Category: ठाणे

Thane news

 गावे वसई-विरार महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याला ग्रामस्थांचा विरोध

वसईतील २९ गावांचा सुनावणीवर बहिष्कार वसई : महाराष्ट्र शासनाने १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसुचनेच्या अनुषंगाने वसईतील २९ गावे वसई विरार महानगरपालिकेत पुनशः समाविष्ट करण्याबाबतची प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली असुन सदर प्रक्रियेवर २९ गावांच्या बहुसंख्य ग्रामस्थांनी सदर प्रक्रियाच असंविधानिक व बेकायदेशीर असुन त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली स्थानिक प्रशासकीय संस्था सद्या अस्तित्वात नसल्याचा आक्षेप घेण्यात आला असून, याप्रकरणी आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष जॉन परेरा यांनी या अन्यायाविरुद्ध आत्महत्या करण्याचा इशाराच जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या ग्रामस्थांच्या वतीने काँग्रेस नेते, तथा महाविकास आघाडीचे वसईतील पराभूत उमेदवार विजय पाटील, शिवसेना (उबाठा) चे सचिव मिलिंद खानोलकर, जनआंदोल समितीच्या नेत्या डॉमिणिका डाबरे, विनायक निकम, पायस मच्याडो, आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष जॉन परेरा, कुमार राऊत व इतर सक्रिय पुढारी व कार्यकर्ते यांनी मा. जिल्हाधिकारी पालघर यांना ड. सुमित डोंगरे यांच्या माध्यमातुन कायदेशीर नोटीस (Legal Notice) बजावण्यात आली आहे. २९ गावे महानगरपालिकेत पुनशः समाविष्ट करण्यासाठी अनिवार्य असलेली कन्सल्टेशन (सल्ला मसलत) ची प्रक्रिया राबविण्यासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात असणे गरजेचे असुन सदर २० गावांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची स्थानिक प्रशासकीय संस्था आज रोजी अस्तित्वात नाही. कायदेशीररित्या सर्वांचे म्हणणे विचारात घेतले जावे-आमदार स्नेहा पंडित-दुबे वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळणे हा निर्णय कायदेमंडळ आणि कार्यपालिकेचा असून, यात सेवा न्यायपालिकेला अधिकार नाही. २००९ साली वसईचे प्रतिनिधित्व करणारे आमदार विवेकभाऊ पंडित यांनी आंदोलनाद्वारे पालिकेतून गावे वगळायला शासनास भाग पाडले. नंतर हा विषय न्यायालयात गेला. तेथेही त्यांनी हीच भूमिका मांडली. आणि न्यायालयानेही १२ त्यानंतर हा निर्णय सरकारचा म्हणून निकाल दिला. दरम्यानच्या काळात वसईतील प्रतिनिधी बदललेले होते. आता मी नव्यानेच निवडून आलेली असून, मी गावांच्या मुद्यावर निवडणूक लढवलेली नव्हती. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला विद्यमान परिस्थितीत गावातील लोकांचे म्हणणे काय आहे? हे नीट समजून घेतले पाहिजे. हा निर्णय पूर्णतः राज्य सरकारच्या आखत्यारीतला आहे. या सुनावणीला मुदत कमी दिली गेली. आम्ही तक्रारी केल्या होत्या, परंतु त्यात आमची नावे आलेली नाहीत, अशा जनतेच्या तक्रारी माझ्याकडे आलेल्या असून, त्यांना पुरेशी मुदतवाढ दिल्या जावी, कायदेशीररित्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्या जावे, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. ०००००

ठाण्यात रशियन तरुणींचे मायाजाल

ठाणे : ठाण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट जोमाने वाढतोय हे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून समोर येत आहे. ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात वागळे स्टेट पोलीस पथकाने छापा मारून तीन रशियन व एका…

श्री माँ विद्यालयाच्या रौप्य महोत्सवातील 20 वी आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धा संपन्न

ठाणे : श्री माँ ट्रस्ट संचालित श्री माँ विद्यालय, ऑफ घोडबंदर रोड, पातलीपाडा, ठाणे (प.) या ठिकाणी शनिवारी आंतरशालेय स्तरावर २० व्या वार्षिक लोककला नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले.   ग्रामीण व शहरी…

आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धेचे आयोजन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धा संस्थेच्या सभागृहात आयोजित केली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२५ या दिवशी सकाळी ९.३० वाजता…

 मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत इंदू इन्फ्राच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

 अभिनेते पारस कलनावत, तन्मय फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला उद्घाटन सोहळा   पनवेल : उलवे तसेच पुष्पकनगर येथे आपल्या बांधकाम व्यवसायाची झेप घेवून नव उद्योजक अखिल यादव यांनी यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून भरारी घेतली आहे. उलवे नोड मधील सुप्रसिद्ध इन्सिग्निया शगुन रिॲलिटी या टॉवरच्या ११ व्या मजल्यावर अखिल यादव यांनी आपल्या आईच्या नावाने तयार केलेल्या इंदू इंफ्रा या कंपनीच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस आणि विविध वेबसिरीज आणि सिरियल्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे युवा अभिनेते पारस कलनावत यांच्या हस्ते या कार्यालयाचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. उलवे नोड परिसरात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवून जनतेशी नाळ जोडणारा असा सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण आपल्यापरीने यथाशक्ती समाजसेवा करीत आज बांधकाम व्यवसायातही प्रगत होत असून त्याने असेच पुढे जात राहावे, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी अखिल यादव यांना दिल्या. सदर उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी अखिल यादव यांना भेटून त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छांचा वर्षाव केला. 0000

ज्ञानपीठ विद्यालयाचा विज्ञान प्रकल्पाला प्रथम क्रमांक

ठाणे : ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी संचलित, ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मनोरमा नगर , ठाणे (पश्चिम) या विद्यालयातील प्राथमिक विभागाचा  विज्ञान प्रकल्पाला  ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय  विज्ञान प्रदर्शन 2024 –…

वैशाली माडे फाऊंडेशन प्रस्तुत ‘नाईन्टीज पहला नशा’ हा गाण्यांचा अनोखा कॉन्सर्ट

अनिल ठाणेकर ठाणे : संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय संध्याकाळ साजरी करण्यासाठी, वैशाली माडे फाऊंडेशन प्रस्तुत  ‘नाईन्टीज पहला नशा: द एरा ऑफ लव्ह अँड रिदम’ या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २० डिसेंबरला  रात्री ८:३० वाजता ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सादर होणार आहे. यावेळी वैशाली माडे आणि अन्य गायक ९०च्या दशकातील सुरेल गाणी सादर करणार असून सरत्या वर्षात संगीतप्रेमींना एक अनोखा नजराणा अनुभवायला मिळणार आहे. वैशाली माडे, ज्यांनी आपल्या मोहक आवाजाने लाखो श्रोत्यांची मने जिंकली आहेत. त्यांचा आवाज केवळ मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील गाजला आहे. या कार्यक्रमात वैशाली माडे यांच्यासोबत सहगायक म्हणून मनीषा जांबोटकर आणि प्रेमकुमार यांचा सहभाग असेल, ज्यामुळे ही संगीत मैफल अधिकच रंगतदार ठरेल. तसेच संगीत संयोजनाची धुरा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अविनाश चंद्रचूड यांनी सांभाळली आहे. या मैफलीचे मुख्य आकर्षण म्हणजे ३५ वादकांच्या भव्य ऑर्केस्ट्राचा समावेश. तसेच सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्या उपस्थितीने या मैफलीला चारचांद लागणार आहेत. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन शिरीष पवार, अनुसया आर्ट्स प्रॅाडक्शन्सने केले आहे. वैशाली माडे म्हणतात, “‘पहला नशा’ हा केवळ एक संगीत कार्यक्रम नाही, तर ९०च्या दशकातील प्रेम, आनंद आणि मैत्रीच्या आठवणींना उजाळा देणारा एक जादुई अनुभव आहे. त्या काळातील गाणी आपल्या भावनांना अनोख्या भाषेत व्यक्त करायचे आणि ती आजही आपल्या हृदयात जिवंत आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू हा आहे की, यातून जमा होणारी रक्कम आम्ही काही सामाजिक संस्थांना मदत म्हणून देणार आहोत. या फाऊंडेशची ही सुरूवात असून यापुढे असे अनेक कार्यक्रम करून त्यातून मिळणारी रक्कम सामाजिक संस्थांना देण्याचा आमचा मानस आहे.’’ ००००

कायदेतज्ञ रमाकांत दत्तात्रय ओवळेकर स्मरणार्थ पुरस्कार सोहळा संपन्न

ठाणे : कायदेतज्ञ रमाकांत दत्तात्रय ओवळेकर स्मरणार्थ पुरस्कार सोहळा-2024 नुकताच डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निरंजन डावखरे, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश…

जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रेल्वे, पोस्ट ऑफिसमधला कार्यानुभव

नीलम शेख ठाणे : विद्या प्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला आणि ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), ठाणे येथील बी.कॉम (लेखा आणि वित्त) (BAF) विभाग यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत बुधवार ११ डिसेंबरला एक नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रम राबविला. हिंदी आणि मराठी भाषेचा दैनंदिन कामकाजातील वापर  विद्यार्थ्यांना समजावा यासाठी  प्रा. श्र सुदाम अहिरराव आणि प्रा.  जीवन माळी यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रेल्वे स्टेशन अनाऊंसमेंट सेक्शन आणि पोस्ट ऑफिस येथे होणारा भाषेचा कामकाजातील उपयोग यासाठी तिथे अभ्यास भेटीचे आयोजन केले. प्रभावी सार्वजनिक घोषणा आणि रेल्वेच्या कामकाजात सुरळीतपणे संवाद सुरु राहावा यासाठी हिंदी भाषेचे असणारे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. पोस्ट ऑफिस कार्यालयात पत्रव्यवहार आणि सार्वजनिक संवादासाठी मराठी हे महत्त्वाचे माध्यम कसे काम करते याबद्दल तेथील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. BAF विभागाच्या समन्वयिका डॉ. नीलम शेख यांनी देखील या अनोख्या कार्यक्रमाची संकल्पना आणि अंमलबजावणी करण्यात मोलाची भूमिका बजावली. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळाली.

उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने दिली धडक; मुंब्रा बायपासवरील घटना

मुंब्राःयेथील बायपास रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला.गुजरात वरुन मुंब्रा बायपास मार्गे ट्रक मधून कर्जतकडे २८ टन रेती घेऊन चाललेल्या ट्रक चालकाचा…