Category: मुंबई

Mumbai news

शिवसेना महाराष्ट्र सैनिक आघाडीची स्थापना

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध   मुंबई : राज्यात पहिल्यांदाच शिवसेना पक्षाकडून महाराष्ट्र सैनिक आघाडीची स्थापना करण्यात आली. मनोज डांगे, दत्तात्रेय पवार, कॅप्टन परशुराम शिंदे यांच्यासह अनेक निवृत्त सैनिक आणि…

ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामविरोधात धडक कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल…

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी पहिला सौरऊर्जा प्रकल्प सुरू

    मुंबई : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून…

ग्राहकांना दर्जेदार ताजी मिठाई विक्री करण्याचे आवाहन

रमेश औताडे   मुंबई : गणेशोत्सवापाठोपाठ येणारा दसरा, दिवाळी व नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई विभागीय कार्यालयामार्फत शुक्रवारी मिठाई , मावा उत्पादक व वितरकांची बैठक घेण्यात आली.…

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना मंजूर

सातारा : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटना प्रतिनिधींबरोबर चर्चा करत सुधारित पेन्शन योजना मंजूर केली. तसेच याबाबत लवकरच अध्यादेश काढण्याचेही आश्वासन दिले आहे. त्यामुळे याचा राज्यातील सुमारे १७ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार…

लाडक्या बहिणींना काँग्रेस दोन हजार रुपये देणार !

सांगलीत काँग्रेस अध्यक्ष खर्गेंची घोषणा सांगली : महाराष्ट्रातील बहीणींवर सगळ्याच राजकीय पक्षांना प्रेमाचे भरते आले आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. यामुळेच आज थेट काँग्रेसचे राष्ट्राय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे  यांनी महाराष्ट्र दौऱ्यात सांगलीतून भाषण करताना राज्यातील मुख्यमंत्री…

शिल्पकार आपटेच्या मुसक्या आवळल्या

कल्याणमधिल घरून अटक पाच दिवसांची पोलिस कोठडी राजन चव्हाण मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधिल राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या ९ महिन्यात कोसळला होता. याप्रकरणी फरार असलेला वादग्रस्त शिल्पकार जयदीप आपटेच्या…

कॅबिनेटमध्ये ‘एकच वादा’वरून लाडक्या बहीणींचे ‘भाऊ’ भिडले

स्वाती घोसाळकर मुंबई : लाडकी बहीण कुणाची यावरून सध्या महायुतीत जोरदार श्रेयवादाची लढाई सुरु आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री हा शब्द वगळून ‘माझी…

आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाची बॅडमिंटन स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी!!

मुंबई : विद्यापीठ क्रीडा विभागातर्फे ठाणे विभागीय आंतर महाविद्यालयीन मुले बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच के एम अग्रवाल महाविद्यालय, कल्याण येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ठाणे विभागातील ३३ महाविद्यालयातील तब्बल २०१…

तर अनुसूचित जाती जमाती समूह विखुरला जाईल  –  अण्णासाहेब कटारे

रमेश औताडे मुंबई : सर्वोच्य न्यायालयाच्या खंडपीठाने अनुसूचित जाती-जमाती मध्ये वर्गीकरण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जाती-जमाती समूहामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे वाद होतील व अनुसूचित जाती जमाती समूह विखुरला जाईल असे मत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. देशातील प्रस्थापित, सत्ताधारी व विरोधी पक्ष मागासवर्गीय मतांवर डोळा ठेवून राजकारण करतात मात्र निर्णयाबाबत ते मूग गिळून बसल्याचे चित्र  आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीची जनगणना झालेली नाही मग वर्गीकरण कशाच्या आधारावर होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी अण्णासाहेब कटारे यांनी  केली. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरू आहे सर्व स्तरातील लोक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे . मुंबईमध्ये पक्षाची ताकत भक्कमपणे उभी करण्यासाठी पक्षाने जुने जाणते रिपब्लिकन नेते अनंत पांचाळ यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईमध्ये पक्ष बळकट होण्यास मदत होईल असा विश्वास कटारे यांनी अनंत पांचाळ यांच्या निवडी प्रसंगी केला.