्या ‘कटाक्ष’ या पहिल्याच लेखसंग्रहाचे लोकार्पण गुरुवार,…

 नवीन शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे विद्यार्थी पन्नास वर्षांनंतर एकत्र

संस्थेसाठी मदतीच्या घेतल्या आणाभाका मुंबई : समाज माध्यमांची किमया घडली आणि १९७५-७६ च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे विद्यार्थी चक्क पन्नास वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. या आता सत्तरी गाठलेल्या माजी विद्यार्थ्यांनी मग संस्थेला संपूर्ण मदत करण्याच्या परस्पर कौटुंबिक संबंध प्रस्थापित करण्याच्या आणाभाका घेतल्या. आजकाल वॉट्स अप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर सर्वच जण व्यस्त असतात. हे समाज माध्यम म्हणजे दुधारी शस्त्र आहे. याचा वापर विधायक कार्यासाठी केला तर फार मोठा प्रभाव पडतो. दहिसर येथील पूर्णप्रज्ञा माध्यमिक शाळेतील १९७५-१९७६ साली नवीन शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे विद्यार्थी सुमारे पन्नास वर्षांनंतर एकत्र आले आणि त्यांनी मैत्री सभेचे आयोजन केले. बोरिवली येथे  माजी विद्यार्थ्यांसाठी ‘मैत्री सभा : शाळेतील आठवणींचा मेळा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या समारंभात शाळेतील  माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते. या समारंभात विविध क्षेत्रात  उच्च पदस्थ झालेल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा आणि  सध्या विविध सेवा संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना एकत्र बांधून परस्पर कौटुंबिक संबंध जोपासणे, व्यवसाय नेटवर्क लिंक्सद्वारे एकमेकांना जोडणे, लहान-मोठी कामे करणाऱ्या आपल्या बंधू-भगिनींना वेगवेगळ्या उंचीवर नेणे, समाजसेवेचे काम एकत्र करणे आणि शाळेतील माजी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे या उदात्त उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून मित्र डॉ. भरत वसानी, डॉ. प्रवीण पुरेचा भाटिया आणि उपेंद्र गोगरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या यशाबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. ००००

स्वराज्य स्पोर्ट्स, स्वस्तिक क्रीडा मंडळ अजिंक्य

मुलुंड क्रीडा केंद्र कब्बडी स्पर्धा मुंबई : मुलुंड (पूर्व) येथील छत्रपती संभाजी राजे मैदानात मुलुंड क्रीडा केंद्रातर्फे आयोजित कबड्डी महोत्सव २०२६ मध्ये महिला गटात कांजूरमार्ग येथील स्वराज्य स्पोर्ट्सने आणि पुरुष…

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था अनिल ठाणेकर मुंबई: इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. या संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून स्टार एअर ची दोन विशेष विमाने काल दुपारी फुजैरा एअरपोर्टवरून उड्डाण घेणार आहेत: VTGSO – संध्याकाळी ३.३० वाजता टेकऑफ, VT GSH – संध्याकाळी ४.३० वाजता टेकऑफ. या दोन्ही विमानांमधून एकूण १६४ प्रवासी आज संध्याकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत मुंबई एअरपोर्टवर दाखल होतील. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज चे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागातील इतर नागरिकांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच या मराठी नागरिकांशी संवाद साधला होता. “तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील,’ असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी अखंड संपर्क साधून या १६४ प्रवाशांना मायदेशी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

आखाती तणावाच्या काळात दुबईतील ‘मुंबई एक्सप्रेस’चा मदतीचा हात

आखाती तणावाच्या काळात दुबईतील ‘मुंबई एक्सप्रेस’चा मदतीचा हात  अडकलेल्या भारतीयांसाठी दिवसभर मोफत जेवण मुंबई : आखाती प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईतील मुंबईमूळ असलेल्या उपाहारगृहाने अडकलेल्या भारतीय नागरिक आणि पर्यटकांसाठी दिलासा…

ऐका हो ऐका…मुंबई-गोवा हायवे ३ महिन्यात होणार

मुंबई : कित्येक वर्षे रखडलेल्या मुंबई- गोवा मार्ग आता पुढील ३ महिन्यात पुर्ण करणार असल्याचे चॅलेंज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्विकारले आहे.  माणगाव व इंदापूर बायपासचा अपवाद वगळता उर्वरित कामे मे २०२६…