Category: ठाणे

Thane news

कळवा येथे १५ एप्रिलला रंगणार ‘वन्यजीव – निसर्ग – साहस’ विशेष अनुभवयात्रा

राजाराम साळवी गौरव विचारमंच’ आयोजित व्याख्यानमालेत ‘वन्यजीव प्रेमी’ व मान्यवरांची विशेष उपस्थिती ठाणे : ‘राजाराम साळवी गौरव विचारमंच’ तर्फे आयोजित व्याख्यानमालेचे ‘तिसरे पुष्प’ येत्या बुधवार, १५ एप्रिलला गुंफले जाणार आहे. ‘वन्यजीव – निसर्ग – साहस’ या अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित हा सोहळा मनीषा विद्यालय व जुनिअर कॉलेज, सभागृह , कळवा येथे दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत संपन्न होणार आहे. या तिसऱ्या पुष्पाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ एक व्याख्यान नसून ती एक संपूर्ण ‘अनुभवयात्रा’ असणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध वनसंपदेचे दर्शन घडविणारे भटकंती छायाचित्र प्रदर्शन, वन्यजीव अभ्यासकांशी थेट संवाद साधणारा लाईव्ह टॉक शो, थरारक साहसी मोहिमांचा स्लाईड शो आणि वन तज्ञांचे विशेष व्याख्यान असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शैलेंद्र पाटील, वन अभ्यासक हे ‘वन्यजीव भटकंती, साहस व निसर्ग फोटोग्राफी’ या विषयावर आपले अनुभव मांडतील. प्रदीप भाऊ साळवी (संचालक, एकलव्य रायफल व आर्चरी क्लब, कासणे) हे ‘वन्यप्राणी संवर्धन, निसर्ग साहस व ग्रामीण युवाशक्ती’ या विषयावर संवाद साधतील. सौ. सुरेखा मोरे या टॉक शोच्या माध्यमातून संवादक/मुलाखतकार म्हणून तज्ञांशी संवाद साधतील. सचिन रेपाळे (उपवनसंरक्षक, ठाणे वनविभाग, महाराष्ट्र राज्य) हे वन्यजीव संरक्षण व वन कायद्यांविषयी विशेष मार्गदर्शन करतील.  दा. कृ. सोमण (प्रसिद्ध खगोलशास्त्र अभ्यासक व पंचांगकर्ते) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.  प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी साधना वझे यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याचे आयोजन राहुल साळवी (संयोजक अध्यक्ष) आणि  प्रदीप साळवी (कार्याध्यक्ष) यांनी केले आहे. या उपक्रमाला मनीषा एज्युकेशन ट्रस्ट, कळवा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद (ठाणे), शोभा वेल्फेअर असोसिएशन आणि मैत्रिण ग्रुप हे सहआयोजक म्हणून जोडले गेले आहेत.

दिवंगत शारदा चन्ने यांचे निधन

ठाणे : पाटबंधारे विभागातील निवृत्त कर्मचारी जीवन चन्ने यांच्या पत्नी शारदा जीवन चन्ने यांचे सोमवार दिनांक ६ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले‌.मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्ष…

कळवा येथे १५ एप्रिलला रंगणार ‘वन्यजीव – निसर्ग – साहस’ विशेष अनुभवयात्रा

‘राजाराम साळवी गौरव विचारमंच’ आयोजित व्याख्यानमालेत ‘वन्यजीव प्रेमी’ व मान्यवरांची विशेष उपस्थिती ठाणे – ‘राजाराम साळवी गौरव विचारमंच’ तर्फे आयोजित व्याख्यानमालेचे ‘तिसरे पुष्प’ येत्या बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी गुंफले जाणार आहे. ‘वन्यजीव – निसर्ग – साहस’ या अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित हा सोहळा मनीषा विद्यालय व जुनिअर कॉलेज, सभागृह , कळवा येथे दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत संपन्न होणार आहे. या तिसऱ्या पुष्पाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ एक व्याख्यान नसून ती एक संपूर्ण ‘अनुभवयात्रा’ असणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध वनसंपदेचे दर्शन घडविणारे भटकंती छायाचित्र प्रदर्शन, वन्यजीव अभ्यासकांशी थेट संवाद साधणारा लाईव्ह टॉक शो, थरारक साहसी मोहिमांचा स्लाईड शो आणि वन तज्ञांचे विशेष व्याख्यान असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शैलेंद्र पाटील (वन अभ्यासक, Rainbow Adventure Group  ) हे ‘वन्यजीव भटकंती, साहस व निसर्ग फोटोग्राफी’ या विषयावर आपले अनुभव मांडतील. प्रदीप भाऊ साळवी (संचालक, एकलव्य रायफल व आर्चरी क्लब, कासणे) हे ‘वन्यप्राणी संवर्धन, निसर्ग साहस व ग्रामीण युवाशक्ती’ या विषयावर संवाद साधतील. सौ. सुरेखा मोरे या टॉक शोच्या माध्यमातून संवादक/मुलाखतकार म्हणून तज्ञांशी संवाद साधतील. सचिन रेपाळे (उपवनसंरक्षक, ठाणे वनविभाग, महाराष्ट्र राज्य) हे वन्यजीव संरक्षण व वन कायद्यांविषयी विशेष मार्गदर्शन करतील.  दा. कृ. सोमण (प्रसिद्ध खगोलशास्त्र अभ्यासक व पंचांगकर्ते) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. श्रीमती साधना वझे (प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी   Animal Conservation/Rehabilitation    ) यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याचे आयोजन राहुल साळवी (संयोजक अध्यक्ष) आणि  प्रदीप साळवी (कार्याध्यक्ष) यांनी केले आहे. या उपक्रमाला मनीषा एज्युकेशन ट्रस्ट, कळवा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद (ठाणे), शोभा वेल्फेअर असोसिएशन आणि मैत्रिण ग्रुप हे सहआयोजक म्हणून जोडले गेले आहेत. ०००००००

पालिकेचे दुर्लक्ष की व्यवस्थेचा अभाव?

Slug –  दिवा स्टेशन परिसरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर दिवा(आरती परब): दिवा शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, पूर्वेकडील मधल्या ब्रिजजवळील प्रवेशद्वारासमोर कचऱ्याचा मोठा ढीग साचल्याचे चित्र समोर आले आहे. सकाळी कामावर जाणारे नागरिक तसेच स्थानिक रहिवासी या ठिकाणी कचरा टाकत असल्याने परिसरात कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. स्थानिक दुकानदारांच्या मते, या भागातील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. परिणामी, कचऱ्याचे ढीग वाढून अक्षरशः डोंगर तयार झाला असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या मार्गावरून कोकणात जाणारे प्रवासी, तसेच रोज वसई, पनवेल आणि रोहा येथे कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही समस्या अधिकच वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित ठिकाणी दररोज कचरा उचलून परिसर स्वच्छ ठेवावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. ०००००००

जनगणनेत धर्म – जात नोंदवणे अनुसूचित जातींची संविधानिक गरज !

माजी सनदी अधिकारी श्याम तागडे यांचे प्रतिपादन मुंबई: मुळात आरक्षण हे जाती आधारित असून अनुसूचित जातींची जनगणना ही त्यासाठीची अनिवार्यता आहे, असे सांगतानाच धर्म आणि जातीची नोंद करण्यास त्यांनी नकार देणे म्हणजे अनुसूचित जाती या प्रवर्गातून स्वतः हून बाहेर पडणे ठरेल, असा धोक्याचा इशारा माजी आयएएस अधिकारी श्याम तागडे यांनी आज मुंबईत बोलताना दिला. ते गृह खात्याचे माजी अप्पर मुख्य सचिव आणि सामाजिक न्याय विभागाचे माजी प्रधान सचिव आहेत. तसेच ते विदर्भातील ‘प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान’चे संस्थापक असून प्रख्यात धम्म प्रशिक्षक आहेत. त्यामुळे जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होताच त्यांनी मांडलेल्या या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महात्मा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त श्याम तागडे यांनी शनिवारी फोर्टमध्ये मुंबईतील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची एक विशेष बैठक बोलावली होती. त्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीला शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, दलित पँथरचे नेते सुरेश केदारे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, विचारवंत सुनील कदम, द बुद्धिस्ट – शेड्यूल्ड कास्ट मिशन ऑफ इंडियाचे संयोजक अच्युत भोईटे , राज्य सरकारचे माजी उप सचिव सी. के. जाधव , बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर, प्रा.  प्रियंका गायकवाड, पंचशील सेवा संघाचे संजय शिंदे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. जनगणना : डॉ आंबेडकर यांचे वरदान आरक्षणाच्या रूपाने लोकसंख्येच्या प्रमाणात दिलेला प्रतिनिधित्वाचा संविधानिक अधिकार आणि त्यासाठी जाती आधारित जनगणना हे अनुसूचित जातींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले सर्वात मोठे वरदान आहे. बौद्ध समाजाने ते गमावण्याचा आत्मघात करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. केवळ जातवार जनगणना रखडल्यामुळे ओबीसींना हक्काचा आरक्षणाचा टक्का मिळण्यापासून वंचित राहावे लागले आहे, याकडे लक्ष वेधून तागडे म्हणाले की,  त्यावरून बौद्ध समाजाने अनुसूचित जातींसाठी जनगणनेचे महत्त्व गंभीरपणे लक्षात घेण्याची गरज आहे. अनुसूचित जातीचा माणूस हा हिंदू, शीख, बुद्ध या तीनपैकी कुठल्याही धर्माचा असला तरी तो आरक्षणाचा हकदार असतो. तो लाभ मिळवण्यासाठी धर्म – जातीची नोंद त्यांनी जनगणनेत करणे ही संविधानिक आणि प्रशासकीय गरज आहे, असे त्यांनी सांगितले. धार्मिक अस्मिता आणि संविधानिक अधिकार यांची गल्लत करू नका केंद्रातील सवलतींना प्रदीर्घ काळ मुकावे लागल्यामुळे बौद्ध समाजाचे गेल्या ६५ वर्षांत आधीच अतोनात नुकसान झालेले आहे, असे सांगून तागडे म्हणाले की, धार्मिक अस्मिता आणि लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्वाच्या अधिकारासाठी  संविधानिक गरजांची पूर्तता या दोन भिन्न गोष्टी आहेत. बौद्धांनी भावनावश होवून त्यांची गल्लत करता काम नये. आरक्षणाचा स्वेच्छेने त्याग करणार ? केंद्र आणि राज्य सरकार आरक्षणाचे उप वर्गीकरण करण्याच्या भूमिकेत असून काही जाती त्यासाठी आग्रही आहेत. अशावेळी बौद्ध समाजाने जनगणनेवेळी अनुसूचित जाती या प्रवर्गातून बाहेर पडणे म्हणजे आरक्षणाचा स्वेच्छेने त्याग केल्याचेच मानले जाईल, असा निर्वाणीचा इशाराही तागडे यांनी बैठकीतून दिला आहे.

महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दीवर्षाचा शुभारंभ

विधान भवनात अभिवादन मुंबई, (प्रतिनिधी ) : महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दीवर्ष प्रारंभानिमित्त आज शनिवार, ११ एप्रिल, २०२६ रोजी विधान भवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव  शिवदर्शन साठ्ये व उप सचिव  विजय कोमटवार, उपसभापतींचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक आणि जनसंपर्क अधिकारी  निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 प्रशांत – समृद्धीला अग्र मानांकन

 राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने ६० वी सिनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२६-२०२७ , १३ ते १६ एप्रिल २०२६ दरम्यान नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, सेक्टर १-ए,…

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सध्या एमडीचा सुळसुळाट

ठाणे: येथे आणि पालघर जिल्ह्यामधे सध्या एमडीचा (मेफेड्रीन) बोलबाला आहे.  पूर्वी या जिल्ह्यांमधे गांजा, चरस, अफू, कोकेन व नशा करणाऱ्या इंजेक्शनची चलती होती. आता मात्र नशेखोरांना एमडीची चटक लागली आहे. इतर…

 कळंब येथे महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

 तहसीलदार धनंजय जाधव आणि उप अधिक्षक भूमि अभिलेख नितिन आटाळे यांची प्रमुख उपस्थिती कर्जत : (अशोक गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१’ अंतर्गत शुक्रवार, १० एप्रिलला महसूल मंडळ कळंब अंतर्गत प्रगती माध्यमिक विद्यालय कळंब येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा समाजकल्याण सभापती नारायण डामसे, पंचायत समिती सदस्य रेश्मा जोशी, तहसीलदार धनंजय जाधव, उप अधिक्षक भूमि अभिलेख नितिन आटाळे, निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंडळ अधिकारी कळंब, संतोष जांभळे यांनी केले . यावेळी नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी तसेच मंडळ कळंब अंतर्गत ग्राम महसुल अधिकारी निलेश पवार, मोहिनी भडांगे, आकाश निकाळे, रणजीत कोळेकर, शशिकांत हुलगुंडे, दर्शना कांबळे, तहसील व भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय सेवांशी संबंधित प्रश्नांचा तात्काळ निपटारा करण्यावर भर देण्यात आला. शिबिरामध्ये नागरिकांना ७/१२ उतारे, ८-अ उतारे तसेच विविध दाखले यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय ७/१२ अद्यावत करणे, ई-मोजणी, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, अकृषिक सुधारणा मार्गदर्शन, पीएम किसान योजना, दुय्यम शिधापत्रिका वाटप, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, आरोग्य तपासणी, मोफत डिजिटल सातबारा, वनपट्ट्यावर सातबारा नावे नोंद करणे, लक्ष्मी मुक्ती योजना, प्रॉपर्टी कार्ड आदी विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा होत असून शासनाच्या “एका दिवसात डिलिव्हरी सेवा” उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शासनाचा हा उपक्रम सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ०००००

 लाकूडचोरांना वन खात्याचा आशीर्वाद

   मुरबाड पश्चिम राखीव वनक्षेत्रात वारंवार राजरोस वृक्षतोड राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील मोहघर वनपरीमंडळ पश्चिम क्षेत्रात राखीव वनांची राजरोसपणे वारंवार तोड होत असून वनखात्याच्या संगनमताने ही तोड होत असल्याची चर्चा आहे. मुरबाडच्या पश्चिम क्षेत्रात मोहघर राउंडमध्ये पाटगाव परिसरात वनजमिनीवरील खैर जातीचे वृक्ष मोठया प्रमाणात तोडले गेले आहेत. मागील सात आठ महिन्यापुर्वी याच ठिकाणी शेकडो खैर तोडून ते चोरट्यांनी विकले. आता याच ठिकाणी पुन्हा खैर तोडले आहेत.वनखात्याच्या संगनमताने ही तोड होत असल्याची परिसरात चर्चा आहे. हे खैर चोरटे अधिकाऱ्यांना माहित आहेत, अशीही वनविभागात व परिसरात दबक्या आवाजात चर्चा आहे. हा खैर चक्क कटिंग मशीन लावून राजरोसपणे तोडलेला आहे.या कटिंग मशीन लाकूडतोड व्यवसायीकांकडे मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे हा खैरचोर लाकूडतोड व्यवसायिक असावा असा अंदाज आहे. त्यात खैर प्रकाराची वृक्षतोड प्रकरणे कुणी केली आहेत. याचा शोध घेतल्यास या खैर चोरांचा तपास लागू शकतो. मागील वेळी हा खैरचोर पकडला होता, मात्र मोठी तडजोड करुन चोरटयांना सोडण्यात आले. मुरबाड मोहघर वनपरीमंडळ पश्चिम क्षेत्रात राखीव वनांची राजरोसपणे वारंवार तोड होत असून वनखात्याच्या संगनमताने ही तोड होत असल्याची चर्चा आहे.